Tag: Tadoba Tiger Reserve

  • श्रीमती शाहनाज बेग यांना पश्चिम भारतातील सर्वोत्तम वाइल्डलाईफ गाईड पुरस्कार

    Best Wildlife Guide : नवी दिल्ली / चंद्रपूर १४ डिसेंबर २०२५ (News३४) – नवी दिल्ली येथील बिकानेर हाऊसमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या प्रतिष्ठित ‘८ व्या टॉफ्ट (TOFT) टायगर वाइल्डलाईफ टुरिझम अवॉर्ड्स २०२५’ सोहळ्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने (TATR) राष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे.

    ताडोबातील मोहरली (कोअर) गेट येथे कार्यरत असलेल्या निसर्ग मार्गदर्शक (Nature Guide) श्रीमती शाहनाज सुलेमान बेग यांना ‘बिली अर्जन सिंग मेमोरियल अवॉर्ड फॉर बेस्ट वाइल्डलाईफ गाईड ऑफ द इयर (पश्चिम भारत)’ या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (हे हि वाचा – राज्य आरोग्य उपक्रमात चंद्रपूर प्रथम)

    पश्चिम भारतातील एकूण आठ नामांकनांमधून श्रीमती शाहनाज बेग यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘पहिली महिला निसर्ग मार्गदर्शक’ (First Female Tourist Guide) म्हणून त्या ओळखल्या जातात. मोहरली कोअर गेटवरील त्यांची उत्कृष्ट सेवा ही संवर्धन-आधारित पर्यटनाच्या क्षेत्रातील महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा (Milestone) ठरली आहे. वन्यजीवांचा सखोल अभ्यास, मार्गदर्शनातील नैतिक मूल्ये आणि सफारी दरम्यानची व्यावसायिक वागणूक या गुणांची दखल घेत त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे. Best Wildlife Guide

    हा पुरस्कार सोहळा ‘टॉफ्ट टायगर्स’चे संस्थापक आणि ॲम्बेसेडर श्री. ज्युलियन मॅथ्यूज, तसेच ज्युरी सदस्य व ‘टॉफ्ट टायगर्स’चे संचालक श्री. विशाल सिंग आणि ‘सॅंक्च्युरी एशिया’चे संस्थापक श्री. बिट्टू सहगल यांच्या हस्ते संपन्न झाला.
    ‘टॉफ्ट टायगर्स अवॉर्ड्स’ हे भारत आणि नेपाळमधील जबाबदार पर्यटन, नैतिक वन्यजीव पद्धती आणि जनसहभागासाठी (Community Engagement) एक मापदंड मानले जातात.

    श्रीमती शाहनाज यांची निवड ही ताडोबा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कौशल्य विकास, उच्च दर्जाचे मार्गदर्शन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील स्थानिक समुदायासाठी शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या कटिबद्धतेला अधोरेखित करते. श्रीमती शाहनाज यांच्या यशासोबतच, ताडोबा परिसरातील जबाबदार पर्यटनात योगदान देणाऱ्या इतर घटकांचाही या सोहळ्यात गौरव करण्यात आला:

    पगदडी रिसॉर्टचे श्री. शाहीन शेख यांना ‘बेस्ट नॅच्युरलिस्ट’ (Best Naturalist) पुरस्काराने गौरविण्यात आले.
    तसेच, आदरातिथ्य क्षेत्रातील (Hospitality Sector) उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘स्वसारा रिसॉर्ट’ आणि ‘वृक्ष रिसॉर्ट’ यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
    राष्ट्रीय स्तरावरील या सामुदायिक यशामुळे भारतातील शाश्वत आणि जबाबदार वन्यजीव पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे स्थान अधिक बळकट झाले आहे.

  • Tadoba Tiger Reserve | 20 दिवसात चंद्रपूर जिल्ह्यात 4 वाघांचा मृत्यू

    tadoba tiger reserve

    tadoba tiger reserve : चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या मृत्यूची मालिका सतत सुरू आहे, एकाच महिन्यात 4 वाघाचा मृत्यू झाल्याने वनविभागात चांगलीचं खळबळ उडाली आहे.


    राज्यात सर्वात जास्त वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहे मात्र प्रत्येक वाघाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या वनविभागावर कामाचा ताण तर आला नाही न असे चित्र वाघाच्या मृत्यूसत्रावर दिसून येत आहे.

    20 जानेवारीला ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बफर झोन मधील शिवनी वनपरिक्षेत्रात दीड वर्षीय वाघाचा मृतदेह आढळून आला.

    शौचास गेलेल्या वाहन चालकावर अस्वलीचा हल्ला


    वनविभागाला याबाबत माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी गाठत वाघाच्या मृतदेहाचा पंचनामा केला, वाघाचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या झाला असल्याचा अंदाज वनविभागाद्वारे लावण्यात आला आहे.


    काही दिवसांपूर्वी मृत वाघाला दुसऱ्या वाघाने जखमी केले होते, मृत वाघ हा आईसोबत जखमी अवस्थेत फिरत होता, त्यावेळी वनविभागाने त्या वाघावर उपचार केला होता, सदर मृत वाघ हा वनविभागाच्या निगराणीत होता मात्र 20 जानेवारीला त्याचा मृतदेह आढळून आला.

    चंद्रपुरात पोलीस चौकीजवळ घरफोडी, लाखोंचे सोने लंपास


    2 जानेवारी पासून वाघाच्या मृत्यूची मालिका सुरू झाली असून सिंदेवाही, मूल, रेल्वेच्या धडकेत वाघाच्या मृत्यूनंतर 48 तासांनी पुन्हा वाघाचा मृत्यू झाला ही बाब वन्यप्रेमींसाठी चिंताजनक आहे.

  • अखेर त्या बछड्याचा मृत्यू

    News34

    चंद्रपूर – जिल्ह्यातील बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कळमना उपक्षेत्रात 7 सप्टेंबर ला वन कर्मचारी गस्तीवर असताना 2 वाघांचे बछडे त्यांना मृतावस्थेत आढळले व एका बछड्याला वनविभागाने रेस्क्यू केले होते मात्र 9 सप्टेंबरला रेस्क्यू केलेल्या बछड्याचा मृत्यू झाला. Tadoba tiger cube

     

    7 सप्टेंबरला वन कर्मचारी कळमना उपक्षेत्रातील वनखंड क्रमांक 572 मध्ये एक वाघाचा अशक्त बछडा आढळला, त्यानंतर परिसरात शोध मोहीम राबविली असता 2 वाघांचे बछडे मृतावस्थेत आढळले होते.

     

    अशक्त वाघाच्या बछड्याला वनविभागाने रेस्क्यू करीत त्याला वन्यजीव उपचार केंद्र ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात आणले होते, सदर बछडा हा मादी असून त्याचे वय अंदाजे 5 महिने आहे. मात्र उपचारा दरम्यान आज बछड्याचा मृत्यू झाला.

    ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी दिव्य मराठीला माहिती दिली की सदर बछडा हा भुकेने व्याकुळ झाला होता, वाघीण शिकारीला निघून गेल्याने बछड्याना दूध मिळालं नाही, त्यामुळे 2 बछड्याचा मृत्यू झाला, मात्र आम्ही एका बछड्याला रेस्क्यू करीत वन्यजीव उपचार केंद्रात आणले, त्या बछड्यावर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र तो उपचाराला सहकार्य करीत नव्हता, 3 ते 4 दिवस तो बछडा उपाशी असल्याने त्यांच्या शरीरातील अवयव उपचाराला साथ देत नव्हते, आज उपचारा अंती त्याचा मृत्यू झाला.

    वाघिणीचा शोध घेण्यासाठी वनविभागाने जंगल परिसर व इतरत्र कॅमेरे लावले आहे, मात्र जंगलाची व्याप्ती मोठी असल्याने वाघीण नेमकी कुठं गेली याबाबत सांगता येत नाही, तरीसुद्धा वनविभाग वाघिणीचा शोध घेत आहे.

  • ताडोबा अभयारण्याच्या Online Booking बाबत न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

    News 34

    Tadoba jungle safari

     सर्व पर्यटक व निसर्गप्रेमींसाठी चांगली बातमी!

    चंद्रपूर येथील प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाइन बुकिंगला चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली आहे. हा केवळ ताडोबा व्यवस्थापनासाठीच नाही तर रिसॉर्ट मालक, टूर ऑपरेटर, जिप्सी चालक, मार्गदर्शक आणि स्थानिक व्यावसायिकांसाठीही मोठा दिलासा आहे.

    ऑनलाइन बुकिंगला मंजुरी मिळाल्याने ताडोबा व्यवस्थापन आता आगामी सणासुदीच्या हंगामासाठी सज्ज होऊ शकेल. दिवाळी, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या बुकिंगचा मार्ग मोकळा झाला आहे, ज्यामुळे तुम्हाला या भव्य व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीचे नियोजन आणि सुरक्षितता आधीच करता येईल.

    कायदेशीर लढाईचा खडतर प्रवास

    ताडोबा व्यवस्थापनासाठी हा प्रवास सोपा नव्हता. आर्थिक गैरव्यवहारामुळे त्यांना वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन्स या बुकिंग एजन्सीसोबतचा त्यांचा करार रद्द करावा लागला. एजन्सीवर वनविभागाने 12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता, त्यामुळे कायदेशीर लढाई सुरू झाली होती.

    ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या करारातील अटी आणि त्यामध्ये बुकिंग करण्याचे अधिकार यावरून सुरू असलेला वाद अखेर चंद्रपूर न्यायालयात पोहोचला. 2026 पर्यंत करार वैध असूनही ताडोबा व्यवस्थापनाने त्यांचा करार अचानक संपुष्टात आणल्याचा दावा एजन्सीने केला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत ताडोबाच्या बुकिंग प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता.

    ऑनलाइन बुकिंग चा मार्ग मोकळा झाला

    मात्र, काही दिवसांच्या अनिश्चिततेनंतर चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने गुरुवारी (३१ ऑगस्ट) स्थगिती उठवली आणि ताडोबाला पुन्हा एकदा सफारी बुकिंगसाठी परवानगी दिली. या बातमीने चिंतेत असलेले ताडोबा व्यवस्थापन, रिसॉर्ट मालक, टूर ऑपरेटर, जिप्सी चालक, मार्गदर्शक आणि स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेवटी, पर्यटक आनंदित होऊ शकतात कारण ते लवकरच त्यांची सफारी ऑनलाइन बुक करू शकतील.

    येत्या 4 ते 5 दिवसांत ताडोबाची अधिकृत बुकिंग साइट सुरू होईल हे जाहीर करताना ताडोबा प्रशासनाला आनंद होत आहे. आता पर्यटकांना एका बटणाच्या क्लिकवर सफारी बुक करण्याची सुविधा मिळेल.

    तयार व्हा वाघाच्या जंगल सफारीसाठी

    तर, तुमची कॅलेंडर चिन्हांकित करा आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात अविस्मरणीय वन्यजीव साहस सुरू करण्यासाठी सज्ज व्हा. बुकिंग साइटच्या अधिकृत लाँचसाठी संपर्कात रहा आणि या मंत्रमुग्ध करणाऱ्या अभयारण्यात तुमचे स्थान सुरक्षित करणार्‍यांपैकी प्रथम व्हा!

  • 12 कोटींच्या घोळाने ताडोब्यातील ऑनलाइन बुकिंग सेवा बंद

    News34

    चंद्रपूर – वाघांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा जंगल सफारीला घोटाळ्याचा फटका बसल्याने सध्या ऑनलाइन बुकिंग बंद करण्यात आली आहे.

     

    ताडोबा प्रशासनाने ऑनलाइन तिकीट बुकिंग चे कंत्राट वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या एजन्सी ला दिले होते, वर्ष 2021 ते 23 चे ऑडिट झाल्याने त्यामध्ये तब्बल 22 कोटी 80 लाख 67 हजार 749 रुपयांची तफावत आढळली, याबाबत एजन्सीला पैसे भरण्यास सांगितले असता त्यांनी 10 कोटी रुपये ताडोबा प्रशासनाकडे भरले मात्र उर्वरित 12 कोटी रुपये त्यांनी भरले नाही, ताडोबा व्यवस्थापनाने त्यांना वारंवार उर्वरित रकमेचा भरणा करण्यासाठी सांगितले मात्र त्यांनी पैसे भरले नाही, नेहमी शासनाला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यामुळे ताडोबा व्यवस्थापनाने बुकिंग एजन्सीचे संचालक अभिषेक विनोदकुमार ठाकूर व रोहित विनोद कुमार ठाकूर या दोघांवर वन अधिकारी सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला.

    कोर व बफर झोनची ऑनलाइन बुकिंग सेवा बंद

    वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या तिकीट बुकिंग एजन्सीने my tadoba नामक वेबसाईट ची निर्मिती ताडोबा जंगल सफारीचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांसाठी बनविली होती.

    मात्र 12 कोटीच्या रकमेचा अपहार केल्याची चाहूल ताडोबा व्यवस्थापनाला लागल्याने त्यांनी my tadoba हे संकेतस्थळ बंद करण्याचा आदेश काढला व राज्यातील संपूर्ण व्याघ्रप्रकल्पाची एक वेबसाईट असणार त्यामधून ऑनलाइन बुकिंग होणार असे जाहीर केले होते मात्र ठाकूर बंधू ताडोबा व्यवस्थापनाच्या या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात गेले, न्यायालयाने ठाकूर बंधूंचे ऐकत ताडोबा व्यवस्थापनाच्या आदेशाला स्थगिती देत सदर निर्णय चंद्रपूर न्यायालय अंतर्गत घेण्यात यावा असे नमूद करीत जोपर्यंत निर्णय लागणार नाही तोपर्यंत ऑनलाइन बुकिंग बंद राहण्याचे निर्देश दिले.

    ऑनलाइन बुकिंग बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला, ऑगस्ट महिन्यापासून कोर झोन च्या जंगल सफारीसाठी पर्यटक बुकिंग प्रक्रिया पार पाडतात, सध्या बफर सफारी सुरू आहे मात्र ती सुद्धा ऑफलाईन पद्धतीने, ज्या पर्यटकांनी आधीच ऑक्टोबर महिन्यासाठी जंगल सफारी बुक केली असेल त्यांना कसलीही अडचण येणार नाही, जर अडचण आली तर त्यांनी ताडोबा व्यवस्थापणासोबत सम्पर्क साधावा असे आवाहन डॉ.जितेंद्र रामगावकर व्यवस्थापकीय संचालक ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प यांनी केले आहे.

    येत्या 2 ते 3 दिवसात न्यायालयाचा निर्णय येणार आहे, शक्यतो ताडोबा प्रशासनाच्या बाजूने निर्णय लागणार त्यानंतर सर्व प्रक्रिया सुरळीत होणार आहे, जर निर्णयाला उशीर झाला तर आम्ही ऑनलाइन बुकिंग सेवा सुरू करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधू अशी माहिती रामगावकर यांनी दिव्य मराठी सोबत बोलताना दिली

  • Exciting Updates on Online Bookings for Safaris in Tadoba Tiger Reserve

    Welcome to our Blog!

    We have some exciting news to share about the online booking of tourism safaris in Tadoba Tiger Reserve. While the online booking system is currently closed due to unfortunate circumstances, we are optimistic about the future and can’t wait to welcome you back soon!

    A Temporary Setback

    Recently, a company with the contract for online bookies in Tadoba Tiger Reserve was involved in fraudulent activities, resulting in a loss of 12 crores in online bookings. As a precautionary measure, the online booking system has been temporarily suspended.

    However, we want to assure you that the offline mode of booking in the buffer zone is still available. You can book your safari at the entrance itself, ensuring you don’t miss out on the incredible wildlife experience that Tadoba Tiger Reserve offers.

    Preparing for the Future

    We understand the convenience and ease of online booking, which is why we are eagerly waiting for the order of the District and Sessions Court to resume our online booking system. Our NIC system is ready, and we are hopeful that the court’s decision will be in our favor within the next two to three days.

    Once the online booking system is up and running again, you will be able to secure your spot for the safari of your choice from the comfort of your own home. Stay tuned for updates on our website and social media channels!

    An Unforgettable Experience Awaits

    Despite the temporary setback, we want to assure you that visiting Tadoba Tiger Reserve is still an incredible adventure waiting to happen. Our team is dedicated to providing you with a safe and memorable wildlife experience.

    Witness the majesty of the tigers, explore the lush forests, and encounter a diverse range of flora and fauna. Our expert guides will accompany you on the safari, sharing their knowledge and ensuring you have a once-in-a-lifetime experience.

    So, mark your calendars! September 30th is just around the corner, and we can’t wait to welcome you back to Tadoba Tiger Reserve for an unforgettable safari experience.

    Stay Connected

    Don’t miss out on any updates about the online booking system and the reopening of safaris in Tadoba Tiger Reserve. Stay connected with us by following our blog, subscribing to our newsletter, and following us on social media.