Tag: News34 chandrapur

  • एक संघ लढ्यातून काँग्रेस “क्रांतीभूमीत ‘ तिरंगा फडकविणार – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    News34

    चिमूर – 16 ऑगस्ट हा देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाला कलाटणी देणारा दिवस आहे. महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जावचा नारा दिल्यानंतर संपूर्ण देशात “करो या मरो’ अशी परिस्थिती निर्माण होऊन स्वातंत्र्याच्या मोठया उठावास सुरुवात झाली. याच काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या क्रांतिकारक भजनाने प्रेरित होऊन 1942 साली चिमुरात क्रांतीची मशाल हाती घेऊन येथील वीरांनी प्राणाची आहुती देत चिमूरला सर्वप्रथम स्वातंत्र्य मिळवून दिले.
    हा इतिहास देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या गेला. सलग दहा वर्षे या क्रांती भूमीची आमदार म्हणून सेवा करण्या करिता मिळालेल्या सेवा संधीमुळे या मातीशी माझी नाळ जुळली आहे. येथील वीर शहिदांना अभिवादन करण्यासाठी मला कोणीही रोखू शकत नाही. सोबतच संपूर्ण काँग्रेस एक संघ होऊन या क्रांती भूमी तिरंगा फडकविणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी केले. ते चिमूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
    याप्रसंगी प्रामुख्याने माजी आमदार,   प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आदिवासी विभाग डॉ .नामदेव उसेंडी,  चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्र निरीक्षक, डॉ.नामदेव किरसान, महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ. अविनाश वारजूकर, प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग, धनराज मुंगले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सतिष वारजूकर, जिल्हा काँग्रेस महासचिव गजानन बुटके, राम राऊत , संजय डोंगरे , काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे प्रफुल खापर्डे,तालुका अध्यक्ष विजय गावंडे, प्रमोद चौधरी, संदीप कावरे , कृष्णा तपासे , राजू लोणारे  माधव बाबू बिरजे, उमेश हिंगे,कल्पना इंदुरकर , रीता अंबाडे मंचावर उपस्थित होते.
    यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, आर एस एस सारख्या मनुस्मृति विचारांच्या शक्तीने देशाच्या राष्ट्रध्वजाचे महत्व कमी करण्याचा प्रकार सुरू आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवीत असताना दुसरीकडे मात्र देशद्रोही मनोहर भिडे सारख्या कडून तिरंगा ऐवजी दुसरा ध्वज फडकवा  असा समाजात तेढ निर्माण करणारा विषारी संदेश पसरविल्या जात आहे. देशाला जीवन समर्पित करून बलिदान देणाऱ्या महापुरुषांचा अवमान करणाऱ्या या देशद्रोही भिडेला तुरुंगात डांबण्या ऐवजी गुरुजी म्हणून सत्ताधारी विद्यार्थी सन्मान करीत आहेत.
    महात्मा गांधींच्या विचारांची महानता या मनुस्मृति वाद्यांना काय कळणार ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर देशात पंतप्रधान मोदींनी हुकुमशाही धोरण लावण्यासाठी स्वायत संस्थांचा वापर करून पक्ष फोडाफोडींचे राजकारण सुरू केले आहे. राजकारणासाठी देवांच्या नावांचा वापर करून समाजाला जाती जातीत विभागले जात आहे यामुळे देशाची एकात्मता धोक्यात आली असून 2024 ची स्वातंत्र्याची दुसरी लढाई साठी सर्वांनी सज्ज राहून राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी करावी असेही विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार प्रतिपादन यांनी केले.
    चिमूर क्रांतीचा इतिहास अजरामर – वडेट्टीवार
    आज 16 आगस्ट चिमूर क्रांती दिनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी चिमूर येथील हुतात्मा स्मारक येथे येऊन चिमूर क्रांतीतील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलतांना विरोधी पक्षनेते आ. सेवडेट्टीवार म्हणाले की सन 1942 साली देशातील चिमुरात क्रांतीची पहिली ठिणगी पेटली. यात शहीद वीर क्रांतिकारक बालाजी रायपूरकर व त्यांच्या साथीदारांनी हाती शस्त्र नसताना देखील शस्त्रधारी इंग्रज अधिकाऱ्यांशी लढा दिला. या लढ्यात अनेक तरुणांना वीरमरण आले. हा चिमुरचा क्रांतिकारी  इतिहास स्वातंत्र्याच्या लढाईच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या गेला असून तो सदैव अजरामर राहील. असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
  • दारू खरेदीसाठी उपक्षेत्रीय प्रबंधकाच्या वाहनाचा वापर

    News34

    चंद्रपूर – वेकोली चंद्रपुर क्षेत्रातील एका उपक्षेत्रीय प्रबंधकाच्या वाहनाचा वापर दारू खरेदीसाठी करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे.

    मिळालेल्या माहिती नुसार आज 16 ऑगस्ट बुधवारी सायंकाळच्या सुमारास चंद्रपुर क्षेत्रातील एका उपक्षेत्रीय प्रबंधकाचे वाहन शहरातील एक वाइन शॉप जवळ उभे करीत वाहन चालक थेट दारूच्या दुकानात शिरला व दारू खरेदी करीत पुन्हा वाहनात जाऊन बसला.

    हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे,  त्यावेळी त्या वाहनात एक कर्मचारी बसून होता, विशेष बाब म्हणजे बुधवारी सुट्टीचा दिवस असतांना ही गाड़ी शहरात आली कशी? आणि त्यात बसलेला तो कर्मचारी कोण? सदर दारू कुणासाठी खरेदी करण्यात आली? असा प्रश्न काही कर्मचारी करत आहे, यापूर्वी सुद्धा अनेक वेळा वेकोलीच्या वाहनाच्या सर्रासपने दुरुपयोग करण्यात आला परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्या मुळे आता थेट दारू खरेदी करण्यासाठी वेकोलीच्या वाहनाचा वापर केल्या जात आहे

  • स्वातंत्र्य दिनी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात ऐतिहासिक क्षणाची नोंद

    News34

    भद्रावती : दि. १५ ऑगस्ट रोज मंगळवार ला स्वातंत्र्यदिनी माजी सैनिक व विरपत्नी यांनी शिवबंधन बांधीत शिवसेनेच्या ‘ शिवालय ’ ह्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना ( उ. बा. ठा. ) पक्षात  प्रवेश केला. स्वातंत्र्यदिनाच्या शुभ पर्वावर  संपूर्ण महाराष्ट्रात  या ऐतिहासिक क्षणाची नोंद वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रात झाली.

    याप्रसंगी देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शुर विरांच्या विर पत्नी आणि माजी सैनिक यांना अत्यंत सन्मानपूर्वक शिवबंधन बांधीत त्यांचा पक्ष प्रवेश सभारंभ पार पडला.

    याप्रसंगी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना ( उ. बा. ठा. ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्यासह  शिवसेना जिल्हा महिला संघटिका तथा राणी लक्ष्मीबाई महिला रक्षणदल जिल्हाप्रमुख नर्मदा बोरेकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुषमा शिंदे, युवा सेनापुर्व विदर्भ सचिव प्रा. निलेश  बेलखेडे, उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने, भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर व वरोरा शहर प्रमुख वर्षा कुरेकर प्रामुख्याने हजर होत्या.

    या ऐतिहासिक क्षणी कारगील योद्धा तथा जयहिंद फाऊंडेशनचे सल्लागार कॅप्टन विलास देठे, जेष्ठ माजी सैनिक तथा तीन युध्दात सक्रीय सहभाग घेतलेले रामचंद्र नवराते, जयहिंद फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष तथा माजी उपसरपंच विजल तेलरांधे, माजी सैनिक  कारगील योध्दा रुपेश कुत्तरमारे,माजी सैनिक अरुण खापने, माजी सैनिक नामदेव मांडवकर, माजी सैनिक कारगील योध्दा अजीत राम, माजी सैनिक प्रमोद गावंडे, माजी सैनिक संजय बेलेकर, माजी सैनिक अरुण मत्ते, माजी सैनिक कारगील योध्दा सुरेश नाकाडे, माजी सैनिक रमेश सातेकर, माजी सैनिक मारोती जांभुळे, माजी सैनिक दिलीप गंग्रस, माजी सैनिक बीएसएफ अनिल जिवतोडे, माजी सैनिक कारगील योध्दा राकेश फूले, माजी सैनिक नमोद रामटेके, माजी सैनिक कारगील योध्दा भाऊराव मत्ते आणि  माजी सैनिक  श्रीराम कुलकर्णी यांच्यासह माजी सैनिक पत्नी द्वारका नवराते, विरपत्नी सुर्या विश्वास सावसाकडे, विरपत्नी रंजना प्रकाश घटे, विरपत्नी कमल सुरेश मत्ते ,विरपत्नी विजया अब्रहम सम्युअल, माजी सैनिक पत्नी मनिषा राकेश फूले, माजी सैनिक कन्या पुजा तिरमलवार आणि जयहिंद फाऊंडेशनच्या सहसचिव दर्शना तेलरांधे यांनी शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षात प्रवेश केला.

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना जिल्हा महिला संघटिका तथा राणी लक्ष्मीबाई महिला रक्षणदल जिल्हाप्रमुख नर्मदा बोरेकर यांनी केले. याप्रसंगी युवा सेनापुर्व विदर्भ सचिव प्रा. निलेश बेलखेडे आणि वरोरा शहर प्रमुख वर्षा कुरेकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल व आभार प्रदर्शन भद्रावती शहर घनश्याम आस्वले यांनी केले. या कार्यक्रमात खेमराज कुरेकर, ज्ञानेश्वर डूकरे, प्रशांत कारेकर, अरुण घुगल, प्रिती पोहाणे, सरला मालेकर, भावना खोब्रागडे यांच्यासह फार मोठया संख्येत शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते बंधू -भगिनी सहभागी झाले. कोरोना योध्दा पंकज कातोरे यांचा वाढदिवस या निमित्याने साजरा करण्यात आला.

    रविंद्र शिंदे यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरीत होऊन पक्षप्रवेशाचा निर्णय : कॅप्टन देठे

    या प्रसंगी कारगील योद्धा तथा जयहिंद फाऊंडेशनचे सल्लागार कॅप्टन विलास देठे म्हणाले की, शिवसेना (उ.बा.ठा.) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी कोरोना संक्रमण कालावधीत केलेले सामाजिक कार्य तसेच त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून सुरु असलेले विविध समाजपयोगी उपक्रम यापासून प्रेरणा घेऊन आम्ही त्यांच्या सोबत  समाजाकरीता काम करण्यासाठी शिवसेना ( उ. बा. ठा. ) पक्षात प्रवेश केला.

    सैन्यदलातील अनूभवाचा लाभ समाजाला करून देणार : विजय तेलरांधे

    जयहिंद फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष  विजय तेलरांधे याप्रसंगी म्हणाले की, आम्हाला सैन्यदलातील मिळालेला अनुभव समाजातील तरुण पिढीला व्हावा.

    त्यांच्यात देश सेवा, स्वयंशिस्त, उत्तम आरोग्य आणि निर्व्यसनीपणा रुजविण्यासाठी शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यासाठी आम्ही पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. सोबतच माजी सैनिक आणि विर पत्नी यांच्या परिवारीक अडीअडचणी, समस्या व मागण्या शासन व प्रशासन दरबारी रेटून त्यांना मार्गी लावण्यासाठी आम्ही हा सामुहिक निर्णय घेतल्याचे विजय तेलरांधे यांनी या प्रसंगी सांगितले.]

    माजी सैनिक व विरपत्नी यांना पक्षात योग्य सन्मान मिळेल : रविंद्र शिंदे

    पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात देशासाठी अविरत कार्य केलेल्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबातील विरपत्नी यांना पक्षात योग्य सन्मान मिळेल . आता ही सर्व मंडळी शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचे घटक झाले आहे.त्यांच्या अनुभावाचा पक्षाला निश्चीतच लाभ होईल. त्यांच्या समस्या, मागण्या व अडचणी मार्गी लावून त्यांना योग्य न्याय मिळविण्यासाठी आम्ही सदैव प्रामाणिक प्रयत्न करू.

    अवघ्या महाराष्ट्रात वरोरा -भद्रावती विधानसभा  क्षेत्रात मोठ्या संख्येत माजी सैनिक व विरपत्नी यांचा शिवसेना (उ.बा.ठा.) मधील पक्ष प्रवेश निश्चीतच शिवसेना परीवारासाठी भूषणावह आहे. असे प्रतिपादन शिवसेना (उ.बा.ठा.) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांनी या प्रसंगी केले.

  • दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर स्मृतीनिमित्त उभारली “अभ्यासिका”

    News34

     

    चंद्रपूर: दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या शिक्षण आणि लोकसेवेच्या समर्पणाला भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “दिवंगत खासदार बाळू धानोरकर अभ्यासिके “चे उद्घाटन शनिवार 19 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. चंद्रपूर येथील भिवापूर वॉर्डातील साई मंदिरात हा कार्यक्रम होणार असून, दिवंगत खासदार बाळू धानोरकर मित्र परिवाराने याचे आयोजन केले आहे.

     

    या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधी पक्ष नेते ना. विजय वडेट्टीवार हे भूषवतील. वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन होईल. प्रमुख वक्त्यांमध्ये दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांची उपस्थिती राहणार असून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

     

    या कार्यक्रमाला मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून राजुरा विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर जोरगेवार, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार श्री. देवराव भांडेकर, चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांची उपस्थिती राहणार आहे.

     

    “दिवंगत खासदार बाळू धानोरकर अभ्यासिका” हि दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या समाजाच्या विकासासाठी बांधिलकीचा वारसा पुढे नेत स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान आणि प्रेरणा देणारे दीपस्तंभ बनणार आहे. उद्घाटन समारंभ हा शिक्षणाचा उत्सव साजरा करण्याचा, दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतीचा सन्मान करण्याचा आणि शैक्षणिक उत्कृष्टता आणि सामाजिक जबाबदारी या दोन्हींसाठी समर्पित असलेल्या नवीन पिढीला प्रेरणा देण्याचा एक प्रसंग आहे. त्यामुळे समाजातील दानशूर शिक्षणप्रेमीनी स्पर्धा परिक्षेची पुस्तके भेट द्यावी, असे आवाहन दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवाराने केले आहे.

  • तळोधी पोलीस स्टेशनच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

    News34

    (प्रशांत गेडाम)
    नागभीड – तळोधी पोलीस स्टेशन च्या वतीने ‘माझी माती, माझा देश’ या उपक्रमाचे औचित्य साधून देशाची स्वतंत्रता व तिच्या गौरव याच्या रक्षणाकरिता बलिदान दिलेल्या वीरांच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांची 14 वर्षे आतील वयोगट व 19 वर्ष आतील वयोगट अशा दोन गटांमध्ये दोन किलोमीटर व चार किलोमीटर दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

    सदर स्पर्धेमध्ये तळोधी येथील महात्मा फुले विद्यालय, लोक विद्यालय,विश्वज्योती कॉन्व्हेंट,जवाहर नवोदय विद्यालय,गोविंदप्रभू महाविद्यालय असे पाच शाळा व महाविद्यालयातील अंदाजे 300 हुन अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

    सदर स्पर्धेच्या प्रसंगी पोलीस स्टेशन तळोधी येथील ठाणेदार मंगेश भोयर, पोलीस उपनिरीक्षक सहदेव गोवर्धन,पोलीस उपनिरीक्षक भास्कर पिसे,अंमलदार विजय उराडे,संजय मांढरे,सरोते,सतीश नेवारे, रत्नाकर देहारे,मंगाम, सुधाकर भानारकर,बांबोडे, आत्राम,विजय वाकडे, हंसराज सिडाम, तसेच संबंधित शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

  • आश्रमशाळेतील शिक्षक 3 महिन्यापासून वेतनाविना

    News34

     

    चंद्रपूर : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक – कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून झालेले नाही. शासनाकडून माहे जून महिन्याची वेतन तरतूद अपूरी प्राप्त झाल्यामुळे सर्वच जिल्ह्यातील निम्या आश्रमशाळांचे वेतन थकीत आहे. तीन महिन्यापासून वेतन न झाल्यामुळे विजाभज आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांना पत्र लिहून तात्काळ तरतूद उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

    नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी विजाभज आश्रमशाळांच्या वेतनाकरिता होणाऱ्या दिरंगाईबाबत नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न लावून शासनाचे लक्ष वेधले. विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी यापुढे वेतन नियमित करू व वेतनास विलंब झाल्यास कारणीभूत घटकावर शासननिर्णयानुसार कारवाई करू, अशी ग्वाही दिल्यानंतरही वेतनाबाबत जैसे-थे परिस्थिती असल्यामुळे आमदार अडबाले यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व विभागाचे मंत्री अतुल सावे यांना पत्र लिहून तात्काळ तरतूद उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

    इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळांचे वेतन तीन-तीन महीने विलंबाने होणे हे नेहमीचेच झाले आहे. शासन हे आश्रमशाळांच्या वेतनाबाबत सजग नाही असे दिसून येते. अनियमित वेतनाचा शिक्षकांच्या अध्यापणावर परिणाम होत असल्यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बहुजन वर्गातील भटक्या/विमुक्त जातीच्या विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

    वेतन तरतूद तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी व यानंतर तरतूद उपलब्ध नसल्यास उणे प्राधिकारातून वेतन काढण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावी. तीनही महिन्याची तरतूद तात्काळ उपलब्ध न झाल्यास विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ इतर आश्रमशाळा संघटनांना सोबत घेऊन राज्यव्यापी आंदोलन करेल, असा इशारा आमदार सुधाकर अडबाले यांनी पत्रातून दिला आहे.

  • 3 शिक्षकांचा धरणात बुडून मृत्यू

    News34

    गोंदिया – 15 ऑगस्टला स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत अनेकजण सहलीला जातात मात्र कधी ही सहल शेवटची ठरणार याचा कोबी अंदाज नसतो, गोंदिया जिल्ह्यातील खाजगी शिकवणी वर्गात शिक्षक असलेले 3 शिक्षकांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.

    हे तिन्ही शिक्षक गोंदिया, भिलाई व उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी होते, 15 ऑगस्ट व पारशी नववर्षाची सुट्टी असल्याने एन. मिश्रा, अरविंद व अतुल कडू हे गोंदियातील सिद्धिविनायक शिकवणी वर्गात शिक्षक आहे.

    2 दिवसांची सुट्टी असल्याने आपण सहलीला जाऊ असा प्लॅन झाला होता, भिलाई येथील शिक्षक मित्राच्या आमंत्रणावर राजनांदगाव येथील मांगता धरणावर चार शिक्षक सहलीसाठी गेले होते.

    मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने 4 पैकी 3 शिक्षक पाण्यात बुडाले यामध्ये तिघांचा मृत्यू झाला, आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने 3 शिक्षकांचे मृतदेह बाहेर काढले, मिश्रा, अरविंद सर व अतुल कडू या तिघांचा यावेळी मृत्यू झाला.

  • वरोरा जिल्हा निर्माण होणार?

    News34

    चंद्रपूर : राज्याच्या लोकसंख्येप्रमाणे सुमारे नवीन २२ जिल्ह्यांची निर्मिती करण्याच्या हालचाली सुरु आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्मिती करतांना वरोरा हे ठिकाण सर्वच दृष्टीने उपयुक्त आहे. प्रस्तावित जिल्हानिर्मिती दरम्यान निर्णय घेतांना घिसाडघाई न करता त्यांत समाविष्ट होणाऱ्या तालुक्यातील जनतेची मते जाणूनच निर्णय घेतला पाहिजे.
    भौगिलिक व इतर सर्वच बाबतीत वरोरा योग्य असून त्यादृष्टीने वरोरा जिल्हानिर्मिती करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्याची विनंती आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्हाधिकारी विनय गौंडा यांना केली आहे.
    जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात वरोरा संघर्ष समितीचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत अनेक विषयांवर बैठक घेण्यात आली.
    यावेळी वरोरा शहरातील कासमपंजा नाल्यातील पाणी वेकोलिच्या नवीन प्रस्तावित रोडमुळे निघण्यास अडथळा होत असल्याने पर्यायी व्यवस्था करणे, नगर शहराच्या मध्यभागी असलेल्या गांधी तलाव नगर परिषदेला हस्तांतरित करणे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजने अंतर्गत वरोरा पाणी पुरवठा योजनेस एम. आय. डी. सी. (म. औ, वि, म) कडून पाणी आरक्षण मिळण्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र त्वरित मिळावे. याकरिता स्वतः लक्ष देऊन त्वरित या मागण्या मान्य करण्याची विनंती आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली.
    याप्रसंगी वरोरा उपविभागीय अधिकारी,कार्यकारी अभियंता, एम.आय.डी.सी.चंद्रपूर, अधिक्षक अभियांता पाटबंधार विभाग चंद्रपूर, कार्यकारी अभियता पाटबंधार विभाग चंद्रपूर, वरोरा तहसिलदार, मुख्याधिकारी वरोरा, कार्यकारी अभियंता, एम.जे.पी चंद्रपूर, क्षेत्रीय व्यवस्थापक, वेकोली, वणी, एरीया तसेच वरोरा जिल्हा संघर्ष समितीचे पदाधिकारी प्रवीण सुराणा, डॉ. सागर वझे, प्रवीण धनवलकर, विलास नेरकर, प्रमोद काळे, मनीष जेठानी, सारथी ठाकूर यांची उपस्थिती होती.
  • आमदार किशोर जोरगेवार यांच्या समोर झाला अपघात आणि….

    News34

    चंद्रपूर – 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन देशात उत्साहात साजरा करण्यात येतो, मात्र या दिवशी चंद्रपूर – चीचपल्ली मार्गावर दुचाकी वाहनाचा अपघात झाला, ऐनवेळी आमदार किशोर जोरगेवार त्या मार्गाने येत असताना त्यांनी तात्काळ जखमींना कार्यकर्त्यांच्या वाहनात टाकत रुग्णालयात दाखल केले.

    स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम आटोपत आमदार जोरगेवार व यंग चांदा ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मार्कंडा येथे दर्शनाला गेले होते.

    सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास आमदार किशोर जोरगेवार परत येत असताना चीचपल्ली मार्गावर दुचाकी वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली, नागरिकांची गर्दी बघून आमदार जोरगेवार यांनी आपले वाहन थांबविले व कार्यकर्त्यांना निर्देश देत तात्काळ जखमींना आपल्या वाहनात बसवीत रुग्णालयात नेण्याचे निर्देश दिले.

    मिळालेल्या माहितीनुसार त्या दुचाकी वाहनांवर आजी-आजोबा व 2 नातू प्रवास करीत होते, दुचाकी वाहनावरून नियंत्रण सुटल्याने वाहन सरळ नाल्यात जाऊन कोसळले.
    या अपघातात एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे, जखमींना रुग्णालयात दाखल केल्यावर आमदार किशोर जोरगेवार रुग्णालयात दाखल झाले त्यांनी डॉक्टरांना जखमींच्या उपचाराकडे विशेष लक्ष देण्याची विनंती केली.

    यंग चांदा ब्रिगेडचे पंकज गुप्ता, करणसिंह बैस व राशीद हुसेन यांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले म्हणून त्यांना योग्यवेळी उपचार मिळाला.

    आमदार जोरगेवार यांनी ऐनवेळी जखमी नागरिकांच्या मदतीला धावल्याने त्यांच्या माणुसकीचे दर्शन चंद्रपूर वासीयांना दिसले.

  • स्वातंत्र्य दिनाला फिरण्याची हौस जीवावर बेतली

    News34

    गडचांदूर/कोरपना – 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला, यादिवशी अनेक नागरिक फिरायला बाहेर पडतात मात्र फिरण्याची ही हौस एका युवकाच्या जीवावर बेतली.

    जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याचे धबधबे पाहण्यास आज असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती, अश्यातच गडचांदूर येथील अमलनाला डॅम येथे वेस्ट वेअर जवळ नागरिकांनी गर्दी केली.

    चंद्रपुर शहराजवळील दाताला येथील काही युवक अमलनाला धरणाजवळ फिरण्यासाठी आले होते, दुपारी 2 वाजताच्या सुमारास 32 वर्षीय शुभम शंकर चिंचोळकर या युवकाने डॅम च्या वेस्ट वेअर पाण्यात उडी मारली मात्र शुभम ला खोलाचा अंदाज आला नसल्याने तो पाण्यात बुडाला.

    शुभम बाहेर न आल्याने मित्रांनी मदतीची हाक मारली, पोलिसांना सूचना देण्यात आली असता तात्काळ गडचांदूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

    काही वेळात पोलिसांनी शुभम चा मृतदेह बाहेर काढला, स्वातंत्र्य दिनी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आहे.

    पावसाळ्यात अमलनाला धरण पाण्याने भरल्यानंतर त्या ठिकाणातून वेस्ट वेअर परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात, मागील वर्षी याच ठीकाणी दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. एपीआई प्रमोद शिंदे यांच्या पथकाने मृतदेह बाहेर काढला असून पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे.