Tag: chandrapur pollution

  • Chlorine Gas Leak | रहमत नगरमध्ये क्लोरीन वायू गळती: महिन्यानंतरही प्रशासन झोपेत!

    Chlorine Gas Leak

    Chlorine Gas Leak : चंद्रपूर 16 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा): येथील रहमत नगर परिसरातील रहिवाशांसाठी एक मोठी आणि गंभीर समस्या समोर आली आहे. CSTPS च्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून (Sewage Treatment Plant – STP) झालेल्या क्लोरीन वायू गळतीमुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घटनेला महिना उलटूनही दोषींवर कारवाई झाली नसल्याने, स्थानिकांनी आणि AIMIM पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. Rahmat Nagar Accident

    Also Read : चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    काय आहे नेमके प्रकरण?

    • गंभीर घटना: दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी रहमत नगर परिसरात एसटीपीमधून क्लोरीन वायूची गळती सुरू झाली.
    • परिणाम: या विषारी वायूमुळे एका लहान मुलासह अनेक रहिवासी गंभीररित्या आजारी पडले. आजही काही लोकांची प्रकृती चिंताजनक आहे.
    • आश्वासन फोल: घटनेनंतर १८ सप्टेंबर २०२५ रोजी AIMIM चे जिल्हाध्यक्ष अमान अहमद यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

    प्रशासन ‘गाढ झोपेत’ असल्याचा आरोप

    आश्वासन देऊनही महिना उलटून गेला तरी कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे १५ ऑक्टोबर २०२५ रोजी AIMIM पक्षाचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले. Government Negligence

    • जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारल्यामुळे त्यांना निवासी उप-जिल्हाधिकारी (RDC) यांच्याकडे पाठवण्यात आले.
    • RDC यांनीही या संवेदनशील विषयावर चर्चा करणे टाळले आणि “आम्ही पाहू” असे मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेली, असा आरोप AIMIM ने केला आहे.

    AIMIM चा इशारा:

    या संपूर्ण प्रकरणावरून ‘रहमत नगरच्या रहिवाशांवर कुणी दयामाया दाखवत नाही’ आणि ‘शासन-प्रशासन गाढ झोपेत आहे’ असे स्पष्टपणे दिसून येते.

    AIMIM चे जिल्हाध्यक्ष अमान अहमद यांनी तीव्र संताप व्यक्त करत म्हटले की, “ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या जीवाशी खेळ केला गेला आहे आणि अधिकाऱ्यांनी जो मजाक उडवला आहे, तो आम्ही सहन करणार नाही. दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील. तसेच, हा एसटीपी प्रकल्प रहमत नगरमधून कायमस्वरूपी हटवला जावा, यासाठी आम्ही मोठे आंदोलन उभारू.”

    या घटनेमुळे रहमत नगरमधील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण असून, ते न्याय आणि सुरक्षिततेच्या प्रतीक्षेत आहेत.

  • chandrapur pollution : प्रदूषण पसरविणारे ते 2 संच, 7 दिवसाच्या आत उपाययोजना करा

    chandrapur pollution

    Chandrapur pollution : चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील आठ आणि नऊ क्रमांकाचे संच प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. ही गंभीर बाब असून, चंद्रपूरमधील प्रदूषण नियंत्रणासाठी केले जात असलेल्या प्रयत्नांमध्ये या संचांमुळे अडथळा येत आहे.

    सात दिवसांच्या आत यावर उपाययोजना करा, अशा स्पष्ट सूचना भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी महाजेनको आणि सीएसटीपीएसच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. Kishor jorgewar

    मणिपूर घटनेवर पंतप्रधान मोदी गप्प का? खासदार धानोरकर

       आज मुंबई येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी या विषयावर बैठक आयोजित केली होती. या बैठकीला महाजेनकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महाजेनकोचे संचालक (ऑपरेशन्स) संजय मरुडकर, कार्यकारी संचालक नितीन वाघ, आयटी विभागाचे  कार्यकारी संचालक नितीन चंदूरकर, कार्यकारी संचालक  राजेश पाटील, यांची उपस्थिती होती. तर या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा आणि सीएसटीपीएस चे मुख्य अभियंता कुमरवार यांची व्ही.सी च्या माध्यमातून बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीत त्यांनी सदर सूचना केल्या.

    अपार आयडी म्हणजे काय?

      चंद्रपूरसारख्या औद्योगिक शहरात प्रदूषण नियंत्रणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, महाऔष्णिक केंद्रातील काही संच आणि काही उद्योग प्रदूषण वाढवत असून त्यामुळे स्थानिक रहिवाशांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.

    महाऔष्णिक केंद्रातील आठ आणि नऊ क्रमांकाचे संच हवेत धूर, राख, आणि इतर घातक कण सोडत असल्याने परिसरातील हवामानाचा दर्जा खालावत आहे.

      या गंभीर परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करत आमदार जोरगेवार यांनी अधिकार्‍यांना सात दिवसांत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

    सदर संचांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा अभ्यास करा आणि यावर त्वरित कृती आराखडा तयार करून शासनाला अहवाल सादर करा असेही यावेळी आ. जोरगेवार त्यांनी सांगितले.

      बैठकीत बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. जंगलाच्या सान्निध्यात असूनही चंद्रपूरमधील वाढते प्रदूषण चिंताजनक आहे. त्यामुळे प्रदूषणाचा अचूक अभ्यास करून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाव्यात. लोकप्रतिनिधी म्हणून आपण यासाठी संबंधित विभागांशी सातत्याने पाठपुरावा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. Chandrapur news

     चंद्रपूर येथील विद्युत महाऔष्णिक केंद्र हे विद्युत निर्मितीचे मोठे केंद्र आहे. मात्र, थर्मल एनर्जी तयार करताना पर्यावरणीय प्रभाव कमी ठेवण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

    या संदर्भात नियमीत पाण्याचा फवारा मारणे, राखेचे योग्य व्यवस्थापन करणे, आणि इतर पर्यावरणीय उपाययोजना राबवणे आवश्यक असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले.  या बैठकीला महाजेनको आणि सीएसटीपीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.