Tag: Chandrapur police news

  • Illegal cattle transport Maharashtra । गोवंश तस्करीवर चंद्रपूर पोलिसांचा चाप – लाखोंचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत

    Illegal cattle transport Maharashtra

    Illegal cattle transport Maharashtra : चंद्रपूर ११ ऑक्टोबर २०२५ – (NEWS ३४ वृत्तसेवा) – तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेत असलेल्या गोवंश जनावराची चंद्रपूर पोलिसांनी सुटका करीत ३ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत १८ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत २५ गोवंश जनावरांची प्यार फाउंडेशन कडे रवानगी करण्यात आली.

    Also Read : खड्डेमुक्त चंद्रपूर साठी खासदार धानोरकरांची भन्नाट कल्पना

    ११ ऑक्टोबर रोजी उमरी पोतदार पोलिसांना पहाटेच्या सुमारास गोवंश जनावरांच्या तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळाली, माहिती प्राप्त होताच पोलिसांनी मौज डोंगर हळदी मार्गावर सापळा रचत नाकेबंदी केली, यावेळी २ पिकअप वाहनांना थांबविता झडती घेतली असता त्यामध्ये २५ गोवंश जनावरे कत्तलीकरिता नेत असल्याचे आढळले. Chandrapur police news

    ३ आरोपींवर गुन्हे दाखल

    यावेळी जनावरांना कोंबून क्रूरपणे नेण्यात येत होते, पोलिसांनी आरोपी २८ वर्षीय मंगेश शामराव चौधरी राहणार लक्कडकोट, २७ वर्षीय राजेश गजानन घोगरे राहणार बेंबाळ, २४ वर्षीय मोहम्मद अजीज अली राहणार वाकडी यांच्याविरुद्ध कलम ११ (१), (घ), (ड), (च), (ज) भारतात प्राण्यांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, सहकलम ५ (अ), ९, ११ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, कलम ३२५, ३ (५), ९ भारतीय न्याय संहिता अन्व्ये गुन्हा दाखल करीत गुन्ह्यात वापरलेले वाहन क्रमांक TS२०-T-४९६७ व MH३४-BZ_८४२५, २५ गोवंश जनावर सह ४ नग मोबाईल असा एकूण १८ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपविभागीय अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात उमरी पोतदार चे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी सुभाष राऊत, सतीश झाडे, विनोद चौधरी, राहुल शंखावार, सूरज बुजाडे, दिनेश देवाडे व गोपाल घुमडेवाड यांनी केली.

  • local crime branch seizes brown sugar heroin । नशेचा डाव उधळला! चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    local crime branch seizes brown sugar heroin

    local crime branch seizes brown sugar heroin : चंद्रपूर – उडता चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेने गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठी कारवाई करीत तब्बल २९८ ग्राम ब्राऊनशुगर/हेरॉईन जप्त करीत २ आरोपीसह तब्बल ३० लाख १९ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष बाब म्हणजे अनंतचतुर्दशी ला पोलीस यंत्रणा हि विसर्जनाच्या कामात व्यस्त असते आणि त्यादिवशी नशेचा व्यापार करणाऱ्या आरोपींनी ब्राऊनशुगर आणण्याचा डाव साधला मात्र स्थानिक गुन्हे शाखेने त्यांचा डाव हाणून पाडला.

    चंद्रपुरात पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली

    ६ सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहरात गणेश विसर्जनाचा भव्य मिरवणुकीचा सोहळा सुरु होता, अश्यातच मोठ्या प्रमाणात शहरात मादक पदार्थ येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने नागपूर-चंद्रपूर रोडवरील पडोली चौकात सापळा रचला. काही वेळात चारचाकी वाहन क्रमांक MH३४ BR ७७६५ ला पोलीस पथकाने थांबवित वाहनांची झडती घेतली, सदर वाहनात पोलिसांना २९८ ग्राम ब्राऊनशुगर/हेरॉईन आढळली.

    नशेच्या तस्करीत पोलिसांनी आणलं विघ्न, मोठी कारवाई

    आढळलेल्या ब्राऊन शुगरची आरोपी अवैधरित्या विक्री करणार होते, सदर मादक पदार्थ हे मुंबई वरून आणला असल्याची माहिती आहे. गणेश विसर्जन सोहळ्यात पोलीस आपलं कर्तव्य बजावीत असताना आरोपी ४२ वर्षीय नितीन उर्फ छोटू शंकर गोवर्धन राहणार महात्मा फुले वॉर्ड बाबुपेठ व २३ वर्षीय साहिल सतीश लांबदूरवार राहणार भिवापूर वॉर्ड यांचा हा डाव पोलिसांनी हाणून पाडला हे विशेष. आरोपींने मादक पदार्थ ज्या व्यक्तीकडून आणले त्यावर सुद्धा कारवाई होणार असून सदर प्रकरणी आरोपींची संख्या वाढणार याबाबत पुढील तपास सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली. Ganesh festival drug operation bust 298 grams brown sugar

    मादक पदार्थाची तस्करी करण्याकरिता वापरलेले वाहन, ब्राऊनशुगर, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण ३० लाख १९ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला. आरोपीवर गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे. brown sugar heroin trafficking busted in Chandrapur

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शनन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पडोली पोलीस स्टेशनचे सपोनि योगेश हिवसे, सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी धनराज करकाडे, स्वामी चालेकर, नितीन रायपुरे, संतोष येलपुलवार, चेतन गज्जलवार, गणेश मोहुर्ले, गणेश भोयर, जयसिंग, सुरेंद्र महतो, सचिन गुरनुले, दीपक डोंगरे, विजयमाला वाघमारे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, मिलिंद जांभुळे, सुमित बरडे, अजित शेंडे, प्रफुल गारघाटे, प्रमोद डंभारे, मुलींत टेकाम व सायबर पोलिसांनी केली.

  • Bhaigiri in Chandrapur । गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला युवकाने माजवली दहशत, चंद्रपूर शहर पोलिसांची तात्काळ कारवाई

    Bhaigiri in Chandrapur

    Bhaigiri in Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपुरातील युवकांना भाईगिरीचे वेड लागले असून याचे अनेक उदाहरणे आपल्याला रस्त्यालगत नेहमीच दिसत असतात, दारू पिऊन कुठेही रस्त्यावर हातात शस्त्र घेऊन दहशत माजविणे हि बाब आता सामान्य झाली आहे, चंद्रपूर शहरात सुद्धा असाच एक प्रकार समोर आला. चंद्रपुरातील चौपाटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामाला तलाव जवळ एक युवक आपल्या हातात धारदार शस्त्र घेऊन लोकांना धमकावीत होता, काही वेळात शहर पोलिसांनी त्या युवकाच्या मुसक्या आवळल्या.

    चंद्रपूर जिल्ह्यात ५४० इसमांवर हद्दपारीची कारवाई

    गणेश उत्सव शांततेत पार पाडावा यासाठी शहर पोलीस प्रयत्न करीत आहे, यासाठी शहरातील शांतता भंग करणारे ५४० गुन्हेगारी वृत्ती असलेल्या इसमांना आधीच पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे, तरी सुद्धा गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पूर्व संध्येला शहरात धारदार शस्त्र घेऊन नागरिकांना एक युवक धमकावीत असल्याचा प्रकार घडला.

    धारदार चाकू जप्त

    चंद्रपूर शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे रामाला तलाव जवळ त्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले, त्या युवकाच्या ताब्यातील चारचाकी वाहन क्रमांक एमएच३४ AA ६२९१ व वाहनात वाहन चालकाच्या सीटच्या खाली एक धारदार चाकू पोलिसाना मिळाला, सदर चाकू त्या आरोपी इसमाचा आहे असे स्वतः त्याने कबूल केले असे त्याने कबुली दिली. Chandrapur law and order

    आरोपीचे नाव २९ वर्षीय साहिल विश्वजितकुमार सिंग राहणार लालपेठ कॉलरी क्रमांक ३ असे असून त्याच्यावर शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम ४,२५ भारतीय शस्त्र अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत शहर पोलिसांनी ५ लाख १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, भावना रामटेके, सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, निकेश ढोंगे, जावेद सिद्दीकी, कपूरचंदं खरवार, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, रुपेश पराते. सारिका गौरकार व दीपिका झिंगरे यांनी केली.