Tag: Chandrapur wildlife conflict

  • wild bear rescue from home in sindewahi । डोंगरगावात घरात घुसले अस्वल; वनविभागाची बचाव मोहीम यशस्वी

    wild bear rescue from home in sindewahi

    wild bear rescue from home in sindewahi : सिंदेवाही १८ नोव्हेम्बर (News३४) : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या वन्यप्राण्यांचा हैदोस सुरु आहे, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आतपर्यंत एकूण ३९ नागरिकांचा बळी गेला आहे, वन्यप्राण्यांना जंगल कमी पडत असल्याने आता गाव व शहराची वाट हे प्राणी धरू लागले आहे, जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागाच्या सिंदेवाही वन परिक्षेत्रातील डोंगरगाव मध्ये १७ नोव्हेम्बर ला रात्रीच्या सुमारास अस्वल सुंदर जुमनाके यांच्या घरात शिरले, अनेक अथक परिश्रमानंतर वनविभागाने अस्वलाला सुखरूप बाहेर काढले.

    Read Also : शिक्षक पात्रता परीक्षा, चंद्रपुरातील संडे मार्केट राहणार बंद

    सदर अस्वल नर जातीचे असून ते रात्रीच्या सुमारास डोंगरगावातील आंब्याच्या झाडावर असलेले मधमाशांचे पोळ्यातील मध खाण्यासाठी गावात आला होता, पहाटे च्या सुमारास अस्वल गावात आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली, गावकर्यांनी अस्वलाचा शोध घेणे सुरु केले, त्यावेळी सुंदर जुमनाके यांनीही घराबाहेर पडत शोध घेतला असता सदर अस्वल त्यांच्या घरापुढे उभा होता, अस्वल थेट जुमनाके यांच्या घरात शिरला, घराचे दार बंद करीत जुमनाके यांनी याबाबत बिटगार्ड सचिन चौधरी यांना संपर्क करीत माहिती दिली. wild bear rescue from home in sindewahi

    घरातील सदस्य बाहेर असल्याने कसलीही अनुचित घटना घडली नाही, माहिती मिळाल्यावर सिंदेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायकर सह डॉ रविकांत खोब्रागडे, शुटर अजय खोब्रागडे व बचाव पथक डोंगरगावात दाखल झाले. १८ नोव्हेम्बर रोजी सकाळी ११ वाजता अस्वलाला डार्ट मारत बेशुद्ध करीत त्याला घराबाहेर काढण्यात आले. अस्वलाला चंद्रपूर टीटीसी उपचार केंद्रात नेण्यात आले.

    सदरची यशस्वी कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायकर, क्षेत्रीय सहायक नितीन गडपायले, यांच्या नेतृत्वात वनविभागातील पथक व गावातील नागरिकांनी बचाव कार्यात सहकार्य केले.

  • Tadoba Jeep Driver Killed । वडिलांसमोरच वाघाचा हल्ला; तरुण जीप चालकाचा दुर्दैवी मृत्यू

    Tadoba Jeep Driver Killed

    Tadoba Jeep Driver Killed : मोहर्ली २४ सप्टेंबर २०२५ : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या भामडेली गावात आज (२४ सप्टेंबर २०२५) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमोल बबन नन्नावरे (वय ३७, रा. भामडेली) असे मृताचे नाव असून, ते ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जीप चालक म्हणून काम करत होते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 33 नागरिकांचा बळी गेला असून यामध्ये वाघ 30, बिबट 2 तर हत्तीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

    नेमकी घटना कशी घडली?

    सकाळी अमोल नन्नावरे आपल्या शेतात औषध फवारणीसाठी लागणारा मोटर पंप आपल्या वडिलांना देण्यासाठी गेले होते. त्याचवेळी शिकारीच्या शोधात असलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. वाघाने अमोलला सुमारे ५० फूटपर्यंत फरफटत नेले. Tadoba Tiger Attack News

    गुराख्यावर वाघाचा हल्ला, गुराखी जखमी

    ही संपूर्ण घटना त्यांच्या वडिलांच्या डोळ्यासमोर घडली. वडिलांनी आरडाओरड केल्यावर वाघाने अमोलचा मृतदेह सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. अमोलच्या मानेवर गंभीर जखमा आढळल्या आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथे पाठवण्यात आला आहे.

    प्रशासनाची तत्परता

    घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस, वन परिक्षेत्र अधिकारी संतोष थीपे, क्षेत्र सहायक एस. जुमडे, बालपणे, वनरक्षक, पीआरटी टीम, वन मजूर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.

    ग्रामस्थांची मागणी

    अमोलच्या पश्चात पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वाघाला पकडून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांची आक्रमक मागणी; मृतकाच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची तातडीची मदत

    चंद्रपूर जिल्ह्यातील मोहर्ली वनपरिक्षेत्रातील सीतारामपेठ बिटात वाघाच्या हल्ल्यात अमोल बबन नन्नावरे (वय ३८, रा. भामडेळी) या तरुणाचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला असून, नन्नावरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. Tadoba Buffer Zone Death Case

    घटनेची माहिती मिळताच चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आक्रमक भूमिका घेतली. ज्या वाघाने अमोल नन्नावरे यांचा जीव घेतला, त्या नरभक्षक वाघाला तातडीने पकडून जेरबंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले, “शेतकरी बांधव आपल्या शेतात सुरक्षित नसतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जोपर्यंत या वाघाला पकडून जेरबंद केले जात नाही, तोपर्यंत नागरिकांचा जीव धोक्यात आहे. वन विभागाने तात्काळ विशेष मोहीम हाती घेऊन या वाघाला जेरबंद करण्याचे निर्देश मी दिले आहेत.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या निर्देशानुसार, मृत अमोल नन्नावरे यांच्या पत्नी प्रेमिला अमोल नन्नावरे यांना घटनास्थळीच तात्काळ रोख ५०,०००/- रुपयांची मदत देण्यात आली. तसेच, नन्नावरे कुटुंबियांना नियमानुसार पुढील शासकीय मदत लवकरात लवकर आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळावी, यासाठी प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे आदेशही त्यांनी दिले.

  • child attacked by tiger । सिंदेवाही तालुका हादरला! ७ वर्षीय मुलगा वाघाच्या तावडीत?

    child attacked by tiger

    child attacked by tiger : चंद्रपूर | 18 सप्टेंबर 2025 – सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी या छोट्याशा गावात आज गुरुवारी रात्री साडेसातव्या सुमारास हृदयद्रावक घटना घडली. गावातीलच दुसरीत शिकणाऱ्या प्रशिल बबन मानकर (वय ७) या चिमुकल्याला अंगणातून पट्टेदार वाघाने उचलून नेले. या घटनेमुळे गावात शोककळा व भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    शेतात काम करताना महिलेवर वाघाचा हल्ला, महिला ठार

    सिंदेवाही तालुक्यातील नवरगावपासून नऊ किलोमीटर अंतरावरील गडबोरी हे गाव जंगल व टेकडीला लागून वसलेले आहे. या परिसरात वन्यप्राण्यांचा धोका अनेक वर्षांपासून कायम आहे. नागरिक वन्यप्राण्यांच्या दशहतीत रात्रीचे जिवन जगत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. आज गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास प्रशिल घराच्या अंगणात निघाला असताना त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने संधी साधत त्याला उचलून नेले, असे काहींचे म्हणणे आहे. तर दुसऱ्या माहितीनुसार, प्रशिल चे वडील बबन मानकर गावात जेवण करून आपल्या दोन्ही मुलांना हातात घेऊन घरी परतत असताना रस्त्यालगत दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घालून शुभमला उचलून नेले. या दोन भिन्न माहितीमुळे घटनेचा नेमका प्रकार स्पष्ट झालेला नाही. Chandrapur forest department news

    यापूर्वी सुद्धा घडल्या घटना

    गडबोरी गावाच्या इतिहासात अशा स्वरूपाच्या घटना नवीन नाहीत. पाच-सहा वर्षांपूर्वीही अशाच दोन ते तीन घटना येथे घडल्या होत्या. पुन्हा एकदा अशा प्रकारची घटना घडल्याने गावात भीती व संतापाचे वातावरण आहे. नागरिक आपल्या मुलांना घराबाहेर काढण्यास घाबरत आहेत. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने गडबोरीत दाखल झाले आहे. जंगल व टेकडी परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र वृत्तलेखनापर्यंत प्रशिलचा शोध लागलेला नव्हता.

    तो हिंस्त्र प्राणी कोणता हे अद्याप निश्चित नाही – मुख्य वनसंरक्षक रामानुजम

    मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांनी माहिती दिली की, प्रशिल नामक मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी परिसरातील भागात शोध मोहीम सुरू केली आहे. कोणत्या हिंस्र प्राण्याने मुलाला उचलून नेले आहे की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, मुलाचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू असल्याचे मुख्य वनसंरक्षक रामानुजम यांनी सांगितले. tiger encounters Chandrapur


    प्रशिल हा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दुसरीत शिकत होता. मानकर यांना दोन मुले आहेत, त्यापैकी एक मुलगा अशा प्रकारे वाघाच्या तावडीत गेल्याने मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांनी तातडीने वन्यप्राणी नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. १८ सप्टेंबर रोजी वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या २ घटना जिल्ह्यात उघडकीस आल्या आहे.

  • Chandrapur wildlife conflict । ब्रम्हपुरीत वाघाचा हल्ला : गुराख्याचा जागीच मृत्यू, गावात भीतीचे वातावरण

    Chandrapur wildlife conflict

    Chandrapur wildlife conflict : ब्रम्हपुरी १७ सप्टेंबर : उत्तर ब्रम्हपुरी वनपरीक्षेत्रातील उपक्षेत्र ब्रम्हपुरी, नियतक्षेत्र सायगाटा भागात मंगळवारी (दि. १६ सप्टेंबर) सायंकाळी सुमारे ४.३० वाजता वाघाच्या हल्ल्यात एक गुराखी ठार झाला.

    पोलीस निरीक्षकापायी कर्मचारी त्रस्त

    अब तक ३०

    मृत व्यक्तीचे नाव सुनील ऊर्फ प्रमोद बाळकृष्ण राऊत (वय ३२, रा. लाखापूर) असे आहे. ते नेहमीप्रमाणे लाखापूरच्या जंगलात गुरे चारण्यासाठी गेले होते. गुरे चारून परत येत असताना, झुडपामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात सुनील राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत एकूण ३० नागरिकांचा मृत्यू झाला असून यामध्ये २८ वाघाच्या, १ हत्ती तर १ अस्वलाच्या हल्ल्यात ठार झाले आहे.

    घटनेनंतर लाखापूर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे. वनविभाग व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

  • Human-bear conflict in Chandrapur । अस्वलाच्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू, २५ लाख भरपाई व मुलाला वनविभागात नोकरी द्या

    Human-bear conflict in Chandrapur

    Human-bear conflict in Chandrapur : चंद्रपूर (२५ ऑगस्ट २०२५) – चंद्रपुरातील जुनोना गावात २३ ऑगस्ट रोजी जंगलात पाने तोडण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्रावर अस्वलीने हल्ला केला होता, या हल्ल्यात वडील अरुण कुकसे व मुलगा विजय कुकसे गंभीर जखमी झाले होते. अरुण कुकसे यांना नागपुरातील एम्स मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र २५ ऑगस्ट रोजी अरुण कुकसे यांचा मृत्यू झाला.

    अस्वलाच्या पंज्यात अडकले पिता-पुत्र, बघा हल्ल्याचा व्हिडीओ

    २३ ऑगस्ट रोजी अरुण व विजय कुकसे पिता-पुत्र जुनोना जंगलात पाने तोडण्यासाठी गेले असता अरुण कुकसे वर अस्वलीने हल्ला केला, वडिलाला वाचविण्यासाठी विजय ने अस्वलीचा सामना केला मात्र अस्वलीने दोघांना पंज्यात पकडत जखमी केले, यावेळी दोघांनी आरडाओरडा केला असता गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेत, अस्वलीला हाकलण्यास सुरुवात केली मात्र अस्वलीने दोघांना सोडले नाही. wildlife incident Junona forest

    उपचारादरम्यान मृत्यू

    गावकर्यांनी हातात दंडुके घेत अस्वलीला हाकलण्याचा प्रयत्न केला, तासभरानंतर अस्वलीने दोघांना सोडले, यावेळी अरुण कुकसे हे गंभीर जखमी झाले होते, गावकर्यांनी दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले, वडील अरुण हे गंभीर जखमी असल्या कारणाने त्यांना तात्काळ नागपुरातील एम्स मध्ये दाखल करण्यात आले. आज २५ ऑगस्ट रोजी सकाळी अरुण कुकसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या मुलगा विजय रुग्णालयात उपचार घेत आहे.

    अस्वलाच्या हल्ल्यांनंतर वनविभागाने कसोशीने प्रयत्न करीत अस्वलाला जेरबंद केले होते, मात्र अस्वल गंभीर जखमी असल्याने २४ ऑगस्ट रोजी अस्वलाचा मृत्यू झाला. जुनोना गावातील नागरिकांनी मागणी केली आहे कि मृतक अरुण कुकसे यांच्या परिवाराला २५ लाख रुपये आर्थिक भरपाई तर मुलगा विजय ला वनविभागात नोकरी द्यावी अशी मागणी केली केली आहे.