Tag: chandrapur local news

  • Congress workers joining BJP । नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घुग्गुस कांग्रेसला धक्का; आमदार जोरगेवारांच्या नेतृत्वावर विश्वास

    Congress workers joining BJP

    Congress workers joining BJP : घुग्गुस २१ नोव्हेम्बर (News३४) – आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वातील विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत घुग्घूस परिसरातील काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रवेशामुळे घुग्घूस व परिसरातील राजकारणात नवीन समीकरणे निर्माण झाली आहेत. पक्षाचा दुपट्टा टाकून सर्व नव्या सदस्यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी पक्षात स्वागत केले आहे.

    Read Also : चंद्रपुरात १७ वर्षीय विद्यार्थ्यांचा मानसिक छळ, गळफास घेत केली आत्महत्या

    यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, घुग्घूस शहर अध्यक्ष संजय तिवारी, विवेक बोढे, महामंत्री नामदेव डाहुले यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, घुग्घूस आणि चंद्रपूर शहराचा सर्वांगीण विकास हा आपला एकमेव ध्यास आहे. पक्षात प्रवेश करणे ही फक्त सदस्यता नव्हे, तर विकासाच्या प्रवासात सहभागी होण्याची संधी आहे. Congress workers joining BJP

    ते पुढे म्हणाले, पक्ष कोणताही असो, प्रत्येक कार्यकर्ता सामाजिक बांधिलकी जपत काम करत असतो. पण विकासाची गती वाढवायची असेल, जनतेपर्यंत योजना पोहोचवायच्या असतील आणि प्रामाणिकपणे संघर्ष करायचा असेल तर भाजप हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे तुमच्या प्रवेशामुळे घुग्घूसमधील भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. नव्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेची माहिती देण्यात आली. घुग्घूस नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्ष प्रवेशाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थानिक राजकीय वर्तुळात या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

  • boy drowns during Ganesh immersion । चंद्रपूर गणेश विसर्जन दु:खद अपघात, १८ वर्षीय तरुणाचा इरई नदीत बुडून मृत्यू

    boy drowns during Ganesh immersion

    boy drowns during Ganesh immersion : चंद्रपूर – ७ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर शहरात ६ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन पार पडलं, मात्र या आनंद व उत्साहाच्या वातावरणात विघ्न आलं, दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीत गणेश विसर्जन करताना १८ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ७ सप्टेंबर रोजी आपत्ती व्यवस्थापन व पोलीस कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबवित मुलाचा मृतदेह बाहेर काढला. १८ वर्षीय दीक्षांत राजू मोडक असे मृतकाचे नाव आहे.

    चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    चंद्रपूर व शहरातील इतर भागात गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात सुरु होते, दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भटाळी पूल इरई नदीच्या पात्रात सुद्धा विसर्जन सुरु होते, बेताल चौक दुर्गापूर मध्ये राहणारा १८ वर्षीय दीक्षांत राजू मोडक हा आपल्या घरी असताना दुपारी त्याच्या मित्राने फोनद्वारे गणेश विसर्जनाला जाऊ असे म्हणत बोलाविले, ते दोघेही घराजवळील बावणे यांच्या गणेश विसर्जनाला गेले.

    शोधमोहिमेत मिळाला मृतदेह

    दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान भटाळी पुलावर इरई नदीच्या पात्राजवळ मित्र व इतर नदी पात्रात उतरले असता दीक्षांत व एकाचा तोल गेला, त्याचवेळी दुसऱ्या मुलाला वाचविण्यास यश आले मात्र दीक्षांत बुडाल्याने तो पाण्याबाहेर आला नाही, तात्काळ याबाबत पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. बचाव पथकाने दीक्षांत चा शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही. रात्र झाल्याने पोलिसांनी शोधमोहीम थांबविली. Irai river drowning incident during Ganesh immersion

    ७ सप्टेंबर रोजी पुन्हा शोधमोहीम राबवली असता सकाळी १० वाजताच्या सुमारास शोध पथकाला दीक्षांत चा मृतदेह मिळाला, दीक्षांत च्या मृत्यूने दुर्गापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुर्गापूर पोलिसांनी याप्रकरणी मार्ग दाखल केला आहे.

  • District stadium swimming pool coach controversy । चंद्रपूर जिल्हा स्टेडियम स्विमिंग पूल वाद! प्रशिक्षकाच्या गैरवर्तनामुळे विद्यार्थ्याचे नुकसान?

    District stadium swimming pool coach controversy

    District stadium swimming pool coach controversy : चंद्रपूर (२५ ऑगस्ट २०२५) – शहर जिल्हा स्टेडियममधील जलतरण तलावात प्रशिक्षक म्हणून काम करणाया श्रीकांत बल्की यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी केलेल्या गैरवर्तनामुळे स्पर्धे दरम्यान शालेय विद्यार्थ्याचे नुकसान झाले आहे. येथे आलेल्या दुसया स्विमींग प्रशिक्षकाशी झालेल्या वादात शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमकी दिल्यामुळे प्रशिक्षक श्रीकांत बल्की वर कार्रवाई करण्याची मागणी आयोजित पत्रकार परिषदेत राकेश कुमार रॉय आणि पालक अनिल झाडे यांनी केली आहे.

    NHM कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खासदार धानोरकर यांचा पाठिंबा

    सध्या श्रीकांत बल्की आणि राकेश कुमार रॉय दोघेही जिल्हा स्टेडियमच्या स्मिमींग पुल येथे प्रशिक्षणार्थींना पोहण्याचे प्रशिक्षण देतात. जिल्हा स्टेडीअम वर जिल्हास्तर वर आणि महानगरपालिके कडून आंतरशालेय जलतरण स्पर्धा सुरू आहे. येथे, खेळाडू विद्यार्थ्यांची शासन मार्फत नोंदणी करण्यात आली आहे. रविवार २४ ऑगस्ट रोजी शहरातील एका शाळेतील 13 वर्षीय विद्यार्थ्याची जलतरण स्पर्धा होती. District stadium swimming coach threat controversy

    शिवीगाळ व मारण्याची धमकी

    शाळेने या स्पर्धेसाठी विद्यार्थ्याची ऑनलाइन नोंदणी केली होती. परंतु रविवारी हा विद्यार्थी स्पर्धेसाठी स्विमिंग पूलमध्ये पोहोचला आणि स्पर्धेची तयारी करत होता. तेव्हा प्रशिक्षक बल्की यांनी स्पर्धा पोर्टलवर त्याचे नाव नोंदणीकृत नसल्याने तो स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही असे सांगून विद्यार्थ्याला निराश केले. यादरम्यान, शाळेचे शिक्षक, प्रशिक्षक राकेश रॉय प्रशिक्षक श्रीकांत बल्की यांच्याकडे पोहोचले आणि कारण विचारले असता, बल्की यांनी दोघांनाही शिवीगाळ केली आणि मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप राकेशकुमार रॉय यांनी पत्रकार परीषदेत केला.

    यादरम्यान, प्रशिक्षक बल्की यांच्या चुकीच्या वर्तनामुळे पालक अनिल झाडे यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
    पत्रकार परीषदेत राकेश कुमार रॉय, अनिल झाडे, मंजुषा झाडे, सुनीता टोंगे, पल्लवी वानखेडे हे उपस्थित होते.

  • chandrapur local news | चंद्रपुरात महिला व मुलींवर हल्ला

    chandrapur local news

    chandrapur local news : आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या सतर्कतेमुळे आणि पुढाकारातून बाबूपेठ परिसरात दहशत निर्माण करणारा एक अज्ञात मनोरुग्ण (अंदाजे 30-32 वर्ष) स्थानिक युवकांनी पकडून सिटी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

    बाबूपेठ परिसरात काही दिवसांपासून एका 30-32 वयोगटातील मनोरुग्णाने नागरिकांमध्ये दहशत पसरवली होती. हा मनोरुग्ण महिलांवर, विशेषतः शाळकरी मुलींवर पाळत ठेऊन अचानक हल्ला करत होता. हातात दांडके घेऊन अश्लील शिवीगाळ करणाऱ्या या व्यक्तीविरुद्ध स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

    चंद्रपुरात अमित शाह यांच्या प्रतिमेला आंबेडकरी जनतेने हाणल्या चपला


    या घटनेची माहिती आप पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांना मिळताच त्यांनी तात्काळ रामनगर पोलिस स्टेशनला माहिती दिली. मात्र, सदर व्यक्ती रोड क्रॉस करून सिटी पोलिस स्टेशन हद्दीत गेल्यामुळे रामनगर पोलिसांनी कारवाई करण्यास नकार दिला. Chandrapur local news

    परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राजू कुडे यांनी वॉर्डातील तरुणांच्या मदतीने त्या मनोरुग्णाला पकडले आणि सिटी पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणाला सदर व्यक्तीची ओळख पटत असेल तर त्यांनी सिटी पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा.

    या प्रसंगी राजू कुडे यांनी भविष्यातील संभाव्य दुर्घटना टळल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि सिटी पोलिस स्टेशनच्या पी. आय. प्रभावती एकुरके मॅडम यांचे आभार मानले.

    हा प्रकार पोलिस आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे निकाली निघाला असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये दिलासा मिळाला आहे.