Tag: sudhir mungantiwar news

  • Mul railway overbridge । रेल्वे क्रॉसिंगवरील अडथळ्यांना पूर्णविराम! मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याने प्रकल्पास मंजुरी

    Mul railway overbridge

    Mul railway overbridge : चंद्रपूर :  राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, मुल शहरालगतच्या रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाच्या बांधकामास पहिल्या टप्प्यात ३१ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. या कामाबाबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी अधिकृत पत्राद्वारे मंजुरीची माहिती दिली आहे. ‘दिला शब्द केला पूर्ण’ या भावनेने लोकांना दिलेला शब्द पाळत आ. मुनगंटीवार यांनी मुल शहरासाठी आणखी एक महत्त्वाचा विकासाचा टप्पा गाठला आहे.

    Also Read : चंद्रपूर शहरातील रस्त्याचा होणार कायापालट

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून मुल शहरालगत रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाच्या बांधकामास अखेर मंजुरी मिळाली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) दीपक कुमार गुप्ता यांनी याबाबत अधिकृत पत्राद्वारे आमदार श्री.मुनगंटीवार यांना मंजुरीची माहिती दिली आहे.मुल–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग एनएच ९३० वरील रेल्वे क्रॉसिंग गेट क्र. GCF १२३ येथे उड्डाणपुलाच्या मंजुरीबाबत डीआरएम दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर यांनी पत्राद्वारे अधिकृत कळविले आहे. Chandrapur NH 930 flyover

    सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

    या ठिकाणी अवजड वाहने आणि इतर वाहतुकीमुळे वारंवार अडथळे निर्माण होत होते. नागरिकांनी यासंदर्भात आ.मुनगंटीवार यांना अवगत केले. या मागणीवर सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.

    आपल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत आमदार मुनगंटीवार म्हणाले,विधानसभा निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेला शब्द पूर्ण करत असल्याचा मनस्वी आनंद आहे. हा उड्डाणपूल केवळ वाहतुकीचा प्रश्न सोडवणार नाही, तर मुल शहर आणि परिसराच्या सौंदर्यातही भर घालणार आहे. या पुलामुळे शेती, व्यापार आणि उद्योग क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल.”

  • sudhir mungantiwar news : मूल तालुक्यात 40 हजार कोटींची गुंतवणूक होणार – सुधीर मुनगंटीवार

    sudhir mungantiwar news

    sudhir mungantiwar news राणी दुर्गावतीचे शौर्य व सेवेची आठवण करण्याचा हा दिवस आहे. राणी दुर्गावतीने राज्य चालविण्यासाठी जनकल्याणकारी योजना राबविल्या. महायुती सरकारने याच आदर्शांवर आदिवासी समाजाच्या कल्याणाचा ध्यास घेतला.

    आदिवासींना आता त्यांच्या भाषेत शिक्षण देण्याचा निर्णय करण्यात आला आहे. आदिवासी समाजातील गरीब कुटुंबांना घर देण्याचा निर्णय, तसेच 12 हजार 500 पदांसाठीची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रत्येक गावामध्ये गोटूलला मंजुरी दिली. Sudhir bhau mungantiwar

    आदिवासींच्या विकासासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची गरज असून आदिवासी समाजाच्या प्रगती व उत्थानासाठी पूर्ण शक्तीने उभा राहील,अशी ग्वाही आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

    बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील पोंभुर्णा येथे आदिवासी समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

    याप्रसंगी नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे, गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीचे संघटक जगन येलके, माजी जि.प.सदस्य राहुल संतोषवार, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुलभाताई पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, हरीश ढवस, गणेश परचाके, प्रेमदास इस्टाम, प्रवीण पेंदोर, विजय आत्राम, मधुकर कुळमेथे, कांताबाई मडावी, विनोद देशमुख, ईश्वर नैताम, ऋषी कोटरंगे तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    प्रतीक्षा संपली, थांगलन चित्रपट आता बघा ott वर

    आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सिंचन,आरोग्य, रोजगार, शिक्षण आणि कृषी या क्षेत्रात लक्ष देण्यात येत असून विशेष करून विद्यार्थी शिक्षणामध्ये पुढे जावा यासाठी नाविन्यपूर्ण योजना आखण्यात येत आहे. पोंभुर्ण्याचा कायापालट व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्नशिल आहे. Sudhir mungantiwar rally

    राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षात या क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधता येईल. मुल येथे पॉलीटेक्निक कॉलेज तसेच 40 हजार कोटीची गुंतवणूक करून पोंभुर्णा एमआयडीसीतील उद्योग, शेती, आरोग्य अशा महत्त्वपूर्ण पाच प्रमुख मुद्द्यांवर काम सुरू करण्यात आले आहे.

    sudhir bhau mungantiwar

    पुढील पाच वर्षे पुन्हा मतदारांची सेवा करण्याचा संकल्प आहे. मतदार अडचणीत असल्यास मतदारांना मदतीचा हात आपला असावा या भावनेतून काम करण्यात येत असल्याचेही आ. मुनगंटीवार म्हणाले.

    मतदारांचे मानले आभार
    पोंभुर्णावासियांनी प्रेमाने स्वागत आणि सत्कार केला. हे प्रेम पुढचे पाच वर्ष या मतदारसंघाची मनापासून सेवा करण्यासाठीची शक्ती आहे. मतदार हा ईश्वराचा अंश आहे.  

    जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्याने बल्लारपूर मतदारसंघातील जनतेने मला 25 हजार 985 मतांनी निवडून दिल्याबद्दल आ. मुनगंटीवार यांनी सर्व मतदारांचे आभार मानले.

    लाडक्या बहिणीची साथ
    विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींमध्ये सर्वात जास्त ऊर्जा पाहायला मिळाली. महायुतीच्या विजयामध्ये लाडक्या बहिणींचा वाटा मोठा असल्याचे नमूद करत लाडक्या बहिणींच्या पाठीशी विविध उपक्रमाच्या माध्यमातून कायम उभा राहील अशी ग्वाही आ. मुनगंटीवार यांनी दिली. Sudhir mungantiwar news

    जगन येलके, गणेश परचाके व त्यांच्या टीमला विशेष करून आ. मुनगंटीवार यांनी धन्यवाद दिले. याच मैदानावर समर्थन व पाठिंबा देत मला निवडून आणण्यासाठी शक्ती पणाला लावली. येथील भाजपा नेते, कार्यकर्ते आणि मतदारांनी या निवडणुकीत स्वतःच उमेदवार आहे या भावनेने निवडणुकीच्या युद्धामध्ये पूर्ण शक्तीनिशी काम केले व मला निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असल्याचे ना.मुनगंटीवार म्हणाले.

    sudhir mungantiwar rally

    पोंभुर्णा नगरीत ना. मुनगंटीवारांचे जंगी स्वागत
    बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टी, पोंभुर्णाच्या वतीने विजयी अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले. जनतेच्या मतरुपी आशिर्वादाने विजय मिळवून दिला. त्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचे आ.मुनगंटीवार यांनी मनापासून आभार मानले.