Tag: Property tax defaulters list

  • property tax defaulters list । चंद्रपूर शहरात झळकले थकबाकीदारांचे बॅनर! काय आहे कारण?

    property tax defaulters list

    property tax defaulters list : 1 लाखाच्या वर मालमत्ता कर थकीत असणाऱ्या थकबाकीदारांना करभरणा करण्यास मनपाद्वारे 21 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती मात्र तोपर्यंत करभरणा न करणाऱ्या सर्व थकबाकीदारांची नावे सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध केली गेली असुन शहरातील वर्दळीच्या सर्व चौकांवर असे बॅनर लावण्यात आले आहे. municipal corporation banner for tax defaulters

    कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र कायदा निर्माण करा – आमदार जोरगेवार

       
      यात विनोद बुराडे -116278,लागूबाई भुफा-153184 ,नामदेवराव पारवेकर- 150086,केवलराम गुलाणी-456082, विनस बनोत-122977,विदर्भ काँक्रीट प्रा. -198557,विठ्ठल पंदीलवार- 320515,मो. नजीर अ.करीम-177441,महंमद वसिउद्दिन-362228 ,निर्मलादेवी पंडीत- 620491, शामराव लांडगे-1180007 समृद्ध जीवन फूड्स लि.- 469093,सायराबाई गांधी-166911, रीना सरकार-203392,समृद्धी सेविंग इन्व्हेस्टमेंट-180620 असे एकुण  51 लक्ष 29 हजार थकबाकी असणाऱ्या16 थकबाकीदारांची नावे प्रकाशित करण्यात आली आहे. municipal corporation property tax recovery


       शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते, परंतु सुविधांचा लाभ घेणारे अनेक जण कराचा भरणा करण्यासाठी चालढकल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठीच मनपाद्वारे थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहिम राबविण्यास येत आहे. कर विभागातील अधिकारी कर्मचारी नागरिकांना समजावून सांगत असल्याने अनेक जणांनी कराचा भरणा केला आहे. property tax notice public display


       1 लाखाच्या वर मालमत्ता कर थकीत असणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मनपाच्या अधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे पाठपुरावा करण्यात आला होता. यासाठी त्यांना यासाठी 21 मार्चची मुदतसुद्धा देण्यात आली होती.मात्र याउपर करभरणा न केल्यास थकबाकीदारांची नावांचे बॅनर प्रसिद्ध करण्यात आले आहे. नावे प्रसिद्ध झाल्यानंतर जर कुणाची मानहानी झाली तर त्याला ते स्वतः जबाबदार राहणार असल्याचे चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे याआधीच स्पष्ट करण्यात आले होते. या होणाऱ्या कारवाईमुळे ज्यांना या मोहिमेच्या परिणामांची कल्पना आली होती त्या थकीतदारांनी ऑनलाईन तसेच अथवा ऑफलाईन माध्यमातुन आपल्या कराचा भरणा केला आहे.

  • Property tax arrears Chandrapur । चंद्रपूर मनपाचा इशारा : 10 मार्चला थकबाकीदारांची नावे होणार जाहीर

    Property tax arrears Chandrapur

    Property tax arrears Chandrapur : 1 लाखाच्या वर मालमत्ता कर थकीत असणाऱ्या थकबाकीदारांना करभरणा करण्यास मनपाद्वारे 8 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली असुन 8 मार्चपर्यंत करभरणा न केल्यास 10 मार्च रोजी अश्या सर्व थकबाकीदारांची नावे सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केली जाणार आहेत.  

    चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना, पोलीस तक्रारीनंतर घटना उघडकीस

       शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते, परंतु सुविधांचा लाभ घेणारे अनेक जण कराचा भरणा करण्यासाठी चालढकल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठीच मनपाने थकीत कर वुसलीसाठी विशेष मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे.कर विभागातील अधिकारी कर्मचारी नागरिकांना समजावून सांगत असल्याने अनेक जणांनी कराचा भरणा केला आहे. Property tax defaulters list


       1 लाखाच्या वर मालमत्ता कर थकीत असणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मनपाच्या अधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे पाठपुरावा केला जात आहे.त्यांना यासाठी 8 मार्चची मुदतसुद्धा देण्यात आली आहे.मात्र याउपर करभरणा न केल्यास थकबाकीदारांची नावे विविध माध्यमातुन प्रसिद्ध केली जाणार आहे. Chandrapur municipal tax notice

       नावे प्रसिद्ध झाल्यानंतर जर कुणाची मानहानी झाली तर त्याला ते स्वतः जबाबदार राहणार असल्याचे चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे. या होणाऱ्या कारवाईमुळे ज्यांना या मोहिमेची कल्पना झाली आहे ते थकीतदार ऑनलाईन अथवा ऑफलाईन माध्यमातुन आपल्या कराचा भरणा करताना दिसत आहेत.तरी अश्या संभाव्य कारवाई टाळण्यासाठी आजच मालमत्ता कराचा भरणा करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. Chandrapur property tax payment