Tag: section 163(2) police action Maharashtra

  • prohibited criminals ban during festival । 🚔 गणेशोत्सवात शांततेसाठी चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई – 540 गुन्हेगार हद्दपार

    prohibited criminals ban during festival

    prohibited criminals ban during festival : चंद्रपूर ५ सप्टेंबर २०२५ – २७ ऑगस्टपासून राज्य व देशात गणेशोत्सवाची धूम सुरु आहे, लाखो भाविक दररोज श्री गणेशाचे दर्शन घेत असून या उत्सवात विघ्न पडू नये याकरिता पोलिसांनी कम्बर कसली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता भंग करणारे तब्बल ५४० गुन्हेगारी वृत्तीच्या इसमांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

    शासनाच्या निर्णयाची चंद्रपुरात होळी

    शांततेत उत्सव साजरा होणार

    सण उत्सव साजरे करीत असताना शांतता व सलोखा अबाधित ठेवण्यासाठी पोलीस सदैव प्रयत्नशील असतात, मात्र समाजातील विघातक प्रवृत्ती आपली या शांततेत विघ्न टाकण्याचे काम करीत असतात, सध्या चंद्रपूर जिल्ह्यात गणेश उत्सवाची धुमधाम सुरु आहे, ६ सप्टेंबर रोजी अनंतचतुर्दशी ला गणेश विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे, यानिमित्ताने जिल्ह्यातील लाखो भाविक मिरवणुकीत सहभागी होतात. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. police ban repeat offenders during Ganesh immersion

    जिल्ह्यात सामाजिक सलोखा कायम रहावा याकरिता पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन प्रभारी यांनी आपापल्या पोलीस स्टेशन हद्दीत शांतता भंग करणारे एकूण ५४० इसमांविरुद्ध कलम १६३ (२) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अन्वये गुन्हगेरे वृत्तीच्या इसमांना पोलीस स्टेशन हद्दीत येण्यास मनाईचा हुकूम व्हावा असे प्रस्ताव तयार करीत उपविभागीय कार्यालयात पाठवून तब्बल ५४० इसमाविरुद्ध हद्दपार चा आदेश पारित करण्यात आला.