Tag: Maratha OBC reservation protest

  • Protest in Chandrapur against Manoj Jarange । मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द!, जरांगे पाटलांच्या प्रतिमेवर जोड्यांचा प्रसाद

    Protest in Chandrapur against Manoj Jarange

    Protest in Chandrapur against Manoj Jarange : चंद्रपूर (२६ ऑगस्ट २०२५) – मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत आहे, मात्र त्यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत अपशब्द वापरल्याने भाजप संतापली असून चंद्रपुरात भाजप नेते अशोक जीवतोडे यांनी जरांगे पाटलांचा निषेध करीत त्यांच्या प्रतिमेवर जोडे हाणले.

    चंद्रपुरात हवी गोंड वीरांची स्मारके

    भाजप ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात शहरातील वरोरा नाका चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले, भाजप नेते जीवतोड म्हणाले कि आधीपासून जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे असा हट्ट करीत आहे, मात्र ते शक्य नाही. आम्ही ओबीसी त्यांची घुसखोरी कशी यशस्वी होऊ देणार नाही.

    घुसखोरी हाणून पाडू

    आंतरवाली सराटी मधून सुरु झालेलं जरांगे पाटलाचे आंदोलन आता मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे, अश्यावेळी पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बाबतीत अपशब्द वापरले हे भाजप सहन करणार नाही. जरांगे पाटलांचे आंदोलन व ओबीसी प्रवर्गात करू पाहत असलेली घुसखोरी आम्ही हाणून पाडू अशी प्रतिक्रिया अशोक जिवतोडे यांनी दिली.

    निषेध आंदोलनात ओबीसी समाजाचे नेते, भाजप पदाधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.