Tag: farmer killed by tiger near canal

  • tiger kills farmer near canal । वाघाचा धुमाकूळ! नहरालगत काम करणाऱ्या शेतकऱ्याचा बळी

    tiger kills farmer near canal

    tiger kills farmer near canal : सावली ४ सप्टेंबर २०२५ : वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पाथरी उपवन क्षेत्रातील असोला मेंढा नहराला लागून असलेल्या शेतात निंदण करीत असलेल्या शेतकऱ्याला वाघाने उचलून नेऊन ठार केल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेमुळे प्रचंड खळबळ माजलेली आहे.

    मध्यवर्ती बँक अध्यक्ष रविंद्र शिंदेंवर मारहाणीचा अदखलपात्र गुन्हा दाखल

    पाथरी येथील पांडुरंग भिकाजी चचाने हे शेतकरी आपल्या विरखल रोड लगत असलेल्या असोला मेंढा नहराला लागून असलेल्या शेतात सकाळी निंदनचे काम करीत असतानाच तिथे वाघाने सदर शेतकऱ्याला उचलून नेऊन ठार केल्याची खळबळ जनक घटना घडलेली आहे. सदर घटनेची माहिती वन परिक्षेत्र विभागाला व पोलीस विभागाला देण्यात आलेली आहे.

    याच परिसरात वाघीनेने पिलांना दिला जन्म

    सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे व त्यांची चमूने घटनास्थळ गाठून पंचनामा केला,
    याच परिसरात वाघीनेने पिलांना जन्म दिल्याची माहिती मिळत असून विरखल परिसरात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ऐन शेतीच्या हंगामात वाघाचा धुमाकूळ सुरू झाल्याने शेतकरी भयभीत झाल्याने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.