Tag: Chandrapur municipal corporation election 2025

  • BJP ticket demand for civic polls chandrapur । चंद्रपूर महानगर निवडणुकीचा जलवा; BJP तिकिटासाठी उमेदवारांची रांग वाढली

    BJP ticket demand for civic polls chandrapur

    BJP ticket demand for civic polls chandrapur : चंद्रपूर १६ नोव्हेम्बर (News३४) – आगामी चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुकांसंदर्भात इच्छुक उमेदवारांनी निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात आज (रविवार) पासून आवेदनपत्रे दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तब्बल १४२ उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत आपली आवेदनपत्रे दाखल केली.

    Read Also : बल्लारपुरात नूतन दिवाणी न्यायालयाचे भूमिपूजन

    चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले असून, आजवर प्रभागांमध्ये सातत्याने जनसंपर्क ठेवत नगरसेवक होण्याची तयारी दर्शविणारे अनेक इच्छुक आता पक्षाचा पाठिंबा मिळविण्यासाठी सक्रिय झाले आहेत. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे इच्छुकांची अधिक पसंती दिसून येत आहे.

    चंद्रपूर महानगर निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आजपासून निशुल्क आवेदनपत्र स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली असून, २१ नोव्हेंबरपर्यंत आवेदनपत्रे स्वीकारली जाणार आहेत. पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी कार्यालयात गर्दी केली होती. आज रविवारी १४२ इच्छुक उमेदवारांनी आवेदन पत्र दाखल करत भारतीय जनता पक्षाच्या टिकिटावर निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

  • Chandrapur municipal ward reservation list । 🏛️ चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीची घोषणा — जाणून घ्या कोणत्या प्रभागात कोणासाठी राखीव जागा!

    Chandrapur municipal ward reservation list

    Chandrapur municipal ward reservation list : चंद्रपूर ११ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभागांची आरक्षण सोडत आज प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात घोषित करण्यात आली. १७ प्रभागातील ६६ जागेपैकी ३३ जागा महिलासाठी राखीव आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी १३ जागा, अनुसूचित जनजातीसाठी ५ जागा, ओबीसी साठी १७ जागा तर सर्वसाधारण गटातून ३१ जागा राखीव असून यामध्ये महिलांना १४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे.

    Also Readतिघांचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघाला वनविभागाने केले जेरबंद

    प्रभागनिहाय आरक्षणाची माहिती

    • प्रभाग क्रमांक १ दे.गो. तुकूम (ST – महिला, OBC- पुरुष, सर्वसाधारण -महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक २ शास्त्रीनगर (SC – पुरुष, OBC – महिला, सर्वसाधारण – महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ३ एम.ई.एल (SC – पुरुष, ST – पुरुष, OBC – महिला, सर्वसाधारण महिला)
    • प्रभाग क्रमांक ४ बंगाली कॅम्प (SC महिला, OBC पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ५ विवेक नगर (SC पुरुष, OBC महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ६ इंड्रस्टीयल इस्टेट (SC महिला, Obc महिला, सर्वसाधारण, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ७ जटपुरा गेट (SC महिला, OBC पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ८ वडगाव (OBC महिला, OBC पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ९ नगिनाबाग (SC महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १० एकोरी (SC पुरुष, Obc महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ११ भानापेठ (ST महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १२ महाकाली (SC महिला, Obc महिला, सर्वसाधारण, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १३ बाबुपेठ (SC पुरुष, Obc महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १४ पठाणपुरा (भिवापूर) (SC महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १५ विठ्ठल मंदिर (Obc महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १६ हिंदुस्थान लालपेठ कॉलरी (Sc महिला, ST महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १७ डॉ . बाबासाहेब आंबेडकर (Sc पुरुष, St पुरुष, सर्वसाधारण महिला)

    निवडणुकीपूर्वी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात अनेक भावी नगरसेवकांनी मीच जनतेचा सेवक असा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता मात्र आज घोषित झालेल्या आरक्षणामुळे नगरसेवक होण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे. Chandrapur local body election ward reservation