Dhanora dam project : चंद्रपूर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या धानोरा बंधाऱ्याच्या संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांच्या वतीने नागपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह कार्यकारी संचालक श्री. राजेश सोनटक्के, मुख्य अभियंता श्री. रवी पराते, अधीक्षक अभियंता श्री. माधव कदम, कार्यकारी अभियंता वऱ्हाडे साहेब तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. Dhanora irrigation scheme
या बैठकीत प्रस्तावित धानोरा बंधाऱ्याच्या कामाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीला धानोरा बंधाऱ्याच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्पाच्या आगामी टप्प्यातील कामकाज, तांत्रिक अडचणी, डीपीआरच्या अंतिम प्रक्रियेबाबत सखोल चर्चा झाली. डीपीआर अंतिम करून लवकरच हाय पावर कमिटीकडे प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते प्रकाश देवतळे, मनोज पाल, कारण नायर आदींची उपस्थिती होती.
बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कोणतीही ढिलाई होऊ नये यावर जोर दिला. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना कामाला गती देण्याच्या ठोस सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी दिल्या. धानोरा बंधारा प्रकल्प हा केवळ सिंचनाची गरज भागवणारा प्रकल्प नसून, परिसरातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवणारा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Chandrapur irrigation project
सदर बंधाऱ्याच्या कामाला गती देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत. सदर विषयावर अनेकदा अधिवेशनात आवाज उठवत त्यांनी या महत्त्वाच्या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. परिणामी, या प्रकल्पाच्या डीपीआरसाठी ५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.
धानोरा बंधाऱ्याच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होईल, तसेच गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होईल. त्यामुळे या प्रकल्पाला वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले. ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली असून कामाला गती देण्यासंदर्भातील अनेक मोठे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. सदर बैठकीस संबंधित अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.
Tadoba Safari Timing Change : चंद्रपूर ताडोबा – 45 अंशापार गेलेल्या तापमानामुळे चंद्रपूर देशात हॉट ठरले आहे. येथील जन जीवन प्रभावित होत आहे. दिवसागणिक तापमानात वाढ होत असल्याने सर्वांनाच त्याचा फटका बसत आहे. वाढत्या तापमानापासून जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पलही सुटला नाही. प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे पर्यटन सफारी प्रभावीत होऊ शकते त्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापानाने सफारीच्या वेळेत बदल करून पर्यटकांना दिलासा दिला आहे. Tadoba safari timing
देशातच नव्हे तर जगात चंद्रपर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्याघ्र दर्शनासाठी प्रसिध्द असे स्थळ आहे. त्यामुळे स्थानिक, देश विदेशातील पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. येथे सफारीकरीता बाहेरील पर्यटक मुक्कामी शुध्दा येतात. परंतु सध्या चंद्रपूरला उन्हाचा चांगलाच तडाखा बसला आहे. त्यापासून वन्यप्राणीही सुटले नाहीत. सध्या चंद्रपूर 45 अंशाच्या पार आहे. तर ब्रम्हपुरी 46 अंशाच्या घरात आहे. दरदिवशी तापमानात वाढ होत असल्याने जनजिवन प्रभावीत होत आहे.
वाढत्या उन्हाच धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने चंद्रपूरला नैसर्गीक आपत्ती जिल्हा म्हणून घोषीत केले आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये ताडोबात पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. परंतु यावेळचा कडक उन्हाळा ताडोबातील पर्यटकांकरीता कठीण जात आहे. त्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने पर्यटकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ताडोबातील दुपारच्या सफारीच्या वेळात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. Tadoba temperature April
हा बदल 1 मे पासून करण्यात येणार होता, परंतु चंद्रपूरचे तापमान देशात हॉट ठरत आहे शिवाय तापमान 45 अंशाच्या पार गेल्याने गुरूवारपासूनच पर्यटन सफारीच्या वेळात बदल करण्यात आला आहे. सकाळची सफारी ही पूर्ववत वेळेतच सुरू आहे. परंतु दुपारी 2.30 ते 6.30 वाजता पर्यंत होणारी सफारी आता अर्धा तास उशिरा सुरू होणार आहे. म्हणजे 3.00 ते 7.00 वाजताची करण्यात आली आहे. ताडोबा व्यवस्थापनाने वेळेत बदल करण्याचा आदेश निर्गमित केला आहे.
ताडोबाच्या कोअर व बफर झोनमध्ये विविध नावाने प्रसिध्द असे अनेक वाघ, वाघिणी आहेत. आपल्या रूबाबदार शैलीने ते पर्यटकांना आर्कषीत करतात. त्यामुळेच पर्यटक दरवर्षी ताडोबात पर्यटनांकरीता जावून वाघांचे दर्शन घेतात. ताडोबात वाघांची संख्या वाढल्याने आणि हमखास दर्शन होत असल्याने दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पर्यटकांची चांगलीच गर्दी बघायला मिळते. स्थानिक, राज्यातीलच नाही तर देश विदेशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक् ताडोबा येऊन आपली पर्यटकनाची हौस भागवितात. मात्र यावेळी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच चंद्रपूर तापायला लागले आहे. सुर्य चांगलाच कोपत असल्याने 45 अंशाच्या पार पारा गेला आहे. safari changed due to heatwave
अंगाची लाही लाही होत आहे. जन जीवन विस्कळीत होत आहे. याच जिल्ह्यातील ब्रम्हपुरीचे तापमानही देशात केंद्रस्थानी आले आहे. उन्हाचा सर्वांनाच फटका बसत आहे. शिवाय हवामान खात्याने उष्ण लहरींचा इशारा दिल्याने येथील जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळांचे वेळापत्रकात बदले करून 7 वे 11 वाजता केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळाला.
त्यापाठोपाठ ताडोबा व्यवस्थापनानेही वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या पर्यटन सफारीच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेऊन सफारीची वेळ अर्धातास केली आहे. त्यामुळे पर्यटकांची उन्हापासून सुटका होणार आहे. अनेक पर्यटकांनी तर बुकींग रद्द करून चंद्रपूरातील उन्हापासून स्वत:ची सुटका करून घेतली आहे. काही पर्यटक् “कडक उन्हात नको रे बाबा पर्यटन सफारी‘ म्हणून ताडोबात सध्यातरी येण्याचे टाळत आहेत.
chandrapur love affair murder : सुमठाणा (राजुरा): पत्नीच्या प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने प्रियकरानेच पतीची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी (दि. २५ एप्रिल) सुमठाणा येथे उघडकीस आली. नितेश किसन निमकर (वय ३३) असे मृत युवकाचे नाव असून, या प्रकरणी राजुरा पोलिसांनी नंदकिशोर चरणदास सोयाम (वय २५, रा. सुमठाणा) याला अटक केली आहे. rajura police murder investigation
पार्टीचं आमिष देऊन बोलावलं…
मृतक नितेशच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आरोपी नंदकिशोर सोयाम याने नितेशला फोन करून पार्टीचे आमिष दाखवले व घराबाहेर बोलावले. नितेश एमएच ३४ एई ६३२८ या क्रमांकाच्या दुचाकीने घराबाहेर पडला. मात्र तो परतलाच नाही.
दुसऱ्या दिवशी गावाबाहेरील रस्त्यालगत नितेशचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्याच्या डोक्यावर घातक वस्तूने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे उघड झाले.
प्रेमसंबंध होते कारण…
आरोपी नंदकिशोर सोयाम याचे नितेशच्या पत्नीशी गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. तो सातत्याने नितेशच्या घरी येत असे. मृतकाचे वडील किसन निमकर यांनी पोलिसांना सांगितले की, एकदा त्यांनी स्वतः आरोपीला त्यांच्या घरी पकडले होते. chandrapur husband killed by lover
प्रथम अपघात, मग उलगडला खूनाचा कट
सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे भासवण्यात आले होते. मात्र राजुरा पोलिसांनी संशयाच्या आधारे तपास सुरू ठेवला असता या घटनेमागे प्री-प्लॅन्ड मर्डर असल्याचे उघड झाले.
गुन्हा दाखल, आरोपीला अटक
या प्रकरणात आरोपी नंदकिशोर सोयाम याच्याविरुद्ध कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रमेश नन्नावरे करीत आहेत.
skill training for forest villagers : चंद्रपूर – पंतप्रधान यांच्या ‘स्किल इंडिया मिशन’शी सुसंगत राहून चंद्रपूर वन अकॅदमीने महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प व संरक्षित जंगल परिसरातील गावांमध्ये राहणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी हाऊसकीपिंग व फूड अॅण्ड बेव्हरेज सेवा या आदरातिथ्य क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी ही अभिनव योजना सुरू केली आहे. या अनुषंगाने ‘प्रथम’ या राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. forest academy Chandrapur training
या करारावर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी स्वाक्षरी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली या प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी 60 दिवसांचा असून प्रशिक्षण, निवास, भोजन व नोकरीची व्यवस्था याचा संपूर्ण खर्च अकादमी आपल्या आंतरिक निधीतून करत आहे. ही योजना वनालगताच्या गावातील तरुणांना सक्षम बनवते, तसेच पर्यायी उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देऊन वनसंवर्धनालाही हातभार लावते. Skill India hospitality program
मेलघाट व्याघ्र प्रकल्पाजवळील गावांतील 12 तरुणांचा आठवी हाउसकीपिंग बॅच 20 फेब्रुवारी ते 20 एप्रिल 2025 या कालावधीत प्रशिक्षणासाठी चंद्रपूर अकॅदमीत उपस्थित होती. आतापर्यंत हाऊसकिपिंग बॅचेस मध्ये एकूण 110 तसेच फूड आणि बेवरेज मधील एकूण 99 जणांना यशस्वीरित्या प्रशिक्षण करून थ्री, फोर, फाईव्ह स्टार हॉटेल्स, रिझॉर्टमध्ये नोकरी देण्यात आली आहे. तसेच हाउसकीपिंग सहाय्यकाचे दोन महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना उदयपूर, लोणावळा, ताडोबा, चंद्रपूर या ठिकाणी जॉब प्लेसमेंट देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालक एस के. गवळी यांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्र, जॉब ऑफर लेटर प्रदान करण्यात करण्यात आले व नेमणूकीच्या ठिकाणी जाण्यासाठी मुक्त करण्यात आले.
चंद्रपूर वन अकादमी मार्फत हा कार्यक्रम पुढील तीन वर्षात राबविण्यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबई यांच्याशी दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी समझोता केला असून त्या अंतर्गत वेगवेगळ्या पाच कौशल्य कामासाठी जसे की, फोर व्हीलर टेक्निशियन असिस्टंट इलेक्ट्रिशियन, वेल्डर, हॉस्पिट्यालिटी असिस्टंट व मल्टी फंक्शन ऑफिस असिस्टंट आणि ब्युटीशियन अशा कौशल्य कामी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदरचे प्रशिक्षण महिलांसाठी देखील उपलब्ध आहे. तरी त्याचा फायदा सर्व संबंधित गावातील तरुणांनी घ्यावा,असे आवाहन श्री. रेड्डी यांनी केले आहे.
Irai River Deepening in Chandrapur : चंद्रपूर शहराच्या प्रवेशद्वारावरच इरई नदीचे दर्शन होते. शहराला 9 कि.मी. समांतर वाहणारी ही नदी एकप्रकारे चंद्रपूर शहराचे नाक आहे. त्यामुळे ती सुंदरच असायला पाहिजे. इरईचे खोलीकरण आणि सौंदर्यीकरण करणे हे केवळ एका व्यक्तिचे काम नव्हे तर यात शासन आणि प्रशासनासह सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, नागरिकांचेसुध्दा योगदान असणे आवश्यक आहे. त्यामुळेच लोकसहभागातून आणि सर्वांच्या सहकार्यानेच इरई नदीचा चेहरा मोहरा बदलण्याचा आपला मानस आहे, असे विचार राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केले. Irai river cleaning project
जिल्हा प्रशासनद्वारे इरई नदी खोलीकरण अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते. local river restoration campaign
इरई नदी खोलीकरणाच्या कामाचे जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, लोकसहभागातून हे खोलीकरण अभियान नक्कीच यशस्वी होईल. ही आपली नदी आहे, हे आपले अभियान आहे, अशी भावना प्रत्येक नागरिकांनी ठेवावी. तसेच या अभियानाबद्दल जास्तीतजास्त जनजागृती करावी, जेणेकरून लोकांचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग. या नदीचे खोलीकरण आणि स्वच्छता ही दोन्ही कामे हाती घेण्यात येईल. आजपासून 45 दिवस हे अभियान निरंतर चालणार आहे. प्रत्येक दिवसाचे जिल्हा प्रशासनाद्वारे नियोजन करण्यात आले आहे.
विरोधकांनी इरई नदीच्या अभियानात सहभाग घ्यावा : केवळ नावासाठी विरोध करून इरई नदी स्वच्छ होणार नाही. त्यामुळे विरोधकांनी सुद्धा या अभियानात सामील व्हावे. नदीच्या खोलीकरण अभियानाबद्दल कोणीही शंका – कुशंका मनात आणू नये. आपल्या जिल्ह्याची बदनामी होणार नाही, याचीसुद्धा दक्षता घ्यावी. इरई नदीच्या खोलीकरणातून चंद्रपूरचा सन्मान वाढेल, अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री डॉ. उईके यांनी, मंत्री म्हणून त्यांना मिळणारे वेतन आणि भत्ता असे एकूण 5 लक्ष रुपयांचा धनादेश इरई नदीच्या खोलीकरण अभियानासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. Chandrapur river deepening
इरई नदीच्या 17 कि.मी. साठी दीर्घकालीन उपाययोजना करा – आमदार सुधीर मुनगंटीवार
पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्वात लोकसहभागातून इरई नदी खोलीकरणाचा शुभारंभ होत आहे, हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. नदी खोलीकरणासाठी वेगवेगळ्या स्त्रोतांतून निधी गोळा होईल. मात्र अधिकारी आणि कर्मचारीसुध्दा आपले वेतन देतात, ही अभिमानाची बाब आहे. नद्यांबाबत नागरिकांमध्ये गंभीरता असावी. मंत्री असताना जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या सहकार्यातून आपण राज्यात 108 नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले होते.
इरई नदीमध्ये ओव्हर बर्डन जास्त जमा होत असल्यने डब्ल्यूसीएल आणि सीटीपीएस यांचे योगदान महत्त्वाचे आहे. इरई नदीच्या 17 कि.मी.साठी दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्यासाठी उत्तम नियोजन व्हावे, तसेच हे अभियान निरंतर चालावे. पर्यावरण तज्ज्ञांचीसुद्धा एक स्थायी स्वरूपाची समिती यासाठी गठित करावी, असे आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी त्यांनी आपला एक महिन्याचा पगार या अभियानासाठी देत असल्याचे जाहीर केले. Irai River Deepening in Chandrapur
संपूर्ण क्षमतेने नदीचे खोलीकरण अभियान राबवावे – आमदार किशोर जोरगेवार
नद्यांच्या काठावर मानवी वस्ती वसली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात इरई, झरपट, वैनगंगा, वर्धा या नद्या वाहतात. पहिल्या टप्प्यात इरई नदीचे खोलीकरण व त्यानंतर सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. हे संपूर्ण अभियान प्रशासनाने पूर्ण क्षमतेने राबवावे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. पुढे ते म्हणाले, जिल्हा प्रशासनाने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. 17 किलोमीटरची जीवनवाहिनी असलेल्या या नदीवर आणखी तीन ते चार बंधारे बांधण्याचे नियोजन करावे. तसेच धानोरा बॅरेज प्रकल्प आगामी काळात पूर्ण करण्यात यावा. इरई नदी पूर संरक्षण भिंतीचा प्रस्ताव शासन स्तरावर मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी 2 लक्ष 55 हजार रुपयांचा धनादेश अभियानासाठी पालकमंत्र्यांकडे सुपुर्द केला. Irai River Deepening in Chandrapur
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, आज अतिशय महत्त्वकांक्षी कामाचा शुभारंभ होत आहे. चंद्रपूर शहरात पावसाळ्यात दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते. इरई नदी ही चंद्रपूरची लोकवाहिनी आहे. त्यामुळे तिला वाचवणे आपले कर्तव्यच आहे. 17 कि.मी.च्या तीन टप्प्यात एकूण 5 लक्ष ब्रास गाळ, वाळू मिश्रित गाळ नदीतून काढण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांना हा गाळ मोफत देण्यात येईल. त्यामुळे त्यांची शेती सुपीक होण्यास मदत होईल. घरकुल लाभार्थ्यांना या नदीतील वाळू मोफत देण्यात येणार आहे तर शासकीय व इतर कंत्राटदारांना अल्प दरात वाळू मिळेल, असे त्यांनी सांगितले. Irai River Deepening in Chandrapur
प्रास्ताविकात मनपा आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले, नदी असलेली शहरे ही भाग्यवान असतात. विकासाच्या भारामुळे इरई नदी घुसमटत आहे. त्यामुळे खोलीकरणाचा आज शुभारंभ करण्यात आला. यासाठी पालकमंत्र्यांनी दोन महिन्यांपूर्वीच आराखडा तयार केला आणि लोकसहभागाने हे अभियान राबविण्याच्या सूचना केल्या. या अभियानात शासन – प्रशासन, यांच्यासोबतच लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. चंद्रपूर महानगरपालिकेला नुकतेच 8 लक्ष रुपयांचे दोन पुरस्कार मिळाले असून दोन्ही पुरस्काराची रक्कम या अभियानासाठी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते खोलीकरणाच्या यंत्रसामुग्रीचे उद्घाटन आणि नदीच्या पात्रात कुदळ मारून खोलीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रिध्दी उईके यांनी तर आभार अधिक्षक अभियंता प्रवीण झोड यांनी मानले.
Bodhgaya Mahavihar in Chandrapur protest : बिहार मधील बौद्धगया महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बौद्ध विहार आणि बौद्ध मंडळांच्या सहकार्याने, न्याय्य मागण्यांसाठी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकर चळवळीतील विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या पुढाकाराने शुक्रवार 25 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य शांतता मोर्चा काढण्यात आला.
रखरखत्या उन्हात नागरिक या शांतता मोर्च्यात हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते, आम्हाला आमचे पवित्र स्थळ परत करा अश्या घोषणा या शांतता मोर्च्यात करण्यात आल्या.
बौद्धगयेचा महाविहार हे बौद्धांचे एकमेव जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ आहे. ते बौद्धांच्या नियंत्रणाखाली नाही ही चिंतेची बाब आहे. त्या वेळी अनागरिक धर्मपाल यांनी बौद्ध मठ हिंदू भिक्षूंच्या नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. लहान-मोठे आंदोलनही झाले. बुद्धगया महाविहार हिंदू च्या नियंत्रणातून मुक्त होईपर्यंत बौद्धांना संघर्ष करावा लागेल. भंते सुरई ससाई यांनी बुद्धगया महाविहाराच्या मुक्तीसाठी 9 टप्प्यांत आंदोलन केले. आता भारतीय भिक्खू संघाने 12 फेब्रुवारीपासून चळवळ सुरू केली आहे. त्याला अनेक राष्ट्रांकडून पाठिंबा मिळत आहे. या मुद्द्याबाबत, केवळ भारतातच नाही तर जगभरात, जागरूक लोक रस्त्यावर येऊन शांततेने निषेध करत आहेत. bodhgaya temple controversy
हा जागतिक वारसा बौद्धांच्या ताब्यात द्यावा आणि 1949 चा बीटी कायदा रद्द करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्पर्शाने चंद्रपूर जिल्हा पवित्र झाला आहे आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रेरणेतून आंबेडकरी चळवळीचे मुख्य केंद्र आहे. या पार्श्वभूमीवर, भिक्खू संघ आणि बौद्ध लोकांच्या उपस्थितीत बोधगया महाविहाराच्या मुक्तीसाठी एक नवीन मुक्ती चळवळ सुरू करण्यात आली आहे. बौद्धांच्या अस्मिते च्या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात बौद्ध आंबेडकरवादी रस्त्यावर उतरून हजारो लोक शांतता मोर्चात सहभागी झाले.
Municipal water supply solutions : शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत एक बैठक पार पडली. इरई नदीतील गाळ उपसा तसेच शहरातील विविध मूलभूत सुविधा आणि पायाभूत कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीत पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी महत्त्वपूर्ण सूचना मनपा प्रशासनाला दिल्या.
या बैठकीस मनपा आयुक्त विपिन पालिवाल, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, स्वच्छता विभागाचे निरीक्षक डॉ. अमोल शेडकी, बांधकाम विभागाच्या अभियंता वैष्णवी रिठे, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, तुषार सोम, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, माजी नगरसेविका छबू वैरागडे, कल्पना बबूलकर, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, श्याम कनकम, राजेंद्र अडपेवार, अरुण तिखे, वंदना हातगावकर, सुरेश तालेवार, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार, करणसिंग बैस, करण नायर, विनोद अनंतवार आदी उपस्थित होते.
शहर व परिसरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर इरई नदीतील गाळ उपसा हे एक महत्त्वाचे काम ठरत असून, या कामाच्या प्रगतीचा व अडचणींचा सविस्तर आढावा आमदार किशोर जोरगेवार यांनी या बैठकीत घेतला. बैठकीदरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून गाळ उपसण्याची सद्यस्थिती, यंत्रसामुग्रीची उपलब्धता आणि कामाचा कालावधी याबाबत सविस्तर माहिती घेतली. कामात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आवश्यक ती मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. River dredging for irrigation
शहरातील काही भागांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार जोरगेवार यांनी टँकरद्वारे सातत्यपूर्ण पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. झोननिहाय पाणीवाटप अधिक कार्यक्षम पद्धतीने होण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच पाण्याच्या टाक्या आणि टँकरच्या स्थान निश्चितीचे काम तातडीने पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला यावेळी देण्यात आले. Sustainable urban water management
परिसरातील रस्ते व बांधकामाच्या कामांची सविस्तर समीक्षा करताना, या प्रकल्पांना गती देण्याची गरज आमदार किशोर जोरगेवार म्हणाले केली. शहराच्या स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी दूर करताना डिव्हायडर देखभाल, फुलझाडे लावणे यांसारख्या सौंदर्यीकरण च्या उपक्रमांना अधिक गती देण्यावरही भर देण्यात आला. प्रशासनाने नागरिकांच्या समस्या तातडीने आणि प्रभावीपणे सोडवाव्यात, अशा सूचना यावेळी आमदार जोरगेवार यांनी केल्यात. या बैठकीला संबधित अधिकारी आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
unregistered child hostel complaint : आपल्या परिसरात अनाधिकृत छात्रावास, अनाधिकृत बालगृह/ बालकांचे निवासी संस्था सुरु असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ 1098 या टोल फ्री नंबरवर तसेच महिला व बाल विकास विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.
परिसरात अनाधिकृत बालगृह व छात्रावास सुरु असेल तर तात्काळ टोल फ्री नंबर 1098 ला माहिती द्यावी व बाल शोषण रोखण्याकरीता सहकार्य करावे. पुणे जिल्ह्यात आळंदी आणि ठाणे जिल्ह्यात खडवली येथे विनापरवाना, अनाधिकृत बालगृह, छात्रावास आणि अनाथालय चालवण्यात येत असल्याच्या बातम्या विविध प्रसार माध्यमातून समोर आल्या आहेत. या ठिकाणी बालकांना इच्छा नसताना ठेवले जाते व त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक शोषण झाले आहे. हे प्रकरण खुप गंभीर आहे. illegal child shelter report
बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व संशोधित अधिनियम 2021 आणि महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम 2018 चे उल्लंघन आहे. या अधिनियम मधील कलम 42 नुसार अशा संस्थाना आवश्यक मान्यता व नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विना नोंदणी प्रमाणपत्र बालगृह/संस्था चालविणाऱ्या व्यक्तीला एक वर्ष कारावास आणि कमीतकमी 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकते.
त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरात व क्षेत्रात असे अनाधिकृत बालकांच्या संस्था/बालगृह व छात्रावासबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री नंबर 1098 वर माहिती देवून बालकांचे शोषण थांबविण्यास मदत करावी, असे आवाहन आयुक्त नयना गुंडे आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दिपक बानाईत यांनी केले आहे. childline 1098 India
district collector visit updates : राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. हे जिल्ह्यातील विविध ठिकाणी क्षेत्रीय भेटी देऊन विकासकामांची पाहणी करीत आहे. गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच बसत असला तरी त्याची पर्वा न करता भर उन्हात जिल्हाधिका-यांनी पोंभुर्णा तालुक्यात भेट देऊन मजुरांशी संवाद साधला.
23 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी पोंभुर्णा तालुक्यातील मौजा घनोटी तुकूम येथील मजगी कामाची पाहणी केली. यावेळी तेथे कामावर असलेल्या कामगारांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांना मार्गदर्शन सुध्दा केले. यावेळी जिल्हाधिका-यांनी तालुक्यातील विविध विकासकामांना भेटी देऊन प्रगतीचा आढावा घेतला. employment under MGNREGA
क्षेत्रीय भेटीदरम्यान मौजा आंबेधानोरा येथे अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच तलाठी कार्यालयाची तपासणी करून मार्गदर्शन केले. यानंतर जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी मौजा उमरी पोतदार येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला भेट देऊन पाहणी केली. तसेच बळीराजा शेत पाणंद रस्ताच्या कामाला भेट दिली.
पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी वैद्यकीय अधिका-यांसोबत रुग्णालयातील वार्ड, भरती असलेले रुग्ण, त्यातील यंत्र सामुग्री, औषध उपलब्धता व इतर आरोग्य विषयक सोई सुविधाबाबत तपासणी करून आढावा घेतला. तसेच पोंभूर्णा येथील महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे अगरबत्ती प्रकल्पाची सुध्दा त्यांनी पाहणी केली. मौजा चिंतलधाबा येथील ग्रामपंचायत क्रीडांगण काम, मनरेगा अंतर्गत 650 वृक्ष लागवड केलेल्या कामास भेट देऊन मार्गदर्शन केले. government health facility inspection
सदर दौ-याच्या वेळी गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तहसीलदार रेखा वाणी, गटविकास अधिकारी विवेक बेल्लालवार, जि.पं.बांधकाम उपविभागीय अभियंता श्रीमती जोशी, पोलीस निरिक्षक राजकमल वाघमारे, नायब तहसिलदार रामकृष्ण उईके, मंडळ अधिकारी दिनकर शेडमाके व सुरेंद्र चिडे यांच्यासह गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, सहा.कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, ग्रामरोजगार सहाय्यक व गावातील नागरीक उपस्थित होते.
compost pit for village : चंद्रपुर : 24 एप्रिल 2025 ग्रामीण जनतेमध्ये स्वच्छते विषयक वर्तणुकीत बदल घडवून आणने, सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करून वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व पटवून देणे, घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी, कचरा कमी करणे, पुनर्वापर करण्याच्या उदेश्याने दि. 01 मे ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!” मोहीम चंद्रपुर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात या मोहीमेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन चंद्रपुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले आहे. organic waste composting at home
स्वच्छ भारत मिशन ग्रा. टप्पा 2 कार्यक्रमांतर्गत चंद्रपुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पिलकित सिंग यांचे मार्गदर्शनात व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नूतन सावंत यांचे नेतृत्वात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची अंमलबजावणी सुरू आहे. गावात निर्माण करण्यात आलेल्या नाडेपच्या माध्यमातून सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करून खत निर्मिती करण्याकरीता राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वतीने “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !” मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहे.
दि. ०१ मे ते दि. ३० सप्टेंबर २०२५ असे एकूण १३८ दिवस पर्यंत ही मोहीम राबविण्यात येत आहे. घरगुती व सार्वजनिकस्तरावर वर्गीकरण केलेल्या ओल्या कचऱ्याचे दि. २७ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीमध्ये संकलन करण्यात येईल. दि. 29 ते 30 एप्रिल दरम्यान या मोहिमेची विविध माध्यमांचा वापर करीत प्रचार प्रसिध्दी होईल. eco friendly waste disposal methods
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि. ०१ मे २०२५ ला “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू!” या मोहिमेचा शुभारंभ होईल. यावेळी स्थानिकस्तरावर लोकप्रतिनिधी, अधिकारी , कर्मचारी यांची उपस्थिती राहिल. दि. ०१ मे ते दि. १० मे या कालावधीत गावातून संकलीत केलेला ओला कचरा नाडेप मध्ये कचरा भरण्यात येईल. त्यापासून खत निर्मितीनंतर 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2025 पर्यंत नाडेप तयार झालेला खत उपसण्याची प्रक्रिया होईल. सदर अभियाना राबविणेबाबत गट विकास अधिकारी, पंचायत समिती (सर्व) यांना निर्देश देण्यात आले आहे.
अभियानाची पडताळणी :
138 दिवसाच्या “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू !” या मोहिमेची पडताळणी जिल्हास्तरावरून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा व स्व), गटविकास अधिकरी, दोन विस्तार अधिकारी, जिल्हा सल्लागार, तालुकास्तरावरील समन्वयक व गट समन्वयक ओल्या कऱ्यापासून भरलेल्या नाडेप खड्डयाची पडताळणी करतील. eco friendly waste disposal methods
प्रचार व प्रसिध्दी, समुदाय सहभाग व श्रमदान :
जास्तीत जास्त गावामंध्ये ही मोहीम राबविण्यासाठी 1 मे पासून सुरू होणाऱ्या याअभियानाची प्रचार प्रसिध्दी स्थानिक वर्तमानपत्र व समाज माध्यमां मध्ये करण्यात येईल. तसेच यशोगाथा प्रकाशित करून इतर गावांना प्रेरित करण्यात येणार आहे. अभियानाकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी, संस्था, बचतगट महिला व शेतकरी गटांचा सहभाग घेऊन गावपातळीवर श्रमदान उपक्रम राबवून जनसहभाग घेतला जाणार आहे.
अभियानाची सूचना व पुर्व तयारी :
राज्यस्तरावरून मिळालेल्या निर्देशानुसार, गटविकास अधिकारी, पं.स. स्तरावर ग्राम पंचायत अधिकारी यांची कार्यशाळा, बैठक आयोजित करतील. त्यानंतर ग्राम पंचायत अधिकारी हे ग्रामस्थांना माहिती देतील. तसेच गावात दवंडी दिली जाणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, सोसायटी कार्यालय, तलाठी साज्जा कार्यालयाच्या सूचना फलकावर दि. २५ ते 26 एप्रिल या कालावधीत अभियानाची माहिती प्रसारित करण्यात येईल. compost pit for village
या मोहिमेच्या माध्यमातून ग्रामस्तरावर नाडेपद्वारे खत निर्मिती होईल. घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी, कचरा कमी करणे, पुनर्वापर करणे, ज्यामुळे पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी करता येईल. ग्रामपंचायत, बचत गट आणि युवकांचा सक्रिय सहभाग वाढविला जाणार आहे. त्यामुळे चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबवावी असे आवाहन चंद्रपुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले आहे.