Chandrapur Warora Earthquake Update
Chandrapur Warora Earthquake Update : चंद्रपूर: २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून १९ मिनिटांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मार्डा आणि एकोना परिसरात ३.२ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाल्याची माहिती ‘सेसमिक स्टडी ऑफ इंडिया’ या भूकंप ॲपवर दिसली. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तातडीने केलेल्या चौकशीत स्थानिक प्रशासनाने भूकंपाची शक्यता फेटाळून लावली आहे.
चंद्रपूरच्या रस्त्यावर युवकाची दहशत, हातात तलवार घेत नागरिकांना धमकविण्याचा प्रयत्न
प्रशासनाने केली सत्यता पडताळणी
आपत्ती व्यवस्थापन, चंद्रपूरने दिलेल्या माहितीनुसार, भूकंप ॲपवर नोंद झाल्यानंतर लगेचच वरोरा परिसरातील ग्रामस्थ, पोलिस पाटील, तलाठी आणि वेकोली खदान व्यवस्थापनाशी संपर्क साधून खात्री करण्यात आली. या सर्व तपासणीत कोणालाही भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे समोर आले. तसेच, कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची नोंद झालेली नाही.
भूकंपाची नोंद खरी, पण धक्के नाहीत?
ज्या वेळी भूकंप ॲपवर ही नोंद झाली, त्याच वेळी मार्डा आणि एकोना गावातील लोकांनी कोणतेही भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे सांगितले. यामुळे, जरी ॲपवर भूकंपाची नोंद झाली असली, तरी जमिनीवर त्याचे कोणतेही प्रत्यक्ष परिणाम जाणवले नाहीत. या घटनेमुळे नागरिकांनी घाबरून न जाता, प्रशासनाकडून अधिकृत माहितीची वाट पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.