Tag: MH34

  • smart prepaid electricity meter audit demand । ⚡ बाबूपेठमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर वाद! आप ने केली ऑडिटची मागणी

    smart prepaid electricity meter audit demand

    smart prepaid electricity meter audit demand : चंद्रपूर : बाबुपेठ परिसरामध्ये अलीकडेच बसविण्यात आलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे अनेक नागरिकांना वाढीव व अनियमित बिल येत असून परिसरात संभ्रम आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात अनेक तक्रारी आम आदमी पार्टीकडे प्राप्त झाल्या आहेत.

    चंद्रपूर पाण्यात, जनजीवन विस्कळीत

    आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महावितरण विभागाला निवेदन देऊन बापूपेठमधील सर्व स्मार्ट प्रीपेड मीटरचे तात्काळ ऑडिट व तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, ऑडिट पूर्ण होईपर्यंत नवीन स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तातडीने थांबविण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

    तर आंदोलन करणार

    पक्षाने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत, तर आम आदमी पार्टीला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.

    यावेळेस आपचे राज्य संघटन सचिव सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, संघटन मंत्री संतोष बोपचे, सोशल मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवार, बाबुपेठ अध्यक्ष राजू तोंडासे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद सय्यद, हर्षल नेवलकर, जयदेव देवगडे, मनीष राऊत, अनुप तेलतुंबडे, इत्यादी उपस्थित होते.

  • heavy rainfall chandrapur । मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, रस्ते बंद, शाळांवर संकट

    heavy rainfall chandrapur

    heavy rainfall chandrapur : चंद्रपूर – आठवडाभरानंतर चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने जोरदार १३ ऑगस्ट रोजी जोरदार कमबॅक केले, रात्रीपासून सुरु झालेला मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनजीवन अस्तव्यस्त झाले होते. मागील २४ तासात चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी १८.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात अनेक मार्ग बंद झाले तर कोरपना तालुक्यात सुद्धा हीच परिस्थिती होती. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घरात शिरले तर शाळेवर झाड कोसळल्याने विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. यामध्ये कसलीही जीवितहानी झाली नाही.

    शाळेवर कोसळले झाड

    भद्रावती आयुध निर्मणी वसाहतीमध्ये शाळेचे वर्ग सुरू असताना शाळेच्या दोन इमारती मध्ये असलेल्या वृक्ष कोसळला त्याची एक फांदी वर्ग पाच च्या खोलीवर कोसळल्याने वर्गातील चार ते पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना दिनांक 13 ला शहरातील आयुध निर्माण चांदा वसाहतीत घडली. किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर आयुध निर्माणी वसाहतीतील दवाखान्यात उपचार करण्यात आले. Chandrapur heavy rain August

    जुना वाद खेळ खल्लास, चंद्रपुरात युवकाची हत्या

    केंद्रीय विद्यालयाचे काही वर्ग वसाहतीतील टाईप थ्री सेक्टर फोर या भागातील बंद असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत घेण्यात येत आहे. सदर शाळेच्या दोन इमारतीच्या मध्ये एक मोठे झाड आहे. आज सकाळपासून पाऊस येत असल्याने हे जीर्ण झाड कोसळले व त्याची एक मोठी फांदी वर्ग पाच च्या खोलीवर कोसळली. यामुळे सिमेंट ऍसबेसटास टिनाचे शेड तुटून त्याचे तुकडे खाली पडल्याने चार ते पाच विद्यार्थ्यांना किरकोळ इजा झाली. मात्र सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात असल्याने मोठा अनर्थ टळला.

    वरोरा व परिसरात दडी मारलेल्या पावसाने आपली जोरदार हजेरी लावत जवळपास १२ ऑगस्ट चे रात्रौ आणि १३ ऑगस्ट ला दुपारी एक वाजेपर्यंत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले.शहरातील पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या ह्या पॅक केल्यामुळे वाहतुकीच्या रस्त्यांवर पाणी साचून अक्षरशः तलाव निर्माण झाले असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.त्यामुळे पूर्णतः जनजीवन विस्कळित झाले. heavy rainfall chandrapur


    शहरातील शुभम मंगल कार्यालय व कर्मवीर शाळा या मध्यंतरी रस्त्यांवर , कॉलरी वॉर्ड,तसेच अलीशान मंगल कार्यालय ते आझाद वॉर्ड कडे जाणारा मार्ग हे तिन्ही मार्गावर तलावाचे स्वरूप निर्माण झाले त्यामुळे वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली . कॉलरी वॉर्ड मध्ये वरोरा साजा च्या तलाठी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी
    आपल्या जबाबदारीचे भान ठेऊन परिस्थितीची पाहणी केली असल्याची माहिती आहे.

    राजुरा शहरालगतचा बामणवाडा परिसर अक्षरशः पाण्याखाली! कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने स्नेहदीप नगर, स्टेला मॅरीस स्कूल आणि बामणवाडातील आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये हाहाकार माजला आहे. परिसरात जिकडे तिकडे पाणीच पाणी, रस्ते चिखलमय झाले, शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना , नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे.


    यामागे फक्त पाऊसच नाही तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्रशासनाचा निष्काळजी व नियोजनशून्य कारभार हेही तितकेच जबाबदार आहेत. राष्ट्रीय महामार्ग एन.एच. ९३०(ड) च्या बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी नैसर्गिक प्रवाहाऐवजी थेट वस्त्यांकडे वळते. चुकीचे ड्रेनेज, बंद नाले आणि बामणवाडा तलावाचे अयोग्य खोलीकरण यांनी परिस्थितीचे रूपांतर आपत्तीमध्ये केले आहे.

    राजुरा तालुका बंद असलेली मार्ग

    टेम्बुरवाही ते विरूर स्टे. रस्ता अतिवृष्टी व सततच्या पाण्यामुळे बंद, मानोली बूज या गावात जाणारा रस्ता बंद, सुमठाना या गावात जाणारा रस्ता बंद व निर्ली ते धाडशी जाणारा रस्ता बंद. rain impact road closures

    कोरपना तालुक्यातील स्थिती

    शिवनारंडा ते कढोली, कढोली ते आवारपूर, नारंडा ते लोणी रस्ते बंद.

    इरई धरणाचे दोन दरवाजे उघडले

    जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे इरई धरणाच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने धरणाचे क्रमांक १ व ७ हे दरवाजे ०.२५ मीटर ने उघडण्यात आले आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन. Erai dam gate opening Chandrapur

  • crime news today । जुना वाद खेळ खल्लास, चंद्रपुरात युवकाची हत्या

    crime news today

    crime news today : चंद्रपूर – कोरपना तालुक्यातील तुकडोजी नगर येथे मंगळवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. तपासादरम्यान, ही हत्या जुन्या वादातून झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्पर कारवाई करत काही तासांतच आरोपीला अटक केली आहे.

    वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

    मृत व्यक्तीची ओळख विश्वास नरेंद्र मालेकर (वय २४, रा. तुळशी) अशी पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादामुळे झालेल्या भांडणामध्ये आरोपीने विश्वास मालेकर यांना मारहाण केली आणि जोरदार धक्का दिला. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.

    काही तासात आरोपी जाळ्यात

    या घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी काही तासांतच सुनील पवार (वय २३, रा. पारधीगुडा) या आरोपीला अटक केली. त्याच्याविरुद्ध कलम १०३ बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकन, साईनाथ जायभाये, प्रभाकर जाधव आणि कोरपना पोलिस पथक करत आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे.

  • tiger attack in Brahmpuri taluka । धक्कादायक! वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला, मुंडकचं धडावेगळं केलं

    tiger attack in Brahmpuri taluka

    tiger attack in Brahmpuri taluka : ब्रह्मपुरी तालुक्यातील कुडेसावली परिसरात वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृत शेतकऱ्याचे नाव घनश्याम गोविंदा उंदिरवाडे (वय 52) असे असून, सोमवारी (दि. 11) सकाळी शेतातील काम आटोपून घराकडे परत येत असताना हा हल्ला झाला. आज सदर शेतकऱ्याचा मृतदेह मिळाला आहे.

    २५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

    प्राप्त माहितीनुसार, काल सोमवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घनश्याम उंदिरवाडे शेतावर गेले होते. शेतातील काम पूर्ण करून परत येत असताना शेतालगतच्या झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. हल्ला एवढा भीषण होता की मृताचे मुंडके धडापासून वेगळे झाले होते.


    सायंकाळपर्यंत घरी न आल्याने कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी त्यांच्या शोधासाठी शेत व जंगल परिसरात पाहणी केली. परंतु ते आढळून आले नाही. अखेर आज मंगळवारी (दि. 12) सकाळी 8 वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह जंगलातील झुडपात आढळून आला. tiger attack farmer दक्षिण वनपरिक्षेत्रातील पद्मपूर बीटमधील गट क्रमांक ७२ मध्ये असलेल्या त्यांच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. वाघाने मृतदेह सुमारे १०० मीटरपर्यंत फरफटत नेला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

    २५ हजारांची तातडीची मदत

    घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ब्रह्मपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
    मृतकाच्या परिवारास वनविभागाच्या वतीने तातडीने 25 हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. यावेळी आर. एफ. ओ. आकाश सोंडवले यांच्यासह इतर अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

    या घटनेमुळे कुडेसावली व परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन्यजीवांच्या हल्ल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

  • Kalidas Ahir jayanti blood donation camp । 🌟 १९ वर्षांची परंपरा! कालिदास अहीर जयंती रक्तदान शिबिरात २५१ रक्तदात्यांचे रक्तदान

    Kalidas Ahir jayanti blood donation camp

    Kalidas Ahir jayanti blood donation camp : चंद्रपूर – सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे स्व. कालिदास अहीर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही अहीर परिवार, स्व. कालिदास अहीर प्रतिष्ठान व मित्र परिवाराच्या वतीने दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात 251 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

    चंद्रपुरात ५ टक्के घर दूषित, डेंग्यूचा धोका

    चंद्रपूर येथील जैन भवन मध्ये पार पडलेल्या या रक्तदान शिबीराचे उद्घाटन दीप प्रज्वलन व स्व. कालिदास अहीर यांच्या प्रतिमेस माल्यार्पणाने पार पडले. या कार्यक्रमास डॉ. अशोक जिवतोडे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चिंचोलकर, डॉ. राजू सैनानी, डॉ. कीर्तिवर्धन दिक्षित, डॉ. गोपाल मुंधडा, डॉ. कदम, डॉ. चिताडे, दामोदर मंत्री, हरिश्चंद्र अहीर, खुशाल बोंडे, अनिल फुलझेले, रविंद्र गुरनुले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. ज्येश्ठ विधीतज्ज्ञ रविंद्र भागवतजी यांनी कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली. यावेळी हंसराज अहीर यांनी त्यांचे स्वागत केले.

    १९ वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन

    आपल्या मनोगतात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी समाजातील गोरगरीब, गरजु, वंचित रूग्णांना तसेच गंभीर रूग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे ही या कार्यक्रमामागील भावना असल्याचे सांगितले. स्व. कालीदास अहीर हे सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे युवा नेतृत्व होते. त्यांच्या कार्याला उजाळा देण्याकरिता गेली 19 वर्षे रक्तदान शिबीर आयोजित केले जात असल्याचेही ते म्हणाले. उपस्थित मान्यवरांनी अहीर कुटूंबियांच्या सामाजिक योगदानाबद्दल गौरवपुर्ण शब्दात प्रशंसा केली. या रक्तदान शिबीरात चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, बल्लारशाह, जिवती, कोरपना, राजुरा, वणी, पांढरकवडा, घुग्घूस व अन्य शहरातील रक्तदाते सहभागी झाले होते. annual Kalidas Ahir memorial blood donation

    समारोपीय कार्यक्रमास वरोराचे आमदार करण देवतळे, माजी आ. सुदर्शन निमकर, विजय चोरडीया, सुभाष कासनगोट्टूवार, डॉ. जीवने, डॉ. नरेंद्र कोलते, पवन एकरे, विनोद शेरकी, तुषार सोम, प्रकाश देवतळे, मोकाशीजी, वणीचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, विजय पिदुरकर यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खुशाल बोंडे यांनी तर मंच संचालन विकास खटी यांनी केले. Kalidas Ahir jayanti blood donation camp

    यावेळी हंसराज अहीर, विनय कालीदास अहीर, अजय कालीदास अहीर व मान्यवरांच्या शुभहस्ते रक्तदात्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व भेट वस्तू देवून सन्मानित करण्यात आले तसेच लाईफलाईन ब्लड बॅंक नागपूरचे डॉ. अपर्णा सागरे यांचे व सहकारी तसेच शासकीय रूग्णालय, चंद्रपूरचे रक्तसंक्रमण विभागातील डॉ. मिलींद झाडे, डॉ. ललीत घोगरे, डॉ. अर्पित दाभाडे यांचे व सहकाऱ्यांचा सुध्दा भेट वस्तू देवून सन्मान करण्यात आला. blood donation camp for needy patients

    या रक्तदान शिबीरास राजेंद्र अडपेवार, राजु घरोटे, किशोर बावने, अरुण मस्की, सुनिल उरकुडे, विठ्ठल डुकरे, शाम कनकम, विनोद खेवले, राजेंद्र खांडेकर, प्रा. रवि जोगी, रवी लोनकर, प्रदिप किरमे, बाळू कोलनकर, शंकर लालसरे, संजय तिवारी, विनोद चौधरी, सुदामा यादव, पुनम तिवारी, गौतम यादव, जगदिश दंडेले, शिलाताई चव्हाण, छबूताई वैरागडे, रेणूकाताई घोडेस्वार, श्रीनिवास सुंचूवार, दिनकर सोमलकर, श्रीकांत भोयर, संजय खनके, सुभाष आदमने, राजु येले, जुम्मन रिजवी, मधुकर राऊत, निलेश खोलापूरे यांचेसह भाजपा, भाजयुमो व महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

  • Chandrapur dengue container survey । चंद्रपूर डेंग्यू सर्वेक्षणात धक्कादायक निष्कर्ष – ५% घरे दुषित!

    Chandrapur dengue container survey

    Chandrapur dengue container survey : चंद्रपूर 12 ऑगस्ट – कंटेनर सर्वे मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व घरांच्या तपासणीचा पहिला टप्पा पुर्ण झाला असुन यात 5 टक्के घरे दुषित आढळली आहेत. ब्रिडींग चेकर्सद्वारा 250 घरांची दररोज तपासणी केली जात असुन दुसऱ्या तपासणीत जर पुन्हा तीच घरे दुषित आढळली तर त्यांना नोटीस देऊन दंडीत केले जाणार आहे.  

    चंद्रपुरात भव्य दही हंडी उत्सव

    १७० आशा वर्कर चा सहभाग

    डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांच्या प्रतिबंधास पुढील काही दिवस महत्वाचे आहेत. 2 वर्षांपुर्वी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत डेंग्युचे 265 रुग्ण मनपा हद्दीत आढळुन आले होते. मागील वर्षी ही संख्या अत्यंत कमी होती, मात्र ज्या घरांमध्ये रुग्ण आढळले होते त्यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात डॉ. नयना उत्तरवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात या मोहिमेत मनपाने नेमलेले 28 ब्रिडींग चेकर्स,32 एएनएम, 22 एमपीडब्लु व 170 आशा वर्कर प्रत्यक्ष सहभागी आहे तसेच स्वच्छता निरीक्षक यांचाही सहभाग आहे. Chandrapur dengue breeding


       संततधार पावसाने मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

  • Chandrapur Dahi Handi utsav । चंद्रपूर नगरीत ‘भाऊंची दहीहंडी उत्सव’ आणि ‘भव्य वेशभूषा स्पर्धा

    Chandrapur Dahi Handi utsav

    Chandrapur Dahi Handi utsav : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना एक मोठा आणि उत्साहपूर्ण उत्सव अनुभवता यावा यासाठी ‘द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार’ यांच्या वतीने यावर्षी ‘भाऊंची दहीहंडी उत्सव’ आणि लहान मुलांसाठी ‘भव्य वेशभूषा स्पर्धा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या १७ ऑगस्ट २०२५ रोजी न्यू इंग्लिश हायस्कूल मैदान, वरोरा नाका चौक, चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे. हा उत्सव केवळ दहीहंडीपुरता मर्यादित नसून, यात लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धेची भर घालण्यात आली आहे.

    १,५१,००० रोख रक्कम आणि एक चषक

    दहीहंडीचा मुख्य कार्यक्रम सायंकाळी ४:०० वाजता सुरू होईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांसाठी प्रथम पारितोषिक म्हणून १,५१,००० रोख रक्कम आणि एक चषक ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक संघांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. Chandrapur costume contest for kids

    चंद्रपुरातील १२०० आस्थापनांना मनपाची नोटीस

    या कार्यक्रमासोबतच, ५ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी एक विशेष ‘भव्य वेशभूषा स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे विषय भारतीय संस्कृती आणि भारतीय इतिहासातील महापुरुष असे ठेवण्यात आले आहेत. लहान मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता ही एक उत्तम संधी आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जातील, ज्यात प्रथम बक्षीस ५,०००, द्वितीय ३,०००, तृतीय २,००० आणि १० उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील.

    दोन्ही कार्यक्रमांच्या अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी कृपया ७९७२३६९०४५ या क्रमांकावर संपर्क साधावा. सदर कार्यक्रम खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहेत. आम्ही चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः  गोविंदा पथक व बालकांना या उत्साहात सहभागी होण्याचे आणि कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करते.

  • Chandrapur fire safety compliance guidelines । फायर ऑडिट न केल्यास मोठी कारवाई – चंद्रपूर पालिकेचा इशारा!, 1200 आस्थापनांना नोटीस

    Chandrapur fire safety compliance guidelines

    Chandrapur fire safety compliance guidelines : चंद्रपूर 12 ऑगस्ट – शहरातील मोठ्या इमारती, मॉल, दवाखाने, हॉटेल यांना शासनाच्या अन्य परवानगीसह अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. अग्निशमन यंत्रणेद्वारे मालमत्ता व जीवित हानी टाळता येते,मात्र शहरातील अनेक आस्थापना अश्या गंभीर बाबीकडे कानाडोळा करत असल्याने मनपाद्वारे नोटीस देण्याची कारवाई सुरु असुन आतापर्यंत 1200 आस्थापनांना अग्निशमन विभागातर्फे नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.    

    अम्मा चौक चे बांधकाम पाडणार

       महाराष्ट्र अग्निशमन प्रतिबंधक कायदा 2006 व 2009 तरतुदीनुसार आग लागू नये, यासाठीची उपाययोजना करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनेच्या  मालकाची आहे. दर 6 महिन्यांनी त्याने ‘फायर ऑडिट’ करणे सुद्धा आवश्यक आहे. फायर सेफ्टी ॲक्ट नुसार ज्या इमारतींची उंची 15 मीटर अथवा त्याच्यापेक्षा जास्त उंच आहे तसेच ज्या व्यावसायिक प्रतिष्ठानाचे बांधकाम 150 चौ. मी. पेक्षा अधिक आहे अशा सर्व इमारतींना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. यात मोठ्या संख्येने नागरिक जमा होण्याची शक्यता असलेले तारांकित हॉटेल्स, लॉजिंग व बोर्डिंग, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, नाट्यगृह, प्रदर्शन सभागृह, एलपीजी गोडावून, फटाका शॉप, बहुमजली इमारती, रुग्णालये इत्यादींचा समावेश आहे.

    चंद्रपुरात आतापर्यंत आगीच्या २५ घटना

       शहरात एप्रिल 2024 पासुन ते आतापर्यंत व्यावसायिक आस्थापनांना आग लागण्याच्या 25 घटना घडलेल्या आहेत. यात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र यापुढेही होवू नये यासाठी अग्निशमन यंत्रणा महत्वाची आहे. मागील वर्षी एकुण 33 आस्थापनांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते यापैकी 26 ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले. तर 2025-26 या आर्थिक वर्षात 458 आस्थापनांना अग्निशमन यंत्रणा बसवुन पालिकेकडून प्रमाणपत्र घेण्यासंबंधी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तपासणीत अग्निशमन यंत्रणा आढळून न आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.सदर प्रमाणपत्र हे ऑनलाईन घेता येणार असुन यासाठी rts.cmcchandrapur.com या वेबसाईट नोंदणी करून अर्ज करता येतो. how to apply fire noc in Chandrapur municipal corporation


    ऑनलाईन ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध – नियमानुसार, ना हरकत प्रमाणपत्र अग्निशमन विभागातून त्याच अधिकृत एजन्सीद्वारे मिळते.  

     “शहरातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा अद्याप बसविण्यात आलेली नाही, त्या ठिकाणी तातडीने उपकरणांची स्थापना होण्यासाठी आम्ही संबंधित मालक व संस्थांशी सातत्याने संपर्क साधत आहोत.” – आयुक्त विपीन पालीवाल. Chandrapur fire audit certificate requirements

  • Amma Chowk memorial violation | अनधिकृत अम्मा चौक स्मारक बांधकामांवर कारवाईचे निर्देश

    Amma Chowk memorial violation

    Amma Chowk memorial violation : चंद्रपूर : चंद्रपूर येथील महादेव मंदिर (मुळशीगोदाम) हे भारत सरकारद्वारे 11 एप्रिल 1925 रोजीच्या अधिसूचनेनुसार केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) नुसार, या मंदिराच्या परिसरात महानगरपालिकेच्या माध्यमातून अम्मा चौक स्मारकासाठी अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण झाल्याची तक्रार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून करण्यात आली होती. या अनुषंगाने, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे.

    चंद्रपुरात 18 वर्षीय मुलाची मफेड्रोन पावडर ची वाहतूक

    नोटीसनुसार, प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे व अवशेष अधिनियम 1958 नुसार (Act 24 of 1958) या संरक्षित स्मारकाच्या 100 मीटरच्या परिसरात अनधिकृत बांधकाम, उत्खनन किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम (निर्माण) किंवा नूतनीकरण करण्यास सक्त मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस दोन वर्षांपर्यंतचा कारावास आणि/किंवा 1,00,000/- (एक लाख) रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.

    7 दिवसाच्या आत अतिक्रमण हटवा


    या प्रकरणी, भारत सरकारने, पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी, चंद्रपूर यांना, अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींना, बांधकामाची प्रक्रिया थांबवून ७ दिवसांच्या आत अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, जर ७ दिवसांच्या आत अतिक्रमण हटवले नाही, तर स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने ते हटवण्यात येईल आणि संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. Amma Chowk controversy


    या नोटीसमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, जर संरक्षित स्मारकाच्या परिसरात कोणत्याही बांधकामाची दुरुस्ती (Repairs) करायची असेल, तर त्यासाठी सक्षम प्राधिकारी (Competent Authority) यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.


    या नोटीसमुळे, स्थानिक प्रशासनाने महादेव मंदिराच्या संरक्षित परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर आणि अतिक्रमणांवर लक्ष केंद्रित केले आहे. मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

  • Mephedrone trafficking case in Chandrapur । १८ वर्षीय मुलगा करतोय मेफेड्रोन ची वाहतूक, चंद्रपूर पोलिसांची कारवाई

    Mephedrone trafficking case in Chandrapur

    Mephedrone trafficking case in Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपुरात अंमली पदार्थ विक्रीचे जाळे सर्वत्र पसरले आहे, आधी गांजा तर आता मेफेड्रोन म्हणजेच एमडी पॉवडर ची विक्री जोमात सुरु आहे, विशेष म्हणजे या विक्री गॅंग मध्ये अनेक महिला, मुली व अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. शहरातील बाबुपेठ मध्ये नुकतेच शहर पोलिसांनी अवैध दारू विक्री प्रकरणी धाडसत्र मोहीम राबवली आता लगेच एमडी पावडर ची वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

    चंद्रपुरात मतांची चोरी

    एमडी पावडर ची वाहतूक बाबुपेठ भागातून होणार असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होतो माहितीच्या आधारे १० ऑगस्ट रोजी शहर पोलिसांनी नेताजी चौक मध्ये नाकाबंदी केली. यावेळी एम एच ३४ बीडब्लू ८६८९ हि दुचाकी येताना दिसली असता पोलिसांनी वाहन थांबवित झडती घेतली असता चालकांकडून तब्बल ०६.८५ ग्राम एमडी पावडर आढळून आले.

    १८ वर्षीय मुलाने केली वाहतूक

    पोलिसांनी दुचाकी चालक १८ वर्षीय अविनाश अनुप कुंडू अटक करीत एकूण ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी कुंडू विरुद्ध एनडीपीएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहे. Chandrapur MD powder drug bust

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, पोलीस कर्मचारी भावना रामटेके, सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, कपूरचंद खरवार, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, सारिका गौरकर व दीपिका झिंगरे यांनी केली.