Tag: Mla kishor jorgewar

  • cdcc bank elections । निवडणुकीआधीच बँक व्यवस्थापन अडचणीत; जोरगेवारांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

    cdcc bank elections

    cdcc bank elections : चंद्रपूर – तब्बल १३ वर्षांनंतर होणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली. याआधीही त्यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री यांचे निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता व गैरप्रकारांकडे लक्ष वेधले होते.

    २०१२ नंतर आता २०२५ मध्ये होत असलेल्या बँकेच्या निवडणुकीबाबत न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणतेही धोरणात्मक निर्णय न घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, बँकेच्या सध्याच्या व्यवस्थापनाने हे आदेश धाब्यावर बसवत काही निर्णय घेतले आहेत, असा आरोप होत आहे.

    6 शहरात चोरी करणाऱ्या महिलांना मूल पोलिसांनी केली अटक

    दरम्यान, काही महिन्यांपूर्वी बँकेवर सायबर हल्ला झाला होता. या हल्ल्यात ३ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. त्यापैकी केवळ १ कोटी रुपये परत मिळाले असून उर्वरित २ कोटी ७५ लाख रुपये बँकेने ग्राहकांना परस्पर परत केले. हा निर्णय बँकेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता घेतल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणातही अनेक वित्तीय गैरप्रकार झाल्याची शक्यता आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (cm Devendra fadnavis) यांच्याशी झालेल्या बैठकीत आमदार जोरगेवार यांनी या सर्व प्रकारांबाबत माहिती दिली. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य होण्यासाठी मुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली.

    अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीसाठी ५ लाख रुपयांची मदतीची मागणी.

    तुकूम येथे काही दिवसांपूर्वी हायवा वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्या सानिका कुमरे या २२ वर्षीय विद्यार्थिनीच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

    हायवा वाहन चालकाला फिट आल्याने त्याचे वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांवर घसरले. या दुर्घटनेत सानिकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण काजल गंभीर जखमी झाली. आमदार जोरगेवार यांनी अपघातानंतर घटनास्थळी भेट दिली होती. तसेच रुग्णालयात जात काजलची प्रकृतीची विचारपूस केली होती.

    सावनेर खान पर्यटन पाहणीचा दिला मुख्यमंत्र्यांना आढावा

    नुकतीच आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर येथील सावनेर येथील भूमिगत खान पर्यटन प्रकल्पाची पाहणी अधिकाऱ्यांसह केली होती. या धर्तीवर चंद्रपूर येथील महाकाली कॉलरीच्या बंद भूमिगत खाणीत पर्यटन सुरू करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

  • सहायक कामगार आयुक्त पोहचले आमदार जोरगेवार यांच्या कार्यालयात

    News34

    चंद्रपूर – सुरक्षा रक्षक महामंडळातील सुरक्षा रक्षकांच्या अनेक रास्त मागण्या प्रलंबित आहे. त्यांना निष्कृष्ट दर्जाचे सुरक्षा साधने दिल्या जात आहे. हा अन्याय खपवून घेतल्या जाणार नाही. सुरक्षा रक्षक महामंडळातील सुरक्षा रक्षकांच्या मागण्या प्राथमिकतेने सोडवा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी सहाय्यक कामगार आयुक्त एम. पी मडावी यांना दिले आहे.

     

    सुरक्षा रक्षक महामंडळातील सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्यांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगारांसह सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सदर निर्देश दिले आहे. या बैठकीला सहाय्यक कामगार आयुक्त एम. पी मडावी, माथाडी बोर्ड क्लर्क चे संतोष नवाते, लेखापाल रवींद्र चाहारे, यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, आनंद रणशूर, नितेश गवळी सुरक्षा महामंडळातील कामगार संतोष कटरे, संजय क्षिरसागर, मारोती रतनकर, सचिन करमरकर, समीर काजी यांच्यासह इतर कामगारांची उपस्थिती होती.

     

    सुरक्षा रक्षक महामंडळातील नोंदणीकृत कामगारांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. त्यामुळे या कामगारांमध्ये रोष निर्माण झाला आहे. गार्ड बोर्ड नियमानूसार उत्तम दर्जाचे सुरक्षा साधने त्यांना दिल्या जात नसल्याचा आरोप कामगारांनी केला.

     

    सुरक्षा रक्षक हे जबाबदारी चे काम आहे. त्यामुळे त्यांना उत्तम दर्जाचे सुरक्षा साधने उपलब्ध करुन देणे ही महामंडळची जबाबदारी आहे. त्यांना नियमानुसार मिळणार असलेले सर्व सुरक्षा व गरजेची साधने आपण तात्काळ उपलब्ध करुन द्यावीत, सदर साहित्यांचा दर्जा गार्ड बोर्डाने निर्धारित केलेल्या निकषानुसार असला पाहिजे अशा सुचना या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सहाय्यक कामगार आयुक्त एम. पी मडावी यांना केल्या आहे.

     

    सदर सुरक्षा रक्षकांना सुरक्षा महामंडळात नोंदणी झालेल्या कामगारांना नोंदनीची पावती देण्यात आलेली नाही. सदर पावती त्यांना उपलब्ध करुन देण्यात यावी, कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना उपचारा करिता रुग्णालये निर्धारीत करुन देण्यात यावी, प्रत्येक कामगाराला स्वतंत्र वेतन पावती देण्यात यावी, गार्ड बोर्डाच्या नियमानूसार प्रत्येक वर्षी त्यांना गणवेश व इतर सुरक्षा साधने देण्यात यावी आदी सूचना यावेळी त्यांनी केल्या आहे. कामगार हा प्रमूख घटक आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करु नका त्यांच्या मागण्यांकडे विषेश लक्ष देत त्या सोडविल्या जाव्यात अशा सुचनाही त्यांनी यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त यांना केल्या आहे.

  • पद्मश्री परशुराम खुणे यांनी घेतली अम्माची भेट

    News34 chandrapur

    चंद्रपूर – पद्मश्री पूरस्कार प्राप्त परशुराम खुणे यांनी आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवास स्थानी अम्मा उर्फ गंगुबाई जोरगेवार यांची भेट घेत अम्मा का टिफिन या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी सदर उपक्रमातून शेकडो गरजूंना मायेचा घास भरविल्या जात असल्याचे म्हणत उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांचीही उपस्थिती होती.

     

    चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून अम्मा का टिफिन हा उपक्रम राबविल्या जात आहे. या उपक्रमा अंतर्गत शहरातील अत्यंत गरजू व्यक्तीला दररोज घरपोच जेवणाचा डब्बा पोहचविला जात आहे. सदर उपक्रमाला राजकीय पक्षांच्या नेत्यांसह अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी भेट दिली असून उपक्रमाचे कौतूक केले आहे.

     

    कुटुंब निरोगी तर समाज निरोगी आणि समाज निरोगी तर आपला देश निरोगी या सशक्त, सुदृढ समाज सूत्राचे पालन करत आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या स्वगृही अम्मा का टिफिन या उपक्रमाची गेल्या तीन वर्षापूर्वी सुरवात केली. याच माध्यमातून गरजूंची दर महिन्यात आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य त्याप्रमाणात मोफत औषध औपचार दिल्या जातो. समाजाचे आपण काही देणे लागतो या सामजिक भावनेतून समाजातील गरजू व्यक्तींना अम्मा का टिफिन घरपोच दिल्या जातो.

    दरम्यान आज शुक्रवारी झाडीपट्टी नाटकांमध्ये आपल्या अभिनयाने डंका वाजविणारे पद्मश्री पूरस्कार प्राप्त परशुराम खुणे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी येत अम्माची भेट घेतली. यावेळी अम्मा चा टिफिन परिवाराशी त्यांनी चर्चा केली. अम्माने कष्ट करुन जोरगेवार कुटुंबाला उभे केले आहे. आजच्या पिढीसाठी अम्माचा प्रवास प्रेरणादाई आहे.

     

    मुलगा आमदार असतांनाही अम्माने कष्ट करण्याचा मार्ग सोडलेला नाही. कधीकाळी गरिबीचे चटके सोसलेल्या अम्माने आता गरीब गरजूंसाठी सेवा कार्य सुरु केले आहे. त्यांनी सुरु केलेला अम्मा का टिफिन हा उपक्रम अनेक गरजुंसाठी उपयुक्त असल्याचे ते यावेळी म्हणाले.

     

  • चंद्रपूरच्या आमदाराने घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट

    News34

    चंद्रपूर – विविध मागण्यांना घेऊन होमगार्ड महासंघाच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत होमगार्ड यांच्या रास्त मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे.

    राज्यातील होमगार्ड हे पोलीस दलासोबत खांद्याला खांदा लावून नागरिकांच्या सुरक्षतेसाठी तत्पर असतात. परंतु सद्यास्थितीत त्यांच्यासमोर अनेक आव्हाने असून राज्यातील होमगार्ड यांच्या प्रमुख २० मागण्यांसाठी त्यांनी मुंबई येथील आजाद मैदानात आंदोलन सुरु केले आहे.

    महाराष्ट्र होमगार्ड अॅक्ट 1947 मध्ये सुधारणा अथवा बदल करण्यात यावा, भारत सरकारच्या आदेशानुसार होमगार्ड यांना 365 दिवस नियमित रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावा, महाराष्ट्र होमगार्ड अॅक्ट 1947 मधील दर 3 वर्षानी होणार्या पुनरनोंदणी पुनर्नियुक्ती प्रणाली पद्धत कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, महाराष्ट्र होमगार्ड अॅक्ट 1947 मधे बॉम्बे पोलीस अॅक्ट प्रमाणे किंवा प्रादेशिक सेना टि.ए 118 इन्फैंट्री बटालियन या धर्तीवर सुधार करण्यात यावा, मानसेवी कर्मचारी पद आणि वेतनिय कर्मचारी पद असे भेदभाव चे प्रकार नष्ट करून महाराष्ट्र होमगार्ड विभागात होमगार्ड सैनिकांना प्रतिनिधित्वाची समान संधी देण्यात यावी.

    तसेच पोलीस विभाग प्रमाणेच होमगार्ड विभागा करिता स्वतंत्र बजट ची व्यवस्था तसेच प्रतिवर्ष महामाई दरानुसार महागाई भत्ता देण्यात यावा, साप्ताहिक परेड भत्ता, उजळणी प्रशिक्षण भत्ता व तसेच आगामी काळात मध्ये येणारे सर्व प्रशिक्षण भत्ता व त्याचप्रमाणे शासनाचे पैरामिलिट्री फोर्स ला लावून दिलेले 6 महिन्याचे अतिदक्ष प्रशिक्षण शिबीर कर्तव्य भत्ता चे दर मानधनाचा सम प्रमाणानुसार देयक असावेत, इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य मध्ये देखील 3 वर्षे सेवा देवू केलेले होमगार्ड सैनिकांना पोलीस विभाग, वन विभाग किंवा इत्यादी शासकीय प्रशासकीय विभागात 50% आरक्षण सह भरती निवड प्रक्रियेत वयात आणि उंचीत विशेष सवलत देत सरळ भरतीने नेमणूक देण्यात यावी यासह इतर मागण्यांना घेऊन होमगार्ड महासंघाच्या वतीने मुंबई येथील आजाद मैदानात आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

    दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत होमगार्ड महासंघाच्या मागण्यांकडे त्यांचे लक्ष वेधले असून या बाबत चर्चा केली आहे. सदर विषय हा राज्यातील ४५ हजार १७१ होमगार्ड यांचा असून ही संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

    या होमगार्ड यांनी होमगार्ड महासंघाच्या नेतृत्वात आझाद मैदानात सुरु केलेल्या आंदोलनाची आपण दखल घेत त्यांच्या रास्त असलेल्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केली आहे.

  • चंद्रपूर विधानसभा मतदार संघातून आमदार जोरगेवार पुन्हा येणार नाही – विजय वडेट्टीवार

    News34

    चंद्रपूर: दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या शिक्षण आणि लोकसेवेच्या समर्पणाला भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “दिवंगत खासदार बाळू धानोरकर अभ्यासिके “चे उदघाटन कार्यक्रमात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. विशेष म्हणजे चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील आमदार किशोर जोरगेवार पुन्हा येणार नाही, पुढचा आमदार हा कांग्रेस पक्षाचा असेल.

    या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधी पक्ष नेते ना. विजय वडेट्टीवार होते तर वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले.  कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांमध्ये दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून राजुरा विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर जोरगेवार, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले, चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांची उपस्थिती होती.

    अभ्यासिकेचे उदघाटन झाल्यावर विरोधी पक्षनेते यांनी दिवंगत खासदार धानोरकर यांना आदरांजली देत, त्यांच्या शिक्षण धोरणाबाबत असलेल्या कार्याचा उजाळा दिला, सोबतच सदर अभ्यासिकेला आमदार व समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी स्पर्धा परीक्षेचे पुस्तके अभ्यासिकेला उपलब्ध करून द्यावी अशी विनंती यावेळी केली.

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढे विजय वडेट्टीवार यांनी राजकीय फटकेबाजी करीत चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत पुढचे आमदार म्हणून किशोर जोरगेवार पुन्हा येणार नाही, पुढचा आमदार कांग्रेस पक्षाचा असेल असे वक्तव्य केले, त्यांच्या या वक्तव्यावर आमदार जोरगेवार बघतच राहिले.

    दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतीचा सन्मान करण्याचा आणि शैक्षणिक उत्कृष्टता आणि सामाजिक जबाबदारी या दोन्हींसाठी समर्पित असलेल्या नवीन पिढीला प्रेरणा देण्याचा एक प्रसंग आहे. त्यामुळे समाजातील दानशूर शिक्षणप्रेमीनी स्पर्धा परिक्षेची पुस्तके भेट द्यावी, असे आवाहन दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवाराने केले आहे.

    आयोजित अभ्यासिका कार्यक्रमात परिसरातील असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

  • आमदार किशोर जोरगेवार यांच्या समोर झाला अपघात आणि….

    News34

    चंद्रपूर – 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन देशात उत्साहात साजरा करण्यात येतो, मात्र या दिवशी चंद्रपूर – चीचपल्ली मार्गावर दुचाकी वाहनाचा अपघात झाला, ऐनवेळी आमदार किशोर जोरगेवार त्या मार्गाने येत असताना त्यांनी तात्काळ जखमींना कार्यकर्त्यांच्या वाहनात टाकत रुग्णालयात दाखल केले.

    स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम आटोपत आमदार जोरगेवार व यंग चांदा ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मार्कंडा येथे दर्शनाला गेले होते.

    सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास आमदार किशोर जोरगेवार परत येत असताना चीचपल्ली मार्गावर दुचाकी वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली, नागरिकांची गर्दी बघून आमदार जोरगेवार यांनी आपले वाहन थांबविले व कार्यकर्त्यांना निर्देश देत तात्काळ जखमींना आपल्या वाहनात बसवीत रुग्णालयात नेण्याचे निर्देश दिले.

    मिळालेल्या माहितीनुसार त्या दुचाकी वाहनांवर आजी-आजोबा व 2 नातू प्रवास करीत होते, दुचाकी वाहनावरून नियंत्रण सुटल्याने वाहन सरळ नाल्यात जाऊन कोसळले.
    या अपघातात एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे, जखमींना रुग्णालयात दाखल केल्यावर आमदार किशोर जोरगेवार रुग्णालयात दाखल झाले त्यांनी डॉक्टरांना जखमींच्या उपचाराकडे विशेष लक्ष देण्याची विनंती केली.

    यंग चांदा ब्रिगेडचे पंकज गुप्ता, करणसिंह बैस व राशीद हुसेन यांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले म्हणून त्यांना योग्यवेळी उपचार मिळाला.

    आमदार जोरगेवार यांनी ऐनवेळी जखमी नागरिकांच्या मदतीला धावल्याने त्यांच्या माणुसकीचे दर्शन चंद्रपूर वासीयांना दिसले.