congress on nitesh rane स्वतःला हिंदू समाजाचा गब्बर उद्देषणारे भाजप आमदार नितेश राणे वर गुन्हा दाखल करीत तात्काळ अटक करण्याची मागणी चंद्रपूर कांग्रेसने केली आहे.
Congress on nitesh rane चंद्रपूर : नगरमध्ये रविवारी महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्च्यादरम्यान, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक भाषण केले. त्यांनी स्वतःला हिंदू समाजाचा “गब्बर” असल्याचे सांगत मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचे विधान केले. त्यांच्या या वादग्रस्त भाषणावरून चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि अल्पसंख्यांक सेलच्या वतीने चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्यात आली असून, नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राणे यांनी आपल्या भाषणात मुस्लिमांना मस्जिदमध्ये घुसून मारण्याची धमकी दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजात संतापाची भावना निर्माण झाली आहे. (Congress on nitesh rane) वादग्रस्त भाषणातील अनेक वक्तव्यांमुळे समाजात धर्मनिरपेक्षतेचा ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या नेत्यांच्या मते, भाजपच्या या भडकावू प्रवृत्तीमुळे राज्यात सांप्रदायिक हिंसा भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
चंद्रपूर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी नितेश राणे यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदन देताना सोहैल रज़ा शेख, नरेंद्र बोबडे, प्रवीण पडवेकर, अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सैयद रमजान अली, मनीष तिवारी, बालचंद्र दानव, पप्पू सिद्धिकी, पिंटू सिरवार, सागर खोबरागडे, सलीम शेख, रामकृष्ण कुंद्रा, राजीव खजांची, नौशाद शेख, सुल्तान शेख, अल्ताफ अली, मौलाना कारी वकील साब आणि नईम भाई यांची उपस्थिती होती.
Tiger attack (गुरू गुरनुले) चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच आहे, आज पुन्हा एका गुराख्यावर हल्ला करीत वाघाने ठार केले, मागील 2 वर्षातील ही 23 वि घटना आहे.
Tiger attack बैल चराईसाठी घेवुन गेलेल्या गुराख्यावर दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला केल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना सावली वनविभागाच्या राजोली क्षेत्रातील मरेगांव मुल येथील सर्व्हे नं. १११ च्या बाजुला असलेल्या गुरुदास कवडु वाकडे यांच्या शेतात मंगळवारी दुपारी १ वाजता दरम्यान घडली. वासुदेव झिवरु पेंदोर वय (६०) वर्षे रा. मरेगांव असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या गुराख्याचे नांव आहे.
मूल तालुक्यातील मौजा मरेगांव एम.आय.डी.सी. येथील वासुदेव झिवरु पेंदोर वय ६० वर्षे हे गुरे घेवुन चराईसाठी सावली वनविभागाच्या राजोली क्षेत्रातील मरेगांव येथील सर्व्हे नं. १११ च्या बाजुला असलेल्या शेतकरी गुरुदास कवडु वाकडे यांच्या शेतात नेले होते. चराई करीत असताना दरम्यान बाजुला असलेल्या झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करुन ठार केले. सोबत असलेल्या इतर गुराख्यांनी सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना व वनविभागाला दिली.
सावली येथील वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा केला सावली आणि मूल पोलीस स्टेशनचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. (Tiger attack) व मृतदेह शवविच्येदन करण्यासाठी मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
सावली वनविभागाच्या वतीने वाघाच्या हल्यात ठार झालेल्या वासुदेव पेंदोर यांच्या कुटुंबियांना तात्काळ २५ हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली. मुल तालुक्यात वाघाच्या हल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शेतकरी,गुराखी व गावकरी भयभीत झाले असून अजूनही वनविभाग व शासन यावर काहीही उपाय योजना केल्याचे दिसत नाही.अशी ओरड शेतकरी बांधवांनी केली आहे. अशीच अवस्था शासनाची राहिली तर मात्र मुल व सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना स्वतःची शेती करणे सोडावे लागेल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.
वनविभागाच्या वतीने तातडीची मदत
वासुदेव झींगरु पेंदोर वय ६० वर्षं राहनार मरेगाव , तालुका मूल याला गुरे चारत असतांना गुरुदास वाकडे यांचे शेताच्या बाजुला असलेल्या नाल्याजवळ वाघाने हल्ला करून ठार केले.माहीती मिळताच घटणास्थळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री विनोद धुर्वे, क्षेत्र सहाय्यक वाकडोत, वनरक्षक धनविजय, वनरक्षक गुरनुले, वनरक्षक आखाडे, वनरक्षक बोनलवार, वनरक्षक नागोसे हे त्वरित हजर होऊन घटणास्थळाचा पंचनामा केला व मृतकाला शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय मूल येथे पाठविण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी सावली श्री विनोद धुर्वे यांचे हस्ते मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत म्हणून २५ हजार रुपये रोख देण्यात आले यावेळी संदिप भाऊ कारमवार, उमेशसिंह झिरे, मरेगाव चे पोलीस पाटील व गावकरी उपस्थित होते.
abhay scheme in maharashtra महावितरणने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे. वीज कनेक्शन तोडलेल्या ३८ लाख घरगुती, व्यावसायिक, आणि औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत, थकीत वीजबिलावरचे व्याज आणि विलंब शुल्क माफ होणार आहे. सदर योजना 1 सप्टेंबर पासून राज्यात लागू करण्यात आली आहे.
Abhay scheme in maharashtra महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरु करण्यात आलीय. १ सप्टेंबरपासून ही योजना अंमलात येतेय. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय. वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे. याअंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण १७८८ कोटी रुपये माफ केले जाणार आहेत. या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधीत वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल. महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल.
काय आहे ही योजना?
अभय योजना ही महावितरणची नवीन योजना आहे. या अंतर्गत ग्राहकांना थकीत वीजबिल भरण्यासाठी सवलत दिली जाणार आहे. (Abhay scheme in maharashtra) जे ग्राहक आपल्या थकीत वीजबिलाचे भरण करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई टाळण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे.
लाभार्थी: घरगुती, व्यावसायिक, आणि औद्योगिक ग्राहक.
व्याज आणि विलंब शुल्क माफी: थकीत वीजबिलावरील एकूण १,७८८ कोटी रुपये माफ.
महावितरणच्या वेबसाईट (www.mahadiscom.in/wss/wss) किंवा मोबाइल ॲपवर अर्ज करता येईल. ग्राहक टोल फ्री क्रमांकावर कॉल करूनही माहिती मिळवू शकतात.
टोल फ्री क्रमांक: १९१२, १८००२३३३४३५, १८००२१२३४३५
ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सदर योजना लागू करण्यात आली असून लाखो वीज ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळविता येणे शक्य होणार आहे, थकीत वीज बिल भरून पुन्हा वीज कनेक्शन या योजनेमुळे पुन्हा मिळणार आहे. हे सर्व महायुतीच्या कल्याणकारी सरकारमुळे सदर योजना अंमलात आली आहे.
tanha pola 2024 बैल पोळा झाल्यावर दुसऱ्या दिवशी लहान मुलांचा तान्हा पोळा साजरा होतो, मात्र यंदा महागाई मुळे लाकडी बैलांच्या किमती वाढल्या आहे.
Tanha pola 2024 लाकूड काम करणारे यांचे महागाई मुळे कंबरडे मोडले आहे, लाकडी बैलाची किंमत आज 500 रुपयांच्या वरून सुरू होते, चंद्रपूर शहरातील गांधी चौकात लागणारा लाकडी बैल बाजारात यंदा चांगलीच गर्दी जमली, यामध्ये विविध प्रकारचे लाकडी बैल विक्री करीता आणले होते. 500 पासून तर तब्बल 1 लाख रुपयांपर्यंत लाकडी बैलांचे भाव वधारले आहे. गांधी चौकात मागील 25 वर्षांपासून लाकडी बैल विक्री करण्याकरिता आणणारे विक्रेते यांनी याबाबत माहिती दिली की यंदा महागाई मुळे लाकडी बैलांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
आधी 200 रुपयाला मिळणारे लाकडी बैलाची किंमत 2 हजार रुपये झाली आहे, आम्ही मागील 25 वर्षांपासून सदर काम करतो, लाकडी बैलासाठी लागणारे आंब्याच्या झाडाचे लाकूड, सुबाबरी व शिसम चा उपयोग होतो, आधी सागवान लाकुडाचा वापर व्हायचा मात्र सागवान चा बैल बनविला तर त्याची किंमत खूप जास्त असल्याने ग्राहक ते घेत नाही, त्यामुळे आम्ही त्याचा वापर करीत नाही.
2 हजार रुपयांचा लाकडी बैल बनविण्यासाठी आम्हाला तितकाच खर्च येत आहे, महागाई वाढल्याने लाकूड सहसा उपलब्ध होत नाही आहे, रंग रंगोटी करण्यासाठी आता नवे रंग घ्यावे लागतात ज्यामुळे लाकडी बैलाला चांगली चकाकी मिळते, त्याच्या किमती सुद्धा जास्त आहे, त्यामुळे बाल गोपालांच्या तान्हा पोळा महाग झाला अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
गांधी चौकात तान्हा पोळा निमित्त लागलेल्या बाजारात 1 लाख, 75 हजार, 60, 51, 45, 35, 25 हजारांचे लाकडी बैल उपलब्ध आहे, किमती वाढल्या पण बाल गोपालांचा हट्ट आई-पुरवीत असून सदर तान्हा पोळा उत्साहाने साजरा होणार हे नक्कीचं.
Bail Pola 2024 गुरू गुरनुले, बैल पोळ्याचे आयोजन निमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे केला शेतकऱ्यांचा सत्कार बाजार समिती आवारात भरला पोळा
Bail pola 2024 – आजचा दिवस भारतीय सण समारंभांमध्ये आपल्या संस्कृतीचं देखील दर्शन होतं. बैलपोळा हा सण देखील त्याचंच उदाहरण आहे. कृषीप्रधान भारत देशामध्ये अन्नदात्यासोबत बैल देखील शेतात राबत असतो. बैलपोळ्याच्या निमित्ताने त्याला आराम देत त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. मग या बैलपोळ्याच्या देण्यासोबतच बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व बैलपोळ्याच्या निमित्ताने त्याचा साजश्रृंगार केला जातो. पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. तर शेतीच्या कामातून देखील सुट्टी दिली जाते.
Bail pola 2024 महाराष्ट्रात सारेच शेतकरी या निमित्ताने घरातील पशूधनाला जपतात. मग हा दिवस आनंदाने साजरा केला जातो. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी खांदमळणीचा कार्यक्रम असतो. पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांदयावर मळली जाते त्याला खांदमळणी असेही म्हणतात. या निमित्ताने शिंगे साळून त्याला हुंगुळ लावण्याची रीत आहे. आंबाडीचे सुत काढून त्याची वेसन बैलाच्या नाकात घालण्याची पद्धत आहे. नविन घुंगर माळा, नविन झुल वेगवेगळया प्रकारचे हिंगुळ बैलाच्या शिंगांना लावून पोळयाच्या दिवशी बैलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो. त्या निमित्ताने बाजार समिती चे आवारात बैल पोळा भरविण्यात येऊन बैल जोडी घेऊन येणाऱ्या सर्व सहभागी शेतकऱ्यांना दुप्पटा व प्रोत्साहन म्हणून बक्षीस व उत्कृष्ट बैल जोडी सजावट केलेल्या नकटू घोगरे,रमेश गणवेंनवार,अनिल बॅटे, गणपत कोरडे,वसंत बोबाटे, भीमराव बोरकर,विनोद चौखुंडे, दशरथ जवादे, सयाजी बटे, माधव राऊत, डोमाजी चौखुंडे, या शेतकऱ्यांचा शाल देऊन सन्मान केला.
यावेळी समितीचे सभापती राकेश रत्नावार उपसभापती राजेंद्र कन्नमवार संचालक घनश्याम येनुरकर, अमोल बच्चुवार, रमेश बरडे, तुलाराम घोंगरे, मूल तालुका काँग्रेस कमिटीच अध्यक्ष गुरु गुरनुले,मुल शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष सुनील शेरकी सर, समितीचे सचिव अजय गंटावार, सुनील मंगर,राजू गेडाम,बबलू सय्यद, आयटलवार, इतर कर्मचारी उपस्थित होते. समितीचे सभापती राकेश रत्नावार व राजेंद्र कन्नमवार उपसभापती, उपस्थित संचालक यांनी समस्त शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या.
har ghar durga abhiyan आता हर घर दुर्गा अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे.
ज्याप्रमाणे विद्यालयांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाची एक खास तासिका असते, त्याप्रमाणेच मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणसासाठी सुद्धा राखीव तासिका असाव्यात यासाठी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यातूनच हर घर दुर्गा या अभियानाची संकल्पना उदयास आली.
शारीरिक शिक्षणाप्रमाणेच वर्षभर महिलांसाठी कराटे, जुडो यासारख्या स्व:रक्षणाच्या पायाभूत प्रशिक्षणाच्या आठवड्यातून कमीत कमी दोन तासिका घेण्यात येणार असून, त्याद्वारे आपत्कालीन आणि आव्हानात्मक परिस्थितीत सक्षमपणे लढण्याची ताकद महिलांना देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी स्थानिक परिसरातील स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार असून, विद्यार्थीनींना नियमित सरावासाठी उद्युक्त करण्यात येणार आहे. याद्वारे मुलींचे शारीरिक बळ वाढेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल सोबतच त्यांचे मानसिक स्वस्थ सुद्धा सुधारेल.
Har ghar durga abhiyan याबाबत बोलताना मंत्री लोढा म्हणाले, “राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली महाराष्ट्राची भूमी आहे. आजवर दुर्गारूपाने असंख्य महिलांनी या भूमीच्या संरक्षणासाठी, प्रगतीसाठी योगदान दिले. आज याच महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रातील घरोघरी अन्यायाविरुद्ध लढणारी दुर्गा असावी, या उद्देशाने ‘घर घर दुर्गा अभियान’ सुरू करत आहोत. महाराष्ट्रातील विद्यार्थीनींनी या तासिकांचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
Chandrapur flood 2024 1 सप्टेंबर रोजी हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिला होता, त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर मनपाने नागरिकाना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता.
Chandrapur flood 2024 आज 2 सप्टेंबर ला सकाळी वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढल्याने इराई नदी पात्रात पाण्याचा दाब मोठ्या प्रमाणात वाढला, अनेक ठिकाणी मार्ग बंद झाले तर शहरातील रहमत नगर भागात 10 ते 12 घरे पाण्याखाली आले, त्यामुळे नागरिकांची चांगली वाताहत झाली, बिनबा गेट जवळील ग्रामीण भागात जाणाऱ्या मार्गावरील पुलाजवळ इराई नदीच्या पातळीत वाढ झाली.
सध्या इराई नदीचे पाणी स्थिर असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्या शहरातील पठाणपुरा गेट च्या बाहेरील भाग, बिनबा गेट बाहेर, नांदगाव सहित झरपट नदीमध्ये पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नदी पात्रजवळ राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे, सद्या पाणी स्थिर असल्याने पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नदी पात्रजवळ जाऊ नये.
Maha Arogya Shibir शहरातील दुर्गापुरात रविवारी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार उपस्थित होते.
Maha Arogya Shibir माणूस कितीही मोठा धनवान असू देत, ताप आल्यावर अन्न सुद्धा कडू लागतं. नोटा आणि सोने पुढे ठेवले म्हणजे प्रकृती बरी होत नाही. त्यासाठी प्रकृती ठणठणीत ठेवण्याशिवाय पर्याय नाही.आरोग्य सुदृढ ठेवायला अशी शिबिरे आणि डॉक्टरांचे मार्गदर्शनच महत्वाचे आहे. आपले अध्यात्म आणि हिंदूंचा सेवा धर्म आपल्याला रुग्ण सेवेचीच शिकवण देतो. त्यामुळे आयुष्यात रुग्णसेवेचे कार्य सर्वोपरी आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज (रविवारी ) केले.
दुर्गापूर येथील सेंटमेरी हायस्कुल येथे निःशुल्क महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ना. श्री. मुनगंटीवार बोलते होते. व्यासपीठावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कटरे, आशा हॉस्पिटलचे डॉ. सौरव अग्रवाल, ओसेसर कँसर हॉस्पिटलचे डॉ. भोयर, शंकरा सुपर हॉस्पिटलचे डॉ. जितेंद्र यादव, आशा हॉस्पिटलचे जयहरी सिंग ठाकूर, फारमेल अकादमीचे प्रिन्सिपल फादर जॉयसेन, सेंट मेरीच्या सिस्टर टॉम्सी, वैद्यकीय अधिकारी कोमल मुनेश्वर यांच्यासह रामपाल सिंग, हनुमान काकडे, अनिता भोयर, केमा रायपुरे, रोशनी खान, सर्व माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, शासकीय कर्मचारी, पक्षाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Maha Arogya Shibir आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यानंतर मिळणारा आनंद कुठल्याही आनंदापेक्षा मोठा आहे. रुग्णांद्वारे मिळणाऱ्या आशिर्वादातून जन्मोजन्मीची शक्ती प्राप्त होते. रुग्णसेवेचे हे पुण्य पुढचे अनेक जन्म कामी येईल, अशी भावनाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
Maha Arogya Shibir ‘राजकारणामध्ये हमारी मांगे पुरी करो, आगे बढो, पीछे हटो हे सुरूच राहणार. परंतु, जातीच्या, वंशाच्या, रंगाच्या पलीकडे जाऊन रुग्णसेवा केल्यास त्याचे कायम स्मरण राहते. ही सेवा आपल्या आयुष्यात बोनस पॉईंट ठरते. अशा सेवेसाठी आम्ही कायम पुढे असतो. या मतदारसंघात आरोग्य शिबीर, दिव्यांगांसाठी कार्यक्रम, गोर गरिबांची सेवा सातत्याने सुरु असते. संजय गांधी निराधार योजनेचे अनुदानही मी दुप्पट केले आहे,’ असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
‘राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून राज्यातील २ कोटी ४८ लाख माता-भगिनींच्या खात्यात थेट पंधराशे रुपये जमा होत आहेत. या बहिणींची, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी म्हणून उत्पन्नाची अट देखील नाही. जीवनदायी योजनेमध्ये त्यांचा खर्च उचलण्याचा संकल्प आपण केला. शासनाच्या अशा कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील ‘स्त्री’ला कुणासमोर हात पसरायची वेळ आता येणार नाही. ती हिमतीने समाजात उभी राहू शकेल. आम्ही कधी, जाती, धर्म वंश पहिला नाही. आपला धर्म हा मानवतेचा धर्म असला पाहिजे,’ असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
जिल्ह्यात कर्करोग रुग्णालय जिल्हात आपण १४० खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारत असून याचा उपयोग जिल्ह्यातील रुग्णांना होईल. एक धर्मशाळा देखील उभारण्यात येणार असल्याची माहिती ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. केवळ चंद्रपूर नव्हे तर परिसरातील प्रत्येकाला हे आरोग्य मंदिर वाटेल, अशी त्या मागची संकल्पना आहे, असेही ते म्हणाले.
दिव्यांग, नेत्र रुग्णांची सेवा मनापासून सेवा करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.परिवारातील सदस्यांप्रमाणे रुग्णांची सेवा करत आहे या बद्दल ना.मुनगंटीवार यांनी स्वयंसेवक,कार्यकर्त्यांचे कौतुक केले. यापूर्वी,नेत्र चिकित्सा शिबिरातून ५० हजार रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. ५ हजारांपेक्षा जास्त मोतीबिंदू ऑपरेशन केले. ३५ हजारांहून अधिक जास्त चष्मे दिले, असेही ते आवर्जून म्हणाले.
मुलांची मोफत हृदय शस्त्रक्रिया लहान मुलांच्या हृदय शास्त्रक्रियेकरिता खाजगी रुग्णालयात १० लाख रुपये लागत असताना या शस्त्रक्रिया मुंबईतील फोर्टीज हॉस्पिटलच्या चमूद्वारे मोफत करून देण्यात आल्या. २ ते १० वर्षांपर्यंतच्या ६० लहान मुलांचे ऑपरेशन करण्यात आले, याचाही त्यांनी उल्लेख केला. ऑपरेशननंतर मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद समाधान देणारा होता.अशी भावनाही ना.मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
Human Wildlife Conflict (गुरू गुरनुले) चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वन्यजीव यांची दहशत अद्यापही कायम आहे.
जाणाळा येथील गुराखी वाघाच्या हल्यात ठार मूल- मुल तालुक्यातील जाणाळा येथील वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार जखमी झाल्याची घटना आज दिनांक 1 रोजी दुपारी घडली. गुलाब वेळमे वय वर्ष 50 राहणार जाणाळा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराखीचे नाव आहे. जाणाळा येथून जवळच असलेल्या डोनी फाट्याजवळ सराईत गाई, गुन्हे चरायला नेला होता. दबा धरून बसलेल्या वाघाने गुराखीवर हल्ला करून ठार केले. ही घटना गावात माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली आहे. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
Human Wildlife Conflict मूल तालुक्यात वाघाचे हल्ले मानवावर वाढल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ग्रामीण भागात चिंतेची बाब झाली आहे. वन्य प्राण्यांचे असे हल्ले आम्ही किती सहन करायचे असे गावकऱ्यात बोलल्या जात आहे. माणूस महत्त्वाचा की वाघ अशी ही चर्चा होत आहे. गावकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मागील पंधर वाड्यातील वाघाच्या हल्यात गुराखी ठार झाल्याची तिसरी घटना आहे.
ration card देशातील 90 कोटी जनतेला मिळणारे मोफत धान्यांपैकी आता तांदूळ बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
तांदूळ ऐवजी मिळणार हे धान्य
Ration card केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत. यामध्ये रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशनही पुरविले जाते. मात्र आता यात मोठा बदल करण्यात आला असून, त्यानुसार रेशनवरील मोफत तांदूळ बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी इतर ९ जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत. यामध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे.
Ration card केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास ९० कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे. त्याव्यतिरिक्त गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले या वस्तू मिळणार आहेत. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल, अशी सरकारला आशा आहे.
मोदी सरकारने तिस-यांदा सत्तेत येण्याअगोदर पुढील ५ वर्षे मोफत धान्य पुरविण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता देशातील जनतेला पुढील पाच वर्षे मोफत धान्य मिळेल, असा विश्वास होता. परंतु केंद्र सरकारने या योजनेत बदल करून आता मोफत मिळणारा तांदूळ बंद केला आहे. याऐवजी आहारातील पोषणाची पातळी लक्षात घेऊन इतर ९ वस्तूंचा समावेश केला आहे. त्यामुळे यापुढे आता तांदळाऐवजी अन्य वस्तू मिळतील, असे सांगण्यात आले.
नवीन रेशनकार्ड कसे काढणार?
जर तुम्ही रेशन कार्डसाठी पात्र असाल आणि अजूनही रेशन कार्ड काढले नसेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावे लागेल. तसेच अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून देखील अर्ज डाउनलोड करू शकता.
तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या प्रविष्ट करावी लागेल. यासोबतच तुमच्याकडून संबंधित कागदपत्रे मागितली गेली असतील तेही अर्जासोबत जोडावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज आणि संबंधित कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळच्या रेशनिंग कार्यालयात जमा करावी लागतील. संबंधित अधिकारी तुम्ही दिलेल्या माहितीची आणि तुमच्या अर्जाची पडताळणी करेल. त्यानंतर तो त्यावर पुढील प्रक्रिया करेल. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड तयार होईल आणि त्यावर तुम्हाला मोफत रेशन मिळू शकेल.