Tag: Chandrapur flood news

  • flood relief shelter arrangements । 📢 चंद्रपूरकरांनो सतर्क राहा! पूरग्रस्तांसाठी मदत केंद्रे आणि आपत्कालीन क्रमांक जाहीर

    flood relief shelter arrangements

    flood relief shelter arrangements : चंद्रपूर 03 सप्टेंबर –  मुसळधार पावसामुळे ईरई धरणाचे सातही दरवाजे उघडण्यात आल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शहरातील काही ठिकाणी पूर सदृश परिस्थिती 2 सप्टेंबरच्या रात्री निर्माण झाली होती. त्यामुळे शहरातील 29 नागरिकांना मनपा आपत्ती व्यवस्थापन चमूने महात्मा ज्योतिबा फुले शाळेत हलवून त्यांच्या निवारा व भोजनाची व्यवस्था केली आहे, त्याचप्रमाणे ईरई नदीतुन मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी येत असल्याने जलशुद्धीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले असुन पाणीपुरवठा नियमित होतपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपुन वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. Chandrapur disaster management 

    व्यावसायिक पायलट होण्याची सुवर्णसंधी, राज्य सरकार देणार ३७ लाख रुपये

    2 सप्टेंबरच्या रात्री रहमत नगर व घुटकाला परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे या परिसरातील 29 नागरिकांना  मनपा आपत्ती व्यवस्थापन चमूने सुरक्षित स्थळी हलविले आहे.पुढील काही दिवस सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा असल्याने मनपा अधिकारी कर्मचारी 24 तास अलर्ट मोडवर असुन नदी पात्रा लगतच्या नागरिकांनी कुठलीही जोखीम न घेता जवळच्या मनपा शाळेत आश्रय घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेने केले आहे.

    मनपा शाळेत आश्रयास असलेल्या नागरिकांसाठी शाळेत जेवण,पिण्याचे पाणी,झोपण्याची सोय,आरोग्य व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या असुन या सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार प्रथमोपचार व औषधे देण्यात येत आहेत. तसेच पुराच्या पाण्याची पातळी कमी झालेल्या रहेमत नगर, फिल्टर प्लांट परिसरात साफ सफाई करुन ब्लीचिंग व लिंडेन पावडर टाकुन स्वच्छता करण्यात आली आहे. वाढते पाणी पाहता सर्वांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घेण्याचे तसेच आपातकालीन प्रसंगी 07172254614,07172259406 (101),8975994277,9823107101 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. flood relief shelter arrangements

    आपत्ती प्रसंगी या मनपा शाळांमध्ये घेता येईल आश्रय –


    महात्मा ज्योतिबा फुले प्राथ. शाळा, घुटकाळा वार्ड, डॉ. जाकिर हुसेन उर्दू प्राथ. शाळा, दादमहल वार्ड, शहिद भगतसिंग प्राथ. शाळा, भिवापूर वार्ड, लोकमान्य टिळक कन्या प्राथ. शाळा, पठाणपूरा रोड, लोकमान्य टिळक प्राथ. शाळा, काळाराम मंदीर, समाधी वार्ड, डॉ. राजेंन्द्र प्रसाद प्राथ. शाळा, भानापेठ वार्ड,महाकाली कन्या प्राथमिक शाळा, महाकाली मंदिर वार्ड, रामचंद्रनगर हिन्दी प्राथ. शाळा, जटपूरा वार्ड,सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक शाळा, जटपूरा वार्ड, स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा, वंडगाव वार्ड, लालपेठ कॉलरी मराठी प्राथ. शाळा, बंगाली कॉलनी, भिवापूर वार्ड,महाकाली कॉलरी प्राथ. शाळा, महाकाली कॉलरी, महात्मा गांधी कन्या प्राथ. शाळा, रैय्यतवारी वार्ड,पी.एम.श्री. सावित्रीबाई फुले उच्च प्राथ. व माध्यमिक शाळा, नेताजी चौक, बाबुपेठ

  • Chandrapur flood water enters 250 houses । अतिवृष्टीमुळे पडोली गावातील आमटा वॉर्डात 250 घरांना फटका, आमदार जोरगेवार यांचा दौरा

    Chandrapur flood water enters 250 houses

    Chandrapur flood water enters 250 houses : चंद्रपूर २ सप्टेंबर २०२५ – कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील पडोली येथील आमटा वॉर्ड परिसरात जवळपास 250 घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. या घटनेत नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने मदतकार्य सुरू असून नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत हलविण्यात आले आहे. दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी आज मंगळवारी अधिकाऱ्यांसह सदर परिसराची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.

    जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे एकमेव पर्याय, चंद्रपुरात मनसेचा पक्षप्रवेशाचा धडाका

    यावेळी तहसीलदार विजय पवार, बीडीओ संगीता भांगडे, भाजप नेते नामदेव डाहुले, मंडळ अध्यक्ष विनोद खेवले, नकुल वासमवार, राकेश पिंपळकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    नागरिकांचे नुकसान

    कालपासून चंद्रपूरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी शिरले असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह ग्रामीण भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पडोली येथील आमटा वॉर्डातील स्थितीचीही त्यांनी पाहणी केली. MLA Kishor Jorgewar Chandrapur flood relief efforts

    chandrapur flood relief efforts

    आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूलकित सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आवश्यक सूचना केल्या. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या तसेच संबंधित अधिकारी व प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

    सध्या सर्व प्रभावित नागरिकांची तात्पुरती व्यवस्था जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आली असून त्यांना जेवण, पाणी व इतर आवश्यक सुविधा पुरवल्या जात आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू होईल. प्रभावित नागरिकांना शक्य तितकी मदत व दिलासा मिळावा, यासाठी मी सातत्याने प्रशासनाशी समन्वय साधत आहे, असे आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.