Tag: Hansraj ahir

  • Pending salary | सिध्दबलीतील पूर्व कामगारांना रोजगार व प्रलंबित राशी तातडीने द्यावी- हंसराज अहीर

    Pending salary

    Pending salary : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष  हंसराज अहीर यांनी सिध्दबली इस्पात प्रकल्पातील विविध प्रश्न, समस्या, कामगारांच्या अडचणी, प्रकल्पात होणारे अपघात व अन्य महत्वपुर्ण विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेतली.

    दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा, निवासी उपजिल्हाधिकारी डि.एस. कुंभारे, तहसिलदार विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, सहायक कामगार आयुक्त राजदिप धुर्वे, जिल्हा उद्योग केंद्र अधिकारी कु. शालु घरत, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे भादुले, सिध्दबलीचे वरिष्ठ अधिकारी व अन्य विभाग प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या बैठकीत हंसराज अहीर यांनी सिध्दबली कंपनीशी निगडीत यापूर्वी झालेल्या बैठकांच्या कार्यपूर्ती अहवालाचा आढावा घेतला. कंपनीतील विविध बाबींचा तपास करण्यासाठी गठीत समितीच्या कार्याविषयी या बैठकीत माहिती घेतली.

    रामनगर पोलिसांनी पकडला नायलॉन मांजा

    बैठकीमध्ये सिध्दबलीमधील जुन्या कामगारांचे नोकरीत पुनर्स्थापन व प्रलंबित वेतन (pending salary) व अन्य देणी याविषयी माहिती घेत अहिर यांनी कंपनीने पत्र दिलेल्या कामगारांपैकी ५ कामगार कामावर रूजू झाले असून ६९ कामगारांपैकी ५० वर्षाखालील ४८ कामगारांना नोकरीचे पत्र देण्यात यावे अशा सुचना केल्या. 

    कंपनीने या सुचना मान्य करीत लवकरच पत्र जारी करण्याची हमी दिली. जे कामगार काही कारणवश रूजू होण्यास असमर्थ असतील अशा कामगारांच्या नातेसंबंधातील व्यक्तीस नोकरीत सामावून घ्यावे अशी सुचनाही अहीर यांनी कंपनी प्रबंधनास दिली.

    यावेळी हंसराज अहीर (hansraj ahir) यांनी सिध्दबली  मध्ये कार्यरत शैलेंद्र नामदेव या कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु झालेला असतांना प्रकरण रफादफा करण्याच्या हेतुने त्याचेशव उपचाराच्या बहाण्याने नागपूरला हलविण्याचा प्रयत्न केला.

    या गंभीर गुन्ह्यांचा सखोल तपास करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले. या व्यतिरिक्त झालेल्या अन्य कामगार अपघात प्रकरणात आयोगाच्या पाठपुराव्यामुळे कामगार न्यायालय, चंद्रपूर यांचे माध्यमातून संबंधित कुंटूंबियास नुकसान भरपाई मिळल्याबद्दल अहिर यांनी समाधान व्यक्त केले.

    जुन्या कामगारांच्या प्रलंबित वेतनाबाबत चर्चेदरम्यान आयोगाकडून सुवना देण्यात आल्या की, क्लोजर रिपोर्ट न देता कंपनीचे काम बंद करण्यात आल्यामुळे कंपनी बंदच्या कालावधीत सिध्दवली व सनविजय या कपन्यांनी कामगारांना प्रलंबित मोबदला देण्याची जबाबदारी घ्यावी, याबाबत कामगार आयुक्तांनी दोन्ही कंपनीच्या कालावधीतील देय असलेली रक्कम निश्चित करावी. 

    याविषयी दोन्ही प्रबंधनाने अनुकूलता दर्शविली असल्यामुळे मा. जिल्हाधिकारी व सहायक कामगार आयुक्त यांनी विशेष पुढाकार घेवून हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा व येत्या ६ जानेवारी २०२५ रोजी बैठकीचे आयोजन करून प्रगती विषयक माहिती सादर करण्याची सुचना एनसीबीसी अध्यक्षांनी संबंधितांना केली. बैठकीमध्ये राजू घरोटे, धानोरा (पि.) सरपंच विजय आगरे, उपसरपंच विनोद खेवले, पवन एकरे, मधूकर नरड, उत्तम आमडे व अन्य उपस्थित होते.

  • चंद्रपूर जिल्ह्यात हंसराज अहिर यांचं घर चलो अभियान

    News34

    चंद्रपूर- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या नेतृत्वामध्ये जिवती तालुक्यातील टेकामांडवा, शेणगांव, पाटन व नानकपठार, हिमायत नगर येथे माजी आमदारद्वय अॅड. संजय धोटे, सुदर्शन निमकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागातून सर्वसमावेशक ‘घर चलो अभियान’ राबविण्यात आले.

    या महाजनसंपर्क अभियानामध्ये भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजू घरोटे जिवती पं.स. चे माजी उपसभापती महेश देवकते, गिरमाजी, सुरेश केंद्रे, शिवाजी सेलोकर, कोरपना तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, अरूण मडावी, डॉ. येरमे, रमेश आडे, भूते पाटील, प्रतिक सादनपवार, तुकाराम वारूलवाड, संदिप शेरकी, रामसेवक मोरे, शिवाजी पल्लेवाड, अनिल येले, अजिम, अनंता बावळे, मनोज तुमराम, तिरूपती कन्नाके, सरपंच विनोद जुमनाके, प्रमोद कोडापे, भिमराव पवार, खंदारे यांची उपस्थिती होती.

    यावेळी हंसराज अहीर व अन्य नेते, पदाधिकारी यांनी नागरिकांना केंद्रसरकारच्या कल्याणकारी योजनांची पत्रके वितरीत केले. केंद्र सरकारच्या 9 वर्षातील लोकाभिमुख कार्याची माहीती दिली. सेवा, सुशासन व गरीब कल्याण वर्षाबाबत लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. सरल ऍप, नमो ऍप, फ्रेन्डस ऑफ बीजेपी आणि केंद्र सरकारच्या हेल्पलाईन क्रमांकावर मिस कॉल करून भाजपाला समर्थन देण्याचे आवाहन भाजप नेत्यांनी या अभियाना अंतर्गत केले.

     

    या कार्यक्रमाच्या अनुशंगाने हंसराज अहीर यांनी कोरपना तालुक्यातील चिंचोली (बेलगांव) येथे हितेश चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित आरोग्य व रक्तदान शिबीरास भेट देवून या कार्यक्रमाची प्रशंसा केली. येथील आरओ प्लांटचे लोकार्पण केले. या घरचलो अभियानादरम्यान हंसराज अहीर यांनी आदर्श शेतकरी रामसेवक मोरे, युवा उद्योजक निलेश ताजणे तसेच एव्हरेस्ट शिखर गाठणाऱ्या युवकाचा सत्कार केला. चिखली या गांवातील महादेव कोळी समाजातील बांधवांचे निवेदन स्विकारले नगराळा येथे अनेक महिला व युवकांनी हंसराज अहीर व अन्य नेते मंडळींच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

  • त्या कामगारांना हंसराज अहिर मुळे मिळाले प्रलंबित वेतन

    News34

    चंद्रपूर – केपीसीएल च्या बरांज कोलमाईन्स मध्ये कार्यरत कामगारांचे 6 महिन्याचे प्रलंबित वेतन मिळवून दिल्याबद्दल या कामगारांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा दि. 31 ऑगस्ट रोजी भद्रावती येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात सन्मान करीत त्यांचे आभार मानले.

    हंसराज अहीर यांनी KPCL (coal Mine) च्या बराज मोकासा येथे कार्यरत असलेल्या या मागासवर्गीय कामगारांना तात्काळ प्रलंबित वेतन देण्याचे निर्देश नागपूर आयुक्त कार्यालय येथे दि. 24 जुलै, 2023 रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या सुनावणी दरम्यान केपीसीएल चे प्रबंध संचालकांना दिले होते. याची दखल घेत केपीसीएल प्रबंधनाने अविलंब कार्यवाही करीत या 21 कामगारांचे थकीत वेतन अदा केल्याने या सर्व कामगारांनी कृतज्ञता व्यक्त करीत हंसराज अहीर यांचा सन्मान करुन त्यांच्या सहकार्याप्रती आभार व्यक्त केला.

    भद्रावती येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास भाजप नेते रमेश राजुरकर, अशोक हजारे, विजय वानखेडे, प्रशांत डाखरे, संजय वासेकर, नरेंद्र जीवतोडे, रामा मत्ते, श्यामबाबु महाजन, अविनाश सिंध्दमशेट्टीवार, प्रदीप मांडवकर, आदिंची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना हंसराज अहीर यांनी उपस्थितांना आश्वस्त करीत मागासवर्गीय कामगार, प्रकल्पग्रस्त व अन्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आपण लढत राहु, ही शेवटची लढाई नसुन या पुढेही अनेक क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपली कटीबध्दता व्यक्त केली. या प्रकल्पग्रस्त कामगारांमध्ये बराज, तांडा, मानोरा, पिरबोडी, कोंडा, केसुर्ली व अन्य गावातील कामगार व प्रकल्पग्रस्त बहुसंख्येने उपस्थित होते.

    बरांज मोकासा येथे भेट देवून अहीरांनी ऐकल्या प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा

    सदरील कार्यक्रमानंतर हंसराज अहीर यांनी बरांज मोकासा या गावास भेट देवून येथील नागरिक व प्रकल्पग्रस्तांशी विविध विषयांवर चर्चा केली यावेळी प्रकल्पग्रस्तांनी त्यांना आपल्या अडचणी सांगितल्या. ज्यात नोकरी ऐवजी अनुदान, अवार्ड नुसार मोबदला, वाढीव प्रकल्पग्रस्त कुटूंबांना मोबदला तसेच बरांज व अन्य प्रभावित गावांच्या पुनर्वसनाबाबत नागरिकांनी त्यांचेशी विस्तृत चर्चा केली. या सर्वांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन हंसराज अहीर यांनी यावेळी दिले.

  • कोळसा खाणीत होणाऱ्या गुन्ह्यांवर आता ड्रोन ची नजर

    News34

     

    चंद्रपूर/यवतमाळ/नागपूर- चंद्रपूर, यवतमाळ व अन्य जिल्ह्यांमधील वेकोलि खाण क्षेत्रात, क्षेत्रालगतच्या वसाहती तसेच ग्रामिण भागात वेकोलि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत व बेजबाबदार वृत्तीमुळे कोळसा चोरींचे प्रमाण वाढले असुन यातून टोळ्या-टोळ्यांचे माध्यमातून अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळाल्याने गंभीर स्वरूपाच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली आहे.

     

    या क्षेत्रात गँगवार, खुनीसंघर्ष व निर्घृण हत्यांसारखे प्रकार राजरोसपणे सुरू असल्याने वेकोलि क्षेत्रांमध्ये आधुनिकीकरणाचा अवलंब करून ड्रोनद्वारे निगरानी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी वेकोलि प्रबंधनाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना सुनावणी दरम्यान दिले.

     

    उपरोक्त विषयाला घेवून त्रस्त मागासवर्गीय नागरीक तसेच ग्रामिण क्षेत्रातील प्रकल्पपिडीतांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची गांभिर्याने दखल घेवून मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी दि. 25 ऑगस्ट 2023 रोजी क्षेत्रीय कार्यालय वेकोलि घुग्गुस येथे सुनावणी घेत या प्रश्नी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

     

    एनसीबीसी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सुनावणीला वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक मनोज कुमार, चंद्रपूरच्या अतिरीक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, यवतमाळचे अतिरीक्त पोलिस अधिक्षक पियुष जगताप, वेकोलिचे मुख्य सुरक्षा अधिकारी कमांडंट विक्रांत, वेकोलि वणी चे क्षेत्रीय महाप्रबंधक आभाषचंद्र सिंह, वेकोलि चंद्रपूर क्षेत्राचे महाप्रबंधक संजय वैरागडे, वणी नॉर्थ क्षेत्राचे श्रीवास्तव, माजरी क्षेत्राचे इलियाज हुसैन यांची या सुनावणीला प्रामुख्याने उपस्थिती होती.

     

    सदर सुनावणीत हंसराज अहीर यांनी वेकोलितील वाढत्या गुन्हेगारीला वेकोलि प्रबंधनास जबाबदार ठरवित या गुन्हेगारीच्या उच्चाटनाकरीता अंतर्गत व परिसरातील सुरक्षा यंत्रणा अत्याधुनिक व सुसज्ज ठेवण्याची सुचना केली. पेट्रोलिंग व शस्त्रसज्ज सुरक्षा रक्षकांच्या संख्येत वाढ करीत स्थानिक पोलिस विभागाशी समन्वय व संपर्क प्रस्थापित करीत त्यांच्या सहकार्याने वेकोलि क्षेत्रातील चोऱ्या व गुन्हेगारीवर अंकुश घालण्याचे निर्देश दिले.

     

    या सुनावणी दरम्यान उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी काही विधायक सुचना करीत त्या अध्यक्ष महोदयांच्या निदर्शनास आणल्या. वेकोलि क्षेत्राच्या 10 किमी अंतरावर स्क्रॅपच्या दुकानांना अनुमती देवू नये याकरिता वेकोलि प्रबंधनाने निवेदनाव्दारे संबंधितांकडे मागणी करावी, वेकोलिच्या अनेक क्षेत्रामध्ये अजुनही चोऱ्यांचे प्रमाण जैसे थे सुरू असल्याने. वेकोलि प्रबंधनाने ड्रोन एजन्सीद्वारा न घेता स्वतः ड्रोनची खरेदी करून या अनुचित घटनांवर नियंत्रण ठेवावे, ज्यादा मनुष्यबळ असलेल्या ठिकाणी कामगारांना सुरक्षा कामी नियुक्त करावे अशा सुचना सुध्दा श्री. अहीर यांनी उपस्थित वेकोलि अधिकाऱ्यांना केल्या.

  • सिध्दबली ईस्पातच्या पूर्व कामगारांना रोजगार व थकीत वेतन तातडीने निर्गमित करा – हंसराज अहीर

    News34

    चंद्रपूऱ- सिध्दबली ईस्पात लिमी. कंपनी, आरसीसीपीएल (परसोडा लाईमस्टोन) विसापूर प्रस्तावीत कोळसा खाण आदी विषयाशी निगडीत विविध प्रश्नांबाबत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाद्वारे दि. 25 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.

    राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, पोलिस निरीक्षक पडोली शिवाजी कदम, तहसीलदार विजय पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे बिपीन भंडारे, यु.बी. भडूले, एमआयडीसी चे श्रीकांत जोरावर, गोपाल भिराख, राजु घरोटे, विनोद खेवले, विजय आगरे, अॅड. प्रशांत घरोटे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

    या बैठकीत सिध्दबली ईस्पात कंपनीमध्ये अन्य मागासवर्गीय तसेच व इतर प्रवर्गातील कार्यरत पूर्व कामगारांना पूर्ववत रोजगार देवून त्यांचे थकीत वेतन तातडीने अदा करण्याची निर्देश हंसराज अहीर यांनी यावेळी दिले. सिध्दबली कंपनी बंद झाल्यापासुन पुर्ववत सुरू झाल्यापर्यंतच्या कालावधीतील अर्ध्या वर्षातील (अडीच वर्ष) वेतन कामगारांना देण्यात यावे अशी सुचना केली.

    या कंपनीमध्ये 4 कामगारांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्या पिडीत कुटूंबियांना कंपनी अधिनियमानुसार नुकसान भरपाईपोटी आर्थिक साह्य त्वरीत अदा करण्यात यावेत असेही निर्देश दिले.
    आरसीसीपीएल कंपनीद्वारा परसोडा लीज क्षेत्रातील जमिनीचे LARR ॲक्ट 2015 नुसार अधिग्रहण करण्याकरीता नोटीफीकेशन काढण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले.

    राज्यशासनाचे नोकरीविषयक धोरण 80:20 असतांना या कंपनीमध्ये स्थानिकांना शासनाच्या अनुपातात रोजगार उपलब्ध केला गेलेला नाही. उलट परप्रांतीयांना झुकते माप देवून कंपनीमध्ये प्राधान्य दिले गेले असल्याच्या तक्रारी असुन ही बाब स्पष्ट झाली आहे.
    शासनाच्या 80:20 या धोरणाचे अनुपालन होत आहे किंवा नाही याची स्थापित समितीच्या माध्यमातून सखोल चौकशी करण्याची सुचना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.

    तसेच या कंपनीमध्ये अनेक कामगारांचा दुर्घटनेमुळे बळी गेला असल्याने व काही कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याने या सर्व प्रकरणाची गांभिर्याने चैकशी करून या चैकशीचा सविस्तर अहवाल आयोगाकडे निर्धारित अवधीमध्ये सादर करण्याचे निर्देशही हंसराज अहीर यांनी प्रशासनाला दिले. या बैठकीस उत्तम आमडे, मुन्ना कुशवाह, रमेश सोनटक्के, सत्यपाल खेवले, प्रदिप वासाडे, आदींची उपस्थिती होती.