Tag: Mns chandrapur

  • त्या अपघाताची मनसे महिला सेने ने घेतली गंभीर दखल

    News34

    बल्लारपूर – बल्लारपूर शहरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, दिवसेंदिवस मोकाट जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे, हि जनावरे अचानक मूख्य मार्गावर येत असतात यामूळे वाहण चालकांनाच नाही तर पायदळ चालतांना सूद्धा मोठी कसरत करावी लागत आहे.

    हि जनावरे अचानक वाहनासमोर आल्याने अपघातात वाढ होत आहे, रविवार दिनांक 20 ऑगस्टला मध्यरात्री रस्त्याच्या मधोमध बसलेल्या गायींच्या कळपामूळे सरदार पटेल वार्डात दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत, अश्या घटणा वारंवार घडून कुणालाही आपला जीव गमवाव लागू नये यासाठी आपण जातीने आणि गार्भीयाने लक्ष देउन सदर मोकाट जनावरांचा बंदोबस्त आठ दिवसाचे आत करावा अन्यथा मनसे स्टाईल आक्रमक आंदोलन केले जाईल.

    या निवेदनावर मुख्याधिकारी वाघ यांनी सांगितले की आम्ही जनावर मालकांना नोटीस दिली आहे आणि कारवाई सुद्धा करू आमची पूर्ण टीम त्या कामात दिवस आणि रात्र एक करीत जनावर जमा करून प्यार फोंडेशन यांना सोपविले आहे.

    मागील काही दिवसात पन्नास ते साठ जनावरे आम्ही जमा केले आणि आपल्या निवेदनाची दखल घेत आम्ही यात आणखी गांभीर्याने लक्ष देऊ आणि काही मोठ प्रकरण नाही घडणार असा प्रयत्न करू आणि जर घडणार तर याला सर्वस्वी संबंधीत प्रशासण जबाबदार असेल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

    यावेळेस मनसे पदाधिकारी कल्पना पोतर्लावार तालुका अध्यक्ष महीला सेना, किशोर मडगुलवार, जिल्हा सचिव बल्लारपुर विधानसभा, कुलदिप चंदनखेडे जिल्हा उपाध्यक्ष मनविसे, मंगला घडले शहर अध्यक्ष महीला सेना, प्रंशात कलवल, अजय निराल्ला व मनसैनीक प्रामुख्याने उपस्थित होते.

  • चंद्रपूर मनसे पक्षात फेरबदल

    News34

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा मनसे मध्ये फेरबदल करण्यात आले असून वाहतूक सेना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी महेश वासलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    सध्या चंद्रपूर जिल्हा मनसे मध्ये सर्व काही आलबेल सुरू असून संघटन वाढीसाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती, त्यामध्ये काही पदाधिकाऱ्यांनी संघटन वाढीसाठी भरीव प्रयत्न केले व करीत आहे.

    ज्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटन वाढीसाठी प्रयत्न न केल्याने त्यांना जबाबदारी मधून मुक्त करण्यात आले आहे, चंद्रपूर जिल्हा मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष पदावर मनसैनिक महेश वासलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    वाहतूक सेना संघटनेचे अध्यक्ष संजय नाईक यांच्या आदेशाने सरचिटणीस आरिफ शेख यांच्यासह मनसे वाहतुक राज्य उपाध्यक्ष सुधीर खापने व मनसे जिल्हा अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या हस्ते वासलवार यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

    नियुक्ती झाल्यावर वासलवार यांनी वाहतूक सेना संघटन वाढीचे जिल्ह्यात प्रयत्न करू व वाहतुकदारांना सध्या नेतृत्वाची गरज आहे, त्यांच्या समस्यांकडे अनेकदा दुर्लक्ष होते, आम्ही मनसे वाहतूक सेनेच्या माध्यमातून त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया नवनियुक्त जिल्हाध्यक्ष वासलवार यांनी दिली.