Tag: Chandrapur politics

  • youth joining congress party । “शंतनू धोटेंच्या नेतृत्वावर विश्वास; चंद्रपूरातील कर्तृत्ववान युवकांचा युवक काँग्रेसमध्ये प्रवेश!”

    youth joining congress party

    “राजकीय अस्थैर्य, बेरोजगारी आणि वाढत्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर युवकांनी निवडली युवक काँग्रेसची वाट”

    youth joining congress party : चंद्रपूर :– चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू अजय धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत चंद्रपूर जिल्ह्य़ातील विविध गावातील अनेक कर्तृत्ववान युवकांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

    चंद्रपूर जिल्ह्यात दारू दुकानाच्या परवाना वाटपात मोठा भ्रष्टाचार

    यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे व युवक कॉंग्रेस चे माजी सचिव राजीव खजांजी यांनी सर्वांना युवक काँग्रेसचे दुपट्टे देऊन सर्वांचे स्वागत केले. तसेच येणाऱ्या काळात विविध पक्षातील अनेक तरुण कार्यकर्ते हे युवक काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन काम करण्यास इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी यावेळी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे माजी सचिव राजीव खाजांजी, यु. काँ. महासचिव हर्षल येलमुले यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. Shantanu Dhote youth congress


    वाढती बेरोजगारी, महागाई तसेच सध्यास्थितीत वाढता जातीयवाद, अराजकता याला कंटाळून युवक काँग्रेसच्या मानवतावादी विचारधारेवर विश्वास व्यक्त करीत चंद्रपूर जिल्हातील विविध गावातील वेदांत प्रदीप देठे, आयुष बंडू सोनटक्के, श्रीनाथ लेटावार, चैतन्य पांडे, अमोल अड्बाले, तेजस देवगडे, नवीन एगुले, समशेर शाह, जय पेटला, शरद येड्लावार, जतीन पळ, क्रिष्णा तवारी, मोहम्मद अल्तमास शाह, पियुष गुडे, भारत कांबटकर, युगल मडावी, सिद्धार्थ कोंडागुरला यासह अनेक युवकांनी युवक काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.

  • राष्ट्रवादीच्या चंद्रपूर शहर अध्यक्षपदी दीपक जयस्वाल

    News34 politics chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष तथा माजी शहर अध्यक्ष दीपक शंकरलाल जयस्वाल यांची तर चंद्रपूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष पदावर सुधाकर पांडुरंग कातकर यांची नियुक्ती प्रांताध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिलबाबु देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले.

     

    शहर अध्यक्षांनी अजितदादा गटात प्रवेश केल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर नव्या नियुक्ती करण्यासंदर्भात प्रांताध्यक्ष मा.आ.श्री.जयंत पाटील,पक्षाचे ज्येष्ठ नेते आ.अनिलबाबु देशमुख,चंद्रपूर शहराचे पक्ष निरीक्षक श्री.शेखर सावरबांधे यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचेशी सविस्तर चर्चा करून वरील नावांची घोषणा केली.

    नागपुरात संपन्न झालेल्या नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमाला चंद्रपूर शहराचे पक्ष निरीक्षक शेखर सावरबांधे,चंद्रपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महीला अध्यक्षा सौ.बेबीताई उईके,युवक जिल्हाध्यक्ष राकेश सोमाणी, प्रदेश सरचिटणीस मुनाज शेख, नागपूर शहर अध्यक्ष श्री.दुनेश्र्वर पेठे,नगरसेविका सौ.मंगला आखरे, माजी नगरसेवक विनोद लभाने,माजी नगरसेवक राजेंद्र आखरे, राजेंद्र काबरा,बादल उराडे, रवींद्र वाळके, सौ.शुभांगी साठे,सौ.अनिता मावलिकर, सौ.पूजा शेरकी, हरिनाथ यादव,बंडू नगराळे,दशरथ मिट्ठावार,पुष्पा निमगडे, उमा दुर्गे,पुष्पा काटरे,कुरुदुल्ला लिंगय्या,मारोती झाडे,उपस्थित होते.