Tag: #MaharashtraPolitics

  • Congress vs BJP local body elections । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसच बाजी मारणार – विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार 

    Congress vs BJP local body elections 

    Congress vs BJP local body elections : चंद्रपूर ८ नोव्हेम्बर (News३४) – भाजप सत्ता काळात अनेक घोटाळे उघडकीस येत आहे.तर दुसरीकडे बेरोजगारी, महागाई व आसमानी संकटांत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी सरकारने दगा केला.सत्तेच्या मदमस्तीत राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणारे व राज्याला कर्जबाजारीच्या खाईत लोटणाऱ्या वोट चोरांना होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये  मतदार राजा काँग्रेस पक्षाच्या तसेच सहकारी घटक पक्षांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून भाजपला धडा शिकविणार असून होणाऱ्या निवडणुकांमध्ये  काँग्रेसच बाजी मारणार असे प्रतिपादन राज्याचे माजी विरोधी पक्षनेते, तथा विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ते तालुका काँग्रेस कमिटी मुलच्या वतीने आयोजित आढावा बैठकीत अध्यक्ष म्हणून बोलत होते.

    Also Read : हल्लेखोर वाघ अखेर जेरबंद

    आयोजित आढावा बैठकीस काँग्रेसचे प्रदेश महासचिव संतोषसिंह रावत, माजी आमदार देवराव भांडेकर,  भाजपमधून पक्ष प्रवेश करणारे माजी सभापती प्रशांत समर्थ, एकता समर्थ, सभापती राकेश रत्नावर, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, काँग्रेस महासचिव घनश्याम येनुरकर, माजी नगराध्यक्ष विजय चिंड्यालवार, तालुका  बँकेचे संचालक विलास मोगरकर, जिल्हा काँग्रेस महिला पदाधिकारी चित्राताई डांगे, माजी जी. प .सदस्य मंगला आत्राम,माजी सभापती वैशाली पुलावर, राजू पाटील मारकवार, महिला अध्यक्ष रुपाली संतोषवार, नलिनी आडपवर, पोभूर्ण अध्यक्ष वासुदेव पाल, बल्लारपूर अध्यक्ष पिंपरे पाटील आदी मंचावर उपस्थित होते. Maharashtra BJP corruption allegations local elections

    यावेळी पुढे बोलताना विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, विखे घराण्याने अस्तित्वाची ओळख करून देणाऱ्या काँग्रेस पक्षावर टीका करताना काँग्रेस पक्षाचे उपकार विसरू नये. असा टोला त्यांनी विखे परिवाराला लगावला. तर जमीन घोटाळ्यावरून शेतकऱ्यांना वारंवार फुकट मागायची सवय लागली असे बोलणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले. महायुती सरकार काळात शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.अशा लुटारू महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी मतदार राजाने कंबर कसली असून हा पक्ष प्रवेश सोहळा म्हणजे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला नवी भरारी घेण्याची उमेद जागविणारा सोहळा होय.असेही ते यावेळी म्हणाले. Congress vs BJP local body elections 

    तर आयोजित सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण व विचार तळागळा पर्यंत पोहचवा असे आव्हानात्मक मार्गदर्शन केले.

    यानंतर भाजपचे प्रशांत समर्थ यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सोबतच पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा ,डोंगर हळदी व विविध गावातील आम आदमी पक्षाचे व इतर पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

      कार्यक्रमाचे संचालन सुनील शेरकी, प्रास्ताविक गुरु गुरनुले तर आभार नलिनी आडपवार यांनी मानले. आयोजित आढावा बैठकीस मूल व पूर्ण तालुक्यातील शेकडोंच्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Shiv Sena leaders switching to Congress । राजकीय हालचाली; शिवसेना पदाधिकाऱ्यांचा कांग्रेस पक्षात प्रवेश

    Shiv Sena leaders switching to Congress

    Shiv Sena leaders switching to Congress : चंद्रपूर ३० ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा): वरोरा येथील खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज एका महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीत शिवसेनेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून काँग्रेसच्या ‘हात’ हाती घेतला. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यामुळे वरोरा शहर आणि माजरी परिसरातील काँग्रेस पक्षाची ताकद अधिक वाढल्याचे बोलले जात आहे.

    Also Read : महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर ४ नोव्हेम्बरला चंद्रपुरात

    निहाल सिद्दीकी, रवी रॉय, रवी भोगे, मुन्ना वर्मा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला आहे. प्रवेशानंतर निहाल सिद्दीकी यांची तत्काळ माजरी शहर काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, हे विशेष.

    यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अहेतशाम अली, माजी नगरसेवक राजू महाजन, राकेश दोंतावार यांच्यासह वरोरा व माजरी परिसरातील काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कांग्रेस पक्षाला ऊर्जा

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की, “या सर्व अनुभवी आणि कार्यक्षम कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला मोठी ऊर्जा मिळाली आहे. त्यांचे जनसंपर्काचे बळ काँग्रेसला निश्चितच उपयोगी पडेल. सध्या देशात आणि राज्यात सुरू असलेल्या लोकशाहीविरोधी कारभाराला कंटाळून हे सर्वजण काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेवर विश्वास ठेवून पक्षात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून सामान्य जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे सोडवता येतील.”

    प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी आपण पूर्ण क्षमतेने काम करू, अशी ग्वाही दिली.

  • Maharashtra municipal corporation reservation । ११ नोव्हेम्बरला चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत

    Maharashtra municipal corporation reservation

    Maharashtra municipal corporation reservation : चंद्रपूर २८ ऑक्टोबर  –राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २८ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण ठरविण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार, आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याकरीता प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया ३० ऑक्टोबर २०२५ पासून ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पार पाडण्यात येणार आहे. Maharashtra Municipal Reservation

    Also Read : गुन्हेगारीमुक्त चंद्रपूर साठी पोलिसांची कारवाई

    यानंतर आरक्षण सोडतीची जाहिर सूचना वृत्तपत्रांमधून ८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. आरक्षणाची सोडत ११ नोव्हेंबर २०२५ रोजी काढण्यात येणार असून, त्याचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल.

    हरकती व सूचना १७ नोव्हेम्बरपासून

    त्यानंतर प्रारुप आरक्षण प्रसिद्ध करून, नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू होईल. हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ असा निश्चित करण्यात आला आहे. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करून संबंधित महानगरपालिका आयुक्त निर्णय घेतील. आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात २ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

       राज्य निवडणूक आयोगाने संबंधित सर्व महानगरपालिका आयुक्तांना या कार्यक्रमानुसार वेळेत आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता व काटेकोरता राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.