Chandrapur ZP president reserved for SC woman
Chandrapur ZP president reserved for SC woman : चंद्रपूर – वर्ष २०२२ नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाना मुहूर्त मिळाला नाही, नुकतेच सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागल्यावर निवडणुकीची लगबग सुरु झाली. आज १२ सप्टेंबर रोजी राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. first SC woman chairperson for Zilla Parishad Chandrapur history
पंजाब राज्यात अस्मानी संकट, चंद्रपुरातील मुस्लिम बांधवांचा मदतीचा हात
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला म्हणून घोषित करण्यात आले, चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर वर्ष १९६२ पासून आतापर्यंत २४ अध्यक्ष विराजमान झाले आहे.
वर्ष १९६२ ते वर्ष २०२२ पर्यंत हे होते अध्यक्ष
- अब्दुल शफी कार्यकाळ – १२ ऑगस्ट १९६२ ते ११ ऑगस्ट १९६७, पुन्हा वर्ष १९६७ ते १३ सप्टेंबर १९७२
- वामनराव गड्डमवार कार्यकाळ – १४ सप्टेंबर १९७२ ते २० जून १९७९
- देवराव मुसळे कार्यकाळ – २१ जून १९७९ ते १० एप्रिल १९८०
- सुभाष धोटे – ११ एप्रिल १९८० ते २४ एप्रिल १९८०
- राजाभाऊ जोगी – २५ एप्रिल १९८० ते ११ ऑगस्ट १९८०
- सुभाष धोटे – १२ ऑगस्ट १९८० ते १ सप्टेंबर १९८०
- अरुण तुम्पल्लीवार २ सप्टेंबर १९८० ते २५ ऑगस्ट १९८२
- प्रशासकीय कालावधी – २६ ऑगस्ट १९८२ ते २१ मार्च १९८२
- उमाजी बगडे – २१ मार्च १९९२ ते १ डिसेम्बर १९९२
- चंद्रकांत गोहोकार – २ डिसेम्बर १९९२ ते ३० डिसेम्बर १९९२
- प्रकाश पाटील मारकवार – ३१ डिसेम्बर १९९२ ते २१ डिसेम्बर १९९५
- दिगंबर गुरकुडे – २६ डिसेम्बर १९९५ ते ८ फेब्रुवारी १९९६
- प्रकाश पाटील मारकवार – ९ फेब्रुवारी १९९६ ते २० मार्च १९९७
- एम.के. परचाके – २१ मार्च १९९७ ते २० मार्च १९९८
- पी.एस.गावंडे – २१ मार्च १९९८ ते २१ मार्च १९९९
- सुधाकर कुंदोजवार – २१ मार्च १९९९ ते २० मार्च २००२
- डॉ. निळकंठराव काळे – २१ मार्च २००२ ते १८ मार्च २००५
- वैशाली वासाडे – १९ मार्च २००५ ते २० मार्च २००७
- संतोषसिंह रावत – २१ मार्च २००७ ते २५ नोव्हेंबर २००९
- सतीश वारजुरकर – २६ नोव्हेम्बर २००९ ते २० मार्च २०१२
- संतोष कुमरे – २१ मार्च २०१२ ते २० सप्टेंबर २०१४
- संध्याताई गुरनुले – २१ सप्टेंबर २०१४ ते २० मार्च २०१७
- देवराव भोंगळे – २१ मार्च २०१७ ते ४ जानेवारी २०२०
- संध्याताई गुरनुले – ५ जानेवारी २०२० ते २० मार्च २०२२
वर्ष १९६२ ते वर्ष २०२२ या कालावधीत चंद्रपूर जिल्हा परिषदेत फक्त तीन वेळा महिला अध्यक्षपदी विराजमान होत्या, आता प्रथमचं अनुसूचित जाती महिला वर्गाला आरक्षण मिळाल्याने राजकीय हालचाली सुरु झाल्या आहे. सध्याचं पक्षीय वातावरण बघता जिल्हा परिषद निवडणुकीत चांगलीच चुरस बघायला मिळणार आहे. Chandrapur district council president reservation SC woman announced