Tag: District Collector School Visit

  • Vinay Gowda GC initiatives । “जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा आश्रमशाळांना दौरा, विद्यार्थी आणि गावकऱ्यांशी संवाद”

    Vinay Gowda GC initiatives

    Vinay Gowda GC initiatives :  राज्य शासनाच्या सात कलमी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी आश्रमशाळा तसेच अंगणवाडी येथे भेट देऊन चिमुकल्यांशी संवाद साधला. यावेळी चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते.

    महाकाली यात्रेसाठी १ कोटींचा निधी द्या – सुधीर मुनगंटीवार

    जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी चंद्रपूर तालुक्यातील इंदपवार आदिवासी आश्रम शाळा बोर्डा येथे भेट देऊन आश्रमशाळेची पाहणी केली. तसेच विद्यार्थी व कर्मचारी यांचेशी संवाद साधला. तसेच आदिवासी आश्रम शाळा बोर्डा येथे सुरू असलेल्या नवीन बांधकाम इमारतीची पाहणी केली. विद्यार्थ्यार्थ्यांची अभ्यासाच्या प्रगतीबाबत चौकशी केली. Vinay Gowda GC initiativ

    तसेच मौजा पाहामी येथील अंधारी नदीवर सुरू असलेल्या नवीन उडान पुलाची पाहणी करून जिल्हाधिका-यांनी बांधकामाबाबत आढावा घेतला. यावेळी त्यांनी अंधारी नदीपासून दीड किलोमिटर अंतरावर असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वसलेल्या पाहामी गावात जाऊन गावातील नागरीकांची भेट घेतली. सदर भेटीदरम्यान पहामी येथील अंगणवाडी केंद्रातील सेविकेशी व शिकत असलेल्या विद्यार्थ्याशी संवाद साधून व्यवस्थेचा आढावा घेतला. District Collector school visit

    जिल्हाधिकारी प्रथमच गावात आल्याने सर्व गावकरी भारावून गेले. यावेळी कोळसा ग्रामपंचायतीचे सरपंच माधुरी वेलादी, पोलीस पाटील भिमराव सोयाम, अंगणवाडी सेविका माया सोयाम तसेच गावातील अन्य नागरीक उपस्थित होते.

  • District Collector School Visit । जिल्हाधिकाऱ्यांची विजासन शाळेला भेट: विद्यार्थ्यांसोबत संवाद, शैक्षणिक सुविधांची पाहणी

    District Collector School Visit

    District Collector School Visit : 100 दिवस कृती आराखड्याअंतर्गत वरिष्ठ अधिका-यांनी गावात भेटी देऊन शाळा, आरोग्य केंद्र आणि अंगणवाडी आदींची पाहणी करावी तसेच नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात, अशा सुचना राज्य शासनाच्या वतीने सर्व जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी भद्रावती येथील विजासन शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

    चंद्रपूर ते मुंबई रेल्वे पुन्हा सुरु होणार, आमदार जोरगेवार यांचा पाठपुरावा

    यावेळी वरोराचे उपविभागीय अधिकारी जेनीथचंद्र दोन्तुला, भद्रावतीचे तहसीलदार श्री. भांडारकर, संवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, नगर पालिकेच्या मुख्याधिकारी शेळकी मॅडम, भद्रावती केंद्राचे केंद्रप्रमुख मोरेश्वर विद्ये आदी उपस्थित होते. (Government School Inspection)                                               

    यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी शाळेतील ऍस्ट्रॉनॉमी लॅबची विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास करून जीवनात यश प्राप्त करावे. कठोर मेहनतीशिवाय दुसरा पर्याय नाही. आता पुढील महिन्यापासून परीक्षा सुरू होतील. त्याची चांगली तयारी करावी. तसेच शिक्षणासोबतच आपल्यातील कलागुणसुध्दा विकसीत करावे. यावेळी जिल्हाधिका-यांनी शाळेतील परस बागेची पाहणी केली तसेच शाळा, शालेय परिसर या सर्व बाबीविषयी समाधान व्यक्त केले.  (Chandrapur District Administration)

    या भेटीच्या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन्नाथ भाऊ दानव, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पेंदा, सहायक शिक्षक अमोल व-हाडे, जीवने मॅडम, चांदेकर मॅडम, डोंगरे मॅडम, सुरज उमाटे, दीपक कावटी व इतर मान्यवर उपस्थित होते.