Tag: MH34

  • Irai river desilting Chandrapur CSR initiative । चंद्रपूरच्या जीवनवाहिनीला नवा श्वास; उद्योगांच्या CSR मदतीमुळे गती

    Irai river desilting Chandrapur CSR initiative

    Irai river desilting Chandrapur CSR initiative : चंद्रपूर : चंद्रपूर शहरात होत असलेल्या इरई नदीच्या खोलीकरण अभियानात आता जिल्ह्यातील उद्योगांनीही पुढाकार घेतला आहे. विविध उद्योगांनी आपल्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड) नदीच्या खोलीकरणासाठी साहित्य उपलब्ध करून दिले असून यात पोकलेन, टिप्पर आणि हायवा यांचा समावेश आहे.

    चार दिवसात ६ महिला ठार, चंद्रपूर जिल्हा हादरला

    चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते 25 एप्रिल रोजी करण्यात आला. पहिल्या टप्प्यात रामसेतू ते चौराळा पूल या दरम्यान खोलीकरण करण्यात येत आहे. सद्यस्थितीत चार ठिकाणी काम सुरू आहे. यासाठी लॉयड्स मेटल्स कंपनीने सीएसआर निधीतून 3 पोकलेन मशीन तसेच 6 टिप्पर / हायवा उपलब्ध करून दिले आहेत. तर अल्ट्राटेक सिमेंट उद्योगाने 1 पोकलेन मशीन आणि 2 हायवा खोलीकरणासाठी दिले आहेत. Chandrapur Irai river rejuvenation CSR support

    ११५८ ब्रास गाळाचे मोफत वाटप

    याशिवाय चार वेगवेगळ्या ठिकाणावर एकूण 8 पोकलेन मशीन कार्यरत असून यात जलसंपदा विभागाचे 3, सीएसआर निधीतून 1 आणि चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या 4 पोकलेनचा समावेश आहे. तसेच खोलीकरणासाठी एकूण 13 टिप्पर / हायवा, जेसीबी आणि 21 ट्रक्टर कार्यरत आहेत. आतापर्यंत नदी पात्रातून 21 टीसीएम गाळ (अंदाजे 7500 ब्रास) काढण्यात आला असून 26 शेतक-यांना 1158 ब्रास गाळ मोफत वाटप करण्यात आला आहे. गाळ नेण्यासाठी  आतापर्यंत 42 शेतक-यांनी अर्ज केले आहेत.

    शासन, प्रशासन आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून इरई नदी खोलीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील इतरही उद्योगांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Tullu pump seizure by municipality । ⚠️ पाणी चोरांवर चाप! मनपाने जप्त केले 15 टिल्लू पंप

    Tullu pump seizure by municipality

    Tullu pump seizure by municipality : चंद्रपूर  –  शहरातील बालाजी वार्ड आणि बालाजी मंदिर परिसरात परिसरात महानगरपालिकेमार्फत टिल्लू पंप जप्तीची मोहीम राबविण्यात येऊन 15 ग्राहकांचे टिल्लू पंप जप्त करण्यात आले असुन त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करून नळ कपात करण्यात आली आहे.

    वाघाने महिलेला नेले फरफटत, चंद्रपूर जिल्ह्यात ४ दिवसात ६ बळी


       मनपातर्फे शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक ( मीटर ) लावण्यात आले असुन मीटरचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. मात्र काही जागी मीटरला लावलेला पाईप काढुन पाणी भरत असल्याचे तसेच काही नागरिक टिल्लू पंपचा वापर करत असल्याचे आढळुन आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून जप्ती करण्यात आली आहे.

    टिल्लू पंप मुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम


        सर्व नळ जोडणींवर मीटर लावण्यात आले असल्याने पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढेच देयक येत असुन अनावश्यक खर्च व अनावश्यक पाण्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे.मात्र काही नागरिक नळाचे देयक कमी करण्याच्या दृष्टीने मीटरला लागुन असलेला पाईप काढतात ज्यामुळे पाण्याचा वापर करतांना मीटर बंद असते व बिल अतिशय कमी येते,शिवाय टिल्लु पंप द्वारे मोठ्या प्रमाणात पाणी एकाच कनेक्शनवर ओढले जाऊन इतर नळधारकांना अतिशय कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो.  illegal water pump use in city


          त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम लक्षात घेता मनपातर्फे कारवाई सुरु असुन यापुढे अश्या प्रकारे पाणी भरतांना आढळल्यास त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

  • woman killed by tiger in Maharashtra । 😨 चंद्रपूर हादरलं! 🛑 वाघाच्या हल्ल्याचा थरार LIVE – जंगलात रक्ताच्या थारोळ्यात सापडली महिला

    woman killed by tiger in Maharashtra

    woman killed by tiger in Maharashtra : चंद्रपूर : 14 मे 2025 – चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे हल्ले दरदिवशी वाढत असून आज बुधवारी (१४ मे) सलग चवथ्या दिवशी चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरीक्षेत्रामधील करबडा येथील कक्ष क्र ८६२ मध्ये तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या एका महिलेला वाघाने ठार केल्याची थरारक घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली. कचराबाई अरुण भरडे (५४) रा . करबडा असे मृतक महिलेचे नाव आहे. चार दिवसातील आजचा सहावा बळी आहे. tiger attack during tendu leaf collection

    वाघाचे हल्ले रोखण्यासाठी आमदार जोरगेवार यांनी घेतली तातडीची बैठक

    महिलेला फरफटत नेत होता वाघ


    चिमूर तालुक्यात सध्या तेंदूपत्ता हंगाम सुरू असून ग्रामीण भागातील कुटुंबीय आपला संसार चालविण्यासाठी तेंदुपत्ता तोडण्यासाठी जात आहे. आज बुधवारी कचराबाई अरुण भरडे ही महिला आपल्या पती सोबत सकाळी आठ वाजताच्या सुमारास गावाशेजारील चौधरी यांच्या शेतीला लागूनच असलेल्या जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेली होती. तेंदुपत्ता तोडत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक महिलेवर हल्ला केला. तेव्हा महिला ओरडली. ओरडण्याचा आवाजाने घटना पतीच्या लक्षात आली. पतीने बघितले तेव्हा वाघ त्या महिलेला तोंडात पकडून फरफटत नेत असताना दिसून आले. लगेच गावात जाऊन नागरिकांना या घटनेची माहिती दिली. नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा कचराबाईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जंगलात पडून होता. tiger kills woman in forest area

    नागरिकांचा आक्रमक पवित्रा


    या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी काही वेळ आक्रमक भूमिका घेत जंगलाला कुंपण करा,गावाभोवताल तारचे कुंपण करा,मुलाला नौकरी द्या,असा मागण्या मान्य करा तरच मृतदेह उचला, असा आक्रमक पवित्रा मृतक महिलेचा मुलगा व ग्रामस्थांनी घेतला होता. वनविभाग व पोलीस विभागाने आक्रमक झालेल्या नागरिकांची समजूत काढली. त्या नंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले.या वेळी वनपरीक्षेत्र अधिकारी योगिता आत्राम,वनपाल विनोद किलनाके,अमोल कवासे,जरारे वनरक्षक, मेश्राम, नागलोत, जिवतोडे, गेडाम, खारडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे,सहकायक पोलीस निरीक्षक, दीप्ती मडकाम,पोलीस कर्मचारी वनकर्मचारी वनमजूर आदी उपस्थित होते. वनविभागाच्या वतीने मयत भरडे कुटुंबास पन्नास हजाराची आर्थिक मदत दिली. villagers protest after tiger attack

    तेंदूपत्ता गोळा करण्याची स्पर्धा

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या ही तब्बल 300 च्या जवळपास आहे, सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता चा हंगाम सुरू झाला असून ग्रामीण भागातील नागरिक भल्या पहाटे जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जातात. चांगला तेंदूपत्ताच्या मोहापायी नागरिक वाघाच्या क्षेत्रात जातात त्यामुळे हे हल्ले सध्या वाढत आहे.


    वनविभागाच्या प्रत्येक विभागात हजारोंच्या संख्येत पहाटे नागरिक तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जात असल्याने वनविभाग त्यांना थांबवू शकत नाही आहे. मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हीसी द्वारे एक बैठक पार पडली असल्याची माहिती आहे. मात्र त्या बैठकीत नेमकं काय घडलं? याबाबत काही माहिती पुढे आलेली नाही.

  • forest department meeting Chandrapur । ⚠️ वनविभागाची ‘हाय अ‍ॅलर्ट’ बैठक! वाघांच्या हल्ल्यांवर नियंत्रणासाठी ५ ठोस निर्णय

    forest department meeting Chandrapur

    forest department meeting Chandrapur : जिल्ह्यात वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार  किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली रामबाग विश्रामगृहात वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. tiger attacks in Chandrapur district

    अल्पवयीन मुलीकडून देहव्यापार, चंद्रपूर शहर पोलिसांनी केली महिलेला अटक

    या बैठकीत मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपसंचालक (भा.प्र.से.) कुशाग्र पाठक, उपवनसंरक्षक (भा.प्र.से.) श्वेता बोडू, मध्य चांदा वन विभागाचे सहायक वनसंरक्षक अदिश शेंडगे, तसेच चंद्रपूर वनविभागाचे सहायक वनसंरक्षक विश्रांत तडसे, प्रकाश देवतळे, माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्यासह वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    तातडीने उपाययोजना करा

    या बैठकीत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवणे, नागरिकांचे संरक्षण सुनिश्चित करणे, तसेच स्थानिकांचा सहभाग वाढवणे यावर सखोल चर्चा झाली. बैठकीदरम्यान आ. किशोर जोरगेवार यांनी जिल्ह्यातील नागरिक सतत धास्तीच्या वातावरणात राहू शकत नाहीत. वनविभागाने तातडीने उपाययोजना आखून अंमलात आणाव्यात, तसेच नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात असे निर्देश दिले. Chandrapur MLA Kishor Jorgewar news

    २४ तास पथक सज्ज ठेवा

    यावेळी आ. जोरगेवार म्हणाले, वाघांच्या हलचालींबाबत माहिती देण्यासाठी गावात बातमीदार यंत्रणा सक्रिय करावी, तसेच वनविभागाचे पथक २४ तास सज्ज ठेवले जावे. लोकांच्या सुरक्षेसाठी शासनाच्या विविध योजना तत्काळ लागू करून नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्यावी.असेही ते यावेळी म्हणाले. या बैठकीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध निर्णय घेण्यात आले असून, वनविभाग आणि स्थानिक प्रशासन परस्पर समन्वयाने काम करणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आले.

  • minor girl rescued from sex trafficking । चंद्रपूरमध्ये अल्पवयीन मुलीला देहव्यापारात ढकलणाऱ्या महिलेवर पोलिसांची कारवाई

    minor girl rescued from sex trafficking

    minor girl rescued from sex trafficking : १७ वर्षाच्या मुलीला देह व्यापारात ढकलणाऱ्या महिलेला चंद्रपूर शहर पोलिसांनी १३ मे रोजी गौतम नगर परिसरातून अटक केली. आरोपी महिलेवर महिला व मुलींचे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. sex trafficking case Chandrapur 2025

    महावितरणचे चंद्रपुरातील बाबुपेठ मध्ये ब्लॅकआउट

    शहरात अल्पवयीन मुलीकडून देहव्यापार करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे शार पोलिसांनी शोधमोहीम राबवित गौतमनगर, महाकाली वार्ड येथे अमीना नावाच्या महिलेची खोली शोधली असता त्याठिकाणी १७ वर्षाची अल्पवयीन मुलगी पोलिसांना आढळली.

    पोलिसांनी त्या महिलेची चौकशी केली असता तिने सांगितले कि अमीना नावाच्या महिलेच्या सांगण्यावरून देहव्यापार करते, पोलिसांनी तात्काळ अमीना सैय्यद या महिलेवर गुन्हा दाखल करीत अटक केली.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे, पोलीस कर्मचारी भावना रामटेके, सचिन बोरकर, संतोष कणकम, संजय घोटे, कपूरचंद खैरवार, इम्रान खान, इर्शाद खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, सारिका गौरकार व दीपिका झिंगरे यांनी केली.

  • DA JGUA scheme for tribal empowerment । आदिवासी गावांमध्ये सरकार थेट मैदानात! – DA JGUA अंतर्गत 15 दिवसांचे महाअभियान

    DA JGUA scheme for tribal empowerment

    DA JGUA scheme for tribal empowerment : चंद्रपूर : जनजातीय गौरव वर्ष 2025 च्या निमित्ताने भारत सरकारने आदिवासी समुदायांच्या सर्वांगीण विकासासाठी दोन महत्त्वपूर्ण आणि कालबद्ध उपक्रम हाती घेतले आहेत. ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (PM-JANMAN)’ आणि ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DA-JGUA)’ अंतर्गत आदिवासी नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून व्यापक योजना राबविण्यात येत आहेत. PM JANMAN benefits for tribal communities

    बाबुपेठ मध्ये महावितरणचे ब्लॅकआउट, आप ने दिला इशारा

    विविध योजनांचा मिळणार लाभ

    या उपक्रमांद्वारे ‘धरती आबा अभियान’ (जागरूकता आणि संपृक्तता मोहीम) आणि ‘धरती आबा कर्मयोगी’ (क्षमता बांधणी कार्यक्रम) द्वारे बहु-क्षेत्रीय सेवा थेट गाव पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड, आयुष्मान भारत कार्ड (PM-JAY), जात प्रमाणपत्र, पीएम-किसान, जन धन खाते आदी महत्त्वाचे वैयक्तिक लाभ एकाच ठिकाणी मिळवून देण्यासाठी 15 जून ते 30 जून 2025 दरम्यान गाव-स्तरीय आणि क्लस्टर-स्तरीय शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. government schemes for PVTGs in India

    या शिबिरांचे आयोजन स्थानिक प्रशासन, विविध शासकीय विभाग, फ्रंटलाइन कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्था (NGOs), कॉमन सर्व्हिस सेंटर्स (CSCs) यांच्या समन्वयातून करण्यात येईल. यामुळे लाभ मिळवण्यात अडथळे येत असलेल्या आदिम जमाती (PVTGs) आणि इतर आदिवासी कुटुंबांपर्यंत आवश्यक सेवा पोहोचवण्यास मदत होणार आहे.

    त्रुटी असलेल्या गावांची नोंद

    या मोहिमेअंतर्गत जिल्हा प्रशासनाने अधिकार प्राप्तीमध्ये त्रुटी असलेल्या गावांची नोंद घेऊन जिल्हास्तरीय सूक्ष्म योजना आणि कॅम्प कॅलेंडर तयार करणे अपेक्षित आहे. याशिवाय, सिकल सेल डे आणि आंतरराष्ट्रीय योग दिन यांसारख्या विशेष दिवसांचा उपयोगही जनजागृतीसाठी केला जाणार आहे.

    मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी जून महिन्यात संबंधित मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांसाठी राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात येणार असून राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवरील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनर नियुक्त केले जाणार आहेत.

    जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे आवाहन :

    15 ते 30 जून 2025 या कालावधीत होणाऱ्या लाभ शिबिरांचा आदिवासी बांधवांनी लाभ घ्यावा आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी  विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.

  • AAP warning to MSEDCL Chandrapur । बाबुपेठ मध्ये महावितरणचे ‘ब्लॅकआऊट”, आप ने दिला इशारा

    AAP warning to MSEDCL Chandrapur

    AAP warning to MSEDCL Chandrapur : चंद्रपूर – कोळसा व महाऔष्णिक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरच्या बाबुपेठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून अघोषित लोडशेडिंगमुळे नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. संपूर्ण परिसराला प्रचंड उकाड्याच्या काळातही सातत्याने वीज खंडिततेचा सामना करावा लागत असून, व्यापारी, रुग्ण, लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. electricity issues in Chandrapur summer 2025

    सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर शहर पोलिसांची धाड

    महिन्याभरापासून नागरिक विजेच्या लपंडावाने त्रस्त

    गेल्या एक महिन्यापासून बाबुपेठ मध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे. वीज वितरण कंपनीकडून कोणतीही पूर्वसूचना न देता होणाऱ्या या अघोषित लोडशेडिंगमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. प्रशासनाचे हे दुर्लक्ष आणि बेजबाबदारपण जनता सहन करणार नाही, असा इशारा आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी दिला आहे.

    11 kV विकास नगर फिडर हा अतिशय मोठा फिडर असून, तो उपकेंद्रातून लालपेठ, आंबेडकर नगर व बाबुपेठ असा फेर घेतो. परिणामी लाईनचा शेवटचा भाग असलेल्या बाबुपेठ व आंबेडकर नगर भागात व्होल्टेज ड्रॉप आणि ट्रिपिंग सारख्या समस्या वारंवार भेडसावत आहेत. सध्या बाबुपेठमध्ये केवळ एकच अंडरग्राउंड केबल असून, ती खराब झाली की संपूर्ण भाग अंधारात जातो. Chandrapur electricity complaint news

    स्वतंत्र लाईन टाका

    या पार्श्वभूमीवर, बागला चौक पासून थेट बाबुपेठ व आंबेडकर नगरसाठी स्वतंत्र लाईन टाकावी, अशी मागणी आज आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने वीज वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत, अधीक्षक अभियंत्यांनी महिनाभरात कार्यवाही पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

    यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बाबूपेठ परिसरातील वीज समस्येचे निराकरण करण्यासाठी डीपीडीसी (जिल्हा नियोजन विकास समिती) मार्फत निधी मागवण्यात येत आहे, परंतु शासनाकडून वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी डीपीडीसीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असताना, जिथे खऱ्या अर्थाने गरज आहे अशा बाबूपेठ सारख्या भागांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. Chandrapur power cut problem latest update

    “जर महिनाभरात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही, तर आम आदमी पार्टी जनतेला सोबत घेऊन वीज वितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करेल आणि टाळे ठोकेल,” असा स्पष्ट आणि ठाम इशारा राजू कुडे यांनी दिला आहे.

    electricity issues in chandrapur summer 2025

    या वेळी निवेदन देताना आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, जिल्हा सचिव प्रशांत सिदूरकर, महिला महानगर अध्यक्षा अॅड. तब्बसूम शेख, युवा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, कार्यकर्ते मनीष राऊत, हर्षल नेवलकर, निशाण गजभिये, वामन सरदार, भाऊरावजी दुर्योधन, प्रवीण वासनिक, मारोती करंबे, शंकरराव येरकल, फ्रँक्लीन रामटेके, केशव भडके, भीमराव खोब्रागडे तसेच बाबुपेठ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Chandrapur police raid on banned tobacco । 🕵️‍♂️ तंबाखू माफियांचा पर्दाफाश – अन्न व औषध प्रशासन झोपेत, पोलिसांचं ‘एक्शन मोड’!

    Chandrapur police raid on banned tobacco

    Chandrapur police raid on banned tobacco : चंद्रपूर – राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखूचा व्यापार चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जोमात सुरु आहे, मात्र या अवैध व्यापारावर अन्न व औषध प्रशासन विभाग पूर्णतः अयशस्वी ठरलं आहे. सध्यातरी पोलीस यंत्रणा यावर कारवाई मोहीम राबवित असताना दिसत आहे. flavored tobacco

    ३ महिलांची शिकार करणारी वाघीण जेरबंद

    चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुनोना चौकात किराणा व्यवसायी ने आपल्या दुकानात प्रतिबंधित तंबाखू ठेवला आहे अशी गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक बच्छीरे यांना ९ मे रोजी मिळाली होती. माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी धाड मारली असता यामध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा आढळला.

    पुरवठादार वसीम झिमरी

    या कारवाईत शहर पोलिसांनी ईगल हुक्का शिशा तंबाखू असा एकूण २७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, किराणा दुकान व्यवसायी ३२ वर्षीय नितेश मुकुंदा वाकडेची चौकशी केली असता त्याने हा माल तंबाखू पुरवठादार वसीम झिमरी यांचेकडून आणला असल्याचे सांगितले पोलिसांनी दोघांवर अन्न व सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले. hookah tobacco seized in Chandrapur

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक बच्छीरे व गुन्हे शोध पथकाने केली.

  • MP Pratibha Dhanorkar public interaction । जिवतीतील नागरिकांचे प्रश्न आता खासदारांच्या कानावर – जनसंवादाने मांडूया आपली व्यथा!

    MP Pratibha Dhanorkar public interaction

    MP Pratibha Dhanorkar public interaction :  चंद्रपूर : जिवती तालुक्यातील नागरिकांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्यांचे त्वरित निराकरण करण्याच्या उद्देशाने खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या, बुधवार दिनांक १४ मे २०२५ रोजी, पंचायत समिती जिवती येथे एका महत्त्वपूर्ण जनता दरबारासह विविध विभागातील अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेणार आहे. सकाळी ठीक ११:०० वाजता या जनता दरबाराला सुरुवात होणार आहे. MP public meeting schedule

    वर्ग १० वी चा निकाल जाहीर, असा बघा निकाल

    खासदार धानोरकर यांचा जनता दरबार

    जिवती तालुक्यातील नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने खराब रस्ते, वनहक्कांसंबंधी समस्या, अनियमित वीजपुरवठा आणि अपुऱ्या आरोग्य सेवा यांचा समावेश आहे. या समस्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी आणि त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी या जनता दरबाराचे आयोजन केले आहे.

    या जनता दरबारात खासदार प्रतिभाताई धानोरकर स्वतः नागरिकांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांना त्यांच्या समस्या व अडचणी थेट मांडण्याची संधी मिळणार आहे. खासदार प्रतिभाताई धानोरकर या समस्यांची नोंद घेऊन संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देणार आहेत. rural development problems

    या जनता दरबाराच्या आयोजनामागील मुख्य उद्देश हा जिवती तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या समस्यांसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि प्रशासनाकडून त्यांच्या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करणे हा आहे. खासदार धानोरकर यांनी यापूर्वीही नागरिकांच्या समस्यांसाठी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत आणि हा जनता दरबार त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे.

    तरी, जिवती तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की ज्यांना आपल्या समस्या व अडचणी खासदार महोदयांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, त्यांनी उद्या सकाळी ११:०० वाजता पंचायत समिती जिवती येथे लेखी निवेदनासह भ्रमणध्वनी क्रमांक नोंद करून उपस्थित राहावे.

  • Maharashtra board 10th result 2025 link । निकाल आला! Maharashtra board 10th result 2025 link वर क्लिक करून लगेच बघा

    Maharashtra board 10th result 2025 link

    Maharashtra board 10th result 2025 link – महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल (SSC Result 2025) आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. ssc result 2025 maharashtra board official website

    3 दिवसात वाघाने केली 5 महिलांची शिकार


    📌 निकालाची मुख्य माहिती:

    • ⏰ निकाल जाहीर होण्याची वेळ: आज, १३ मे २०२५, दुपारी १:०० वाजता
    • 📋 निकाल पाहण्यासाठी आवश्यक माहिती:
      • 🆔 सीट नंबर (Roll Number)
      • 👩 आईचे संपूर्ण नाव (Mother’s Full Name)

    🌐 दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे:

    1. www.mahresult.nic.in
    2. www.mahahsscboard.in
    3. https://sscresult.mkcl.org
    4. https://ssc.mahresults.org.in

    📲 SMS द्वारे SSC निकाल पाहण्याची प्रक्रिया:

    1. मोबाईलमधील SMS अ‍ॅप उघडा
    2. खालील प्रमाणे मेसेज टाइप करा:
      👉 MHSSC <आपला सीट नंबर>
    3. तो मेसेज 57766 या क्रमांकावर पाठवा
    4. थोड्याच वेळात तुमचा निकाल रिप्लायमध्ये मिळेल

    🖥️ ऑनलाईन निकाल पाहण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत:

    1. अधिकृत संकेतस्थळांपैकी कोणतेही एक उघडा (उदा. mahresult.nic.in)
    2. “SSC Examination Result 2025” या लिंकवर क्लिक करा
    3. आपला सीट नंबर व आईचे नाव भरून “Submit” बटण क्लिक करा
    4. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल – तो डाऊनलोड व सेव्ह करून ठेवा how to check ssc result 2025 maharashtra board

    🎉 सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

    निकालाच्या दिवशी गोंधळ न होता वेळेत तुमचा निकाल तपासावा. भविष्यातील प्रवेशासाठी प्रिंटआउट आवश्यक असू शकतो, त्यामुळे निकालाची कॉपी जपून ठेवा.