Tag: Tadoba Andhari Tiger Reserve safari

  • Tadoba Jungle Safari Price Maharashtra । ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प: जंगल सफारी शुल्काबाबत स्पष्टीकरण

    Tadoba Jungle Safari Price Maharashtra

    Tadoba Jungle Safari Price Maharashtra : चंद्रपूर २७ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सफारीच्या शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आता सामन्यांसाठी जंगल सफारी हे दिवा स्वप्नच आहे. शुल्कात झालेली भरमसाठ वाढीने स्थानिकांना जंगल सफरीमध्ये सूट द्यावी अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली, मागणी मान्य न झाल्यास १ ऑक्टोम्बर पासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जिप्सी प्रवेश होऊ देणार नाही असा इशारा सुद्धा देण्यात आला, यावर ताडोबा प्रशासनाने खुलासा केला कि शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली नाही. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिले आहे.

    सावली तालुक्यात घरात शिरले अस्वल

    जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्रप्रकल्पात दरवर्षी लाखो पर्यटक वन्यप्राणी बघायला येत असतात, मात्र काही दिवसांपूर्वी ताडोबा जंगल सफारी महागली आहे, यावरून ताडोबा सफारी चर्चेचा विषय बनली. मात्र ताडोबा व्यवस्थापनाने यावर स्पष्टीकरण दिले असून प्रयत्न शुल्कात भरीव वाढ करण्यात आली नाही, विशेष म्हणजे सवलतीच्या दारात आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील अंदाजे ४०,००० लोकांनी जंगल सफारी केलेली आहे. Tadoba tiger reserve entry fee update

    हे आहे ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील पर्यटन शुल्क

    उपस्थितपूर्वीचे शुल्क (कोअर)आताचे शुल्क (कोअर)पूर्वीचे शुल्क (बफर)आताचे शुल्क (बफर)
    दिवस०-५९ दिवसाकरीता६०-१२० दिवसाकरीता०-५९ दिवसाकरीता६०-१२० दिवसाकरीता
    शनिवार ते रविवारशुक्रवारशनिवार ते रविवारशुक्रवारशनिवार ते रविवार
    प्रवेश शुल्क१२००२२००४२००४२००
    जिप्सी शुल्क३०००३०००३०००३०००
    गाईड शुल्क६००६००६००६००
    एकूण४८००५८००७८००११४००
  • Tadoba Andhari Tiger Reserve safari । ताडोबाच्या वाघांपर्यंत आता थेट सफर – चंद्रपूर शहरातून क्रुझर सेवा लवकरच!

    Tadoba Andhari Tiger Reserve safari

    Tadoba Andhari Tiger Reserve safari : चंद्रपूर शहरातील पर्यटकांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प सफारीसाठी थेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच क्रुझर सेवा सुरू होणार आहे. महिन्याभरात ही सेवा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत बैठक घेतल आहे. विशेष म्हणजे मुंबई येथे वन मंत्री गणेश नाईक यांची भेट घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर मागणी केली होती. तर गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. Tadoba jungle safari

    बाबुपेठ मध्ये पाणी बाणी, नागरिकांचे निवेदन


     या बैठकीला बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली संचालक, अशोक खडसे संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला, एफडीसीएम चंद्रपूर प्रदेश प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कोरचे उपसंचालक आनंद रेड्डी येल्लू, मध्य-चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोडू, विभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे, विभागीय वनअधिकारी सचिन शिंदे आदिंची उपस्थिती होती.


      ताडोबा हे देशभर प्रसिद्ध असलेले व्याघ्र प्रकल्प असून, येथे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. मात्र, चंद्रपूर शहरातून ताडोबाला जाण्यासाठी थेट सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर क्रुझर सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आमदार जोरगेवार यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमोर मांडला होता. Tadoba tourism


      या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आमदार जोरगेवार यांनी वन विभागाच्या अधिकार्यांसोबत बैठक घेत क्रुझर सेवेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक कार्यवाहीबाबत चर्चा केली. या बैठकीत स्कूझरच्या मार्गाची आखणी, वेळापत्रक, तिकीट दर, बुकिंग व्यवस्था आणि इतर तांत्रिक बाबींवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
      स्कूझर सेवा सुरू झाल्यास पर्यटकांना शहरातून ताडोबाला जाण्यासाठी सुविधा मिळणार आहे.

    पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून, पर्यटकांना प्रवासासाठी सहज सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ताडोबाला भेट देणार्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक व्यवसायालाही चालना मिळणार आहे. यासंदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, “ताडोबा हा चंद्रपूरच्या पर्यटन क्षेत्रातील एक महत्त्वाचा ठिकाण आहे. पर्यटकांना अधिक सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रुझर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सेवा महिन्याभरात सुरू होईल. Tadoba forest safari

    वन विभागाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला असून, महिन्याभरात ही सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने अंतिम तयारीला वेग देण्यात आला असल्याचे ते म्हणाले. सोबत बुकिंग करुन वेळेवर न येणा-या पर्यटकांच्या ठिकाणी दुस-या पर्यटकांना ताडोबा सफारी दिली जाणार आहे, संजय सब्बनवार यांनी तयार केलेली 40×40 फूट लांबीची गोंडकालीन किल्ल्याची लघुप्रतिकृती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ठेवली जाणार आहे. तर दिवंगत ख्यातनाम काष्ठशिल्पकार मनोहर सप्रे यांनी बांबूपासून साकारलेले काष्ठशिल्पांसाठी वन विभागाद्वारे प्रदर्शनी दालन उभारून दिल्या जाणार आहे. आदी निर्णय सदर बैठकीत घेण्यात आले आहे.