Tag: Road accident

  • Road Accident at Marriage Party । जनावरांच्या कळपाने घेतला जीव! नववधूच्या आईचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    Road Accident at Marriage Party

    Road Accident at Marriage Party : गोंडपिपरी – लेकीच्या विवाहानंतर जावयाच्या घरी स्वागत समारंभासाठी निघालेल्या स्कॉर्पिओ वाहनाचा भीषण अपघात विठ्ठलवाडा-भंगाराम तळोधी मार्गावर झाला. यामध्ये नववधूच्या आईचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि. २८) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. Road accident after marriage

    सुधीर मुनगंटीवार यांनी सोडविला पाण्याचा प्रश्न

    जनावरांच्या कळपामुळे नियंत्रण सुटले; वाहन उलटले

    तारसा खुर्द येथील स्नेहा चांदेकर यांचा विवाह रविवारी (दि. २७) गोंडपिपरी येथील कन्यका सभागृहात फुलोरा हेटी येथील महेंद्र रामटेके यांच्यासोबत पार पडला होता. विवाहानंतर दुसऱ्या दिवशी रामटेके कुटुंबीयांनी स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. या समारंभासाठी चांदेकर कुटुंब व वऱ्हाडी मंडळी स्कॉर्पिओ (MH 34 CD 4014) वाहनाने निघाले होते. Animal herd on road accident

    दरम्यान, विठ्ठलवाडा-भंगाराम तळोधी मार्गावर अचानक जनावरांचा कळप समोर आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील स्कॉर्पिओने तीन वेळा पलटी घेत शेतात उलटले.

    छाया चांदेकर यांचा मृत्यू, सात जण रुग्णालयात

    या भीषण अपघातात छाया दिलीप चांदेकर (वय ५०, रा. तारसा खुर्द) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मंदा मोरेश्वर उरकुडे, चेतना सुरेश कुकुडकर, कर्णिका दिनेश धांडे, अश्विनी धांडे, संगीता प्रकाश खोब्रागडे, प्रतिमा वाल्मीक भारशंकर आणि मोहन तुमडे हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

    पोलीस कारवाई सुरू; वातावरण शोकमग्न

    घटनेनंतर गोंडपिपरी पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. छाया चांदेकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी वैनगंगा नदीघाटावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    मृत महिलेच्या पश्चात पती, मुलगा व दोन मुली

    छाया चांदेकर यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी घडलेली ही दुर्दैवी घटना संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

    News34

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मूल-राजोली-सिंदेवाही मार्गावर अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला.

     

    10 सप्टेंबर ला सायंकाळच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली त्या दरम्यान मूल-सिंदेवाही मार्गावर बिबट्या रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला.

     

    अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिल्यावर ते वाहन घटनास्थळावरून पसार झाले. बिबट्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ताडोबा वन्यजीव उपचार केंद्रात नेण्यात आला.

     

    वन्यप्राण्यांसाठी अंडर पासची व्यवस्था नाही

    भारताच्या मध्यभागी असलेला चंद्रपूर जिल्हा हे विपुल नैसर्गिक सौंदर्याने नटलेले ठिकाण आहे. चारही बाजूंनी घनदाट जंगलांनी वेढलेला हा जिल्हा विविध प्रकारच्या वन्यजीवांचे माहेरघर आहे. तथापि, या अद्वितीय भौगोलिक वैशिष्ट्यामुळे एक महत्त्वपूर्ण समस्या देखील निर्माण झाली आहे – रस्ता ओलांडताना वन्य प्राण्यांचा वारंवार अपघात.

     

    या जंगलांमुळे जिल्ह्याला अनेक फायदे मिळत असले तरी, प्राण्यांसाठी योग्य अंडरपास व्यवस्था नसल्यामुळे अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. प्राणी, अन्न किंवा पाण्याच्या शोधात, जेव्हा ते व्यस्त रस्ते ओलांडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते स्वतःला धोकादायक परिस्थितीत सापडतात.

     

    अधिकाऱ्यांनी या समस्येची दखल घेऊन प्राणी आणि मानव या दोघांच्या सुरक्षेसाठी अंडरपास यंत्रणा कार्यान्वित करण्याची वेळ आली आहे. अशा प्रणालीमुळे प्राण्यांना सुरक्षित रस्ता तर मिळेलच शिवाय रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल.

     

    अंडरपास हे या समस्येवर एक प्रभावी उपाय आहेत कारण ते प्राण्यांना वाहनांच्या धडकेशिवाय रस्त्यावर मुक्तपणे फिरू देतात. हे अंडरपास रस्त्याच्या खाली बांधले गेले आहेत आणि विशेषत: विविध प्राणी प्रजातींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. प्राण्यांना अंडरपासच्या दिशेने मार्गदर्शित करण्यासाठी आणि त्यांना रस्त्यावर जाण्यापासून रोखण्यासाठी ते अनेकदा कुंपण आणि वनस्पतींनी सुसज्ज असतात.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात अंडरपास कार्यान्वित करण्याचे फायदे असंख्य आहेत. प्रथम, ते वन्यप्राण्यांचे प्राणघातक अपघातांपासून संरक्षण करेल आणि रस्त्यांवरून त्यांची सुरक्षित हालचाल सुनिश्चित करेल. दुसरे म्हणजे, रस्ते अपघातांमुळे होणारा त्रास कमी करून प्रदेशाचा नाजूक पर्यावरणीय समतोल राखण्यात मदत होईल. तिसरे म्हणजे, ते प्राण्यांशी टक्कर होण्याचा धोका कमी करून प्रवाशांसाठी रस्त्यांची एकंदर सुरक्षितता वाढवेल.

     

    स्थानिक अधिकाऱ्यांनी या समस्येचे महत्त्व समजून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अंडरपासच्या बांधकामात गुंतवणूक करून ते चंद्रपूर जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव यांच्यात सुसंवादी सहअस्तित्व सुनिश्चित करू शकतात.

     

  • चंद्रपुरात एकाच दिवशी 3 अपघात 3 मृत्यूनंतरही प्रशासन निद्रावस्थेत

    News34

    चंद्रपूर: दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी एकाच दिवशी 3 नागरिकांचा अपघाती मृत्यू झाल्याने चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्था व जड वाहनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. नागपूर महामार्ग बंगाली कॅम्प व मूल मार्ग तसेच बायपास रस्त्यावरील जीवघेणे अपघात रोखण्याच्या मागणीसाठी आता जनविकास सेनेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे.

     

    दुपारी 12 वाजता संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख, महिला आघाडीच्या मनीषा बोबडे व युवा आघाडीचे अक्षय येरगुडे यांचे नेतृत्वात जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिवंगत अनिता ठाकरे यांना त्यांचा अपघात झाला त्याच ठिकाणी वाहतूक अडवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पोलिसांनी वाहतूक अडविण्यास अटकाव केल्यानंतर अर्धा तास जनविकासचे कार्यकर्ते पोलिसांशी झोंबले. संतप्त कार्यकर्ते व नागरिकांचा आवेश पाहून अखेर पोलिसांनी रस्त्यावरील अपघातस्थळी श्रद्धांजली अर्पण करू दिली.

    जनविकास सेनेच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे व रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांनी अपघातस्थळी दिवंगत अनिता ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करून निवेदन स्वीकारल्यानंतर जनविकासच्या कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली कार्यक्रमाचा समारोप केला. शहरातील जीवघेणे अपघात रोखण्याचे हेतुने 8 दिवसांत उपायोजना आखणे सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जनविकास सेनेने जिल्हा प्रशासनाला दिला.

    यावेळी निर्मला नगराळे, कुसुम उध्दार,किरण कांबळे, श्रुती कांबळे, माया डोईफोडे, पुष्पा मुळे,नेत्रा इंगुलवार, प्रतिभा तेलतुंबडे,मेघा दखणे, चंदा नैताम, संगीता मेश्राम,स्नेहल चौथाले,वसंता जोशी, विशाल बीरमवार, देवा पाचभाई, सुहास फुलझेले,चंद्रमणी पाटील , मनोहर धांडे,सोमेश्वर गीरडकर, अमोल पांढरे, प्रशांत काळे, प्रशांत थूटे, शरद दुरटकर, ओम कोमलवार,प्रतिक हरणे, वैभव लेडांगे,गिरीश ढवस,मनीष घनश्याम येरगुडे, देवराव हटवार ,इमदाद शेख,प्रफुल बैरम,गोलू दाखने, भूषण माकोडे, राहुल दडमल,आकाश लोड़े, शुभम चिंचोलकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

    शहरातील जीवघेणे अपघात रोखण्यासाठी नव्याने रिंग रोडचा प्रस्ताव, वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनविरुद्ध कारवाई, नियमानुसार वाहनतळ नसलेले हॉटेल, शोरूम ,बार- रेस्टॉरंट,दुचाकी विक्रेते,स्ट्रिट फूड विक्रेते, खाजगी ट्रॅव्हल्स इत्यादीं विरूद्ध कठोर कारवाई, मुख्य रस्ता व सर्विस लेन यांच्यामध्ये छोटे दुभाजक, नागपूर मार्गावर गजानन मंदिर चौकातील ट्राफिक सिग्नल सुरू करणे, सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत शहरातून जड वाहतुकीवर बंदी घालणे अशा विविध उपाययोजना आखण्यासाठी पुढील 8 दिवसांत कार्यवाही सुरू करण्याची जनविकास सेनेची मागणी आहे.

     

    तर कदाचित अनिता ठाकरे यांचा जिव वाचला असता…

    16 मार्च 2022 रोजी जनविकास सेनेने नागपूर मार्गावरील एमडीआर मॉल, जुना वरोरा नाका चौक, आंबेडकर भवन मार्ग अशा विविध पाच अपघातप्रवण स्थळांची ओळख पटवून गतिरोधक लावण्याची मागणी बांधकाम विभागाला केली होती. मात्र दीड वर्षात बांधकाम विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही. एमडीआर माॅलसमोर नागपूर कडे जाणाऱ्या मार्गावर गतिरोधक असते तर ट्रकची स्पीड कमी झाली असती व 15-20 मीटर अंतरावर झालेल्या अपघातात कदाचित दिवंगत अनिता ठाकरे यांचा जीव वाचला असता.

    असा झाला अपघात…

    गायत्री अलाइनमेंट समोर उभ्या असलेल्या एका स्कार्पियो चालकाने अचानक गाडी मागे घेऊन मुख्य रस्त्यावर नेल्याने अनिता ठाकरे यांना बाजुला जावे लागले. त्याच वेळी भरधाव वेगाने मागून येणाऱ्या ट्रक चालकाने छोट्या टेम्पोला डाव्या बाजूने ओव्हरटेक केल्याने अनिता ठाकरे यांच्या गाडीला धडक दिली व अपघात झाला. चौकशी करून सर्व दोषीविरुद्ध कारवाई करण्याची जनविकास सेनेची मागणी आहे.

  • चंद्रपूर शहरात एकाचं दिवशी 3 अपघात, 3 मृत्यू तर 1 गंभीर जखमी

    News34 chandrapur city accident

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात 4 सप्टेंबर ला सकाळपासून अपघातांचे सत्र सुरू झाले, या अपघातामध्ये तिघांचा बळी गेला तर 1 गंभीर जखमी झाला आहे.

    शहरात सकाळी चंद्रपूर-नागपूर मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप जवळ 49 वर्षीय शिक्षिका अनिता ठाकरे यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक ने धडक दिली, धडक बसल्यावर ती शिक्षिका खाली कोसळली आणि बघता बघता त्या शिक्षिकेचे डोके ट्रक च्या चाकात आले, या अपघातात शिक्षिका ठाकरे यांचा मृत्यू झाला.

    सायंकाळी साडेसात वाजता चंद्रपूर-मूल मार्गावरील आदर्श पेट्रोल पंप जवळ झालेल्या अपघातात 1 युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा युवक गंभीर जखमी आहे.

    हे 2 युवक चंद्रपूरच्या दिशेने भरधाव वेगात येत होते, आदर्श पेट्रोल पंप जवळ येताच युवकांचा दुचाकीवरून नियंत्रण सुटले असता दुचाकी रस्त्यावर स्लिप झाली.

    या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या युवकाच्या डोक्याला जबर मार लागला आहे.

    या अपघातातनंतर काही वेळात पुन्हा चंद्रपूर-मूल मार्गावर अपघात झाला या अपघातात एकाचा मृत्यू झाला.

    भास्कर सातपुते राहणार कोंढाळा-घुग्गुस असे मृतकाचे नाव आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भास्कर पायी जात असताना त्याला मागून येणाऱ्या एका ऑटोने एसपायर अकॅडमी नेहरू नगर मूल रोड येथे जोरदार धडक दिली. यात भास्करचा जागीच मृत्यू झाला. धडक देऊन आटो पसार झाला असून रामनगर पोलीस त्याचा शोध घेत आहे.

    चंद्रपूर शहरात 4 सप्टेंबर रोजी घडलेल्या अपघात सत्रामध्ये भरधाव वाहनांमुळे तिघांना आपला जीव गमवावा लागला, चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेत 2 पोलीस निरीक्षक असताना सुद्धा शहरातील वाहतूक अनियंत्रित कशी? हा मोठा प्रश्न आहे.

    शाळा सुटल्यावर शहरात अल्पवयीन बाईक रायडर्स चा धुमाकूळ सुरू होतो, सायंकाळी दारू पिऊन वाहन चालविणार्याची संख्या सुद्धा मोठी आहे.

    भरधाव वेगात वाहन चालविणारे चंद्रपूर वाहतूक शाखेला दिसत नाही काय? कागदपत्रांची चौकशी करण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज असतात मग भरधाव वेगात धावणाऱ्या वाहनांवर कारवाई का होत नाही? वाहतूक शाखेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कुणाचं नियंत्रण नाही का?

    जर वाहतूक पोलीस असेच कार्य करीत राहली तर भरधाव वेगात धावणारे वाहन व होणारे अपघात हे कधीच थांबणार नाही हे विशेष.

     

  • चंद्रपूर शहरातील रिलायन्स पेट्रोलपंप जवळ अपघात शिक्षिका ठार

    News34

    चंद्रपूर – 4 सप्टेंबर ला सकाळी 10 वाजताच्या सुमारास चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या ट्रक ने दुचाकीला धडक दिली, या धडकेत दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला.

    मृतक 48 वर्षीय अनिता किशोर ठाकरे श्रीकृपा कॉलोनी, जगन्नाथ बाबा नगर चंद्रपूर येथे राहणाऱ्या होत्या, त्या जिल्हा परिषद शाळा लखमापूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.

    4 सप्टेंबर ला सकाळी 10 वाजता शिक्षिका ठाकरे ह्या शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या, चंद्रपूर-नागपूर मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप जवळ अचानक भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक क्रमांक RJ11GC-0824 ने ठाकरे यांच्या दुचाकी वाहन क्रमांक mh34bs4977 ला धडक दिली.

    या धडकेत शिक्षिका ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला, धडक दिल्यावर ट्रक चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला.

    सदर घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

  • रक्षाबंधनासाठी जात असताना धावत्या दुचाकीवर चक्कर आली आणि घडलं दुर्दैवी

    News34

    सिंदेवाही – रक्षा बंधनाच्या दुसऱ्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी निघालेल्या बहिणीचा 1 सप्टेंबर ला अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, अपघातात मृतक महिलेची 6 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

    1 सप्टेंबर ला 34 वर्षीय लवकेश रेचनकर, त्याची पत्नी 29 वर्षीय मीनाक्षी रेचनकर व मुलगी 6 वर्षीय मनस्वी हे आज दुपारच्या सुमारास सावली तालुक्यातील पाथरी चक येथे जात होते.

    रक्षा बंधनाला भावाकडे राखी बांधायला मीनाक्षी गेली नसल्याने आज त्या कुटुंबासहित निघाल्या होत्या मात्र सिंदेवाही पासून 3 किलोमीटर अंतरावरील मेंढा माल येथुन जात असताना लवकेश यांना धावत्या दुचाकीवर चक्कर आली आणि दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने कुटुंबसहित सर्व रस्त्यावर आदळले.

     

    या अपघातात मीनाक्षी रेचनकर यांचा जागीच मृत्यू झाला तर 6 वर्षीय मनस्वी गंभीर जखमी झाली, सिंदेवाही पोलिसांनी तात्काळ मनस्वी व लवकेश यांना रुग्णालयात दाखल केले, मनस्वी ची प्रकृती गंभीर असल्याने तिला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    सिंदेवाही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पीआय तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलिस करीत आहेत.

  • बल्लारपूर शहरात अपघाताचा थरार नातवासमोर आजीचा मृत्यू

    News34 road accident

    बल्लारपूर – आजी आपल्या नातवाला सोबत घेत पेन्शन घेण्यासाठी दुचाकीवर निघाली होती, मात्र वाटेतच मृत्यूने त्यांना पाठीमागून धडक दिली, या धडकेत आजीचा मृत्यू झाला.

    बल्लारपूर येथील रहिवासी लक्ष्मीबाई बंडेलवार व नातू नरसिंग कोंडा हे बुधवारी दुपारी पेन्शन घेण्यासाठी एमएच 34_8320 क्रमांकाच्या अॅक्टिव्हाने राजुरा येथे जात होते. यादरम्यान दोघेही व्हीटीएस प्लॉटच्या वेलंकी पेट्रोल पंपाजवळ पोहोचले, त्याचवेळी मागून येणाऱ्या एमएच 34 बीजी 9131 क्रमांकाच्या ट्रकने अॅक्टिव्हाला धडक दिली.

     

    त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले. दरम्यान नातू नरसिंग कोंडा याने ट्रकचालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक चालक ट्रकसह पळून गेला. या अपघातात नातू किरकोळ जखमी झाला. दरम्यान, ट्रकने धडक दिल्याने आजी लक्ष्मीबाई बंडेलवार यांचा जागीच मृत्यू झाला.

     

    घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह रुग्णालयात पाठवला. काही वेळातच पोलिसांनी चालकाला अटक करून ट्रक जप्त केला.

  • चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात

    News34 गुरू गुरनुले

    मूल : चंद्रपूर येथून छत्तीसगड राज्यातील बोहरमभेडी गावांत पार्थीव घेवून जाणा-या स्काॅर्पीओचा अपघात झाल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील जानाळा लगतच्या नर्सरी जवळ घडली. अपघातग्रस्त स्काॅर्पीओ मध्यें चालकासह एकुण सहा जण प्रवास करीत होते.

    चंद्रपूर लगतच्या पडोली लखमापूर परीसरातील कोल डेपो मध्यें काम करणारे केशवराम यादव (60) यांचे काल रात्री निधन झाले. छत्तीसगड मधील मानकापूर जिल्हयातील बोहरमभेडी येथील मूळ रहिवासी असल्याने मृतक केशवराम यादव याचे पार्थीव अंत्यसंस्कारा करीता त्याचे मूळ गांवी घेवून जाण्यासाठी त्याचे नातेवाईक छगनलाल साहु व इतर दोघेजण स्काॅर्पीओ (एचएच-34-बीएफ 0050) ने सकाळी 9.15 वाजताच्या दरम्यान लखमापूर येथून छत्तीसगड कडे रवाना झाले.

    दरम्यान सकाळी 9.50 वा. चे दरम्यान मूल पासून चंद्रपूर मार्गावरील 7 कि.मी.अंतरावर असलेल्या जानाळा लगतच्या नर्सरी जवळ स्काॅर्पीओ चालक अश्वजीत रूपचंद सहारे (26) रा. दुर्गापूर याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मार्गावरील पुलाच्या कठडयाला स्काॅर्पीओने धडक दिली.

     

    अपघातग्रस्त वाहन भरधाव वेगात असल्याने वाहनाच्या धडकेने पुलाचा कठडा तुटून मार्गाच्या कडेला असलेल्या झाडाला जबर धडक दिली. यामध्यें गोंदिया जिल्हयातील अर्जूनी मोरगांव तालुक्यातील बुटाई येथील रहीवासी असलेले सचिन मोहन साखरे (32) याचा घटनास्थळीच मृत्यु झाला. मृतक सचिन साखरे हा स्काॅर्पीओ चालक अश्वजीत सहारे याचा नातेवाईक असून पार्थीव पोहोचवून परत येतांना सोबतीला एक जण असावा म्हणून स्काॅर्पीओ चालकाने त्याला सोबत घेतले होते. अपघाता मध्यें छगनलाल साहु (60) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रूग्णालय येथे हलविण्यात आले. इतर दोघांना किरकोळ जखमी झाले असून ते सुखरूप आहेत. घटनेची माहिती होताच मूल पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

    अपघातातील जखमी आणि मृतकाला हलविण्यात रूग्णवाहीकेला बोलाविण्यात आले परंतू रूग्णवाहीकेला घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याने शेवटी पोलीस वाहनामध्यें जखमी आणि मृतकांना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुमीत परतेकी यांचे मार्गदर्शनात स्थानिक पोलीस कर्मचारी करीत आहेत.

  • बल्लारपूर में गाय को बचाने के चक्कर मे हुआ भीषण हादसा

    Accident in ballarpur

    News34

    बल्लारपुर (रमेश निषाद)

    👉 आज रात करीब एक बजे बल्लारपुर कॉलरी परिसर के सरदार पटेल वार्ड निवासी राजशेखर पेरका बाइक से दुर्घटनाग्रस्त होने पर गंभीर घायल होने पर जिंदगी से जंग नागपुर के मेडिटेशन दवाखाने में लड़ रहा है वहां डॉक्टरों ने ब्रेन डेड बताया है वहीं दूसरा वेकोली कामगार प्रशांत आकुला चंद्रपुर के मेहरा हॉस्पिटल में भर्ती किया गया तीसरा शिवा नामक युवक को मामूली चोट बताई जा रही है ।

    👉 रविवार की रात करीब एक बजे राजशेखर पेरका को सरदार पटेल वार्ड में स्थित घर छोड़ने जाने के दौरान कॉलरी दवाखाने के पास अंधेरे में गाय का झुंड बैठा था जिससे बचने व बचाने के चक्कर में बाइक डिवाइडर से टकराई जिससे दोनों के सिर पर गंभीर चोटें आई है तीसरा मामूली घायल हुआ है । बल्लारपुर शहर में आए दिन जानवरों के कारण दुर्घटना हो रही है नागरीको की मांग को बल्लारपुर नगर परिषद मुख्याधिकारी व प्रशासक विशाल वाघ के अनदेखा करने से और कितनी होंगी दुर्घटनाएं ?, कितनों के जान गवाना का हो रहा इंतजार ? जनता कर रही सवाल।

    👉 आवश्यकता है कि खुले घूमनेवाले जानवरों के मालिकों पर उचित कार्यवाही की जाए जानवरों को पकड़कर गौशाला में रखने का प्रबंध किया जाए कॉल री के तिलक वार्ड, भगत सिंग वार्ड, सरदार पटेल वार्ड ,गणपति वार्ड, पंडित दीनदयाल वार्ड, मौलाना आजाद वार्ड, रविन्द्र नगर वार्ड के कारवां रोड पर, संतोषी माता वार्ड, पुराना बस स्टैण्ड,में मुख्य मार्ग पर, नगर परिषद चौक , कलामंदीर आदि पूरे शहर में जानवर खुले घूमते देखे जाते है जिन्हे पकड़कर उचित कार्यवाही करने की मांग नागरीको द्वारा की जा रही है ।

  • चंद्रपूर जिल्ह्यातील महाराजा चा अपघात एक ठार तर 5 जखमी

    News34

    बल्लारपूर – सध्या राज्यात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, सर्वात जास्त अपघाताचा कहर तर समृद्धी महामार्गावर सुरू आहे, मात्र अनेक मार्गावर अपघाताच्या घटना घडत असून त्यामध्ये अनेकांचा नाहक जीव जात आहे.

    बल्लारपूरहून नागपूरकडे जाणाऱ्या महाराजा ट्रॅव्हल्सची बस क्रमांक एमएच 34 बीझेड 0009 चा सकाळी 10 वाजताच्या सुमारास वर्धा जिल्ह्यातील जाम समोरील कांदळी गावाजवळ अपघात झाला. या अपघातात पेपर मिल इन्स्ट्रुमेंट विभागात कार्यरत धीरज कुलकर्णी (48) यांचा मृत्यू झाला. चालकासह 5 ते 6 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार महाराजा ट्रॅव्हल्सची ही बस बल्लारशाह येथून सकाळी 7 वाजता नागपुर साठी निघाली. सकाळी 10 वाजताच्या सुमारास वर्धा जिल्ह्यातील जाम जवळील कांदली गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या टँकरवर बसची धडक झाली. या अपघातात बसची केबिन चाके उडून गेली. गंभीर जखमी ड्रायव्हर, कंडक्टर आणि प्रवाशांना नागपूरच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर किरकोळ जखमी प्रवाशांना प्राथमिक तपासणी आणि उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे.