Tag: tukum accident

  • road accident news in Chandrapur today । खाकीच्या स्वप्नांसाठी झटणाऱ्या मुलीला काळाने गाठले…चंद्रपुरात भीषण अपघात

    road accident news in Chandrapur today

    road accident news in Chandrapur today : चंद्रपूर शहरातील तुकुम भागात आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने धावणाऱ्या हायवा ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ही गंभीर दुर्घटना घडली. या अपघातात २२ वर्षीय सानिका कुमरे नामक मुलीचा जागीच मृत्यू झाला तर काजल आत्राम ही गंभीर जखमी झाली सोबतच, रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

    अपघात इतका भीषण होता की, ट्रक थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका मोठ्या दुकानात घुसला. यामुळे परिसरात काही वेळासाठी प्रचंड गोंधळ उडाला आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली. tukum accident


    तुकुम हा चंद्रपूर शहरातील अत्यंत गजबजलेला आणि गर्दीचा परिसर आहे, जिथे नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक आणि नागरिकांची वर्दळ असते. मिळालेल्या माहितीनुसार, हायवा ट्रक क्रमांक mh34m 7638 या परिसरातून जात असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. त्यानंतर ट्रक थेट दुकानात जाऊन धडकला. यावेळी काही महिला व मुली रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या त्यांना चिरडत हायवा ट्र्क पुढे गेला, यामध्ये एका मुलीचा जागीच मृत्यू झाला तर काजल आत्राम राहणार उपरवाही राजुरा हि गंभीर जखमी तर ५५ वर्षीय नंदा उंबरकर या गंभीर जखमी झाल्या. काजल आत्राम ला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

    chandrapur truck accident latest update

    वाहन चालकाला आली फिट, पोलीस भरतीची तयारी करीत होती तरुणी

    सदर अपघातात ६ दुचाकी व २ ऑटो रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघात पूर्वी वाहन चालक विनोद दिवाकर माधुरे ला फिट आली आणि त्याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा भीषण अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व जखमी रुग्णांची भेट घेतली. आमदार किशोर जोरगेवार यांनी खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या काजल मेश्राम हिची भेट घेतली आणि सुरु असलेल्या उपचाराबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. मृतक आणि जखमी या दोघीही मैत्रीनी असुन त्या पोलिस भरतीच्या तयारी करिता चंद्रपूरात राहत हांत्या. त्या एका खाजगी अभ्यासिकेत अभ्यास करुन घरी जात असतांना सदर घटना घडली आहे. kishor jorgewar accident visit

    kishor jorgewar update

    या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन सेवा पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले होते. घटनेचा तपास दुर्गापूर पोलीस करीत असून पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे.

    रामाला तलावाची संरक्षण भिंतीच्या कामाला सुरुवात