Tag: अल्पवयीन मुलगा बेपत्ता

  • ballarpur teenager missing । बल्लारपूरचा १७ वर्षीय रणजित बेपत्ता! ५ दिवसांपासून शोध सुरू, पालकांची CID चौकशीची मागणी

    ballarpur teenager missing

    ballarpur teenager missing : चंद्रपूर – बल्लारपूरचा अल्पवयीन तरुण रणजित निषाद गेल्या पाच दिवसांपासून राजुरा तहसील मधील गौरी सास्ती परिसरातील गुप्ता कोळसा वॉशरी वेकोली परिसरातून त्याच्या मित्रांसह रात्री फिरायला गेला होता आणि तो परतला नाही. त्यामुळे त्याच्यासोबत काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचा कुटुंबीयांना संशय आहे.

    या संदर्भात मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिस प्रशासनाकडे बेपत्ता मुलाचा शोध घेण्याची किंवा सीआयडीकडून प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी बेपत्ता मुलाच्या पालकांनी पत्रकार परिषदेद्वारे पोलिस प्रशासनाला केली आहे.

    स्मार्ट प्रीपेड मीटरचा वाद, आप मैदानात

    बेपत्ता अल्पवयीन मुलाची आई राजाराणी आणि वडील दिनेश यांनी सांगितले की, राजुरा तहसीलमधील बावापूर कडोली मानोली कोलगांव येथील परिसराजवळ गुप्ता वॉशरी आणि वेकोली कोळसा खाणी आहेत, जिथे रात्रीच्या वेळी वाहतूक वाहनांमधून वाहनांच्या बॅटरी आणि डिझेलची चोरी अनेक वेळा होते. त्याचप्रमाणे, ८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११.3० वाजता, बल्लारपूर येथील रहिवासी रणजित निशाद उर्फ कट्टाणी, वय १७, त्याच्या ७ मित्रांसह बाहेर गेला आणि परतला नाही. family press conference

    रणजितचा मोबाईल दाऊद जवळ, संशय बळावला?

    दरम्यान, दुस_या दिवशी, रणजितसोबत गेलेल्या तरुणांना चोरीच्या आरोपाखाली राजुरा पोलिसांनी अटक केली. त्यात रणजित निशाद त्यांच्यात नव्हता. परंतु त्याचा मोबाईल फोन दाऊद नावाच्या मुलाने राजुरा पोलिसांना दिला. या आधारे, रणजितसोबत गेलेल्या तरुणांनी त्याच्याशी काहीतरी चुकीचे केले आहे असा कुटुंबाचा संशय आहे. या संदर्भात, पोलिसांनी बेपत्ता मुलाला शोधून न्याय द्यावा किंवा सीआयडी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.


    पत्रकार परीषदेला रणजितची आई राजाराणी, वडील दिनेश निशाद आणि भाऊ संजय निशाद, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे आणि इतर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.