Tag: human wildlife conflict Maharashtra

  • forest department captures man-eating tiger । चिमूरमध्ये तिघांचा बळी घेणारा हल्लेखोर वाघ अखेर जेरबंद

    forest department captures man-eating tiger

    forest department captures man-eating tiger : चंद्रपूर ११ नोव्हेम्बर (News३४) – चिमूर तालुक्यात धुमाकूळ माजवीत तिघांची शिकार करणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला १० नोव्हेम्बर रोजी यश प्राप्त झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला असून यामध्ये आतापर्यंत तब्बल ३९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

    Also Read : ब्रह्मपुरी तालुक्यात शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला

    चिमूर तालुक्यात या हल्लेखोर वाघाने तिघांची शिकार केली होती ज्यामध्ये १८ सप्टेंबर रोजी भिसी उपवनक्षेत्रात गडपिपरी क्षेत्रात घडली, शेतात निंदनाचे काम करीत असलेल्या ४२ वर्षीय विद्या कैलास मेश्राम वर हल्ला चढवीत वाघाने ठार केले होते. तर दुसऱ्या घटनेत चिमूर वनपरिक्षेत्रातील डोमा बीटातील शिवरा मध्ये २६ ऑक्टोबरला ६० वर्षीय शेतकरी नीलकंठ भुरे हे शेतातील पिकाची पाहणी करीत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवीत ठार केले होते.

    ग्रामस्थांनी केले होते रस्ता रोको आंदोलन

    ६ नोव्हेम्बर रोजी शेतात कापूस वेचणी करीत असलेल्या ४५ वर्षीय शेतकरी ईश्वर भरडे यांच्यावर हल्ला करीत वाघाने ठार केले होते. चिमूर तालुक्यात तीन नागरिकांचा बळी घेणाऱ्या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा या मागणीसाठी चिमूर तालुक्यातील ८ गावातील ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले होते. वाघाचे हल्ले होत राहिल्यास आम्ही शेतावर जायचे कसे असा प्रश्न शेतकरी बांधवांसमोर उभा राहिला होता.

    वाघाचा बंदोबस्त व त्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाच्या वतीने एक लाईव्ह कॅमेरा, १६ ट्रॅप कॅमेरे व ३५ वनकर्मचारी तैनात केले होते. अखेर १० नोव्हेम्बर रोजी शंकरपूर वनपरिक्षेत्रात हल्लेखोर वाघाला डार्ट मारत जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले.

    सदरची यशस्वी कारवाई पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, पोलीस कर्मचारी व ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे शुटर अजय मराठे, दीपेश टेम्भूर्णे, योगेश लाकडे, गुरुनानक ढोरे, वसीम शेख, विकास ताजने, प्रफुल वाटगुरे, कोरपे व दांडेकर यांनी केली.

  • Tiger terror in chandrapur district | गोंडपिपरीत वाघाचे थैमान! ८ दिवसांत दुसरा बळी; ४५ वर्षीय महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

    Tiger terror in chandrapur district

    Tiger terror in chandrapur district : गोंडपिपरी (चंद्रपूर 26 ऑक्टोबर News34): गोंडपिपरी (Gondpipri Taluka) तालुक्यात वन्यजीव हल्ल्यांची मालिका सुरूच असून, येथील गणेशपिपरी (Ganeshpipri) गावात वाघाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालत एका महिलेचा बळी घेतला आहे. आज, सोमवार (दि. २७ ऑक्टोबर), सायंकाळच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. यामुळे तालुक्यात प्रचंड दहशत (Terror) आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. Woman killed by tiger Gondpipri cotton field

    Also Read : नागभीड मधील त्या हल्लेखोर वाघाचा शोध सुरू

    अल्का महादेव पेंदोर (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. मजूर मिळत नसल्याने त्या एकट्याच आपल्या शेतात कापूस वेचणीसाठी (Cotton Picking) गेल्या होत्या. त्यांचे पती बैल घेऊन घरी परतले, मात्र उशिरापर्यंत अल्का घरी न परतल्याने कुटुंबियांना भीती वाटली. गावकऱ्यांनी शोध घेतला असता, शेतशिवारात अल्का यांचा मृतदेह अतिशय छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.

    वनविभागाच्या उपाययोजनांना अपयश

    गेल्या काही दिवसांपासून गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगाव, वटराणा, गणेशपिपरी आणि चेकपिपरी या भागात वाघाची दहशत वाढली होती. या वाघाने अनेक पाळीव जनावरांची शिकार केली होती.

    दुसरा बळी: आठ दिवसांपूर्वी याच वाघाने चेकपिपरी येथील ७० वर्षीय शेतकरी भाउजी पाल यांचा बळी घेतला होता. या घटनेनंतर आमदार देवराव भोंगळे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून वाघाला जेरबंद (Cage/Capture) करण्याचे आदेश मिळवले होते, मात्र वनविभागाला या आदेशांचे पालन करण्यात अपयश आले.

    लोकक्षोभ: ८ दिवसांत दोन शेतकऱ्यांचे बळी गेल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट (Anger Wave) पसरली आहे.

    सन्मानजनक मदतीसाठी ग्रामस्थांचा पवित्रा

    घटनेची माहिती मिळताच वनविभागाची चमू तात्काळ गणेशपिपरी (Gondpipri News) येथे दाखल झाली. मात्र, संतापलेल्या ग्रामस्थांनी मृतदेह उचलण्यास स्पष्ट नकार दिला. जोपर्यंत या नरभक्षक वाघाला जेरबंद केले जात नाही आणि मृत कुटुंबाला सन्मानजनक आर्थिक मदत (Financial Aid) दिली जात नाही, तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. उशिरापर्यंत गावकऱ्यांचा हा विरोध सुरू होता.

    सध्या कापूस वेचणीचा महत्त्वाचा हंगाम सुरू असताना, वाघाच्या भीतीमुळे शेतीत काम करणे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरले आहे. या वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

    आतापर्यंत 36 बळी

    चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची मालिका सुरू झाली आहे, यावर्षी 36 नागरिकांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमावला असून यामध्ये 32 वाघाच्या हल्ल्यात, 2 बिबट, एक हत्ती व एकाचा अस्वलीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

  • tiger attacks on farmers in gondpipari region | शेतात वाघाचा हल्ला; गोंडपीपरीमधील ७० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

    tiger attacks on farmers in gondpipari region

    tiger attacks on farmers in gondpipari region : गोंडपिपरी 19 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) :– तालुक्यातील धाबा वनपरिक्षेत्रातील चेकपिपरी शेतशिवारात शनिवारी (दि. १८) वाघाच्या हल्ल्यात शेतकरी भाऊजी पत्रू पाल (वय ७०) यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड तणाव आहे. वर्ष 2025 मध्ये आतापर्यंत एकूण 34 नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून त्यामध्ये 30 वाघाच्या, 1 अस्वल, 1 बिबट व एकाचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

    Also Read : स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक

    गावकऱ्यांची शोधमोहीम आणि भयावह दृश्य

    भाऊजी पाल हे शनिवारी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास शेतातील बैल आणण्यासाठी गेले होते. परंतु सायंकाळपर्यंत ते परतले नाहीत. घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने शेजाऱ्यांना माहिती दिली. गावकऱ्यांनी तात्काळ शेतात धाव घेतली असता, बैलजोडी बांधलेली दिसली मात्र भाऊजी पाल यांचा काहीच मागमूस लागला नाही.
    अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली आणि सकाळी पुन्हा शोध घेतला असता गावकऱ्यांच्या अंगावर काटा आणणारे दृश्य दिसले, शेतकरी भाऊजी पाल यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला, वाघाने हल्ला करून भाऊजी पाल यांना ठार केल्याचे उघड झाले. farmer killed by tiger 2025

    घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर गौरकर, बिटगार्ड दत्ता, तसेच निसर्ग सखा संस्थेचे अध्यक्ष दीपक वांढरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

    या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गावकऱ्यांमध्ये संतापही व्यक्त होत आहे. मृतकाच्या पश्चात त्यांची पत्नी असून गावात शोककळा पसरली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून गोंडपिपरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाघाचा वावर वाढला आहे. शेतशिवारात वाघाच्या पाऊलखुणा सतत आढळत आहेत. या काळात कापूस वेचणे, धान कापणी आणि सोयाबीन संकलन अशी शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी अधिकच धोक्यात आहेत.

    तहसीलदार शुभम बहाकर आणि वनविभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून उपाययोजना सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी गौरकर यांनी दिली आहे.

  • tiger attack Chandrapur 2025 । शेतात काम करताना महिलेवर वाघाचा हल्ला, महिलेचा मृत्यू, अब तक ३१ मृत्यू

    tiger attack Chandrapur 2025

    tiger attack Chandrapur 2025 : चिमूर:- शंकरपूर पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या लावारी येथील एका महिलेला वाघाने ठार केल्याची घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली, विद्या कैलास मसराम वय 42 असं मृतक महिलेचे नाव आहे ही घटना चिमूर वनपरिक्षेत्र भिसी उपवन क्षेत्रातील गडपिपरी बिटात घडली. विशेष बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात आतपर्यंत तब्बल ३१ नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी गेला आहे, ज्यामध्ये २९ वाघाच्या हल्ल्यात, १ अस्वल व १ हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. tiger attack Chandrapu

    ब्रह्मपुरीमध्ये वाघाचा हल्ला, गुराखी ठार

    लावारी मध्ये मसराम यांनी धानाची शेती ठेक्याने घेतली आहे, मागील २ दिवसापासून शेतात निंदनाचे काम सुरु होते, आज सकाळी सहा महिला शेतात निंदनासाठी गेल्या होत्या, ५ महिला वेगळ्या दिशेने तर विद्या मसराम हि दुसऱ्या बाजूस निंदण करीत होती. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने विद्या वर हल्ला करीत तिला फरफटत नेत ठार केले.

    महिलेचा पती विद्या ला बघण्यासाठी शेतात आला तेव्हा ती कुठे आढळून आली नाही, त्यावेळी मागील बांधीत विद्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता, काही अंतरावर गावकर्यांना वाघ दिसला मात्र त्यांच्या आरडाओरडाने वाघ पळून गेला. जोपर्यंत महिलेच्या पतीला नोकरी, दहा लाख रुपये व वाघाचा बंदोबस्त करणार नाही तोपर्यंत कुणाचेही वाहन जाऊ देणार नाही अशी भूमिका गावकर्यांनी घेतली.

    दुचाकी वाहन फोडले

    वनविभाग व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मात्र गावकऱ्यांचा रोष वाढल्याने घटनास्थळी चांगलाच तणाव निर्माण झळा होता, यावेळी वनरक्षक बोरकर यांच्या दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. वनरक्षकाची तात्काळ बदली करावी अशी मागणी गावकरी करीत होते. यावेळी पोलीस व ववनविभागाने गावकर्यांना लेखी आश्वासन दिल्यावर तणाव शांत झाला. वन विभागातर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते तर पोलीस विभागातर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे भिसीचे ठाणेदार मंगेश भोंगडे, पोलीस उपनिरीक्षक रवी वाघ, थूटे चिमूर व भिसी येथील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.