corruption in ration shop Pombhurna
corruption in ration shop Pombhurna : पोंभुर्णा – पोंभुर्णा शहर व तालुक्यातील शासनमान्य धान्य दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात धान्याचा काळाबाजार सुरू असून, सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्य सर्रासपणे खासगी व्यापाऱ्यांना व ट्रकमधून बाहेर जिल्ह्यात विकले जात असल्याची गंभीर तक्रार युवा सेना शहरप्रमुख महेश प्रकाश श्रीगिरीवार यांनी पोंभूर्णा तहसीलदार यांचेकडे केली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची चंद्रपुरात पडताळणी सुरु
सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे स्वस्त धान्य गरीब व गरजू जनते च्या घरी न पोहोचता दलाल व व्यापाऱ्यांच्या खिशात जात असल्याने हजारो कुटुंबे स्वस्त धान्यापासून वंचित राहत आहेत. शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या योजनेला हा उघडपणे लुटण्याचा प्रकार ठरत असून, प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पोंभूर्णा युवा सेनेकडून करण्यात आला आहे. black marketing of subsidised food grain
महत्वाच्या मागण्या :-
- १) धान्य घोटाळ्यातील सर्व संबंधित दोषी दुकानदार, लाभार्थी व व्यापाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी.
२) गोडावून व दुकानांची चौकशी करून साठवलेले धान्य तात्काळ जप्त करावे.
३) धान्य वाहून नेणारे ट्रक व इतर वाहनांवर कारवाई करून त्यातील माल जप्त करावा.
४) हा घोटाळा मोठ्या प्रमाणावर असून, यामध्ये उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी.
युवा सेनेचा इशारा :-
जर ७ दिवसांच्या आत प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही, तर युवा सेना पोंभुर्णा तर्फे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील. ” गरीब आणि सामान्य जनतेच्या हक्काचे धान्य लुटणाऱ्या भ्रष्ट यंत्रणेचा आम्ही कडाडून विरोध करू. पोटभर अन्न मिळावे हा जनतेचा हक्क असून, त्या हक्कासाठी युवा सेना रस्त्यावर लढा देईल.” yuvasena ubt
निवेदन देतांना युवासेना शहरप्रमुख महेश श्रीगिरीवार यांचेसोबत कृषभ बुरांडे, सुरज कावळे व युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.