Tag: vulture conservation project Maharashtra

  • vulture conservation project Maharashtra । ताडोबात गिधाडांची दुसरी तुकडी दाखल, प्रकल्पाचा नवा टप्पा

    vulture conservation project Maharashtra

    vulture conservation project Maharashtra : चंद्रपूर:पूर्णपणे नामशेष होत असलेल्या संकटग्रस्त प्रजातीला पूर्नस्थापित करण्याकरीता पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची (Gyps bengalensis) दुसरी तुकडी आज गुरूवारी (24एप्रिल) ला जटायू संवर्धन प्रकल्प अंतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा वनपरिक्षेत्रातील बोटेझरी येथील प्री-रिलीज पक्षीगृहात सोडण्यात आली. पांढऱ्या पाठीचे हे गिधाडे हरियाणामधील गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र (VCBC) येथून स्थानांतरित करण्यात आले आहेत. Tadoba vulture release news

    जननी शिशु योजना ठप्प होण्याच्या मार्गावर, खासदार धानोरकर यांनी घेतली दखल


    या दुसऱ्या तुकडीत पाच गिधाडांचा समावेश असून त्यामध्ये तीन नर व दोन मादी आहेत. प्रत्येक गिधाडाचे स्वतंत्र ओळख क्रमांक व वय नोंदवलेले आहे. नर गिधाडांमध्ये F24 (वय ६ वर्ष), N16 (वय 2 वर्षे) आणि N77 (वय 1.4 वर्षे) यांचा समावेश आहे, तर z.25 (वय 6 वर्ष) व z 34 (वय 3 वर्षे) मादी गिधाडे आहेत.
    हा प्रकल्प महाराष्ट्र वन विभाग व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. पक्षीगृहात सोडण्यात आलेली गिधाडे सध्या चांगल्या प्रकृतीत असून, त्यांच्या वर्तणूक व हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. Jatayu vulture project India

    Tadoba vulture release news


    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा वनपरिक्षेत्रातील बोटेझरी येथील प्री-रिलीज पक्षीगृहात ही दुसरी तुकडी सोडण्यात आली आहे. या आधी 2024 मध्ये 10 गिधाडांची पहिली तुकडी सोडण्यात आली होती, ज्यापैकी दोन गिधाडे n 10 आणि j 74 जिवंत आहेत. सध्या या परिसरात पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची नैसर्गिक लोकसंख्या अस्तित्वात नाही. त्यामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये सुरु असलेला हा प्रकल्प संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल ठरत आहे. या परिसरातून पूर्णपणे नामशेष झालेल्या या अत्यंत संकटग्रस्त प्रजातीला पुन्हा स्थापन करण्याचे उदिष्ठ्य या उपक्रमामागे आहे.


    प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव, BNHS चे अध्यक्ष प्रविणसिंह परदेशी, BNHSचे संचालक किशोर रिठे आणि ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. डॉः श्रवण सिंह, डॉ. काझवीन उमीगर, हेमंत बाजपेयी, मयंक बर्डे, मनन महादेव, कोळसाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुंदन काटकर व त्यांच्या चमूने गिधाडांची सुरक्षित वाहतूक व पक्षीगृहात सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली.