Tag: Maharashtra wildlife conflict news

  • tiger attacks on farmers in gondpipari region | शेतात वाघाचा हल्ला; गोंडपीपरीमधील ७० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

    tiger attacks on farmers in gondpipari region

    tiger attacks on farmers in gondpipari region : गोंडपिपरी 19 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) :– तालुक्यातील धाबा वनपरिक्षेत्रातील चेकपिपरी शेतशिवारात शनिवारी (दि. १८) वाघाच्या हल्ल्यात शेतकरी भाऊजी पत्रू पाल (वय ७०) यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड तणाव आहे. वर्ष 2025 मध्ये आतापर्यंत एकूण 34 नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून त्यामध्ये 30 वाघाच्या, 1 अस्वल, 1 बिबट व एकाचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

    Also Read : स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक

    गावकऱ्यांची शोधमोहीम आणि भयावह दृश्य

    भाऊजी पाल हे शनिवारी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास शेतातील बैल आणण्यासाठी गेले होते. परंतु सायंकाळपर्यंत ते परतले नाहीत. घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने शेजाऱ्यांना माहिती दिली. गावकऱ्यांनी तात्काळ शेतात धाव घेतली असता, बैलजोडी बांधलेली दिसली मात्र भाऊजी पाल यांचा काहीच मागमूस लागला नाही.
    अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली आणि सकाळी पुन्हा शोध घेतला असता गावकऱ्यांच्या अंगावर काटा आणणारे दृश्य दिसले, शेतकरी भाऊजी पाल यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला, वाघाने हल्ला करून भाऊजी पाल यांना ठार केल्याचे उघड झाले. farmer killed by tiger 2025

    घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गौरकर, बिटगार्ड दत्ता, तसेच निसर्ग सखा संस्थेचे अध्यक्ष दीपक वांढरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

    या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गावकऱ्यांमध्ये संतापही व्यक्त होत आहे. मृतकाच्या पश्चात त्यांची पत्नी असून गावात शोककळा पसरली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून गोंडपिपरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाघाचा वावर वाढला आहे. शेतशिवारात वाघाच्या पाऊलखुणा सतत आढळत आहेत. या काळात कापूस वेचणे, धान कापणी आणि सोयाबीन संकलन अशी शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी अधिकच धोक्यात आहेत.

    तहसीलदार शुभम बहाकर आणि वनविभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून उपाययोजना सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी गौरकर यांनी दिली आहे.

  • tiger attack Chandrapur 2025 । शेतात काम करताना महिलेवर वाघाचा हल्ला, महिलेचा मृत्यू, अब तक ३१ मृत्यू

    tiger attack Chandrapur 2025

    tiger attack Chandrapur 2025 : चिमूर:- शंकरपूर पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या लावारी येथील एका महिलेला वाघाने ठार केल्याची घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली, विद्या कैलास मसराम वय 42 असं मृतक महिलेचे नाव आहे ही घटना चिमूर वनपरिक्षेत्र भिसी उपवन क्षेत्रातील गडपिपरी बिटात घडली. विशेष बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात आतपर्यंत तब्बल ३१ नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी गेला आहे, ज्यामध्ये २९ वाघाच्या हल्ल्यात, १ अस्वल व १ हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. tiger attack Chandrapu

    ब्रह्मपुरीमध्ये वाघाचा हल्ला, गुराखी ठार

    लावारी मध्ये मसराम यांनी धानाची शेती ठेक्याने घेतली आहे, मागील २ दिवसापासून शेतात निंदनाचे काम सुरु होते, आज सकाळी सहा महिला शेतात निंदनासाठी गेल्या होत्या, ५ महिला वेगळ्या दिशेने तर विद्या मसराम हि दुसऱ्या बाजूस निंदण करीत होती. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने विद्या वर हल्ला करीत तिला फरफटत नेत ठार केले.

    महिलेचा पती विद्या ला बघण्यासाठी शेतात आला तेव्हा ती कुठे आढळून आली नाही, त्यावेळी मागील बांधीत विद्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता, काही अंतरावर गावकर्यांना वाघ दिसला मात्र त्यांच्या आरडाओरडाने वाघ पळून गेला. जोपर्यंत महिलेच्या पतीला नोकरी, दहा लाख रुपये व वाघाचा बंदोबस्त करणार नाही तोपर्यंत कुणाचेही वाहन जाऊ देणार नाही अशी भूमिका गावकर्यांनी घेतली.

    दुचाकी वाहन फोडले

    वनविभाग व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मात्र गावकऱ्यांचा रोष वाढल्याने घटनास्थळी चांगलाच तणाव निर्माण झळा होता, यावेळी वनरक्षक बोरकर यांच्या दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. वनरक्षकाची तात्काळ बदली करावी अशी मागणी गावकरी करीत होते. यावेळी पोलीस व ववनविभागाने गावकर्यांना लेखी आश्वासन दिल्यावर तणाव शांत झाला. वन विभागातर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते तर पोलीस विभागातर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे भिसीचे ठाणेदार मंगेश भोंगडे, पोलीस उपनिरीक्षक रवी वाघ, थूटे चिमूर व भिसी येथील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.