Tag: Chandrapur MNS news

  • Rahul Balamwar MNS Chandrapur । मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवारांचा मोठा निर्णय! ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष सूरज शेंडे पदमुक्त

    Rahul Balamwar MNS Chandrapur

    Rahul Balamwar MNS Chandrapur : चंद्रपूर/ब्रह्मपुरी – चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वात संघटना वाढीचे काम जोमात सुरु आहे, मात्र संघटन वाढीमध्ये अडथळा व पक्षाच्या हितास बाधा आणणारे विरुद्ध बालमवार यांनी शिस्तभंगाची कारवाई करीत पदावरून हकालपट्टी केली आहे.

    चंद्रपूर भाजपात गटबाजीचे ग्रहण

    मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्याकडे वरोरा, चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राची जबाबदारी आहे, या भागात मनसेचे काम व संघटन वाढी चांगली सुरु आहे, ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष सूरज शेंडे यांनी पक्षविरोधी काम केल्याने बालमवार यांनी शेंडे याना पदमुक्त केले आहे. तसे पत्र आज २१ नोव्हेम्बर रोजी बालमवार यांच्याकडून जारी करण्यात आले आहे.

    तात्काळ पदमुक्त

    पक्षविरोधी काम करण्याच्या कृतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमी आक्रमक असतात, जर कुणी पक्षाच्या हिताला बाधा पोहचेल असे काम केल्यास त्याला सरळ घरचा रस्ता दाखवा असे आदेश आहे. त्या आदेशाला अनुसरून मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष सूरज शेंडे यांना तात्काळ पदमुक्त केले आहे. पक्षासोबत प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मनसे नेहमी न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र विरोधात काम केल्याने तात्काळ कारवाईचा बडगा शेंडे यांच्यावर पक्षाच्या वतीने बालमवार यांनी उगारला आहे.

  • MNS expansion in Chandrapur slum area । जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे एकमेव पर्याय, अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेशाचा धडाका

    MNS expansion in Chandrapur slum area

    MNS expansion in Chandrapur slum area : चंद्रपूर २ सप्टेंबर २०२५ :- जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक बांधणी विखूरली असली तरी काही मनसे पदाधिकारी पक्षाच्या संघटन बांधणीला महत्व देऊन पक्षात विविध राजकीय सामाजिक कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश करून घेण्याचा सपाटा चालवीत आहे, दरम्यान चंद्रपूर शहरातील झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाकाली कॉलरी परिसरातील प्रकाश नगर येथे विकास कामे झाली नसल्याने दुर्लक्षित या परिसरात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे हा एकमेव राजकीय पक्ष कामं करू शकतो व मनसेचे पदाधिकारी हे आमचे सगळे कामं करतील हा विश्वास ठेऊन काही तरुणांनी मनसेत प्रवेश केला.

    नागरिकांनो सतर्क रहा, इरई धरणाचे ७ दरवाजे उघडले

    कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचं नेतृत्व

    या वार्डातील कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात शेकडो युवक व महिलांचा मनसेत पक्ष प्रवेश घेण्यात आला. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळाबांधे, सुनील गुढे, रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, महिला सेना अध्यक्षा वर्षा बोंभले व इतर मनसे पदाधिकारी उपस्थित होते. MNS Expansion Chandrapur

    येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मनसेचे उमेदवार मोठ्या प्रमाणात उभे करण्यासाठी शहरातील वार्डावार्डात मनसे पदाधिकारी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम राबवित असून शहरातील मागास व कामगार वर्ग असलेल्या प्रकाश नगर येथे मनसेची शाखा धुमधडाक्यात उदघाटन करण्यात आली, यावेळी मनसे जिल्हा कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित वार्डवासी यांना दुपट्टे टाकून मनसेत प्रवेश घेतला,

    mns chandrapur

    यावेळी मनसे कार्यकारणी जाहीर करण्यात आली, यामध्ये शाखाध्यक्ष साहिल खान, शाखा संघटक ज्ञानेश्वर बांसोड़, सचिव सिद्धार्थ नायक, उपाध्यक्ष भीमराव वनकर, कोषाध्यक्ष सुरेश सिंहठाकुर, सदस्य अंकित मालाकार कन्हैया, आकाश मालाकार, छाया ठाकुर, राजश्री सिद्धार्थ नायक, तृप्ति भीमराव, सरोज यादव, देव कुमार, सोहेल शेख, आसिफ शेख, फैजान शेख, ईरफान शेख, अशफाक खान इत्यादीनी महाराष्ट्र सैनिक म्हणून पदभार स्वीकारला.

  • MNS Numerous youth join party । स्थानिक स्वराज्य निवडणुकीत मनसेची धडक तयारी – युवकांचा उत्स्फूर्त प्रवेश

    MNS Numerous youth join party

    MNS Numerous youth join party : राजुरा – जिल्ह्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून होत आहे अश्यातच पक्षाच्या बैठकीचे आयोजन ग्रामीण क्षेत्रात सुरू आहे, त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा मागे नसून ग्रामीण क्षेत्रात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, उमाशंकर तिवारी, जनहीत जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे यांचे जिल्हा दौरे सुरू आहे.

    जरांगे पाटलांच्या प्रतिमेला जोड्यांचा प्रसाद

    राजुरा तालुक्यातील गोयेगाव व आजूबाजूच्या परिसरातील गावामधून आलेल्या युवकांनी दिनांक 25 ऑगस्ट रोज सोमवारला गोयेगाव येथील हनुमान मंदिर परिसरातील खुल्या मैदानात मनसेत प्रवेश केला. यावेळी गोयेगाव गावातील आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य यासंह माजी पोलीस पाटील उपस्थित होते. MNS youth joining in Rajura taluka

    आगामी निवडणुकीत मनसेला फायदा

    चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा भद्रावती या क्षेत्रात मनसेचा प्रभाव असल्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसेने उमेदवार दिले तर जिल्हापरिषद मध्ये मनसेचं खातं उघडू शकतं, त्यामुळे मनसेच्या दुसऱ्या फळीतील सर्व मनसे पदाधिकारी हे कामाला लागले आहे.

    या धर्तीवर राजुरा तालुक्यातील गोयेगाव येथे शेकडो युवकांनी मनसेत प्रवेश घेतला, यावेळी सर्व मनसे पदाधिकारी यांनी उपस्थित महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन करून पक्ष संघटनेला मजबूत करण्याचे व स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये आपले लोकप्रतिनिधी निवडून आणण्याचे आवाहन केले.