Tag: Cooler maintenance tips

  • Cooler maintenance tips | तापमानात वाढ, कुलर सुरू करताय तर ही बातमी वाचा

    Cooler maintenance tips

    Cooler maintenance tips : चंद्रपूर:- उन्हाळा लागताच अंगाची लाही लाही होऊन घामाच्या धारा वाहायला सुरू होते. थंड हवा मिळावी, यासाठी कुलर लावले जातात. उन्हाळ्यात केवळ चार महिने वापरला जाणारा कुलर आठ महिने अडगळीत ठेवलेला असतो. फेब्रुवारी महिना उजाडताच तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यातूनच कुलर बाहेर निघताना दिसत आहेत.
    कुलर थंड हवा देणारे यंत्र असले तरी ते इलेक्ट्रिकवर चालणारे आहे. त्याचा वापर करतांना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

    कुलर मध्ये पाण्याचा वापर केला जातो. यामुळे कधी शॉक बसेल, याचा नेम नसतो. हीच बाब लक्षात घेऊन अनेक जण दरवर्षी कुलर लावण्यापूर्वी दुरुस्तीची कामे करून घेतात. तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असली तरी अजूनही पहाटे व रात्री थंडी कायम आहे दिवसभर मात्र उकाळ्यामुळे घामाघुन होत आहे अडगळीत पडलेले घरातील कुलर काढणे सुरू केले.

    स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले


    कुलरला अर्थिंग द्या.

    थंड हवा मिळावी, यासाठी कुलर मध्ये पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे शॉक लागण्याची अधिक शक्यता असते. अशावेळी कुलरला अर्थिंग देणे आवश्यक आहे. तसेच कुलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याच्या घटना दरवर्षीच घडतात त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
    मोटार, वायरिंगची तपासणी का करावी? Prevent electric shock from cooler

    थंडी गायब होऊन ऊन तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्वेटर कपाटात गेले असून कुलर बाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे.
    कुलर दुरुस्तीची कामे अजून वाढलेली नाही तापमानात वाढ होताच नागरिक नवीन कुलर खरेदीसाठी किंवा गवत, जाडी, मोटार, आदि खरेदीसाठी गर्दी करतात.

    अडगळीत ठेवलेल्या कुलरची उंदरांकडून वायरिंग कुडतडली जाण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे कुलर सुरू करण्यापूर्वी मोटार व वायरिंग सुस्थितीत आहे किंवा नाही तपासने गरजेचे आहे. Air cooler wiring check

    उन्हाळा लागताच कुलर दुरुस्तीच्या कामांना वेग येतो. यात मोटार, जाडी, गवत बदलविण्याची कामे होतात या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.