Tag: Tiger Attack News

  • वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा बळी; चंद्रपूर जिल्ह्यातील ‘बळी’चा आकडा ४२ वर

    tiger attack fatalities : चंद्रपूर १० डिसेंबर २०२५ (News३४) : चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळील कवडशी देश गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शंकरपूर-कवडशी रस्त्यालगत शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका ५२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी (दि. ९) उघडकीस आले. शेषराव नथु झाडे (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरातील वाघीण निघाली सह्याद्रीला)

    🔍 शोधानंतर लागला मृतदेह

    मिळालेल्या माहितीनुसार, शेषराव झाडे हे सोमवारी (दि. ८) सायंकाळी शंकरपूर येथे बाजारहाट करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यानंतर ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. त्यांचा संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी मंगळवारी सकाळी शोध घेण्यास सुरुवात केली. दिवसभर शोध घेऊनही ते न सापडल्याने, मंगळवारी सायंकाळी गावकऱ्यांनी शेतशिवारात संयुक्त शोध मोहीम सुरू केली.

    शोध मोहिमेदरम्यान, शंकरपूर आणि कवडशीला जोडणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एमएसईबी (महावितरण) कार्यालयाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावरील जखमा आणि परिसरातील परिस्थितीवरून त्यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. tiger attack fatalities

    📈 मानव-वन्यजीव संघर्षाचा वाढता धोका

    शेषराव झाडे यांच्या मृत्यूमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्षातील बळींचा आकडा पुन्हा वाढला आहे. चंद्रपूर जिल्हा हा मोठ्या प्रमाणात वनसंपदा आणि वन्यजीव (विशेषतः वाघ) असलेली संवेदनशील जागा आहे.

    आजवर जिल्ह्यात झालेल्या या संघर्षामध्ये एकूण ४२ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सर्वाधिक बळी वाघाच्या हल्ल्यात झाले आहेत, ज्यांची संख्या ३८ आहे. याव्यतिरिक्त, बिबट्याच्या हल्ल्यात २ तर अस्वल आणि हत्ती यांच्या हल्ल्यात प्रत्येकी अशा एकूण ४२ नागरिकांचा बळी गेला आहे. वन्यजीव लोकवस्तीत येत असल्याने आणि शेतकरी व मजूर शेतीच्या कामासाठी जंगलात जात असल्याने हा संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. वन विभागाने या वाढत्या धोक्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

  • Tiger Attack News । मानव वन्यजीव संघर्षाचा चंद्रपूर जिल्ह्यात दुसरा बळी

    Tiger Attack News updates

    Tiger Attack News : पळसगाव  (पि )चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विहीरगाव नियत क्षेत्र २ मधील कक्ष क्र, ८५८ मधील जंगलात विहीरगाव येथील गुराख्याला वाघाने ठार मारल्याची घटना आज दिनांक २५ जानेवारीला दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. जानेवारी महिन्यातील मानव वन्यजीव संघर्षातील हा दुसरा बळी आहे.

    विहीरगाव येथील पाच ते सहा लोकांची गावातील जनावरे चारण्याची एका हप्त्याची पाळी होती.आज त्यांच्या पाळीचा दुसरा दिवस जनावरे नेण्याचा होता. भाऊराव नागोसे,अनिल जांभळे,जानिक धाडसे, यांच्या सोबत गुरे घेऊन सकाळी दहा वाजता सहकारी गुराखी सोबत गेले असता दबा धरून असलेल्या वाघाने जंगलातच गुरख्याला ठार मारले.

    अट्टल गुन्हेगार दुर्गापूर पोलिसांच्या ताब्यात

    सदर गुराखी दयाराम लक्ष्मण गोंडाणे (७०) रा. विहीरगाव (ता.चिमूर ) असे मृत गुराख्याचे नाव आहे. सोबत असलेल्या सहकारी गुराखी सोबत काही अंतरावर जनावरे चारीत असताना अचानक वाघाने हल्ला करून गुराखी दयाराम गोंडाने याला तोंडात उचलून दाट जंगलात घेऊन गेला सोबत असलेल्या सहकारी यांनी आरडा ओरड केली मात्र वाघाने त्याला सोडले नाहीं.

    सहकारी गुराखी यांनी गावात मोबाईल द्वारे सदर घटनेची माहिती दिली नंतर गावातील नागरिक आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत हल्ल्यात मृतक गुराख्याचा शोध कार्य राबविले असता पुढे काही अंतरावर शोध घेतला असता गोंडाणे यांचा मृतदेहच मिळाला त्यांच्या मानेवर वाघाच्या हल्ल्याचे घाव आढळून आले.

    सदर परिसरात मागील काही महिन्यांपासून वाघाचा मुक्त वावर सुरू आहे. अनेक जनावरांचा फडशा त्याने पाडला. काही लोकांना या वाघाचे दर्शनही झाल्याचे सांगितल्या जाते. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.त्याचे प्रेत उचलून शवविच्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले.

    या वेळी, वनपरीक्षेत्र अधिकारी योगिता आत्रम,अमोल कवासे वनपाल,वनपाल विनोद किलनाके,निखूरे,वनरक्षक नागलोत, मेश्राम,खारडे,जिवतोडे, जरारे, गेडाम,दुधे, ठाकरे, पोलीस निरीक्षक सतोष बाकल सह पोलीस कर्मचारी वनविभागाचे कर्मचारी हजर होते.मृत्यकाच्या कुटुंबास वनविभागाच्या पन्नास हजाराची आर्थिक मदत करण्यात आली.त्याच्या मागे पत्नी,दोन मुले, एक मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.