Tag: Criminal Detention under MPDA

  • crime prevention under MPDA act । कायद्याला न जुमानणाऱ्या ‘तावाडे” ला रामनगर पोलिसांनी दाखविला MPDA चा हिसका

    crime prevention under MPDA act

    crime prevention under MPDA act : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी वृत्ती वाढत असताना पोलिसांनी MPDA कायद्याचे शस्त्र उगारत गुन्हेगारांना कारागृहात स्थानबद्ध करण्याची मोहीम राबवली आहे. आतापर्यंत ३ सराईत गुन्हेगारांना कारागृहात MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे.

    तावाडे वर अनेक गंभीर गुन्हे

    जिल्ह्यातील बल्लारपूर व रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गंभीर गुन्हे चोरी, जबरी चोरी, खून, खुनाचा प्रयत्न, विना परवाना हत्यार बाळगणारे, दुखापत करणारे, बलात्कार करणारे, जाळपोळ व जीवे मारण्याची धमकी सह अवैध धंदे असे १५ गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार २८ वर्षीय विनीत नानाजी तावाडे राहणार बापटनगर चंद्रपूर याला वर्षभराकरिता मध्यवर्ती कारागृह चंद्रपूर मध्ये २ ऑगस्ट रोजी स्थानबद्ध करण्यात आले. Vinit Tawade criminal history MPDA

    दहशत माजविणाऱ्या कुख्यात गुंडांवर MPDA कायद्यांतर्गत कारवाई

    १५ गुन्ह्यांची नोंद असलेल्या विनीत तावाडे यांच्या विरुद्ध sdpo सुधाकर यादव यांच्या नेतृत्वात रामनगर पोलीस निरीक्षक आसिफ रजा शेख यांनी प्रतिबंध व्हावा यासाठी कलम ३ (१), महाराष्ट्र झोपडपट्टी हातभट्टीवाले, औषधी विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ सुधारणा २००९, २०१५ MPDA act अनव्ये कारवाईचा अहवाल तयार करून पोलीस अधीक्षक कार्यालय मध्ये पाठविण्यात आला.

    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दस्तऐवजाची पडताळणी करून सपोनि योगेश खरसान यांनी स्थानबद्ध प्रस्ताव तयार करीत सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला, या प्रस्तावावर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ आदेश मंजूर करीत गुन्हेगार विनीत तावाडे ला जिल्हा कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला. police action against repeat criminals

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफ रजा शेख, अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि योगेश खारसान, पोउपनि सुरेंद्र उपरे, पोलीस कर्मचारी संजय देशवाले, अरुण खारकर, परवेज शेख, अनिल जमकात व महिला पोलीस मनीषा मोरे, ब्युलटी साखरे यांनी केली.

  • Criminal Detention under MPDA । चंद्रपूरमध्ये पोलिसांचा दणका! MPDA कायद्यान्वये गुन्हेगाराला तुरुंगात डांबले

    Criminal Detention under MPDA

    Chandrapur Crime News: Dangerous Criminal Arrested Under MPDA Act

    Criminal Detention under MPDA : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात खून, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे करून नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईअंतर्गत दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या २७ वर्षीय करीम फिरोज सय्यद याला महाराष्ट्र प्रतिबंधक गुन्हेगारी अधिनियम (MPDA) अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. Chandrapur Police Action

    ओबीसी समाजाच्या समस्येवर सरकारने लक्ष द्यावे – खासदार प्रतिभा धानोरकर

    गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे कठोर कारवाई

    करीम फिरोज सय्यद हा दुर्गापूर भागात सतत गंभीर गुन्हे करत होता आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांनी त्याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठविला. पुढे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून तो जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला.

    जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता व आरोपीचे स्थानबद्धीकरण

    जिल्हाधिकारी यांनी MPDA अंतर्गत प्रस्तावास मान्यता देऊन करीम फिरोज सय्यद याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. आदेशाची प्रत दुर्गापूर पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ आरोपीस ताब्यात घेतले व त्याला चंद्रपूर जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले. MPDA Act Maharashtra

    यशस्वी कारवाईत पोलिसांचा महत्त्वाचा सहभाग

    ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, दुर्गापूर पोलीस निरीक्षक लता वाडीवे, पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत, दुर्गापूर पोलीस ठाण्याचे अरुण खारकर आणि गुन्हे शोध पथकाने या ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे वर्ष २०२४ मध्ये व वर्ष २०२५ च्या सुरुवातीला दुर्गापूर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.

    MPDA कायद्याची अंमलबजावणी गुन्हेगारी नियंत्रणासाठी महत्त्वाची

    MPDA कायद्यांतर्गत आरोपीला काही काळासाठी स्थानबद्ध करता येते, ज्यामुळे तो समाजात पुन्हा गुन्हे करू शकत नाही. यामुळे पोलिसांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरोधात कठोर पावले उचलण्याची संधी मिळते आणि नागरिकांना सुरक्षिततेचा अनुभव येतो.

    चंद्रपूर पोलिसांची ही कारवाई जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. भविष्यात अशाच प्रकारे कठोर कारवाई करून पोलिसांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करावी, अशी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.