Tag: Traffic congestion due to road work

  • Traffic congestion due to road work । चंद्रपूर शहरात रस्ते आहेत की खड्ड्यांचा सापळा? प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव!

    Traffic congestion due to road work

    Traffic congestion due to road work : चंद्रपूर शहरात मागील २ महिन्यापासून अमृत २.० व मलनिःस्सारण प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली मात्र कसलेही नियोजन न करता रस्त्याचे खोदकाम सुरु केले, मात्र या खोदकामामुळे शहरात सर्वत्र धुळीचे वातावरण निर्माण झाले. वाहतूक व्यवस्था अक्षरक्षा खोळंबली. Chandrapur Traffic

    बिहारची बंदूक, चंद्रपूरचे तीन गुन्हेगार

    आधीच प्रदूषणाची झळ सोसणाऱ्या चंद्रपूरकरांना रस्त्यावरील धुळीचे प्रदूषण सोसावे लागत आहे. शहरातील मुख्य मार्ग कस्तुरबा व महात्मा गांधी मार्ग खोदण्यात आला आहे, नागरिकांना शहरातून जात असताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

    सदर काम सुरु होण्यापूर्वी वाहतुकीचे व प्रदूषणाचे काय होणार याच कसलेही नियोजन मनपाने केलं नसल्याचं चित्र शहरातील वातावरण बघून निदर्शनास येते. जिल्हा परिषद मार्ग ते गिरनार चौक या मार्गावरून जाताना नागरिकांचे चेहरे लाल होत आहे. गिरनार चौकातून महात्मा गांधी मार्गावर गेल्यास थेट प्रियदर्शिनी चौकापर्यंत ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहे. Dust pollution from road construction

    या कारणामुळे चंद्रपुरातील संडे मार्केट बंद

    सदर कामापूर्वी चंद्रपूर वाहतूक विभागाने वाहतुकीचा खोळंबा होणार नाही याच नियोजन का केलं नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. चंद्रपूर शहरातील मार्ग हे अरुंद आहे, विशेष म्हणजे विविध ठिकाणी अतिक्रमण सुद्धा आहे, कामापूर्वी मनपाने अतिक्रमण काढले असते तर नागरिकांना या मार्गावरून जाताना त्रास झाला नसता.

    शहरातील जटपुरा गेट ते जिल्हा परिषद मुख्यालयाच्या रस्त्यावर वारंवार ट्रॅफिक जॅम होत असून वाहतूकदारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज या जॅम मध्ये ४ ते ५ रुग्णवाहिका अडकत आहे, नागरिक वाहतुकीच्या नियमन न जुमानता आपली वाट काढतात मात्र याना नियम सांगणार वाहतूक विभाग यावर काही उपाययोजना करताना कुठेही दिसत नाही आहे.