Tag: Chandrapur shooting incident

  • Chandrapur shooting incident | चंद्रपूर पुन्हा हादरले : कांग्रेस शहर अध्यक्षाच्या घरावर गोळीबार

    Chandrapur shooting incident

    Chandrapur shooting incident : चंद्रपूर/ घुग्घुस : शहरात गुन्हेगारीचे सत्र वाढत असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रविवारी (दि. ९) रात्री ८ वाजताच्या सुमारास काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीने पिस्तूलने गोळीबार केला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Chandrapur crime news

    गोळीबार आणि पोलिसांचा तपास

    घुग्घुस येथील तुकडोजी महाराज वॉर्डात राजू रेड्डी यांचे घर आहे. ते आपल्या मोठ्या मुलासोबत राहतात. रविवारी रात्री घरी असतानाच अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरावर गोळी झाडली, जी वरच्या माळ्यावर लागली. विशेष म्हणजे, हा माळा त्यांनी किरायाने दिला आहे. गोळीबाराच्या आवाजाने रेड्डी यांनी घराबाहेर येऊन पाहिले, मात्र हल्लेखोर पसार झाले होते. Chandrapur criminal activities

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. फायरिंग झालेली एक गोळी पोलिसांना मिळाली आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.

    चंद्रपुरात पोलिसाची हत्या

    चंद्रपुरात गुन्हेगारांची दहशत! कायदा धोक्यात?

    गेल्या काही दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, या घटनेच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी चंद्रपुरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला, ज्यामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला होता. पोलीस यंत्रणेवर हल्ले होणे आणि आता काँग्रेस नेत्याच्या घरावर थेट गोळीबार होणे, या घटना गुन्हेगार आता पोलिसांनाही जुमानत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करतात.

    चंद्रपूर शहर आणि परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी कठोर पावले उचलून गुन्हेगारांना तातडीने गजाआड करावे, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.