Tag: Chandrapur police action news

  • mephedrone trafficking Mumbai to Chandrapur । मुंबईवरून चंद्रपूरला आली ‘MD पावडर’ची खेप; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    mephedrone trafficking Mumbai to Chandrapur

    mephedrone trafficking Mumbai to Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थविरोधात वर्षातील सर्वात मोठी कारवाई करीत तब्बल ५२८ ग्रॅम मेफेड्रोन MD पावडर किंमत २६ लाख ४० हजार रुपयांचा माल जप्त केला, विशेष म्हणजे सदर MD मुंबई वरून चंद्रपुरात पोहोचली होती. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

    Also Read : सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू

    ५ ऑक्टोबर रोजी चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन पावडर येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग वरील साखरवाही फाट्याजवळ सापळा रचला, यावेळी कार क्रमांक MH १० EQ ०४२१ ला थांबवित पोलिसांनी वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये प्लॅस्टिक च्या प्रेसलॉक पन्नी मध्ये ५२८ ग्राम MD पावडर मिळून आले. यावेळी पोलिसांनी वाहन व MD सह एकूण ३५ लाख ७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. NDPS Act Chandrapur police

    ३७ वर्षीय वसीम इमदाद खान राहणार बैगणवाडी रिक्षा स्टॅन्डजवळ, साईबाबा मंदिर, गोवंडी मुंबई याला अटक करण्यात आली. आरोपीवर मादक पदार्थ विरोधी कायद्यांवये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

    वर्षातील या मोठ्या कारवाईची पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी माहिती दिली कि चंद्रपूर जिल्हा हा नशामुक्त करण्याची मोहीम पोलीस विभागाने हाती घेतली आहे, आपल्या जवळपास कुणी अंमली पदार्थाची विक्री करीत असेल तर नागरिकांनी पोलीस विभागाला माहिती द्यावी. MD कारवाईत इमदाद खान हा आरोपी मुंबईवरून चारचाकी वाहन भाड्याने घेऊन आला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात हे पावडर कुणी बोलाविले? हा माल कुणाला विकल्या जाणार होता? याबाबत पोलीस पुढील तपास करणार असून भविष्यात अंमली पदार्थविरोधी कारवाया सतत होणार असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले. Maharashtra drug seizure latest news

    या क्रमांकावर करा तक्रार

    अंमली पदार्थ बाबत कुणालाही माहिती मिळाल्यास तात्काळ ११२ किंवा ७८८७८९०१०० वर तात्काळ संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवल्या जाणार.

    वर्ष २०२५ मध्ये चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाची कारवाई

    यावर्षी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने आतापर्यंत NDPS अधिनियम अंतर्गत १५७ गुन्हे दाखल करीत १९२ आरोपीवर कारवाई करण्यात आली असून आरोपीकडून ८० लाख ५९ हजार ७७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या २६ गुन्हे दाखल करीत ५५.२४ किलो गांजा जप्त करीत ४० आरोपींवर कारवाई करीत ६ लाख ६२ हजार १६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. mephedrone trafficking Mumbai to Chandrapur

    MD पावडर बाळगणाऱ्या ३१ आरोपींवर कारवाई करीत १४ गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपीजवळून ७२२.६१४ ग्रॅम MD पावडर सह ४३ लाख ७८ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ब्राऊन शुगर बाळगणाऱ्या आरोपींवर १ गुन्हा दाखल करीत २९८ ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करीत २ आरोपींवर कारवाई करीत तब्बल ३० लाख १९ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या १८६ आरोपींवर कारवाई करीत १५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुनील गोहोकार, इम्रान खान, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, हिरालाल गुप्ता, शशांक बदामवार, किशोर वाकाटे, विजयमाला वाघमारे व प्रमोद डंभारे सह सायबर पोलीस स्टेशन यांनी केली.

  • Ganesh immersion laser light violation । 🚨 गणेश विसर्जनात लेझर लाईटचा वापर! पोलिसांच्या आदेशाकडे डीजे चालकांचे सपशेल दुर्लक्ष

    Ganesh immersion laser light violation

    Ganesh immersion laser light violation : चंद्रपूर – ६ सप्टेंबर २०२६ – चंद्रपुर जिल्ह्यात वेगवेगळ्या तारखेला गणेश मूर्ती विसर्जन वेगवेगळ्या तारखेला आयोजन करण्यात आले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी होतात मात्र यावेळी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना बसला आहे. मुख्य मार्गावर स्ट्रीट व हायमास्ट लाईट बंद आहे. आणि विशेष बाब म्हणजे २१ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षकांनी लेझर लाईट वापरावर प्रतिबंध असल्याचा आदेश निर्गमित केला होता, त्या आदेशाला डीजे चालकांनी केराची टोपली दाखवली आहे.

    गणेश विसर्जनाच्या पूर्व संध्येला चंद्रपुरात युवकाची भाईगिरी, चाकू काढत नागरिकांना धमकी

    मानवी जीविताला धोका, आरोग्य, सुरक्षितता व गोंधळ सह भांडणे निर्माण करीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने मिरवणुकीत लेझ लाईट वापरास प्रतिबंध केला असा आदेश सुद्धा निर्गमित करण्यात आला होता. मात्र गणेश उत्सवाच्या धामधुमीत डीजे चालकांनी पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर केलाच. Violation of Chandrapur police order

    चंद्रपूर शहरातील ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेक डीजे चालकांनी लेझर लाईटचा वापर केल्याचे दिसून येत आहे, यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

    लेझर लाईटचे दुष्परिणाम काय?

    लेझर लाईटमुळे अंधत्व येणे, डोळे निकामी होणे, आरोग्याला धोका आणि गोंधळाची स्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्वये 27 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2025 या कालावधीत आयोजित मिरवणुकीमध्ये लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे पोलिस अधिक्षकांच्या आदेशात नमुद आहे.