Tag: Festival of Ganesh Chaturthi

  • Festival of Ganesh Chaturthi । चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या घरी श्री चे आगमन

    Festival of Ganesh Chaturthi

    गणेशोत्सव 2025 : २,५०० पोलीस दल सज्ज – जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था कडक

    Festival of Ganesh Chaturthi (२७ ऑगस्ट २०२५) : चंद्रपूर – आज देशात विविध ठिकाणी गणरायाचे जल्लोषात आगमन झाले असून चंद्रपूर जिल्ह्यात एकूण १४ हजार ८३१ गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये खाजगी व घरगुती १२ हजार ९७५ गणेश मूर्ती, सार्वजनिक गणेश मूर्ती स्थापना लहान मंडळ ८७३, मोठे मंडळ ६१३ तर एक गाव एक गणपती ३७६, जिल्ह्यातील एकूण सार्वजनिक गणेश मूर्ती १ हजार ८४७ ठिकाणी विराजमान झाली आहे. गणेशोत्सव काळात जिल्ह्यात अप्रिय घटना घडू नये यासाठी २ हजार ५०० पोलीस अधिकारी, अंमलदार महिला/पोलीस सह १ हजार होमगार्ड्स पुढील ११ दिवस कर्तव्य बजावणार आहे. police deployment Chandrapur 2500 officers

    दारू दुकानाविरोधात २८ ऑगस्ट रोजी बेमुदत आमरण उपोषण

    चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी आज गणरायाचे आगमन करण्यात आले आहे. Ganpati peace prayers Chandrapur leaders

    महाराष्ट्र सदैव सुजलाम्-सुफलाम् राहो

    माजी मंत्री व आमदार मुनगंटीवार यांनी सहकुटुंब श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करून पूजन केले. ‘श्री’च्या आगमनाने संपूर्ण घर भक्तिभावाच्या दिव्य लहरींनी न्हाऊन निघाले. महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, दीन-दुर्बल व पीडित जनतेच्या कल्याणासाठी अखंड सेवा करण्याची शक्ती लाभो. महाराष्ट्र सदैव सुजलाम्-सुफलाम् राहो, अशी प्रार्थना श्री गणरायाच्या चरणी मुनगंटीवार यांनी केली.

    गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते वरोरा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात गणपती बाप्पाची विधिवत स्थापना करण्यात आली. यावेळी पारंपारिक पद्धतीने पूजा-अर्चा करून बाप्पाचे पूजन करण्यात आले. या मंगलमय प्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत मानस धानोरकर आणि पार्थ धानोरकर उपस्थित होते, ज्यामुळे या सोहळ्याला कौटुंबिक आणि उत्साहाचे स्वरूप आले होते.

    नागरिकांच्या आयुष्यात आनंदाची भरभराट होवो

    गणेश चतुर्थीच्या पावन दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायाचे मंगल आगमन झाले. यावर्षीचे हे ९५ वे वर्ष असून, जोरगेवार कुटुंबीयांनी १९३० पासून ही परंपरा जपली आहे. आता त्यांच्या चौथ्या पिढीने ही पवित्र परंपरा पुढे नेली आहे.

    सकाळी शुभ मुहूर्तावर संपूर्ण कुटुंबासह गणरायाची प्राणप्रतिष्ठा करून शास्त्रोक्त विधी-विधानानुसार पूजा-अर्चा करण्यात आली. गणेशाच्या मंगलमय आगमनाने घरात आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा नांदू दे, अशी प्रार्थना सर्वांनी केली.

    या पावन प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी गणरायाच्या चरणी सर्व शेतकऱ्यांना भरपूर पिके, चांगले उत्पन्न, निसर्गाची साथ आणि सुरक्षित भविष्य मिळावे, तसेचसर्व नागरिकांच्या जीवनात सुख-समृद्धी, आरोग्य, धनधान्य आणि आनंदाची भरभराट होवो अशी प्रार्थना केली