Tag: Maharashtra monsoon crop damage 2025

  • Chandrapur Farmer Flood Relief । शेतकऱ्यांवर कोसळलं अतिवृष्टी संकट – खासदार प्रतिभा धानोरकर यांची केंद्र सरकारकडे मदतीची मागणी

    Chandrapur Farmer Flood Relief

    Chandrapur Farmer Flood Relief : चंद्रपूर : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने शेतीत सर्वाधिक नुकसान केले असून, शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. या नैसर्गिक संकटाकडे केवळ ‘नुकसान’ म्हणून न पाहता, हा आमच्या अन्नदात्याच्या आशा, स्वप्ने आणि भविष्याचा चिखल झाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी याच गंभीर विषयावर केंद्र सरकारचे कृषी आणि किसान कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांना थेट पत्र लिहून महाराष्ट्रासाठी तातडीने विशेष मदत पॅकेज जाहीर करण्याची आग्रही मागणी केली आहे.

    १ ऑक्टोम्बर पासून ताडोब्यातील जिप्सी बंद करणार, खासदार धानोरकर यांचा इशारा

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात शेतकऱ्यांची व्यथा तीव्र शब्दांत मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सोयाबीन, कापूस, धान, तूर, भाजीपाला आणि फळांची उभी असलेली सोन्यासारखी पिके डोळ्यांदेखत पाण्याखाली बुडाली आहेत. “ज्या धान्यासाठी शेतकरी दिवस-रात्र घाम गाळत होता, ते पूर्णपणे सडून गेले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकऱ्याच्या नशिबी आलेली ही घोर निराशा आणि हताशता केवळ शब्दांत व्यक्त करणे अशक्य नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.”

    कर्जाचे डोंगर, जगण्याचा मोठा प्रश्न

    नुकसानीमुळे प्रत्येक शेतकऱ्यावर कर्जाचे मोठे डोंगर आणि जगण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांचे मन वेदनांनी भरले असून, या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांना तात्काळ आर्थिक आधाराची नितांत गरज आहे. त्यामुळे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारला या संकटकाळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले आहे.