Tag: Pratibha Dhanorkar News

  • special train for Mahaparinirvan Diwas । महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौद्ध अनुयायांसाठी विशेष सुविधा द्या – खासदार धानोरकर

    special train for Mahaparinirvan Diwas : चंद्रपूर 4 डिसेंबर (News३४): भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) चैत्यभूमी (मुंबई) आणि दीक्षाभूमी (नागपूर) येथे अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या लाखो बौद्ध अनुयायांच्या सोयीसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

    खंडणी : वाळू घाट बंद पाडतो, खंडणीचा गुन्हा दाखल

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून समृद्धी महामार्गावर (मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग) टोलमधून संपूर्ण सवलत देण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, महापरिनिर्वाण दिनी लाखो अनुयायी खासगी वाहनांनी प्रवास करतात. त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी व्हावा, तसेच त्यांना वेळेवर आणि सुलभपणे पोहोचता यावे, यासाठी बौद्ध अनुयायांची वाहने टोलमुक्त करावीत. महाराष्ट्राकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्याचा हा मोठा सन्मान ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. special train for Mahaparinirvan Diwas

    दरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनाही पत्र पाठवून बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरून मुंबईसाठी विशेष रेल्वेगाडी चालवण्याची मागणी करण्यात आली आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईला जातात. नियमित गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन, अनुयायांच्या सोयीसाठी ०५ डिसेंबर रोजी बल्लारपूरहून मुंबईसाठी (अप) आणि ०७ डिसेंबर रोजी मुंबईहून बल्लारपूरसाठी (डाऊन) अशी एक विशेष रेल्वेगाडी त्वरित चालवावी, अशी विनंती रेल्वेमंत्र्यांना करण्यात आली आहे.

  • Pratibha Dhanorkar news । संसदेतून थेट जनतेच्या दरबारात: प्रतिभा धानोरकर यांची समस्या निवारणासाठी तत्परता!

    Pratibha Dhanorkar news

    Pratibha Dhanorkar news : लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच खासदार प्रतिभा धानोरकर या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पुढे आल्या असून त्यांच्या माध्यमातून आज दि. 07 एप्रिल रोजी वरोरा येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.

    चंद्रपूर बस स्थानकावर शिवाई बसने चिरडला ऑटो चालकाचा पाय

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जनतेच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे मत वरोरा येथील आयोजीत जनता दरबाराच्या वेळीस केले. अर्थ संकल्पीय अधिवेशनात आपल्या लोकसभेतील अनेक प्रश्नांचा पाढा केंद्र सरकार समोर वाचून आता त्या पुन्हा एकदा जनसेवेत रुजू झाल्या आहेत.

    वरोरा येथे आयोजित जनता दरबारात अनेक नागरिकांच्या समस्यासंदर्भात त्यांनी निराकरण केले. अनेक नागरिकांनी आज आयोजित जनता दरबारात लेखी निवेदनासह खासदार धानोरकर यांच्याकडे समस्या मांडल्या. या संदर्भात खासदार धानोरकर यांनी अनेक समस्यांच्या निराकरणासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून नागरीकांच्या समस्या सोडविल्या.

    यावेळी, खासदार धानोरकरांनी प्रत्येक नागरीकांची समस्या ही माझ्याकडून सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्न केले जाईल अशे आश्वासित मत व्यक्त केले. येणाऱ्या काळात प्रत्येक तालुक्यात तसेच, जिल्हा परिषद क्षेत्रात जनता दरबाराचे आयोजन करुन नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले. 

  • Pratibha Dhanorkar News | कृषी पंप वीज जोडणीवरून खासदार आक्रमक

    Pratibha Dhanorkar News

    pratibha dhanorkar news : सन 2018 पासून अनेक शेतकऱ्यांनी कृषीपंप वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज केला असुन शासनाच्या उदासिन धोरणामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज जोडणी मिळत नसल्याची खंत मा. मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देंवेद्र फडणविस यांना पाठविलेल्या पत्राद्वारे खा. धानोरकर यांनी व्यक्त केली.

    चंद्रपुरात क्रूर हत्या


    चंद्रपुर जिल्हात 1596 शेतकऱ्यांनी शेतीच्या सिंचनासाठी कृषी पंप वीज जोडणी मिळावे याकरिता अर्ज केला असुन त्यांना अद्यापही वीज जोडणी मिळालेले नाही. शासन कृषी पंपाना सौर उर्जा लावण्यासाठी शेतकऱ्यांना जबरदस्ती करित आहे. ते योग्य नसल्याची बाब खा. धानोरकर यांनी व्यक्त केली.

    एमईआरसी च्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना सौर उर्जे करिता शासन जबरदस्ती करु शकत नाही. त्यामुळे अनामत रक्कम भरलेल्या शेतकाऱ्यांना तात्काळ कृषी पंप वीज जोडणी देण्याची मागणी खा. धानोरकर यांनी मा. मुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणविस (cm devendra fadnavis) यांना पत्राद्वारे केली आहे.

    सदर मागणी तात्काळ पुर्ण करावी अशी विनंती देखिल खा. धानोरकर यांनी केली आहे. सदर मागणी पुर्ण न झाल्यास शेतकऱ्यांसह महावितरण कार्यालयावर उग्र आंदोलन करण्याचा ईशारा खा. धानोरकर यांनी दिला आहे.