Tag: Chandrapur illegal liquor seizure

  • Illegal liquor transport raid updates । चंद्रपूरकरांच्या पोटात बनावट दारू?

    Illegal liquor transport raid updates

    Illegal liquor transport raid updates : चंद्रपूर, दि. 21 नोव्हेम्बर (News३४) :  राज्य उत्पादन शुल्क विभाग, वरोरा निरीक्षक पथकाने येनसा ते सोसायटी (मजरा) जाणाऱ्या रस्त्यावर कारवाई करून चारचाकी वाहनातून अवैधरित्या वाहतूक होत असलेला परराज्यातील व बनावट विदेशी मद्यसाठा जप्त केला. जप्त मद्य आणि वाहनाची एकूण किंमत अंदाजे 6 लक्ष 40 हजार इतकी असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    Read Also : नगराध्यक्षपदासाठी शिवसैनिकांचा आमना-सामना

    मिळालेल्या गुप्त माहितीनुसार,  बुधवारी सायं. 5 वाजताच्या सुमारास नागपूर-चंद्रपूर हायवेवर वरोरा तालुक्यात ही कारवाई करण्यात आली. शॉवरलेट कंपनीच्या ग्रे रंगाच्या चारचाकी वाहन क्रमांक MH49-AS-0647 ची तपासणी करण्यात आली असता वाहनाच्या डिक्कीत रॉयल स्टॅग ब्रँडच्या 180 मिलीच्या 480 बॉटली, रॉयल चॅलेंज ब्रँडच्या मध्यप्रदेश निर्मित 750 मिलीच्या 24 बॉटली (प्रथमदर्शनी बनावट) असा परराज्यातील व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित विदेशी मद्यसाठा आढळून आला.

    या प्रकरणी मनीष नंदकीशोर जयस्वाल (वय 48, नागपूर),  विशाल शंभू मंडळ (वय 28, सावनेर, जि. नागपूर),  सतीश नामदेव देवकर (वय 31, वरोरा, जि. चंद्रपूर) यांना अटक करण्यात आली असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Illegal liquor transport raid updates

    ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त गणेश पाटील आणि अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत निरीक्षक प्रवीण मोहतकर, दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार, प्रमोद रजोते, हर्षराज इंगळे, सागर दिडसे, जवान विलास महाकुलकर (वाहनचालक), तसेच जवान जगदीश मस्के, जितेंद्र आनंद, मंगेश कुयटे आणि अमोल भोयर यांचा सहभाग होता.

    सदर प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा हे करीत आहेत.

  • Chandrapur LCB liquor raid । चंद्रपूर LCB ची कारवाई; ₹6.82 लाखांचा अवैध दारूचा साठा जप्त

    Chandrapur LCB liquor raid

    Chandrapur LCB liquor raid : चंद्रपूर: चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवैध देशी दारूची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 38 पेट्या देशी दारू आणि एक टाटा सुमो वाहन असा एकूण ₹6,82,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    ४ तासात आरोपी ताब्यात, वाहनचालकाने रचला जबरी चोरीचा कट

    मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 02/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाणे कोरपना हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना एका टाटा सुमो वाहनातून अवैधरीत्या देशी दारू विक्रीसाठी नेली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. LCB Chandrapur operation news

    या माहितीच्या आधारे पोलिसांनी माथा फाटा, कोरपना रोड येथे सापळा रचला आणि संबंधित टाटा सुमो वाहन (क्र. MH 14 CG 6143) ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये देशी दारूच्या 90 एम.एल.च्या 38 पेट्या (एकूण 38,000 नीप) आढळून आल्या. या दारूची अंदाजे किंमत ₹1,52,000/- आहे. यासह, दारू वाहतुकीसाठी वापरलेले अंदाजे ₹5,30,000/- किमतीचे टाटा सुमो वाहनही जप्त करण्यात आले. Chandrapur crime news liquor

    आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

    या प्रकरणी खालील चार आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे कोरपना येथे गुन्हा क्रमांक 240/2025 कलम 65(अ)(ई), 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

    1. प्रफुल पुरुषोत्तम खेलुरकर, वय 25 वर्ष, रा. आंतरगाव, ता. कोरपना
    2. प्रशांत नारायण मेश्राम, वय 25 वर्ष, रा. वानसडी
    3. अमर व्हेट्टी, रा. कुराई, ता. वणी, जि. चंद्रपूर
    4. आरिफ शेख, रा. कुराई, ता. वणी, जि. चंद्रपूर

    कारवाईत सहभागी पथक

    ही यशस्वी कारवाई राजुरा व गडचांदूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पो.हवा. स्वामीदास चालेकर, पो.हवा. किशोर वैरागडे, पो.शी. गोपीनाथ नरोटे, पो.शी. शेखर माथनकर, आणि चालक पो.शी. ऋषभ बाराशिंगे यांनी पार पाडली.

    जप्त केलेल्या मुद्देमालासह आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस ठाणे कोरपना यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस ठाणे कोरपना या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहे.