Tag: MSF security theft case

  • MSF security theft case | वेकोलि खाणीत खळबळ: सुरक्षा रक्षकांनीच केली चोरी

    MSF security theft case

    MSF security theft case : वेकोलि माजरी परिसरात बंद पडलेल्या भूमिगत खाणीच्या स्टोअर रूमचे संरक्षण करणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांवरच चोरीचा आरोप लागल्याने खळबळ उडाली आहे.

    माजरीचे पोलीस निरीक्षक अमित कुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्रीच्या पाळीत काम करणारे एमएसएफचे चार जवान अजय पाटील, भीमराव जाधव, परमेश्वर पवार, शरद पवार हे रात्रीच्या पाळीत कर्तव्यावर असताना भूमिगत खाण क्रमांक ३ च्या बंद स्टोअर रूममधून केबल चोरून रात्री पावणेएकच्या सुमारास जाळून त्यातून तांबे काढत होते. (Coal mine cable theft)

    वरोऱ्यात 2 किलो गांजा जप्त, एका आरोपीला अटक

    त्याचवेळी वेकोलिच्या सुरक्षा रक्षकांच्या गस्ती पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले आणि क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी एस.के. बैरवा यांना माहिती दिली. बैरवा यांच्या सूचनेनुसार सुरक्षा रक्षक शैलेश वानखेडे यांनी या चारही आरोपींविरुद्ध माजरी पोलीस ठाण्यात ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    माजरी पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक अमित कुमार पांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध व्यवसाय करणाऱ्या आणि वेकोलिमध्ये लोखंड चोरी करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. असे असतानाही वेकोलिच्या स्टोअर रूममधून केबल चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने वेकोलिच्या अधिकाऱ्यांना एमएसएफच्या सुरक्षा जवानांवर संशय आला. (Chandrapur mine theft)

    त्यानंतर वेकोलिच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आणि अखेर रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

    प्रतिक्रिया

    नव्या पोलीस निरीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कठोर कारवाईमुळे वेकोलिच्या खाणींमधून होणारी चोरी थांबली होती. तरीही स्टोअर रूममधून केबल चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने एमएसएफच्या जवानांवर संशय होता. वेकोलिच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या गस्ती पथकाच्या निगराणीत असतानाच हे जवान रात्रीच्या वेळी केबल जाळून तांबे काढताना पकडले गेले.

    एस.के. बैरवा (क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी), वेकोलि माजरी क्षेत्र