Tag: Chandrapur latest updates

  • Jan Suraksha Bill black law । ‘काळा कायदा’ तात्काळ रद्द करा!, महाविकास आघाडीचा हल्लाबोल

    Jan Suraksha Bill black law

    Jan Suraksha Bill black law : चंद्रपूर, १० सप्टेंबर २०२५ – महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या जनसुरक्षा विधेयक २०२४ विरुद्ध आज चंद्रपूरच्या गांधी चौकात महाविकास आघाडीने तीव्र आंदोलन केले. हे विधेयक लोकशाहीच्या मूल्यांना मुठमाती देणारे असून, हुकूमशाही प्रवृत्तीला खतपाणी घालणारे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विरोधकांनी या कायद्याला ‘काळा कायदा’ असे ठामपणे घोषित केले आहे.

    या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश रामू तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे सुरेश पचारे, कम्युनिस्ट पक्षाचे अरुण भेलके, तसेच महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    घुग्गुस मध्ये जनसुरक्षा विधेयक विरोधात महाविकास आघाडी चे निदर्शने

    जनतेचा आवाज दडपणार

    आंदोलनात सहभागी सर्व मान्यवरांनी एकमुखाने सांगितले की, “राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा कायदा घाला घालतो. आधीच अस्तित्वात असलेल्या कायद्यांद्वारे सुरक्षा व्यवस्थापन शक्य आहे; त्यामुळे नवीन कायद्याची गरजच नव्हती. हा कायदा नक्षलवाद्यांच्या नावाखाली जनतेचा आवाज दडपण्यासाठी वापरण्यात येणार आहे. Maha Vikas Aghadi protests Jan Suraksha Bill

    सरकारविरोधात बोलणाऱ्यांना, पत्रकारांना तुरुंगात टाकण्यासाठी या कायद्याचा गैरवापर होईल. जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. जर हा कायदा मागे घेतला गेला नाही, तर राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. 

  • Bhaigiri in Chandrapur । गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला युवकाने माजवली दहशत, चंद्रपूर शहर पोलिसांची तात्काळ कारवाई

    Bhaigiri in Chandrapur

    Bhaigiri in Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपुरातील युवकांना भाईगिरीचे वेड लागले असून याचे अनेक उदाहरणे आपल्याला रस्त्यालगत नेहमीच दिसत असतात, दारू पिऊन कुठेही रस्त्यावर हातात शस्त्र घेऊन दहशत माजविणे हि बाब आता सामान्य झाली आहे, चंद्रपूर शहरात सुद्धा असाच एक प्रकार समोर आला. चंद्रपुरातील चौपाटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामाला तलाव जवळ एक युवक आपल्या हातात धारदार शस्त्र घेऊन लोकांना धमकावीत होता, काही वेळात शहर पोलिसांनी त्या युवकाच्या मुसक्या आवळल्या.

    चंद्रपूर जिल्ह्यात ५४० इसमांवर हद्दपारीची कारवाई

    गणेश उत्सव शांततेत पार पाडावा यासाठी शहर पोलीस प्रयत्न करीत आहे, यासाठी शहरातील शांतता भंग करणारे ५४० गुन्हेगारी वृत्ती असलेल्या इसमांना आधीच पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे, तरी सुद्धा गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पूर्व संध्येला शहरात धारदार शस्त्र घेऊन नागरिकांना एक युवक धमकावीत असल्याचा प्रकार घडला.

    धारदार चाकू जप्त

    चंद्रपूर शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे रामाला तलाव जवळ त्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले, त्या युवकाच्या ताब्यातील चारचाकी वाहन क्रमांक एमएच३४ AA ६२९१ व वाहनात वाहन चालकाच्या सीटच्या खाली एक धारदार चाकू पोलिसाना मिळाला, सदर चाकू त्या आरोपी इसमाचा आहे असे स्वतः त्याने कबूल केले असे त्याने कबुली दिली. Chandrapur law and order

    आरोपीचे नाव २९ वर्षीय साहिल विश्वजितकुमार सिंग राहणार लालपेठ कॉलरी क्रमांक ३ असे असून त्याच्यावर शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम ४,२५ भारतीय शस्त्र अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत शहर पोलिसांनी ५ लाख १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, भावना रामटेके, सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, निकेश ढोंगे, जावेद सिद्दीकी, कपूरचंदं खरवार, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, रुपेश पराते. सारिका गौरकार व दीपिका झिंगरे यांनी केली.

  • Erai dam gates opened alert villages Chandrapur । मुसळधार पावसाने चंद्रपूर जिल्हा बेहाल, अनेक मार्ग बंद

    Erai dam gates opened alert villages Chandrapur

    Erai dam gates opened alert villages Chandrapur : चंद्रपूर (२ सप्टेंबर २०२५) – मागील २४ तासात चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे, जिल्ह्यातील अनेक मार्ग पावसामुळे बंद करण्यात आले असून, जिल्ह्यात एकूण सरासरी ५० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. इरई धरणाचे सातही दरवाजे उघडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

    राजुरा विधानसभा क्षेत्रातील बोगस मतदार व ६१ लाख रुपयांचा वाली कोण?

    १ सप्टेंबर रोजी सायंकाळपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती, या पावसामुळे इरई धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने २ सप्टेंबर ला सकाळी ७ वाजता धरणाचे ३ दरवाजे १ मीटर ने तर ४ दरवाजे ०.७५ मीटरने उघडण्यात आले आहे.

    इरई धरणाचे दरवाजे उघडल्याने या गावांना सतर्कतेचा इशारा

    पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना आणि इतर इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. असे आवाहन चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.

    अनेक मार्ग बंद, प्रशासनाची बचाव मोहीम

    कारवा-बल्लारपूर रोड वरील नाल्याला आलेल्या पुरामुळे १२ नागरिक अडकले होते, याबाबत बल्लारपूर प्रशासनाला माहिती मिळताच रात्री १२ वाजता तहसील कार्यालय बल्लारपूर मध्ये उपलब्ध असलेले बचाव साहित्य सोबत घेत कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुखरूपपणे कारवा मधील सोमाजी नाईक आश्रम शाळा मध्ये थांबण्याची व्यवस्था केली त्यांनतर तहसील कार्यालयाच्या वाहनाने नागरिकांना बल्लारपूर मध्ये पोहचविण्यात आले. Chandrapur heavy rain rescue operation update

    road close

    मार्ग बंद

    चंद्रपूर, धानोरा ते भोयेगाव मार्गावरील पुलावर पाणी आल्याने सदर मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे, मूल तालुका – फिस्कुटी ते चिचाळा नदी पुलावरून पाणी जात असल्याने सदर मार्ग बंद, चिरोली केळझर मार्ग बंद, चिंचोली गावाजवळील रेल्वे बोगद्यात पाणी असल्यामुळे काटवन ते मूल मार्ग बंद, काटवन ते मुल येण्याकरिता मारोडा हा पर्यायी मार्गाचा नागरिकांनी अवलंब करावा. वरोरा तालुका – कोसरसार ते बोडखा रस्ता बंद, अर्जुनी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने चारगाव ते खुर्द अर्जुनी मार्ग बंद, मौजा सुर्ला ते जामगाव बु मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद. भद्रावती तालुका – मौजा गुंजाला नाल्यावर पाणी जास्त वाढलेले असून नाल्या शेजारील काही घरात पाणी शिरलेलं आहे, मौजा गुंजाला कचराळा वाहतूक रस्ता बंद. Chandrapur musaldhaar rain impact villages

    flood alert

    कोरपना तालुका – इरई भारोसा मार्ग बंद, भोयेगाव धानोरा मार्ग पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद करण्यात आला आहे. बल्लारपूर तालुका – पळसगाव-कवडजी मार्गावरील रंगीत यांच्या शेताजवळील पूल तीन फूट उंच पाण्याने डुबून असल्याने रहदारी बंद करण्यात आली आहे. इरई नदीवरील पुलावर पाणी आल्यामुळे मौजा चारवट माना चंद्रपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. काटवली ते बामणी मार्ग बंद.