Tag: Chandrapur Municipal Corporation corruption

  • Vipin Paliwal transfer demand | मनपा आयुक्त पालीवाल विरुद्ध माजी नगरसेवकाने पुकारला एल्गार

    Vipin Paliwal transfer demand

    Vipin Paliwal transfer demand : चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांची तात्काळ बदली करून त्यांची कठोर विभागीय चौकशी करण्याची मागणी जनविकास सेनेने केली आहे. संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख तसेच जनविकास सेनेचे इमदाद शेख,प्रफुल बैरम व अमोल घोडमारे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन लेखी पत्राद्वारे ही मागणी केली. आयुक्त पालीवाल यांनी अनेक कामांमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा जनविकास सेनेचा आरोप आहे.

    शासकीय आश्रमशाळेत अधिकाऱ्यांचा मुक्काम

    महानगरपालिकेत वाढलेला भोंगळ कारभार व भ्रष्टाचार याला मनपा आयुक्त पालीवाल जबाबदार असून त्यांच्या कारकिर्दीतील सर्व कामांची सखोल व निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याने त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी या भेटीच्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे करण्यात आली. मनपातील भोंगळ कारभार व भ्रष्टाचाराविरुद्ध लवकरच जनआंदोलन सुरू करण्यात येत असल्याची माहिती सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आली. (Chandrapur Municipal Corporation corruption)

    अमृत पाणीपुरवठा व भूमिगत गटार योजनेच्या भ्रष्टाचाराची तक्रार

    234 कोटी रुपयांच्या पहिल्या अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी फोडलेले रस्ते दुरुस्त करणे, काम पूर्ण झाल्यानंतर एक वर्षापर्यंत योजना चालवणे इत्यादी पूर्ण केलेली नसतांना कंत्राटदार मे. संतोष एजन्सीचे देयके देण्यात आली. 270 कोटी रुपयांच्या दुसऱ्या अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी मंजुरी घेताना अनेक नियमांना बगल देण्यात आली. नवीन अमृत भुमिगत गटार योजनेचे सुरुवातीला 450 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधील अधिकाऱ्यांना हाताशी धरून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयुक्त पालीवाल यांनी अंदाजपत्रकीय किमंतीत वाढ केली. सुमारे 450 कोटी रुपयांचे काम कंत्राटदाराला 506 कोटी रुपयांमध्ये देण्यात आले. या कामात कंत्राटदाराला सुरुवातीलाच 50 कोटी रुपयांचा लाभ पोहोचविला माजी नगरसेवक देशमुख यांचा आरोप आहे. (Corruption in Chandrapur projects)

    आयुक्तांचा भूतकाळ वादग्रस्त

    बल्लारपूर नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असतांना पालीवाल यांनी नगरपालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसात खोट्या तक्रारी केल्याचा आरोप होता. वर्धा नगरपालिकेत त्यांची कारकीर्द वादग्रस्त होती. त्यांच्याविरुद्ध शासनाकडे आजपर्यंत अनेक तक्रारी झालेल्या आहेत.

    चंद्रपूर महानगरपालिकेत अतिक्रमण काढतांना किंवा ब्ल्यु झोन मधील अवैध बांधकाम पडताना त्यांनी निवडक व भेदभावपूर्ण कारवाई केल्याचा आरोप आहे. निळ्या पूर रेषेच्या आतील अनेक मध्यमवर्गीयांची बांधकामे पाडण्यात आली. त्याचवेळी श्रीमंत व वजनदार लोकांच्या अवैध बांधकामांना संरक्षण दिल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. लोकसभागातून विविध उपक्रम राबवून जनमानसात प्रतिमा संवर्धन करणे व या प्रतिमेच्या आडून करोडो रुपयांचा मलिदा लाटणे ही आयुक्त पालीवाल यांची कार्यपद्धती असल्याचा देशमुख यांचा आरोप आहे.

  • Chandrapur Municipal Corporation corruption | चंद्रपूर मनपाच्या भ्रष्ट कारभाराची ईडी कडे तक्रार

    Chandrapur Municipal Corporation corruption

    Chandrapur Municipal Corporation corruption : चंद्रपूर महानगरपालिकेतील आर्थिक गैरव्यवहारांवर तीव्र प्रकाश टाकत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वाखाली आज प्रवर्तन संचालनालय (ईडी) मुख्यालय, दिल्ली येथे तक्रार अर्ज सादर करण्यात आला.

    खड्ड्यात बसून चंद्रपुरात सत्याग्रह आंदोलन

    या तक्रारीत महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यांच्या कार्यकाळात 1,000 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या विविध योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

    प्रमुख आरोप:

    • अमृतपाणी योजना फेस 1: टेंडर प्रक्रियेत अपारदर्शकता व अपूर्ण कामांसाठी पूर्ण पेमेंट.
    • अमृत कलश योजना 2: अपूर्ण कामे असूनही निधीचा दुरुपयोग.
    • कचरा संकलन व दलित वस्ती सुधारित योजना: फसव्या निविदा प्रक्रियेमुळे सरकारी निधीची हानी.
    • फाउंटन घोटाळा : निविदा प्रक्रियेत अपारदर्शकता.
    • शहर सौंदर्यीकरणासाठी काढण्यात आलेल्या छोट्या निविदा: निधीचा अपव्यय.
    • ड्रेनेज सिवर घोटाळा

    जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “विपिन पालीवाल यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या प्रत्येक मोठ्या योजनेत भ्रष्टाचाराचे स्पष्ट पुरावे समोर आले आहेत. टेंडर प्रक्रिया पारदर्शकतेने न होणे, अपूर्ण कामांसाठी संपूर्ण निधी देणे आणि जनतेच्या पैशांचा अपव्यय करणे हे त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख गैरव्यवहार आहेत. हा केवळ आर्थिक भ्रष्टाचार नसून, चंद्रपूरच्या नागरिकांच्या विश्वासाला फसवणूक आहे.” (Chandrapur Municipal Commissioner scam)

    ईडीकडून मिळाले आश्वासन:
    तक्रारीच्या सादरीकरणानंतर ईडी अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर तातडीने लक्ष घालून चौकशी सुरू करण्याचे आश्वासन दिले.

    प्रमुख मागण्या:

    1. चंद्रपूर महानगरपालिकेतील सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी.
    2. महानगरपालिकेच्या सर्व योजनांचे लेखापरीक्षण (Audit) करण्यात यावे.
    3. दोषी अधिकारी विपिन पालीवाल आणि इतर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

    तक्रार सादर करताना आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्यासोबत युवा जिल्हाध्यक्ष राजू कूडे, आदित्य नंदनवार, आणि रोहन गुर्जेवार उपस्थित होते. परंतु, नेतृत्वाच्या आघाडीवर मयूर राईकवार यांनी अत्यंत प्रभावीपणे या मुद्द्याला वाचा फोडली.

    जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी सांगितले की, “चंद्रपूरच्या जनतेच्या पैशांची ही लूट थांबवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ. हा केवळ एक राजकीय लढा नाही, तर चंद्रपूरच्या सामान्य जनतेच्या हक्कांचा लढा आहे.”

    आम आदमी पक्षाच्या वतीने हा लढा पुढेही सुरू राहील आणि चंद्रपूरच्या जनतेच्या प्रत्येक पैशाचा हिशोब मागितला जाईल.