Tag: MH34

  • Wild animals : तर चंद्रपूर जिल्ह्यात जन आंदोलन होणार – डॉ. अभिलाषा गावतुरे यांचा इशारा

    Wild animals : तर चंद्रपूर जिल्ह्यात जन आंदोलन होणार – डॉ. अभिलाषा गावतुरे यांचा इशारा

    Wild animals काँग्रेस नेत्या व भूमिपुत्र ब्रिगेड च्या मार्गदर्शिका डॉ. अभिलाषाताई गावतूरे यांच्या नेतृत्वात एक प्रतिनिधिक शिष्टमंडळ वन विभागाचे प्रधान सचिव श्री. बी वेणुगोपाल रेड्डी यांची वन अकॅडमी चंद्रपूर येथे भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये डॉ. अभिलाषा गावतूरे समवेत भादूर्णी, बेंबाल ,चिंचोली, केळझर, चिचाळा, मरेगाव, जानाला, बेंबाळ, बोरचंदली गावातील बहुसंख्य नागरिकांचा समावेश होता.


    जिल्ह्यातील विशेषतः बल्लारपूर विधानसभेतील जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. खालील विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. Wild animals

    बिबट्याने केली 7 वर्षीय मुलाची शिकार

    1. वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरी देणे.
    2. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर मोबदला म्हणून मिळणाऱ्या पंचवीस लाख रक्कम त्वरित देण्यात यावी व रकमेत वाढ करण्यात यावी.
    3. गाय, बैल, शेळी, मेंढी, म्हैस, बकरी च्या चराईसाठी गावनिहाय चराई कुरण करून मोफत चराई करण्याची परवानगी द्यावी.
    4. वाघ, बिबट, अस्वल अशा हिंस्र प्राणी यांची निश्चित आकडेवारी शोधून चंद्रपूर जिल्ह्यातील वन क्षेत्र तुलनेत संख्या जास्त झाल्यास अन्यत्र हलवण्याची कारवाई करावी.
    5. सर्व हिंस्र पशूंना कॉलर आयडी लावून त्यांच्या हालचालीवर देखरेख ठेवून ते गावाजवळ आल्यास त्यासंबंधी सूचना गावकऱ्यांना करणे व याबाबत यंत्रणा विकसित करणे. (Wild animals)
    6. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तात्काळ दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका वन विभागात द्वारे उपलब्ध करून देणे व नामांकित खाजगी रुग्णालय यांचे नामांकन करून रुग्णालय उपलब्ध करून देणे जेणेकरून जखमी व्यक्तीस दर्जेदार उपचार मिळेल.
    7. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी चे संपूर्ण व्यवस्थापन स्थानिक गावकऱ्यांच्या हाती देणे व कम्युनिटी सफारी सुरू करणे त्याचे उत्पन्न स्थानिक गावकऱ्यांना मिळेल.
    8. सराई कुरण बाबत वारंवार पाठपुराटा करून देखील चराई कुरण निर्माण न करणाऱ्या वन अधिकाऱ्याचा आढावा घेऊन निलंबनाची कारवाई करावी.
    9. सोलर झटका मशीन वा निकृष्ट दर्जाचे वाटप होत असल्याने सदर भ्रष्टाचाराची उच्च चौकशी करून व संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी. Wild animals
    10. बॉटनिकल गार्डन वन उद्यान व अकॅडमी यामध्ये निर्माण केलेले हॉटेल पब्लिक रेस्टॉरंट व व अन्य कामांमध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन आणि लाचखोरी होत असल्याने याची उच्चस्तरीय समिती गठीत करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी.
    11. ⁠वन विभागाच्या सर्व प्रकल्पांचे सोशल ऑडिट करून रिपोर्ट सार्वजनिक करावी. सोशल ऑडिट कमेटी मध्ये सर्व स्टेकहोल्डर्स चा समावेश असावा.
    12. ⁠वन हक्क कायदा 2006 मध्ये संशोधन करून वन जमिनी वरती शेती व घरगुती वापरासाठी 2024 पर्यंत झालेले अतिक्रमण कायदा करून वन हक्काने पट्टे वाटप करण्यात यावे.
    13. ⁠वन हक्क कायदा 2006 मध्ये गैर आदिवासी समाजाच्या तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी.
      या मागण्यांना घेऊन प्रधान सचिव वन विभाग व वनबल प्रमुख व वन विभागातील विशिष्ट अधिकारी यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा केली. सर्व मागण्या योग्य असल्याचे प्रधान सचिव यांनी मान्य केले व सदर समस्या त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

    विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात

      चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच वन विभाग अधिकाऱ्याची नियोजन शून्य व कमिशन कारभार याविषयी वन सचिवाशी झालेल्या चर्चेमुळे वन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शेतकरी, गुराखी व सामान्य नागरिक यांच्या प्रश्नाला काँग्रेस नेत्या डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी वाचा फोडली. या महत्वपूर्ण मागण्याबाबत राजकीय दबाव व राजकीय हस्तक्षेप झाला नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ, बिबट, अस्वल या हिंस्र प्राण्याचे बंदोबस्त तसेच बैल, गाय मेंढी, शेळी, बकरी म्हैस यांच्या चराईचा प्रश्न व वन विभागातील कमिशन खोरी, भ्रष्टाचार या समस्या 100% सुटतील असा आशावाद डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी व्यक्त केला व यास समस्या करिता राजकीय पक्ष राजकारण यांच्या सीमा ओलांडून जमिनीचे जन आंदोलन करण्याचा आव्हान याप्रसंगी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला केले.
      या समस्यांवर होणाऱ्या प्रत्येक जन आंदोलनात सर्वात पुढे राहण्याचा निश्चय याप्रसंगी केला.

    1. property tax : मालमत्ता करात मिळवा 10 टक्के सूट

      property tax : मालमत्ता करात मिळवा 10 टक्के सूट

      Property tax चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत मालमत्ता कराचा एकरकमी भरणा करणाऱ्या नागरिकांना करात सवलत देण्यात येत असुन ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत थकबाकीसह मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा ऑफलाईन पद्धतीने केल्यास ८ टक्के तर ऑनलाईन पद्धतीने भरणा केल्यास १० टक्के सुट देण्यात येत आहे. तसेच कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने ३० सप्टेंबर पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरणा कार्यालय सुरु राहणार आहे.

             
      Property tax महापालिका क्षेत्रात ८० हजाराहुन अधिक मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करण्यात येते. कर न भरल्यास दंड वसुली तसेच प्रसंगी मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने यंत्रणा जोमात कामाला लागली आहे.

      महत्वाचे : नागरिकांनो हे काम करा मनपा देणार 1 लाख रुपये


          चंद्रपूर महानगरपालिकेचे स्वतःचे उत्पन्न वाढुन कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर किरकोळ खर्च पालिकेला स्वतःच्या उत्पन्नातून भागविण्याचे दृष्टीने मालमत्ता कराची वसुली नियमित व प्रभावी होण्याकरीता मनपाद्वारे विविध प्रयत्न केले जातात. मालमत्ता कराच्या प्रभावी वसुलीकरीता व संभाव्य उद्दिष्ट पूर्ती करीता मनपातर्फे करात  सवलत जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांना पुढील आर्थिक वर्षात विशेष सवलत दिली जाणार आहे त्यामुळे या कर सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

    2. Mns party : असंख्य युवकांचा मनसेत पक्षप्रवेश

      Mns party : असंख्य युवकांचा मनसेत पक्षप्रवेश

      Mns party पोंभूर्णा:-मनसेचे पोंभूर्णा तालुका अध्यक्ष आकाश तिरुपतीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेचे जिल्हा सचिव (बल्लारपूर विधानसभा) किशोर मडगूलवार तथा मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे यांच्या संकल्पनेतुन पोंभूर्णा तालुक्यातील अनेक युवकांनी मनसेचा झेंडा हाती घेतला.

      7 वर्षीय मुलाची बिबट्याने केली शिकार

      Mns party महाराष्ट्रात सर्वत्र निवडणुकांचे बिघूल वाजले असुन येणार्या काहि दिवसात विधानसभेची सार्वत्रीक निवडणूक होवु घातली आहे राजकिय पक्षाणी आपआपल्या परीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असून युवकांनी मनसेचा झेंडा हाती घेत आपले कौल महाराष्ट्राच्या परीवर्तणाला देण्याचे निर्धार केला असल्याचे दिसुन येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांणा प्रेरीत होऊन सन्मानिय राजसाहेबांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेऊन पोंभूर्णा तालुक्यातील यूवकांनी मनसेचा झेंडा हाती घेत पक्षप्रवेश केला.

      विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात

      दिनांक २१ सप्टेंबर रोजी शनिवारला मनसेचे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, यांच्या मार्गदर्शनात पोंभूर्णा तालुक्यातील अनेक युवकांनी मनसेमध्ये पक्षप्रवेश करीत राजसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली नव्याने पक्षप्रवेश केलेल्या युवकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर पदाधिकार्यांनी उपस्थीतांना मागदर्षण करीत पक्षासाठी एकनिष्ठेने काम करा येणाऱ्या काळात आपल्याला अपेक्षीत महाराष्ट्राचा नवनिर्माण झालेला दिसेल असा विश्वास व्यक्त केला.

      महत्वाचे : पीएम सुर्यघर योजनेचा लाभ घ्या

      कार्यक्रमाचे आयोजन मनविसे तालुकाध्यक्ष आशिष नैताम मनसेचे तालुका सचिव अमोल ढोले मनविसे तालुका उपाध्यक्ष राजेश गेडाम यांनी केले असून पक्षप्रवेश सोहळ्यात मनसेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे, मनसेचे पोंभूर्णा तालुकाध्यक्ष आकाश तिरुपतीवार, मनविसे पोंभूर्णा तालुकाध्यक्ष आशिष नैताम, मनसेचे तालुका सचिव अमोल ढोले, मनविसे तालुका उपाध्यक्ष राजेश गेडाम, मनसेचे पोंभूर्णा शहराध्यक्ष निखिल कन्नाके, मनसेविसे तालुका सचिव महेश राजु नैताम, शन्मुख देऊरमल्ले, शुभंम वांढरे,प्रथम चांदेकर मनसेचे पदाधिकारी तथा मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

    3. important demand : आम आदमी पक्ष युवा आघाडीची महत्वाची मागणी पूर्ण

      important demand : आम आदमी पक्ष युवा आघाडीची महत्वाची मागणी पूर्ण

      Important demand बायपास जवळील नागरिकांना नाल्या-अभावी होत असलेल्या त्रासाला लागणार पूर्णविराम, आम आदमी पक्ष युवा आघाडीच्या मागणीला यश

      Important demand चंद्रपूर : चंद्रपूर – बल्लारशा राष्ट्रीय महामार्गावरील पावसाळ्याच्या पाण्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरत होते तसेच शिरना-या पाण्यामुळे अनेक त्रासांना समोर जावे लागत होते. याबाबत नागरिकांची आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे
      यांच्या कार्यालयात वारंवार तक्रारी करन्यात आल्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम आदमी पार्टी तर्फे बांधकाम विभागाला अनेक निवेदन देण्यात आले, त्यानंतर जनतेला सोबत घेऊन आंदोलने करण्यात आले. या आंदोलनाची प्रशासनाला दखल घ्यावी लागली.

      7 वर्षांच्या मुलाची बिबट्याने केली शिकार

      आंदोलनामुळे नाली च्या कामाला मंजुरी मिळाली असून आज नालीच्या कामाकरिता बांधकाम विभाग यांच्या टीमने मोजणी करूण जागेची पाहणी केली ४ दिवसात कामाला सुरुवात होणार असल्याचे सुद्धा संबंधित अधिकारी यांनी म्हटले आहे. याकरिता येथील पीडीत नागरिकांनी आम आदमी पार्टीचे राजु कुडे यांचे आभार मानले. Important demand

      भाजपची निवडणूक प्रचाराला सुरुवात


      यावेळेस आपचे जिल्हाध्यक्ष राजु कुडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, युवा संघटनमंत्री मनीष राऊत, शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद शेख, शहर वाहतूक अध्यक्ष जयदेव देवगडे, आदित्य नंदनवार, अक्षय गोवर्धन, सागर बोबडे, अजय बाथब इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    4. Terror of tigers : मूल तालुक्यात वाघाची दहशत, संतोष रावत आक्रमक

      Terror of tigers : मूल तालुक्यात वाघाची दहशत, संतोष रावत आक्रमक

      Terror of tigers (गुरू गुरनुले) मुल – मरेगांव येथील वाघाच्या हल्याची घटना ताजी असतांना परत १९ सप्टेंबर २४ रोजी चीचोली येथील देवाजी राऊत यांनीही वाघाने ठार केले. हा शेतकरी, गुराखी यांचेवर नेहमीच होणारी जीवित हानी एक अन्यायच आहे. हे किती दिवस जनता सहन करणार, यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा वरिष्ठ वनाधिकारी व वनपरिक्षेत्र अधिकारी मुल यांना संतोषसिंह रावत यांनी दिला.


      Terror of tigers दिनांक २१ सप्टेंबर रोजी चिंचोली येते मृतक देवाजी राऊत यांच्या घरी भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले,विचारपूस केली. आर्थिक सहकार्यही केले. तेव्हाच सी.डी.डी.सी.बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी इशारा दिला.

      अवश्य वाचा : चंद्रपुरात 7 वर्षीय मुलाची बिबट्याने केली शिकार


      चिचोली,मरेगांव येथील दोन्ही घटना एकामागे एक घडल्या असल्याने गावकरी व शेतकऱ्यांमध्ये वाघाची दहशत पसरली आहे.जिवाच्या भीतीने शेतात जाणे सोडले आहेत. तरी देखील वनविभाग,वनाधिकारी कुठलीही दखल घेतलेली नाही.आणि वनसंरक्षक व विभागीय वनाधिकारी चंद्रपूर यांनी आमदार सुभाष धोटे, सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत व मृतकाचे कुटुंबीय आणि अनेक कांग्रेस पदाधिकारी यांना दिलेल्या तोंडी आश्वासनांचे काय,असा प्रश्नही केला आहे.

      विधानसभा निवडणूक प्रचाराचा भाजपने केला शुभारंभ

      Terror of tigers पहिले वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा,करंट दांडा द्यावा,मृतकाचे मुलांना वनविभागाने नोकरी द्यावी,अशी मागणी रावत यांनी केली असून येत्या आठ दिवसांत मागणी पूर्ण केली नाही तर तीव्र आंदोलन करणार असा खंबीर इशाराही दिला.

      यावेळी सभापती राकेश रत्नावार, कांग्रेस जिल्हा महासचिव घनश्याम येनुरकर,विवेक मुत्यलवार,सुरेश फुलझेले,अतुल गोवर्धन,संदीप मोहबे, पोलिस पाटील श्रीकृष्ण चचाने, मनोज ठाकरे, साईनाथ मंगाम, आकाश राऊत, विनोद राऊत, यांचेसह चिंचोली ग्रामस्थ उपस्थित होते.

    5. Leopard attack : बिबट्याने केली 7 वर्षीय मुलाची शिकार

      Leopard attack : बिबट्याने केली 7 वर्षीय मुलाची शिकार

      Leopard attack वनाने वेढलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे, 20 सप्टेंबर ला घरासमोर शौच करीत असलेल्या 7 वर्षीय मुलाला बिबट्याने उचलत त्याची शिकार केली.

      महत्त्वाचे : शहरात कांग्रेसचे निषेध आंदोलन

      Leopard attack दुर्गापुरातील मसाळा गावात 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान 7 वर्षीय भावेश तुराणकर हा घराच्या मागील बाजूस शौचास बसला होता, शौच झाल्यावर भावेश उठला आणि रस्त्याकडे धावत गेला तितक्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने भावेश वर झडप घेत त्याला उचलून नेले.

      अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात वाघ व बिबट्याचे हल्ले वाढले, वनविभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

      बराच वेळ झाल्याने भावेश घरी न परतल्याने आई-वडिलांनी त्याचा शोध घेतला, त्यानंतर काहींना परिसरात बिबट दिसला अशी माहिती दिली असता याबाबत वनविभाग व दुर्गापूर पोलिसांना माहिती देण्यात आली.
      दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लता वाढीवे ह्या मसाळा गावात दाखल झाल्या, पोलीस व गावकऱ्यांनी रात्रभर शोधमोहीम राबवली मात्र भावेश कुठेही आढळून आला नाही. (Leopard attack)

      सकाळी तुराणकर यांच्या घरापासून 300 मीटर अंतरावरील पद्मापुर सब एरिया कार्यालय जवळील झाडावर काहींना बिबट बसलेल्या अवस्थेत दिसला, वनविभाग व पोलीस विभाग त्याठिकाणी दाखल झाला, नागरिकांची गर्दी वाढली, वनविभागाने बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट त्याठिकाणांहून पळून गेला.
      पोलीस व वनविभागाची चमू ने झाडाखाली शोध घेतला असता तिथे भावेश चा छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह आढळला.

      वनविभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा


      अत्यंत क्रूर पध्दतीने भावेश ला बिबट्याने खाल्ले होते.
      यानंतर घटनास्थळी गावकऱ्यांनी जमाव केला, भावेश चा मृतदेह बघताच कुटुंबाने टाहो फोडला, नागरिक क्रोधीत झाले, तणावाची स्थिती निर्माण झाली, पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांनी परिस्थिती हाताळत भावेश चा मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठविला.
      मृतक भावेश हा पहिल्या वर्गात शिकत होता, भावेश च्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

      दुर्गापूर, सीएसटीपीएस ला ताडोबा जंगलाचा भाग लागून आहे, अनेकदा त्याठिकाणी वाघ, बिबट व अस्वलांचा वावर आढळून आला आहे, मागील 3 वर्षात फक्त दुर्गापूर भागात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जवळपास 15 नागरिकांचा मृत्यू झाला, मानव वन्यजीव संघर्षांच्या घटनेत वाढ होत असताना वनविभागाने या घटनांवर आळा बसविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज होती मात्र इतक्या वर्षात कसलीही उपाययोजना वनविभागाने केली नसल्याने आज पुन्हा अशी दुर्दैवी घटना उघडकीस आली.

      या परिसरात वेकोली कार्यालय आहे, त्याचठिकानी वेकोलीचा कचरा टाकल्या जातो, म्हणून त्याठिकाणी डुक्कराचा वावर वाढला, शिकारीच्या शोधात असलेल्या वन्य प्राण्यांना या भागात अलगद शिकार उपलब्ध होते, त्यामुळे मसाळा भागात वन्यप्राणी येऊ लागले अशी सर्वत्र चर्चा आहे.

    6. Chandrapur city Municipal Corporation : नागरिकांनो हे काम केल्यास मनपा देणार 1 लाख रुपयांचे बक्षिस

      Chandrapur city Municipal Corporation : नागरिकांनो हे काम केल्यास मनपा देणार 1 लाख रुपयांचे बक्षिस

      Chandrapur city municipal corporation चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छता ही सेवा व एकच लक्ष शहर स्वच्छ मोहीमेअंतर्गत शहरातील नागरिकांचे आपल्या शहराच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणात योगदान असावे या दृष्टीने सुंदर माझे उद्यान व सुंदर  माझी ओपन स्पेस या २ स्वतंत्र स्पर्धा १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येत आहे.

      अवश्य वाचा : वनविभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा


        Chandrapur city Municipal Corporation मागील वर्ष या स्पर्धेचे प्रथम वर्ष होते, मात्र स्पर्धेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला होता. स्पर्धेत शहरातील ५८ संघांनी नोंदणी केली होती. १९ उद्यान व २१ ओपन स्पेस असे मिळुन एकुण ४० संघांनी उद्यान व ओपन स्पेस सौंदर्यीकरण करण्याचे काम पुर्ण केले. विजेत्यांना रोख बक्षिसाबरोबरच त्यांच्या परिसरात विकासकामे सुद्धा मनपाने दिलेल्या निधीतुन करता आली.  


       Chandrapur city Municipal Corporation  स्पर्धकांनी खुल्या जागेत वापरण्यायोग्य २५ मैदाने तयार केली. अंदाजे ८२ हजार ५०० स्क्वेअर फूट एवढी जागा – भिंती उत्कृष्टपणे रंगविण्यात आल्या.जवळपास ३६ हजार किलो टाकाऊ प्लास्टीकचा वापर करून टिकाऊ वस्तू स्पर्धेदरम्यान तयार करण्यात आल्या. २५ शिल्प व कारंजे स्पर्धकांनी बनविले,५ कंपोस्ट पीट व २८ शोष खड्डे बनविण्यात येऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड सुद्धा करण्यात आली होती.पर्यावरणपुरक स्पर्धा ठरल्याने यावर्षीसुद्धा ही स्पर्धा घेण्यात येत आहे.

      आता जलद न्याय होणार – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

         
           स्पर्धेत उद्यान समिती,ओपन स्पेस विकास समिती,एनजीओ, स्वयंसेवी संस्था,सामाजीक संस्था,युवक/युवती मंडळे इत्यादी सर्वांना यात सहभागी होता येणार असुन स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्यास काही स्थळ मनपातर्फे देण्यात येणार असुन याव्यतिरिक्त इतर स्थळ जसे शहरातील मोकळ्या जागा,बगीचा, सार्वजनिक ठिकाणे या जागा निवडण्याची मुभा स्पर्धक गटांना राहणार आहे.  खाजगी स्थळ,लेआऊट मधील ओपन स्पेस या जागा अपेक्षित नसुन केवळ सार्वजनिक स्थळ अथवा शासकीय जागा असें अपेक्षित आहे. स्पर्धेत नागरिकांनी आपल्या गटासह सहभागी होऊन आपल्या शहराच्या सौंदर्यीकरणात योगदान देण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.


      संपर्क – स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर असुन स्पर्धेत भाग घेण्यास साक्षी कार्लेकर ८३२९१६९७४३,८३२९३५२८४२,७४९८९५४९७६ या क्रमांकावर अथवा मनपा उद्यान विभागात संपर्क साधुन अधिक माहिती घेता येईल. तसेच मनपाच्या फेसबुक पेजवर उपलब्ध असलेल्या गुगल लिंक द्वारेही स्पर्धेत भाग घेता येईल. (Chandrapur city Municipal Corporation)


      बक्षिसे –  
       प्रथम पारितोषिक – १ लक्ष, ट्रॉफी व त्या वार्डासाठी २५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे
       द्वितीय पारितोषिक – ७१ हजार,ट्रॉफी व त्या वार्डासाठी १५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे
       तृतीय पारितोषिक – ५१ हजार, ट्रॉफी व त्या वार्डासाठी १० लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे
       प्रोत्साहनपर – ३ लक्ष रुपयांची ५ बक्षिसे
       गुणांसाठी निकष : स्पर्धेत गुण प्राप्त करण्यास पर्यावरण पुरक वृक्षारोपण,टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तु बनविणे, उद्यान /ओपन स्पेस विकास समितीची स्थापना व कार्ये,सार्वजनिक स्थळ/उद्यानाचे सौंदर्यीकरण, लोकसहभाग, आरोग्यदायी उपक्रम,ओपन स्पेस/ बगिच्याची देखभाल,परिसराची स्वच्छता,केलेल्या कामाची प्रचार प्रसिद्धी,३ आर तत्वांचा वापर,जागेचे आरेखन करणे असे विविध निकष आहेत. 

    7. pm surya ghar yojana : चंद्रपूर परिमंडळात 1 हजार 152 घरावर सोलर

      pm surya ghar yojana : चंद्रपूर परिमंडळात 1 हजार 152 घरावर सोलर

      चंद्रपूर:- प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला चंद्रपूर परिमंडळांतर्गत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत 1 हजार 152 ग्राहकांनी योजनेचा लाभ घेत घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून स्वत:ची वीज स्वत: तयार करण्यास सुरुवात केली आहे. पर्यायाने ते विजेबाबत स्वावलंबी झाले आहे.

      महिलांच्या मदतीसाठी गृह विभागाने उचलले हे पाऊल


      Pm surya ghar yojana या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलो वॅट क्षमता पर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना 78 हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. ही योजना फेब्रुवारी महिन्यात सुरु झाली. सौर प्रकल्पांतून ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यामुळे वीज बिल शुन्य होते. शिल्लक वीज महावितरण विकत घेते. निवासी घरघुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट 30 हजार रुपये अनुदान 2 किलोवॅटपर्यंत मिळते. 3 किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी 18 हजार रुपये अनुदान मिळते. 3 किलोवॅट पेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान 78 हजार रुपयापर्यंत मर्यादित आहे.

      Pm surya ghar yojana रूफटॉप बसवणाऱ्या एजन्सीजसाठी महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि जलद केलेली आहे. त्याचप्रमाणे 10 किलोवॅटपर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बनवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. Pm surya ghar yojana

      अवश्य वाचा : चंद्रपूर वनविभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – डॉ अभिलाषा गावतुरे

      वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे. प्रधानमंत्री सूर्य घर मोफत योजना छतावर सोलर बसविलेल्या चंद्रपूर परिमंडळातील ग्राहकांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे 819 ग्राहकाचा समावेश आहे त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील 333 ग्राहकाचा समावेश आहे.
      उपरोक्त योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी फायदा घेण्याकरिता विविध प्रसिद्धी माध्यमाद्वारे आवाहन चंद्रपूर परिमंडळातील मुख्य अभियंता श्री. हरीश गजबे यांनी केले आहे.

      नागरिकांचा प्रतिसाद

    8. Congress Party Movement : चंद्रपुरात कांग्रेसचे निषेध आंदोलन

      Congress Party Movement : चंद्रपुरात कांग्रेसचे निषेध आंदोलन

      चंद्रपूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्यविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार संजय गायकवाड,  भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्यावर कठोर कारवाई करून अटक करण्यात यावी, या मागणीसाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता गांधी चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी या दोन्ही नेत्यांविरोधात घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला.

      महत्त्वाचे : चंद्रपूर वनविभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – डॉ अभिलाषा गावतुरे


      Congress Party Movement शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांची जीभ कापण्याची, तर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी जिभेला चटके देण्याचे वक्तव्य केले. लोकशाहीप्रधान देशात उघडपणे धमकी देण्याचा प्रकार खुद्द लोकप्रतिनिधींकडून होत आहे. मात्र, केंद्र, राज्यातील गृह विभागाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. यासर्व प्रकाराला केंद्र सरकारची सहमती असल्याचे दिसून येते.

      महिलांच्या मदतीसाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सम्पर्क अधिकारी, आता न्याय जलद होणार

      Congress Party Movement गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग व बलिदान दिले आहे. यानंतरही देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिराजी गांधी व राजीवजी गांधी यांचे बळी घेतले आहेत. आता पुन्हा गांधी संपवण्याची जाहीर धमकी दिली जात आहे. परंतु, केंद्रातील भाजपचे सरकार यावर कोणतीही कारवाई करीत नाही, ही बाब अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह आहे.


      त्यामुळे भाजपने अशा वाचाळवीरांना वेळीच आवर घालून कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी यावेळी दिला. आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. के. सिंग, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, शिवा राव, विजय नळे, राजू झोडे, अनिरुद्ध वनकर, प्रविण पडवेकर, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष चंदा वैरागडे, अनुताई दहेगावकर, प्रसन्ना शिरवार, पितांबर कश्यप, सुनीता अग्रवाल, दुर्गेश कोडाम, पिंकी दीक्षित, मनीष तिवारी, गौस खान, तवंगर खान, भालचंद्र दानव, वंदना भागवत, पप्पू सिद्दीकी, नौशाद शेख, सचिन रामटेके, राहुल चौधरी, सागर खोब्रागडे यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (Congress Party Movement)

    9. Chandrapur Forest Department : वनविभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, भूमिपुत्र ब्रिगेडचे ठिय्या आंदोलन

      Chandrapur Forest Department : वनविभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, भूमिपुत्र ब्रिगेडचे ठिय्या आंदोलन

      वनमंत्र्याच्या जिल्ह्यातच जात आहेत दिवसाआड मनुष्यबळी

      Chandrapur Forest Department 19 सप्टेंबर 2024 रोजी चिंचोली मुल येथे वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. देवाजी बाबुराव राऊत वय वर्ष 62 या इसमाची बकरी चराई करताना वाघाच्या हल्ल्यात मृत्यू मुखी पडल्याची दुःखद घटना घडली आहे. या महिन्यातील टाडाळा जाणारा मरेगाव येथील वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याच्या बातम्या ताज्या असतानाच ही घटना घडली.

      मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा


      Chandrapur Forest Department गत कित्येक वर्षांमध्ये विशेष करून मागच्या सहा महिन्यांमध्ये वाघ व बिबट च्या हल्ल्यामध्ये गुराखी व शेतकरी यांच्या मृत्यूमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. घरचा कमवता व्यक्ती गमवल्या मुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.


      काँग्रेस नेत्या तथा भूमिपुत्र ब्रिगेडच्या मार्गदर्शिका डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी वाघाच्या बंदोबस्ता करिता अनेक वेळा निवेदन देऊन व मागण्या करून वनविभागाचे लक्ष या गंभीर बाबी कडे वेधले आहे परंतू मानवी जिवा पेक्षा डुक्कर, बिबट, वाघ महत्वाचा असलेल्या वनविभागाने या मागण्या कडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे परिसरातील जनता वाघाचा बळी ठरत असल्याचे दिसून येत आहे. (Chandrapur Forest Department)


      विशेष करून गाय, बकरी, म्हैस यांच्या चराई करिता चरण कुरणे उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागाला अनेक वेळा निवेदन देण्यात आले आहे परंतु सद्यास्थीती पर्यंत वनविभागाने चराई कूरणा करिता ठोस उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे वाघाच्या हल्ल्यात सामान्य नागरिकाचे जीव जात असल्याचे दिसुन येत आहे. यामुळे वन्यप्राण्याच्या बंदोबस्ता मध्ये वनविभाग व प्रशासन सपेशल अपयशी ठरले आहे.


      जिल्ह्यामध्ये वनविभागाचे प्रमुख पद असलेले मुख्य वनसंरक्षण चंद्रपुर हे पद गेल्या कितेक महिन्या पासून रिक्त असून ताडोबाचे मुख्य वनसंरक्षक यांच्या कडे वनप्रशासनाने या पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. त्यामुळे त्याच्यावर कामाचा अतिरिक्त ताण आला आहे. त्यात ताडोबा महोत्सव, वनमहोत्सव, कास्ट रवानगी महोत्सव आदी कार्यक्रमा मध्ये ते व्यस्त झाले आहे. तर हे सर्व कार्यक्रम करून घेण्यात वनविभागाचे प्रधान सचिव पासून ते वनविभागाचे सर्व छोटे मोठे अधिकारी कामाला लागले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सामान्य नागरिक, शेतकरी व गुराखी यांच्या मुख्य प्रश्नाला बगल दिल्या जात आहे. (Chandrapur Forest Department)

      अवश्य वाचा : महिलांनी केला निर्धार, संदीप गिर्हे आमचा निर्धार

      त्यामुळे सामान्य माणूस वाघाचा बळी ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यात वनविभाग शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजने अंतर्गत सौर झटका मशीन वाटप सारखे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर जाहिरात व प्रसिद्धी करून राजकीय पक्षाच्या प्रचार सारखे करून वाघाच्या हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या इसमाच्या परिवाराच्या दुखाःवर मिठ चोळण्याचा प्रकार करत असल्याची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणावर आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री हे वनमंत्री असून देखील याविषयी ब्र काढायला तयार नाही.
      सामान्य शेतकरी व गुराखी यांच्या जीविताची किंमत काही हजार आणि लाख ठरवली आहे आणि वनविभाग एक ठराविक रक्कम देऊन आपल्या मूळ जबाबदारी पार पाडण्यात अपयशी झाले आहेत.


      सरकार आणि वनविभागाच्या या असंवेदनशील वागणुकीचा भूमिपुत्र ब्रिगेडने जाहीर निषेध केला असून वन महोत्सव यांच्या प्रचार, प्रसिध्दी व जाहिरातीमध्ये अखंड बुडालेल्या वनविभाग व सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पाळीव जनावराच्या चराईच्या प्रश्नावर निष्काळजी करणाऱ्या या घटलेला जबाबदार असलेल्या वनविभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची व मुख्यवनसंरक्षक चंद्रपुर हे पद तात्काळ भरण्याची मागणी केली आहे. (Chandrapur Forest Department)


      चराई क्षेत्र निर्माण करणे, दोषी वनाधीकारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणे, वाघाचा बंदोबस्त करणे याकरिता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहीती यावेळी काँग्रेस नेत्या आणि भूमिपुत्र ब्रिग्रेडच्या मार्गदर्शिका डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांनी सांगितले
      आणि म्हणून वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मेंढपाळांचा आणि शेतकऱ्यांचा बळी वाघाने घेतल्या नसून वनविभागाने घेतलेला आहे आणि म्हणून वनविभागावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार आज पोलीस स्टेशन मुल येथे काँग्रेस नेत्या आणि भूमिपुत्र ब्रिगेड मार्गदर्शिका डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी केली आहे.


      यावेळी मुल तालुक्याचे काँग्रेस सेवा दलाचे माजी अध्यक्ष
      अध्यक्ष जेष्ठ नागरिक नामदेवरावजी गावतुरे, समता परिषदेच्या कार्याध्यक्ष शशिकलाताई गावतुरे, छायाताई सोनुले, सीमाताई लोणबुले, विक्रम गुरनुले, नितेश म्याकलवार, राकेश मोहूर्ले, संतोष चिताळे, कालिदास गायकवाड, दिवाकर चौधरी, दामोदर किनाके, सुखदेव मगरे, वामन सोनवणे, संतोष गायकवाड, समीर उमरकर, विश्वनाथ चचाटे, कोंडू घरत, भोजराज कोवे, रामदास सीडाम, संजय नागपुरे, दिलीप चौधरी, भाऊजी नेवारे, बंडू बावनवाडे, दीपक राऊत, सचिन मुंडवार, जोगेश्वर ठाकरे, मारुती मगरे, करण ठाकरे यांच्यासह शेकडो चिंचोलीवासी उपस्थित होते.