Tag: Chandrapur heavy rain news

  • Chandrapur Weather Update । मुसळधार पावसाचा तडाखा: चंद्रपूर जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

    Chandrapur Weather Update

    Chandrapur Weather Update :चंद्रपूर २५ सप्टेंबर २०२५: जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इरई धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे एकूण पाच दरवाजे उघडण्यात आले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

    चंद्रपुरात भूकंप? नेमकं काय घडलं?

    इरई धरणाची स्थिती आणि नदीकाठच्या गावांना सूचना

    सध्या इरई धरणाची पाणी पातळी २०७.३७५ मीटर पर्यंत पोहोचली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यासाठी आधी तीन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले होते. आता, आणखी दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. Irai Dam Water Release Chandrapur

    प्रशासनाने नदीकाठच्या गावांना विशेषतः सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी नदीपात्र ओलांडू नये आणि जनावरांना नदीकाठी सोडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व संबंधितांनी ही माहिती त्यांच्या संपर्कातील सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    मुसळधार पाऊस: शाळा-महाविद्यालये बंद

    जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज (२५ सप्टेंबर २०२५) जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. ज्या शाळा सकाळी सुरू झाल्या आहेत, त्यांना सकाळी ११ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सूचना सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी (BDO) आणि शिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. Chandrapur Schools Holiday Rain

    नागभीड तालुक्यात दुर्देवी घटना: एकाचा मृत्यू

    नागभीड तालुक्यातून एका दुर्देवी घटनेची माहिती समोर आली आहे. नागभीड तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी असलेले धर्मा देवाजी शेंडे (वय अंदाजे ६५) यांचा त्यांच्या घराशेजारील विहिरीवर असलेल्या मोटरपंपाला विजेचा धक्का (करंट) लागून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली. धर्मा शेंडे यांच्या नावे गोविंदपूर येथे शेती आहे. तहसीलदार नागभीड यांनी या घटनेची माहिती दिली आहे.

  • chandrapur flood latest update |मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थिती; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    chandrapur flood latest update

    chandrapur flood latest update : चंद्रपूर १३ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे, यामुळे वर्धा व इरई नदीचा जलस्तर वाढला असून अनेक ठिकाणी पुराचा धोका वाढला आहे, इरई धरण परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

    पुरात अडकली बस, बसमध्ये होते ७० विद्यार्थी

    इरई धरणाचे ७ दरवाजे उघडले

    चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने धरणाचे सातही दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहे. यामुळे नदीकाठील पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना आणि इतर इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. पुलावरून पाणी जात असल्यास कुणीही पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, जनावरांना नदीकाठी चरण्यास सोडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. flood warning Errai dam villages

    जीर्ण इमारत कोसळली, २ मुली बचावल्या

    संततधार पावसामुळे बल्लारपूर शहरातील १०० वर्षे जुनी असलेली जीर्ण इमारतीचा मोठा भाग शुक्रवारी रात्री कोसळला, बल्लारपूर वस्ती विभागातील गांधी चौकाच्या नजिक असलेला गुप्ता यांच्या घराचा रस्त्याकडील पूर्ण भाग कोसळला. यावेळी मार्गावरून जात असलेल्या दोन मुली थोडक्यात वाचल्या. मलब्याखाली दबलेली काही दुचाकी वाहने अग्निशमन दलाच्या पथकांनी काढले आहे.अजूनही काही दुचाकी वाहने ढिगाऱ्याखाली दबलेली आहेत.या दुर्घटनेत कोणतीही वित्तहानी वा जिवीतहानी झालेली नाही. 100-year old building collapse in Ballarpur
    रस्ता बंद करून बॅरीगेटिंग करण्यात आले.त्या ठिकाणी १ सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले. इमारतीत राहणाऱ्या दोन कुटुंबांपैकी १ कुटुंब त्यांच्या नातेवाईकाकडे थांबले असून १ कुटुंबाची राहण्याची व्यवस्था लोक मंगल कार्यालयात केली आहे. जेसीबी आणि ट्रॅक्टर लावून मलबा काढण्याबाबत सूचन देण्यात आल्या. सदर इमारत खूप जुनी असल्याने अगदी जीर्ण झालेली आहे.

    बस पाण्यात

    दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी अंदाजे वेळ 18.15 वाजता चंद्रपूर आगाराची बस क्रमांक MH40 N 9426 भादुर्ली ते मुल येत असताना रेल्वेपटरी खालील बोगद्या मध्ये गाडी आली असता अंदाजे एक ते दोन फूट पाणी असल्याने बस निघू शकेल असे समजून चालकाने गाडी काढण्याचा प्रयत्न केला असता सायलेन्सरला पाणी लागल्यामुडे गाडी बंद पडली व पाऊस वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याने गाडीच्या रेडिएटर पर्यंत पाणी आले असून गाडी अडकून आहे. सदर गाडीत तीन प्रवासी प्रवास करत होते. सदर प्रवासी व चालक वाहक सुखरूप आहे.
    सदर घटना चालकाच्या निष्काळजी पणामुळे घडलेली आहे. घटनास्थळी आगार व्यवस्थापक, चंद्रपूर, विभागीय वाहतूक अधिकारी, सहाय्यक यंत्र अभियंता हे यांत्रिक कर्मचाऱ्यांसाह गाडी काढणायासाठी पोहोचले होते. chandrapur flood latest update

    bus in water

    ३ कामगारांचे रेस्क्यू

    आज दिनांक 13सप्टेंबर रोजी अंकुश डिव्हिजन तरफदार वय २८ राह. नरेंद्रपूर तालुका चामुर्शी जिल्हा गडचिरोली 2) आशिष आनंदलाल शहा, वय ३५, राह. लालपेठ चंद्रपूर, 3) शुभजीत शंकर देवनाथ वय ३१, राह. सुभाष ग्राम तालुका चामुर्शी जिल्हा गडचिरोली हे सर्व लॉईड मेटल कंपनीचे लेबर कंपनीचे पाणी पुरवठ्याचे काम करीत असताना म्हातारदेवी गावा जवळील वर्धा नदीला पूर आल्याने दि. 12.09.25 चे रात्री पासून नदीमध्ये अडकून होते. वरील अडकलेल्या लोकांना आज दिनांक 13.09.2025 रोजी चंद्रपूर जिल्हा पोलीस रेस्क्यू पथक मधील बोट चालक – पीएसआय अशोक गर्गेलवार, रेस्क्यू पथक मधील पोलीस हवालदार मनोज हांडे , उमेश बनकर, प्रमोद डोंगरे, गिरीश मरापे, वामन नक्षीने, लीलाधर करमे, राजाराम गायकवाड, सुमेध घडसे यांनी बोटच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले.

    rescue

    वरोरा : निमसडा मार्ग बंद झालेला आहे. निमसड्याचे 32 शाळेचे विद्यार्थी व 25 ग्रामस्थ अडलेले असून त्यांची व्यवस्था वर्धा पावर कंपनीमध्ये करण्यात आली आहे. वरोरा तालुक्यातील सोईत – कोसारा पुलावर 5 फूट पाणी आल्याने सदरचा मार्ग पूर्णतः बंद करण्यात आला आहे. road closure warnings flood

  • Irai dam gates opening alert villages । मुसळधार पावसामुळे इरई धरणाचे दरवाजे उघडले, नदीकाठावरील गावांना इशारा

    Irai dam gates opening alert villages

    Irai dam gates opening alert villages : चंद्रपूर ११ सप्टेंबर २०२५ – काही दिवसांची विश्रांती घेतल्यावर चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्याने जिल्ह्यातील काही भाग हा अस्तव्यस्त झाला आहे. मागील ३ दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरवात झाली. त्यामुळे वर्धा व इरई नदीचा जलस्तर वाढल्याने काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

    चंद्रपुरातील या शिक्षकांचा होणार सन्मान

    ग्रामीण व शहरी भागात पावसाचा जोर वाढल्याने वर्धा नदीचा जलस्तर वाढल्याने चंद्रपूर-भोयेगाव मार्ग पूर्णतः बंद झाला, यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ११ सप्टेंबर रोजी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने सदर मार्ग हा बंदच आहे. Chandrapur weather alert for rising river water levels

    ३ दिवसांपासून येत असलेल्या पावसाने इरई धरणाच्या पातळीत वाढ झाल्याने गुरुवारी ११ सप्टेंबर रोजी सकाळी इरई धरणाचे तीन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले होते. दुपारी पुन्हा दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा काही दरवाजे उघडण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने सूचित करण्यात आले आहे.

    नागरिकांनो सतर्क रहा

    इरई धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नदी काठावरील पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

  • Chandrapur bridge collapse due to heavy rain । चंद्रपूरात मुसळधार पावसाने पूल वाहून गेला; खासदार धानोरकर यांची मागणी काय?

    Chandrapur bridge collapse due to heavy rain

    Chandrapur bridge collapse due to heavy rain : चंद्रपूर : चंद्रपुरातील पठाणपुरा ते भिवापूर वॉर्डला जोडणारा झरपट नदीवरील पूल जोरदार पावसामुळे वाहून गेल्याने, स्थानिक MP Pratibha Dhanorkar खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पत्र पाठवून पुलाची उंची वाढवून नव्याने बांधकाम करण्याची सूचना केली आहे.

    वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

    हा पूल कोसळल्यामुळे पठाणपुरा आणि भिवापूर या दोन महत्त्वाच्या वॉर्डमधील नागरिकांचा थेट संपर्क तुटला आहे. यामुळे बाबुपेठ आणि भिवापूर वॉर्डमधून पठाणपुरात ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे. पायी चालणेही शक्य नसल्यामुळे, नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात वाढली आहे. Chandrapur bridge collapse news

    भाविकांसाठीही अत्यंत महत्त्वाचा

    या संदर्भात बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, “हा पूल केवळ वाहतुकीसाठीच नाही, तर चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली यांच्या यात्रेदरम्यान भाविकांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावरून मोठ्या संख्येने वाहतूक वळवली जाते, त्यामुळे हा पूल तातडीने आणि सुरक्षितपणे बांधणे आवश्यक आहे.”

    त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्तांना या गंभीर समस्येची दखल घेऊन, युद्धपातळीवर पुलाचे बांधकाम सुरू करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होईल आणि आगामी काळात महाकाली यात्रेदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.