Tag: MH34

  • Anganwadi sevika : सरकारचे आश्वासन फसवे, चंद्रपुरात जेलभरो आंदोलन

    Anganwadi sevika : सरकारचे आश्वासन फसवे, चंद्रपुरात जेलभरो आंदोलन

    Anganwadi sevika महाराष्ट्र सरकारचे दिलेले आश्वासन फसवे निघाल्याने आज चंद्रपुरात हजारो अंगणवाडी सेविकानी जेलभरो आंदोलन केले.


    Anganwadi sevika चंद्रपूर शहरात आज अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलनाने प्रशासन हादरून गेलं, चंद्रपूर जिल्हा परिषद समोर हजारो अंगणवाडी सेविकानी चक्का जाम करीत जेलभरो आंदोलनात सहभाग घेतला.

    शासनाच्या योजना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविल्या जात आहे मात्र त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम महाराष्ट्र सरकार द्वारे केल्या जात आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात आला बिबट्या, उडाली खळबळ

    मानधनात वाढ, पेन्शन सुरू करावी, ग्रॅच्युईटी देण्यात यावी अश्या अनेक मागण्या घेऊन आज अंगणवाडी सेविकानी मोर्चा काढत जेलभरो आंदोलन केलं, या आंदोलनात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
    सदर आंदोलनाचे नेतृत्व सिटू कामगार नेते रमेशचंद्र दहिवडे यांनी केले, यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे उपस्थित होते.

    जेलभरो आंदोलन


    रमेशचंद्र दहिवडे म्हणाले की 25 जानेवारीला महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी सेविकांना पेन्शन, मानधनात वाढ व ग्रॅच्युईटी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आज 8 महिने लोटल्यावर सुद्धा आश्वासनाची पूर्तता झाली नाही,त्यावेळी अंगणवाडी सेविका यांनी 52 दिवस आंदोलन केले होते. आजचं जेल भरो आंदोलन इथं थांबणार नाही, यापुढे आम्ही गावागावात जाऊन सरकारच्या फसवेगिरी बाबत जागृती करणार.

    खासदार प्रतिभा धानोरकर ह्या म्हणाल्या की आज अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आपल्या हक्कासाठी भांडावे लागत आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे, मी आमदार असताना याबाबत अनेकदा पाठपुरावा केला, आता खासदार झाल्यावर यापुढेही आम्ही अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार.

    आयोजित जेलभरो आंदोलनात हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

  • Mundan Andolan : चंद्रपुरातील युवकांनी महायुती सरकार विरोधात केले मुंडन

    Mundan Andolan : चंद्रपुरातील युवकांनी महायुती सरकार विरोधात केले मुंडन

    mundan andolan सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर 8 महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, यामुळे राज्यातील शिवप्रेमींनी आपला संताप व्यक्त केला.

    अवश्य वाचा : चंद्रपूर शहरात आला बिबट्या

    Mundan andolan महायुती सरकारने कमिशन खोरीच्या नादात भ्रष्टाचार करीत पुतळा उभारला, असा आरोप राज्यातून विविध स्तरातून सरकारवर झाला, राज्यात सरकार विरुद्ध अनेक राजकीय, सामाजिक व शिव प्रेमींनी आंदोलन पुकारले, 4 सप्टेंबर रोजी चंद्रपुरातील शिव प्रेमी जनतेने भव्य निषेध मोर्चा काढला.

    मुंडन आंदोलन

    उर्जानगर-दुर्गापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने महायुती सरकार विरोधात युवकांनी मुंडन आंदोलन करीत निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे, त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेत जे कुणी दोषी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी याकरिता आम्ही युवकांनी आज मुंडन आंदोलन केले अशी प्रतिक्रिया दिली.

    यावेळी सदिंप बिसेन , सागर धनकसार, नामन पवार, धिरज दुर्योधन, नागेश कडुकर,अंकित वाघमारे मनोज मगांम, राजा शेख,स्वपनिल खांडेकर अमोल दुर्योधन,पीयुष चादेंकर, मनोज इटकर,व असख्य शिवभक्त उपस्थित होते.

  • leopard in city : चंद्रपूर शहराच्या मध्यभागी बिबट्याचे आगमन

    leopard in city : चंद्रपूर शहराच्या मध्यभागी बिबट्याचे आगमन

    leopard in city चंद्रपूर जिल्हा हा चारही बाजूने वन सौंदर्याने नटलेला आहे, या भागात अनेक वन्यप्राण्यांचा वावर आहे, अश्यात काही वन्यप्राणी अनेकदा रस्त्यावर तर काही गावात वावरताना आढळून येतात.


    Leopard in city 5 सप्टेंबर ला पहाटेच्या सुमारास शहरात अचानक बिबट्या शिरला, त्या बिबट्याचा मागे कुत्रे लागल्याने त्याने पळ काढत थेट बिनबा गेट जवळील बोबडे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या झुडपात आश्रय घेतला सदर बाब नागरिकांना कळताच याबाबत त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली, सध्या वनविभाग बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न करीत आहे.

    शहरातील बिनबा गेट परिसरात बिबट शिरल्याची घटना समोर आली आहे. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार ऑन द स्पॉट दाखल झाले असून, सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. येथे जमलेली गर्दी पाहता, सुरक्षा वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या असून, बिबटला जेरबंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी विभागीय एसीएफ आदेश शेणगे, वन अधिकारी प्रशांत खाडे, वन अधिकारी नायगमकर यांच्यासह पोलिस विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात 19 सप्टेंबर पर्यंत कलम 36 लागू


    Leopard in city पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिनबा गेट लगत असलेल्या झाडी-झुडपांमध्ये बिबट वावरत असल्याचे काही नागरिकांना दिसले. याची माहिती लगेच वन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिस विभागातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सोबतच याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांना पोहोचताच ते मुंबईहून थेट घटनास्थळी पोहोचले. सध्या बिबटला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. रेस्क्यू पथकही येथे दाखल झाले आहे. येथे होत असलेली नागरिकांची गर्दी पाहता दंगा नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. या सर्व कार्यवाहीवर आमदार किशोर जोरगेवार स्वतः लक्ष ठेवून असून, त्यांच्या वतीने प्रशासनाला योग्य सूचना करण्यात येत आहेत.

    शहरात बिबट्या


    त्यांनी दूरध्वनीवरून पोलिस अधीक्षकांशीही संपर्क साधत पोलीस विभाग यासंदर्भात अनेक सूचना केल्या आहेत. येथे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात यावा, काही भाग प्रतिबंधित करण्यात यावा, अशी सूचना यावेळी त्यांनी पोलिस अधीक्षकांना केली आहे. तसेच तहसीलदार आणि वन विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्यांशीही ते सतत संपर्कात आहेत. नागरिकांना कोणतीही हानी न होता नियोजनबद्ध पद्धतीने बिबटला जेरबंद करण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत असून, आपण स्वतः येथे उभे राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

  • Section 36 : 19 सप्टेंबर पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    Section 36 : 19 सप्टेंबर पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    Section 36 जिल्ह्यात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरुवात होत असून 16 सप्टेंबर रोजी ईद-ए- मिलाद निमित्त मुस्लिम समाजतर्फे मिरवणूक कार्यक्रम, 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून 19 सप्टेंबर पर्यंत सार्वजनिक गणेश मुर्तीचे विर्सजन करण्यात येणार आहे.

    Section 36 या दहा दिवसांत विविध धार्मिक सण /उत्सव कार्यक्रम होत असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने तसेच सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला  बाधा पोहचु नये, यासाठी  4 ते 19 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत कलम 36 चे पोटकलम अ ते फ लागू आहे.

    अवश्य वाचा : ताडोबा रिसॉर्ट च्या नावाने 41 लाखांची फसवणूक

    Section 36 या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविणे बाबत, सभेचे आयोजन व मिरवणुक काढण्याबबात, मिरवणूकीचे मार्ग निश्चित करण्याबाबत, लाऊडस्पिकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. यात अ) मिरवणुक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांचे वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार,  आ) मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पुजा स्थानाचे जवळ लोकांचे वागणुकीचे निर्बंध घालण्याचे अधिकार, इ) मिरवणुकीस बाधा होणार नाही, याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजा स्थानाच्या जवळ  लोकांचे वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, ई) सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे  इत्यादिचे निर्बंध घालण्याचे अधिकार, उ)   रस्ते व इतर सर्व  सार्वजनिक ठिकाणी    सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, ऊ) सार्वजनिक  ठिकाणी/ रस्त्यावर लाउडस्पिकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार ऋ) कलम 33,  35,  37, ते 40, 42, 43, व 45 मुंबई  पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सुचना देण्याचे अधिकार.

    मशाल रॅली

    सदर आदेश लागू असताना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजविणे, लाऊडस्पिकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घेण्यात यावी. सर्व बाबतीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशात नमूद आहे.  

  • chitra nagari : नागपुरात 100 हेक्टरवर होणार भव्य चित्रनगरी

    chitra nagari : नागपुरात 100 हेक्टरवर होणार भव्य चित्रनगरी

    chitra nagari चित्रपट निर्मितीचा पाया मराठी चित्रपटांनी रचलेला असून आशयसंपन्न मराठी चित्रपटांची पंरपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे.

    Chitra nagari ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तसेच मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी  मिळण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी चित्रपट धोरण तयार करण्यात यावे, त्यासाठीची  समिती गठीत करुन या कामास गती  देण्याच्या सूचना देत नागपूर येथे १०० हेक्टर भव्य चित्रानगरी निर्माण करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिल्या.

    सावधान : ताडोबा रिसॉर्ट च्या नावाने अनेकांची फसवणूक

    मराठी चित्रपट अनुदानासंदर्भात  मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी संबंधितांना विविध महत्वाचे निर्णय घेतले. यावेळी  विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, चित्रनगरी मुबंईच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील,  यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता संघटनेचे , पदाधिकारी, इतर संबंधित उपस्थित होते.


            नागपूर साठी गुड न्यूज!

     Chitra nagari विविध पायाभूत सुविधा आणि अनेक महत्त्वपूर्ण बाबींसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या वैभवात आता भर पडणार आहे; अनेक प्रतीथयश साहित्यकार, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते देणाऱ्या विदर्भाच्या भूमीत चित्रनगरी व्हावी असा मनोदय नाव मुनगंटीवार यांनी आज व्यक्त केला.  मराठी चित्रपटांच्या अधिक दर्जेदार निर्मितीसाठी पूरक वातावरण आणि  संधीची उपलब्धता वाढवण्याचा सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न असून त्यादृष्टीने मुबंई आणि कोल्हापूर प्रमाणे नागपूर येथे फिल्मसिटी निर्माण करण्यासाठीची आवश्यक कार्यवाही सुरु करण्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी या बैठकीत सूचित केले.

    वीज ग्राहकांसाठी अभय योजना

    तसेच अनुदानाास पात्र ठरलेल्या चित्रपटात महिला दिग्दर्शिका असलेल्या चित्रपटाला अतिरिक्त पाच लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय ही यावेळी घेण्यात आला. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या मराठी चित्रपटांना विना परिक्षण  दुप्पट अनुदान देण्यात येईल. तसेच अनुदानासाठी चित्रपटांचे श्रेणीकरण अ, ब, “क” या तीन गटात करण्यात यावे, त्यासाठी श्रेणीकरण समिती गठीत करण्याच्या सूचनाही मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.
      कोवीड काळातील चित्रपटांच्या बाबतीत स्वतंत्रपणे विचार करुन निर्णय घेतला जाईल,असे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी यावेळी सांगितले.

  • Tadoba Resorts : ताडोबा येथे रिसॉर्टच्या नावाने अनेकांची फसवणूक

    Tadoba Resorts : ताडोबा येथे रिसॉर्टच्या नावाने अनेकांची फसवणूक

    Tadoba resorts ताडोबा येथे रिसॉर्ट च्या नावाने मोठ्या प्रमाणात अनेकांची फसवणूक झाली असून सदर प्रकरणातील आरोपी भरत धोटे हे पसार झाले आहे.

    Tadoba resorts ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणा-या पर्यटकांना रिसोर्ट प्रमाणे कुटी तयार करून देण्याच्या नावावर गुंतवणुकदारांकडून पैसे घेऊन प्रत्यक्ष कोणतेही बांधकाम न करणा-या भरत नानाजी धोटे (वय 38) रा. तुकूम, चंद्रपूर याने 41 लक्ष 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूरकडून करण्यात येत आहे. सदर आरोपी गुन्हा दाखल झाल्याच्या दिनांकापासून फरार असून कोणत्याही नागरिकाला याबाबत माहिती असल्यास किंवा आरोपी आढळून आल्यास त्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला द्यावी, असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.

    अवश्य वाचा : अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या

    Tadoba resorts याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलिस स्टेशन दुर्गापूर, जिल्हा चंद्रपूर येथे सर्व पिडीत अन्यायग्रस्त फिर्यादी तर्फे अशोक पांडुरंग भटवलकर, रा.म्हॉडा कॉलनी, दाताळा, चंद्रपूर यांच्या लेखी रिपोर्ट वरून आरोपी भरत नानाजी धोटे,  रा. तुकुम, चंद्रपूर यांनी भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्स या नावाने खाजगी कंपनी स्थापन करून अभिकर्ते नियुक्त केले. त्यांच्या मार्फतीने मौजा पद्मापूर, अजयपूर, देवाडा, तळोधी  (नाईक), बोर्डा, किटाळी येथे कुट्यांचे  बांधकाम करण्याबाबत युनिव्हर्स ॲग्रो टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करारनामा केला. ताडोबा राष्ट्रीय वन उद्यान येथे  फिरण्यास येणाऱ्या लोकांना रिसोर्टप्रमाणे कुटी किरायाणे देऊन येणारे प्रतिमहिना मासिक उत्पन्न 7083 रुपये देण्याचे प्रलोभन देऊन प्रत्येक गुंतवणुकदारांकडून 2 लक्ष 50 हजार रुपये घेतले. मात्र प्रत्यक्षात  कुटीचे बांधकाम न करता गुंतवणूकदारांची एकुण 41 लक्ष 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणुक केली. याबाबत  फिर्यादीच्या तक्रारीवरुन सदर गुन्हा नोंद असुन गुन्हयाचा  तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर करीत आहे.

    शिवप्रेमींचा संताप

    सदर  गुन्हयातील आरोपी भरत नानाजी धोटे हा गुन्हा दाखल झाल्याच्या तारखेपासून फरार आहे. तरी सदर आरोपीचा शोध घेण्याकरीता तसेच नमुद आरोपी का कोणास आढळल्यास पोलीस नियंत्रण कक्ष, चंद्रपूर 07172- 273258, 07172-264702 या क्रमांकावर तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर  चिकनकर (मो. नं. 9359258365) या क्रमांकावर माहिती देण्यात यावी, असे आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस अधिक्षक कार्यालय, चंद्रपूर यांनी कळविले आहे.

  • Chandrapur Crime : जिल्ह्यात एकाच दिवशी 2 अत्याचार, अल्पवयीन मुलीने उचलले टोकाचे पाऊल

    Chandrapur Crime : जिल्ह्यात एकाच दिवशी 2 अत्याचार, अल्पवयीन मुलीने उचलले टोकाचे पाऊल

    chandrapur crime चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात एकाच दिवशी दोन अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले, एका प्रकरणात 35 वर्षीय मतिमंद महिलेवर अत्याचार तर दुसऱ्या प्रकरणात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला, 4 सप्टेंबर रोजी पीडित अल्पवयीन मुलीने आत्महत्या करीत आयुष्य संपविले.


    Chandrapur crime पहिल्या घटनेत एका अल्पवयीन ( वय १६ ) मुलीवर प्रेम प्रकरणातून लैंगिक शोषण केले आहे. आरोपी ने त्या मुलीला फूस लावत लॉजवर नेऊन तिच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत मुलीची आत्या व पीडितेने बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, पोलिसांनी गुन्हा दाखल करीत मौलाना आझाद वार्डातील आरोपी 20 वर्षीय शिवम दिनेश दुपारे ला अटक केली. या प्रकरणी शांती लॉज ओयो मालक व व्यवस्थापक यांची चौकशी या प्रकरणात सुरू आहे, ओयो हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलींना नेण्यास मनाई आहे हे माहीत असताना सुद्धा व्यवस्थापक यांनी त्यांना परवानगी दिली कशी? चौकशी झाल्यावर गुन्हा दाखल करू अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी दिली.

    महायुती सरकारचा निषेध, चंद्रपुरात हजारो शिवप्रेमी रस्त्यावर


    Chandrapur crime दुसऱ्या घटनेत एका ३५ वर्षीय मतिमंद महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. सदर महिला मतिमंद असून ती आपल्या आई सोबत राहते. तिची आई एका हॉटेलमध्ये काम करत असून सकाळी कामाला जाऊन रात्री घरी येते. त्या घरभाड्याने राहतात. दिवसभर पीडित महिला घरी एकटीच असते. आरोपी घरमालकाच्या ओळखीचा असून तो २ सप्टेंबर रोजी दारू पिऊन आला यावेळी पीडित महिला घरी एकटीच असल्याचा फायदा घेऊन दुपारच्या सुमारास तिच्यावर बलात्कार केला. सदर घटना घरमालकाच्या लक्षात येताच जेव्हा तिची आई रात्री घरी आली तेव्हा घडलेला प्रकार सांगितला त्यावरून आई ने मंगळवार दि. ३ सप्टेंबरला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले.  याप्रकरणी पोलिसांनी शिव नगर, बल्लारपूर येथील चंदू बालू भुक्या (५८ ​​वर्षीय ) आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी विरुध्द ६४ (२) (के), ३३२ (क) बीएनएस २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल केले आहे या प्रकरण विषयी दिपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पोलीस स्टेशन येथे भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम, पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे करीत आहे.

    अवश्य वाचा : भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करा

    पहिल्या प्रकरणातील अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केली, दुपारच्या सुमारास घरी कुटुंब असताना पीडित मुलगी दुसऱ्या रूम मध्ये गेली आणि तिथे गळफास घेत आत्महत्या केली, पोलिसांना याबाबत कसलीही सुसाईड नोट सापडलेली नाही, याबाबत पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील मुली व महिला सुरक्षित रहाव्या यासाठी नुकतीच शहरात मशाल रॅली काढण्यात आली होती, अश्या घटना जिल्ह्यात घडू नये याबाबत सध्या नागरिकांमध्ये जनजागृती ची गरज आहे, याबाबत प्रशासनाने जनजागृती ची मोहीम हाती घ्यावी, अल्पवयीन मुले, मुली व त्यांच्या पालकांना सुद्धा जागृत करावे अन्यथा अश्या घटनांना आळा बसणार नाही.

  • Shiv Premi : चंद्रपुरातील हजारो शिवप्रेमी रस्त्यावर

    Shiv Premi : चंद्रपुरातील हजारो शिवप्रेमी रस्त्यावर

    Shiv premi सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. या घटनेचा राज्यात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी निषेध नोंदविला.


    Shiv premi आज 4 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून राजकीय, सामाजिक संघटना यांनी एकत्र येत भव्य मोर्चा काढला, मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी तात्काळ या घटनेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी मोर्च्यात करण्यात आली.

    अवश्य वाचा : पूर रेषेच्या आत बांधकाम करणार तर गुन्हे दाखल होणार


    हजारो शिवप्रेमी यांनी सदर मोर्च्यात महायुती सरकारचा निषेध नोंदविला, महायुती सरकारने पुतळा उभारणीमध्ये भ्रष्टाचार केला असा आरोप यावेळी करण्यात आला.
    शिवाजी महाराज चौकातून निघालेला हा मोर्चा शहराचे भ्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहचला, महायुती सरकारचा निषेध म्हणून शिव प्रेमींनी काळा पोशाख परिधान केला होता.

    शिवप्रेमींचा मोर्चा


    यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे म्हणाले की भ्रष्टाचार करीत महायुती सरकारने हा पुतळा उभारला, आणि केवळ 8 महिन्यातच पुतळा कोसळला, याचा आम्ही निषेध करतो भविष्यात महापुरुषांचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कमिशन खोरी मुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला असा आरोप गिर्हे यांनी यावेळी केला. आयोजित निषेध मोर्च्यात हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.

  • single window system : चंद्रपूर मनपाची एक खिडकी प्रणाली सुरू

    single window system : चंद्रपूर मनपाची एक खिडकी प्रणाली सुरू

    चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाप्रसंगी सार्वजनीक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानगीसाठी सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी प्रणालीस (single window system ) चांगला प्रतिसाद मिळत असुन आतापर्यंत १३७ सार्वजनीक गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज सादर केले आहेत. या सर्व मंडळांना प्रशासनाच्या विविध विभागातर्फे परवानगी देण्याची कारवाई सुरु आहे.  


      single window system  येत्या ७ सप्टेंबरपासून शहरात दहा दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे. याकरीता गणेश मंडळांना महापालिका व इतर विभागाकडून रीतसर परवानग्या घ्याव्या लागतात. पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विभागाच्या परवानगी या एकच ठिकाणाहुन घेता याव्या यासाठी एक खिडकी प्रणाली चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरु करण्यात आली आहे.

    अवश्य वाचा : पूर रेषेच्या आत बांधकाम कराल तर, चंद्रपूर मनपा करणार कठोर कारवाई


         गणेश मंडळांना अर्ज करणे सोपे जावे याकरीता महानगरपालिका कार्यालयात एक खिडकी प्रणाली मदतकक्ष सुद्धा स्थापन करण्यात आला आहे. सुटीच्या दिवशीही सदर मदतकक्ष सुरु ठेवण्यात येत असल्याने सर्व गणेश मंडळांना त्याचा लाभ मिळत आहे. 

    महावितरण ची अभय योजना

    https://pandal.cmcchandrapur.com या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करता येऊ शकतो. मनपा हद्दीतील १३७ सार्वजनीक गणेश मंडळांनी आतापर्यंत परवानगीसाठी अर्ज सादर केले असुन अजुन संख्या वाढण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव प्रदुषणमुक्त होण्याच्या दृष्टीने पीओपी मुर्तींना थारा न देता शाडूच्या मुर्तींचाच वापर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  

  • Terror of tigers : वाघाचा बंदोबस्त करा – संतोष रावत

    Terror of tigers : वाघाचा बंदोबस्त करा – संतोष रावत

    Terror of tigers वनविभागाने तातडीने वाघांचा बंदोबस्त करावा, गुरांना चराईसाठी संरक्षण द्या अन्यथा वनविभागासमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी दिला

    Terror of tigers – (गुरू गुरनुले) आज मरेगांव येथे वाघाच्या हल्यात एक गुराखी आज ठार झाला. या पार्श्वभूमीवर रावत यांनी हा इशारा दिला.

    चिचाळा, ताडाळा, जानाळा, मरेगांव अशा एकापाठोपाठ एक गावात गुराख्यांवर वाघानी हल्ले करून ठार केले. यामुळे या भागातील नागरीकांत प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. लोक जीवाच्या भितीने आपले दैनदिन कामेही करणे बंद केले आहे. शेतकरी शेतात जाण्यांस तर, गुराखी गुरे चारण्यास घेवून जाण्यास घाबरत आहे. यामुळे ग्रामिण भागातील अर्थव्यवस्थाच धोक्यात आली आहे.

    अवश्य वाचा : भाजप आमदार नितेश राणे यांना अटक करा

    वनविभागाने वाघाचे बंदोबस्त न केल्यांने, अनेक शेतकरी, आपल्या शेतीत पीके न घेता, शेत पडीत ठेवत आहे. यामुळे या शेतकर्यांची मोठी नुकसान होत आहे.

    महावीतरणची अभय योजना

    वनविभागाने या शेतकर्यांना भरपायी द्यावी, गुरांना चराईसाठी निश्चित जागा उपलब्ध करून द्यावी, चारा उपलब्ध करून द्यावा, वाघांचा बंदोबस्त करावा, शासनाने वाघ मारण्यांची तातडीने परवाणगी द्यावी अशी मागणी संतोष रावत यांनी केली आहे.

    वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करून ग्रामिणांना दिलासा न दिल्यास कॉंग्रेसच्या वतीने उपनसंरक्षक कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात येईल असा इशारा श्री. रावत यांनी दिला आहे.